Skip to main content

गॉसिप

Architectural Animation हा प्रकार आता Design क्षेत्रात चांगलाच रुळला आहे, आता तर तो त्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे.
3D visualisation हे एक करिअर होऊ शकत यावर माझा स्वताचाही आधी विश्वास नव्हता, किंबहुना मला त्याविषयी काही माहिती देखील नव्हती. Animation म्हटल कि डोळ्यासमोर कार्टूनच उभी राहायची, किंवा 3D गेम . पण त्यापुढेही हे क्षेत्र किती अफाट आहे , हे हळू हळू आता कळायला लागलंय.

कपिलाषष्ठी, गटारयंत्र व इतर - अर्थात, मायमराठीची लेणी : भाग २

गेल्या लेखात आपण कै. विद्याधर वामन भिडे रचित "मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी" या ग्रंथातील काही निवडक वाक्प्रयोगांशी परिचय करून घेतला. ह्या लेखातही मागीलप्रमाणेच आम्हांस मौजेचे व अनोखे वाटणारी काही निवडक उदाहरणे सादर करीत आहोत.

कपिलाषष्ठीचा योग -
१. अगदी दुर्मिळ, क्वचित प्रसंगी मिळणारी संधी, संयोग अथवा पडणारी गाठ.
२. अतिआश्चर्यकारक आणि अनपेक्षित प्रकारे आनंददायक गोष्टी एकाच वेळी जुळून येणे, ही जुळणी.

संसर्गजन्य जिवाणू

आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो.
म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा.
कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.
आम्ही ज्याच्या संपर्कात त्याला लागलेत आजार रोग.
काही अंधश्रध्दाळू म्हणोत बापडे आपल्याच कर्माचे भोग.

तर शरीरात थोडे आतवर - नसांमध्ये पोहोचलो.

इतर माणसांच्या तुलनेत या व्यक्तीचे शरीर काही वेगळेच होते.
इतरांचे रक्त लाल तर याचे रक्त कोठे लाल, कोठे हिरवे, कोठे निळे,
कोठे भगवे, कोठे पिवळे, कोठे दुरंगी, कोठे तिरंगी होते.
जरा जरा वेळाने त्या रक्ताचे रंग बदलत होते.

मी मनात म्हटले की या सर्वरक्तीय प्राण्याच्या शरीरात काही रुजता येणार नाही.

होम्स, शेरलॉक, शेरलॉक होम्स

पहिलाच लेख लांबलचक आहे, याबद्दल क्षमस्व! या लेखाला समीक्षा म्हणावे की नाही, याबाबतही साशंक आहे.

---------------------------------------------------------------------------------

पहेले 'मार' का पहेला गम!

'शाळा' नुकतंच वाचून संपवलं. तसंच त्यावरचा चित्रपटही नुकताच प्रदर्शीत झालाय. सगळीकडे चित्रपटाची आणि पुस्तकाची चर्चा चालू आहे. पेपरांमधे आणि आंजावर रिव्यू येत आहेत. एकूण सगळं वातावरण शाळामय झालंय. अशात कित्येकांना आपल्या शाळेची, शिक्षकांची, शाळेतल्या मित्रांची (काही भाग्यवंतांना मैत्रीणींची), खोड्यांची आणि विशेषतः शाळेत खाल्लेल्या माराची आठवण झाली नाही तरच नवल. तर या वाहत्या गंगेत हात धूउन घ्यावेत ह्याच एकमेव हेतुने हा धागा काढतोय.

माझ्या मना

माझ्या मना

माझ्या मना तू माझ्या मना
मला तू तरी समजून घे ना

उगा नको तू प्रश्न विचारू
उत्तर मला माहीत नसेल ना

न ऐकले तुझे अन भेटलो तिला
का भेटलो तेव्हा ते मला कळेना

दुर ती गेली निघूनी सोडून मला
आठवण तिची कधी काढू नको ना

होती का काही तिची मजबूरी?
ती तरी का सांगेल कोणा?

असेल का रे स्थिती तिची अशीच
माहीती का तुला? तू मला सांग ना!

- पाषाणभेद

V for Vendetta

एखाद्या चित्रपटातील एखादं वाक्य, संवाद आपल्या मनात घरं करून राहतं. काही केल्या ते मनातून हटत नाही व जेथे जेथे वाक्या संदर्भातील परिस्थिती असते तेव्हा आपल्याला हमखास ते वाक्य तो संवाद आठवतो. मग आपण हलकेच स्मित करतो व पुढील कामाला लागतो. तसेच काहीसे सध्या माझे होत आहे. मागील अनेक दिवस माझ्या सहीमध्ये, गुगल/फेसबुकच्या स्टेट्स मॅसेजमध्ये "remember remember the fifth of november" हे वाक्य होते. अनेकांनी विचारले या वाक्याचा संदर्भ काय आहे तर, आता सांगतो काय संदर्भ आहे ते.

सरदार सरदार

सरदार सरदार

सरदार सरदार तुम्ही माझं अंमलदार
काळजी तुमची करते लवकर परतावं

सवत चाकरी झाली माझी
ओढून नेई तुम्हा युध्दावर
वाट पाहिल तुमची दारी दासी
सेवा करीते थोडं शेजघरी पडावं

तुम्हाविण व्याकुळ चिमणा जीव
काय घडलं तेथे कुणी सांगावं
मन लागेना कामी दिसभर
घास जाईना ओठी काय करावं

धिर करून देते निरोप आता
माझी काळजी आहे उलीशी
महाराष्ट्राचा पसारा मोठा
पुर्‍या ताकदीनिशी युध्द लढावं

भारताची प्रगती १: प्रास्ताविक

आज २६ जानेवारी. प्रजासत्ताक दिवस. त्यानिमित्ताने गेला बराच काळ डोक्यात घोळणारं लेखन सुरू करत आहे. ही लेखमाला लिहायला दुसरं तत्कालिक कारण म्हणजे रामदासांचा 'घृतं पीबेत' हा अतिशय वाचनीय लेख. स्मरणरंजनात्मक लेखनात सहज रमून जायला होतं. त्यात तो लेख रामदासांसारख्यांनी लिहिलेला असला तर विचारायलाच नको. त्या जादूई दिवसांची सगळी गोड, कडू जादू जिवंत होते. 'काय दिवस होते राव! गेले ते. आता पुन्हा नाही यायचे.' प्रत्येकाच्याच जीवनात असे सोनेरी आठवणींचे दिवस असतात. जेव्हा सगळं काही सुंदर होतं. आता नाही राहिलं ते. त्यांच्या आठवणी उजळून येताना त्यावेळचे डाग पुसून येतात.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

सर्व वाचकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

२६ जानेवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी ब्रिटीशांकडे केली होती. त्या दिवसाचे प्रतिकात्मक महत्त्व म्हणून स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेचा २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकार करण्यात आला. भावनिकदृष्ट्या १५ ऑगस्टला जास्त महत्त्व आहेच पण व्यवहारात २६ जानेवारीचं महत्त्व, आपल्या कायद्यांप्रमाणे आपलं राज्य चालवण्याचं महत्त्व, अधिक आहे. १५ ऑगस्ट १९४७ ते २५ जानेवारी १९५० या काळात १९३५ साली केलेल्या Government of India Act वापरून राज्यशकट हाकला जात होता.