भय इथले संपत नाही..........!!
Taxonomy upgrade extras
भय इथले संपत नाही
किती गोष्टींना घाबरून जगत असतो आपण. यात आपल्याशी संबंधित गोष्टी तर असतातच पण बरेचदा दुरान्वयेही संबंध नसलेल्या गोष्टींचाही भरणा असतो.
- Read more about भय इथले संपत नाही..........!!
- 8 comments
- Log in or register to post comments
- 10585 views
प्रवास .
प्रवास
खाच खळग्यांच्या उंचसखल चिकचिक वाटा तुडवताना
आणि त्यातील मोजक्याच उंचवट्यांवरून
जपून चवड्यांवर चालताना
भरून आले पाय
मग ठरवले ...बस ...
ठेवावे पूर्णच पाउल ठासून
टोचतीलही कदाचित काही टोकदार तीक्ष्ण जागा
एक भय होतं काहीतरी रुपण्याचं खुपण्याचं
एक कौतुक कुठेतरी स्वतःला जपण्या-सावरण्याचं
पण त्याच कौतुकभयाला पाठीशी न घालता
थेट पायापाशी घातलं
खरं सांगते
काही वेळातच याची ही सवय होऊन गेली
आणखी काही वेळाने तर मौजही वाटू लागली
- Read more about प्रवास .
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5357 views
गरगर गरगर
गरगर गरगर फिरतो पंखा
आजोबांना येतात शिंका
घरघर घरघर फिरतो मिक्सर
आजी म्हणते "आली चक्कर"
शूs शूs शिट्टी कूकर देतो
"भात शिजला" मम्मिला म्हणतो
टिंग्टाँग टिंग्टाँग वाजते बेल
पप्पा येतात घेऊन भेळ...
सगळे जेव्हा जातात झोपी
घड्याळ करते टिकटिक मोठी
- ग्लोरी
- Read more about गरगर गरगर
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4421 views
मैने गांधीको नही मारा
'मैने गांधीको नही मारा' अशा शीर्षकाचा एक चित्रपट नुकताच नेट्फ्लिक्सवर पाहिला.
अनुपम खेर आणि उर्मिला माताँडकर ह्यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ह्या चित्रपटात डिमेन्शिया झालेल्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढण्यासाठी खोटे नाटक रचले जाते अशी कथा आहे. हा एक वेगळाच चित्रपट फार प्रकाशात कसा आला नाही ह्याचे आश्चर्य वाटले. हा चित्रपट पाहिला नसल्यास अवश्य पाहावा अशी सूचना करीत आहे. यूट्यूबवर http://www.youtube.com/watch?v=T_RT_AnN61w येथे अल्प दरात तो उपलब्ध आहे.
अशाच प्रकारचे कथानक असलेले एक मराठी नाटक पूर्वी पाहण्यात आले होते. ९५-९६च्या सुमारास दूरदर्शन चॅनल सर्वांना खुले झाले असता 'प्रभात' नावाचा एक चॅनल एक-दोन वर्षे दिसत असे. (तो चॅनल लवकरच बंद झाला.) त्यांच्याकडे थोडाच मालमसाला होता आणि तोच फिरूनफिरून दाखविला जात असे असे आठवते. त्यामध्ये दोन नाटके मला खूप आवडली होती.
त्यांपैकी एकात अशी कथा होती की एका व्यक्तीला आपण नाना फडणीस आहोत असा भ्रम झाला होता. त्या भ्रमातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या आसपास पेशवाईचे वातावरण आणि पात्रे निर्माण केली जातात. पेशवाईत वावरणारी ही पात्रे त्यातून बाहेर पडली की सर्वसामान्य माणसे होतात आणि त्यातून मजेदार घटना निर्माण होतात.
हे नाटक कोणते होते हे जाणून घेण्याची आणि यूट्यूबसारख्या जागी हे दिसत असल्यास पुन: पाहण्याची मला फार इच्छा आहे.
दुसरे नाटकहि विनोदी होते आणि त्यात विजय कदम ह्यांचे अप्रतिम काम होते असेहि आठवते.
ह्याविषयी कोणास काही माहिती असल्यास प्रतिसादातून अवश्य कळवावे अशी विनंति करण्यासाठी हे लिहिले आहे.
- Read more about मैने गांधीको नही मारा
- 36 comments
- Log in or register to post comments
- 22839 views
मोकळं मोकळं वाटतंय
टाचांच्या भेगा झोंबत नाहीएत
गुडघे दुखत नाहीएत
पाठीतून कळ येत नाहीए
सततचा खोकला थांबला एकदाचा
जवळचं लांबचं सगळं व्यवस्थित दिसतंय आता
हातपाय थरथरत नाहीत
छातीत दुखत नाही
सारखं लघवीला लागल्यासारखं वाटत नाहीए
डोकं जड जड झाल्यासारखं वाटत नाहीए
प्रकाशाचा त्रास होत नाही
कान किटत नाहीत
भाजतसुद्धा नाहीए अजिबात...
मोकळं मोकळं वाटतंय
- Read more about मोकळं मोकळं वाटतंय
- 9 comments
- Log in or register to post comments
- 5928 views
आपल्या देशाची अद्यावत प्रतीकचिन्हे!
सुज्ञास सांगणे न लगे! :)
(....ढकलपत्रावरून साभार!)
![]() |
- Read more about आपल्या देशाची अद्यावत प्रतीकचिन्हे!
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5095 views
सैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध - मिलिंद मुरुगकर
सध्या सैन्यातला भ्रष्टाचार हा ऐरणीवरचा विषय आहे. त्याला संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुख यांच्यातल्या वादाची फोडणी मिळाली आहे. त्याशिवाय अण्णा हजारेंचं भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन चालू होऊन वर्ष झाल्याची बातमी काल वाहिन्यांवर येत होती. आजच्या महाराष्ट्र टाईम्समधला मिलिंद मुरुगकर यांचा एक लेख भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन आणि सैन्यातला भ्रष्टाचार यांविषयी काही रोचक मांडणी करतो. याविषयी 'ऐसी अक्षरे'करांचं मत जाणून घ्यायला आवडेल.
- Read more about सैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध - मिलिंद मुरुगकर
- 14 comments
- Log in or register to post comments
- 12291 views
वाया गेलेली बाई..!! (फेसबुक वर सात जणांनी शेअर केलेली आणि साठ कॉमेंट आलेली....माझी 'फेसबुक बाईची' कविता :))
वाया गेलेली बाई
रंगून मजेने बाई fbवर बसते ....नि घरदार वैरी होते
बाई तहान भूक विसरते ...
बाई वय विसरते
नि बाई fb च्या तंबूत घुमते ...!!!!!
पोरगं शाळेतलं काहीबाही रंगवून सांगतं
बाई नुसताच हुं हुं करते
पोरगं वरमून खालमानेनं ..थेट घराबाहेर जातं
बाई फ्रेंडशी नवा च्याट मांडते.......!!!!!!
बाई पोक काढून स्क्रीन मध्ये घुसते
नवरा गपपणी ताक घुसळतो
डावं उजवं नको जिभेचे चोचले नको
म्हणत बाई भात नि वरण उकडते .....!!!!!!!
लोग इन होईस्तोवर बाई डाळ तांदूळ धुते
पासवर्ड टाकते नि ग्यास पेटवते
चार शेरे वाचते ग्यास बारीक करते
मधेच खुदू खुदू खुसू खुसू हसते ........!!!!!!
वाडी आणी बरेच काही ..!!
मी बघत राहिले दूर दूर जाणाऱ्या आकृत्यांकडे . आकृत्या.... पुढे त्यांच्या लांब लांब सावल्या उरलेल्या . नंतर जणू त्या सावल्याही लांब लांब जात दिसेनाशा होत गेल्या .सावल्यांच्या मागे धावणे , आकृती रेखाटणे , आणि त्या निरखत बसणे त्यावर कल्पनाविलास रचणे हा तर जीवाला जन्मापासून लागलेला छंद जणू . त्याच आकृती अनेक प्रकारच्या लांब रुंद त्रिकोणी चौकोनी आणि अनेक पदरांच्या आणि म्हणूनच त्यांच्या सावल्याही तशाच बहुरंगी बहुढंगी.कधी थेट पायाखाली लपून बसणार्या कधी तिरप्या तिरप्या होत अलगद नजरेच्या कक्षेपलीकडे लपून बसणाऱ्या तर कधी असता असता न दिसणाऱ्या आणि दिसताना गायब होणार्या .
- Read more about वाडी आणी बरेच काही ..!!
- Log in or register to post comments
- 2971 views
डाव मांडावा नव्याने आणि द्यावी मात मी..
डाव मांडावा नव्याने आणि द्यावी मात मी
खेळ दैवा चाल! बघ केली नवी सुरुवात मी
पांढर्या काळ्या पटावर सज्ज सारे मोहरे
कोण चाले चाल तिरकी, तर कुणी मागे सरे
लावते बाजी नव्याने आत्मविश्वासात मी
खेळ दैवा चाल! बघ केली नवी सुरुवात मी
दुष्मनाची ओळखूनी चाल मीही खेळते
वाकडी वा थेट प्यादी मी पणा'ला लावते
चेक आणी मेट नाही व्हायचे इतक्यात मी
खेळ दैवा चाल! बघ केली नवी सुरुवात मी
घेरले चारी दिशांनी एकटीला तू पुन्हा
ठाव मजला जीवघेणा डाव हा आहे जुना
जीत इतुकी ना तुला रे द्यायचे स्वस्तात मी
खेळ दैवा चाल! बघ केली नवी सुरुवात मी
- प्राजु
- Read more about डाव मांडावा नव्याने आणि द्यावी मात मी..
- 10 comments
- Log in or register to post comments
- 6209 views
