Skip to main content

दुष्काळाच्या झळा

दुष्काळाच्या झळा

दुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा
पाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा

डाळींबाचे होवूनी हाल द्राक्षबाग ती उखडली
गहू होणे दुरच होते मान मोडून बाजरी पडली

कुठून आणावे पाणी विहीर तर सुकली
बांधावरची जुनी बाभूळ आताशा वठली

कोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून
पान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून

दुर दिशेला चुकार ढग आस दाखवी
तेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई

कसे जगावे कळेना कसे जगवावे न उमजेना
दुष्काळाने मन कोरडे पण पाणी येई डोळा

भैराळं

कावळा शिवलेल्या बाईसारखं भैराळं लांब एका बाजूला गावाच्या वाटेला न येता बसून असायचं.

गावच्या आणि भैराळ्याच्या मधून गाडीरस्ता जात होता. एक पायवाट त्या रस्त्यापासून दबकत दबकत, मध्येमध्ये उगवलेल्या गवताखाली लपत लपत भैराळ्याकडे येत असे. भैराळ्याच्या काठाजवळ न यायची खबरदारी घेता ती थोडी दूरवरच एका उंचवट्यावर जाऊन हळूच, झुडूपांआडून त्या तळ्याकडे चोरून पहात असे.

आजचा सुधारक – एप्रिल २०१२ (गुणवत्तापूर्ण शिक्षण विशेषांक)

भारतीय बालकांना नि:शुल्क आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क देणारा अधिनियम (Act) एप्रिल २०१० पासून लागू झाला. ‘आजचा सुधारक’चा ताजा अंक त्या विषयाशी संबंधित विशेषांक आहे. मंजिरी निंबकर आणि सुबोध केंभावी हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत. अधिनियमात उल्लेख असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उद्दिष्टाबाबत विचारमंथन करण्यासाठी १४-१५ जानेवारी २०१२ रोजी सेवाग्राम (वर्धा) इथे एक संमेलन आयोजित केलं गेलं होतं. त्यात सहभागी झालेले शिक्षक, अधिकारी, कार्यकर्ते आणि तज्ज्ञ यांच्या विचारांवर आधारित लेख या अंकात आहेत.

रहस्य कशात असतं?

Taxonomy upgrade extras

अाज एक अनपेक्षित अनुभव अाला. टेलिव्हिजनवर मी टेनिस मॅचेस अनेकदा बघतो. २२ एप्रिलला मोनॅकोमध्ये दुपारी दोन वाजता Monte-Carlo Rolex Masters या स्पर्धेची final match राफाएल नदाल अाणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्यामध्ये होती. मोनॅको इथल्या (म्हणजे विनिपेगच्या) सात तास पुढे असल्यामुळे मॅच सकाळी होऊन गेली, पण ती तेव्हा इथे टेलिव्हिजनवर live दाखवलेली नव्हती. पण त्याच मॅचचं रॅकॉर्डिंग इथल्या संध्याकाळी सात वाजता टेलिव्हिजनवर दाखवणार होते, ते मी पाहिलं.

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जीवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही.

अवनी

बाह्यांतरी हो निर्मळ
करूया हा ब्रम्हगोळ
काष्ठी पाषाणी जे जळ
वाचवू तया..

सकल वृक्षांची मांदियाळी
त्यासी जो नरवर सांभाळी
तयासी खरा सावतामाळी
म्हणा म्हणा हो...

या अवनीच्या अत:करणी
अगणित वौभवाच्या खाणी
अंडी सोन्याची देयी म्हणूनी
कोंबडीच कापे

नाना सुगंध परिमळती’
नाना पुष्पे रंग सांडती
ऐसी महालावण्यवती
अवनी माझी..

धबधबा जलाशय सांडती
झरे होवुनीया झुळझुळती
नाचत गाजत जे कि मिळती
सागरासीहो..

कित्येक येथे प्राणीमात्र
नाना पुशुपक्षी सर्वत्र
ऐकावे त्यांचे नादस्तोत्र

वीर्यदानाचे महत्व पटवणारा - विकी डोनर :)

जॉन अब्राहम, अभिनय कशाशी खातात हे न कळणारा एक बॉलीवुडी पेहेलवान, जेव्हा एक चित्रपट प्रोड्युस करणार हे वाचले होते तेव्हा हसू आले होते. खरंतर त्याचा हा सिनेमा डाऊनलोड करूनच बघितला असता. पण सध्या मद्र देशी काहिच विरंगुळा नसल्याने आणि १२-२ असे लोड शेडिंग असल्यामुळे एका मॉल मध्ये गेलो (A.C. मध्ये २ तास घालवायला). बघण्यासारखी काहीच 'प्रेक्षणीय स्थळं' नसल्यामुळे भयंकर बोर झाले म्हणून PVR मल्टीप्लेक्स कडे मोर्चा वळवला. तिथे त्यावेळी फक्त विकी डोनर ची तिकीटे करंटला मिळत होती. म्हटले चला १२० रूपये जॉनच्या बोडक्यावर घालूयात काही पर्याय नाही.

ललित किस्सा ...अगदी तुमचा आमचा......!!!

ललित किस्सा ...अगदी तुमचा आमचा

परवा मित्राकडे अचानक गेलो ...त्याने घरभर पसरलेल्या वस्तू रप्पारप आवरल्या ...!!

खुर्चीवरचे पेपर उचलले ...सेटीवरच्या बायकोच्या ओढण्या कुठे कुठे कोंबल्या ..!!
पोरांवर खेकसून त्यांना खेळणी लपवायला सांगितले >>!

मांजराला काखेत मारलं ..!!
आणि म्हणाला हां गं...बोल आता .....बस ..!!

मी म्हंटलं ...काय बोलू ...'परकं' करून टाकलस नं एका मिन्टात :((
आले तेव्हा कसं अगदी माझ्या घरासारखं वातावरण होतं ....

जाऊ दे जातेच मी :((
माझा मुडच ऑफ केला त्याने :(

|| अवतार शंकरमहाराज ||

श्री. शंकरमहाराज
अवतार शंकरमहाराज
दर्शन देवूनीया
धन्य केले आम्हा आज
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

किती तुमचे गुण गावू
तुम्ही आमचे सखा बंधूभाऊ
किती तुमचे गुण गावू
तुमचे नाव मुखी घेता
सोपे होई कामकाज ||१||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

अजाणबाहू दोन्ही कर
अष्टवक्र लाभले शरीर
आजानुबाहु दोन्ही कर
मस्तक झुकवूनीया
शरण आलो तुम्हा आज ||२||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

देशोदेशी दिल्या भेटी
तुम्ही दीनांचे जगजेठी