Skip to main content

एक किस्सा - दगड आणि खड्डे

तसा मी 'कॉलेज' (रूढार्थाने) जिवनाचा फार काही उपभोग खर्‍या अर्थाने घेउ शकलो नाही, पॉलीटेक्नीक मध्ये शिकलो मी. आमची शाळा तांत्रिक शाळा असल्यामुळे, शाळेच्या अलिखित परंपरेप्रमाणे १०वी नंतर डिप्लोमाला, भागुबाई मफतलाल पॉलीटेक्निकला, अ‍ॅडमिशन घेतली... घेतली म्हणजे मिळाली. हे पॉलीटेक्निक मुंबैच्या टॉप ३ पॉलीटेक्निक मध्ये मोडत असल्यामुळे व्यवस्थापन त्याच्या 'प्रतिमे'साठी फार जागरूक होते. त्यामुळे नियम फारच कडक होते. कॅन्टीनमध्ये सिग्रेटी फुंकायला मनाई होती. तसेच नविन वर्ष चालू झाले की सगळे HOD कॅम्पसमध्ये फिरत असायचे, रॅगिंग होऊ नये म्हणून. असे बरेच काही कडक वातावरण.

नारायण सान्याल आणि काही प्रश्न...

Taxonomy upgrade extras

ज्या माणसाला मदत केली म्हणून डॉ. बिनायक सेन यांना अटक झाली होती त्याला, नारायण सान्याल, यांना आता सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिला आहे. त्या संबंधीची माहिती आजच्या वृत्तपत्रातून आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा दुवा इथे देत आहे.

http://timesofindia.indiatimes.com/india/Supreme-Court-grants-bail-to-N…

बातमी नीट वाचली. मात्र हे वाचल्यावर काही प्रश्न मनात आले. मूळातच एका नक्षलवाद्याला सुप्रिम कोर्टाने, शिक्षा भोगत असताना, जामिन दिला आहे ही एक महत्वाची आणि लक्षणिय बाब आहे. हा निर्णय देताना कोर्टाने काही बाबींचा विचार केला त्या अशा,

आपल्याला संकल्पनांची गरज आहे का ?

Taxonomy upgrade extras

प्रस्तुत संस्थळावर धर्म आणि आध्यात्मिकता या दोन गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभ्या करणारे चर्चाविषय अलिकडे लिहिले गेलेले आहेत. त्यांमधे उलटसुलट मते मांडली गेलेली आहेत. या दोन चर्चांशी थेट साधर्म्य नसलेली परंतु ( माझ्यामते) प्रस्तुत विवेचनाकरता याच्याशी संबंध जोडता येईल अशी आमीरखान च्या कर्यक्रमाबद्दलची चर्चा इथे झाली आहे/ होत आहे.

सुरवातीला मी एक डिस्क्लेमर देतो : मी स्वतःला धार्मिक प्रवृत्तीचा मानत नाही किंवा आध्यात्मिक प्रवृत्तीचा समजत नाही.

कविता .......उरल्या उपरेपणाच्या. ..

कविता .......उरल्या उपरेपणाच्या. ..

खरं तर आमच्याकडे
लिहीण्यासाठी
दाखवण्या बघण्यासाठी
ठोस असे काहीच नाही

ना चुलाण्याचा धूर
ना घुंगराचे छुन्नक गाणे
ना देवळातील हरी विठ्ठल गजर
ना अति किंवा अनावृष्टीचे
दणके फटके
ना वर्णाचे न धर्माचे
ना भाषेचे न असण्या नसण्याचे
पीळ कोणतेच

इकडे नव्यांना तर आम्ही
कधीच आपलं मानलं नाही
वर इथे राहून
तिकडचे कढ काढण्यात
लेखण्या झिजून गेल्या
हाताचे घट्टे भेगाळून गेले
मागच्या पुढच्या बटा
विरळ होत रुपेरी होत गेल्या
आम्हालाही चुकवून

आता हिंदकळणे फक्त
एकूणच सीमारेषांवर अधांतरी
त्यांनी पूर्वीच मिटली कवाडे

दोन चारोळ्या -

१.
अनोळखी वाटेवर क्षणभर

भेटुन जाई राजकुमार -

नाही दिसला पुन्हा जरी तो

ओढ तयाची का अनिवार !

२.
मिठीत तुझिया विसावतो मी -

म्हणू लाडके कसे तुला ?

चवळीची तू शेंग बारकी ,

दुधी टम्म मी फुगलेला !

.

टोपणनावे!

Taxonomy upgrade extras

इथली एकेक भन्नाट टोपणनावे, स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, ते टोपणनाव का घेतलेले आहे ह्याविषयीची माहिती मात्र भरभरुन देणे...
हे सगळे वाचून-बघून गंमत वाटली.
‘इतरांनी केवळ लिखाणातून आपल्याला जाणून घ्यावे, व्यक्तिगत माहितीच्या फंदात पडू नये’ असे का वाटत असावे? स्वत:ची माहिती इतरांना न देण्यामागे काय हेतू असतात?
आजवर खरी माहिती दिल्याचा पश्चात्ताप करण्याची पाळी माझ्यावर अजून तरी आलेली नाही!

सत्यमेव जयते

भल्या भल्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्याने मोहात पाडले आहे. अमिताभ, सलमान, शाहरूख ह्यांच्या मांदियाळीत आता मि. परेफेक्ट, आमिर खान, हाही सामिल होतो आहे. तो सत्यमेव जयते ह्या एका कार्यक्रमाद्वारे छोट्या पदद्यावर येतो आहे. आजपासून दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट 'थीम्ड टॉक शो' असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.