मदत हवी आहे - भारतीय इंग्रजी रंजक पुस्तकं
केवळ हलकंफुलकं वाचण्यात रस असणार्या एका परदेशी मित्राला काही भारतीय लेखकांच्या इंग्रजी लिखाणासाठी शिफारशी हव्या आहेत. कुणी काही सुचवू शकेल का?
- Read more about मदत हवी आहे - भारतीय इंग्रजी रंजक पुस्तकं
- 37 comments
- Log in or register to post comments
- 18145 views
काय करावे मन तळमळते !
साधे सोपे सहज शब्द ते
एकापुढती एक ठेवले ,
कांगावा काही ना करता
निमुटपणे ते कविता बनले !
याला तुम्ही कविता म्हणता ?
-उसळुन सारे धावत आले ,
शांतच होती माझी कविता
घाव किती अंगावर पडले !
अगम्य असभ्य शब्द कोषिचे
एकापुढती एक ठेविले ,
डोक्यावरती घेऊन सारे
कविता सापडली म्हणाले !
ही कविता की ती कविता मज
अजूनही पुरते ना कळते ,
भीत रहावे - लढत रहावे -
काय करावे मन तळमळते !
- Read more about काय करावे मन तळमळते !
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3656 views
ते सर्व!
बांधावरती उभे रहातात,
एकमेकांना खेटुन,
ते सर्व!
त्यांचं त्यांनाच कळत नाही
हळुहळु ते स्वतःच होऊन जातात बांध.
आणि मनातला किंवा मनाबाहेरचा अंधार
थोपवत रहातात, उद्याच्या आशेने.
पण एकमेकांना खेटुन,डोळे गच्च मिटुन
आणि लाटेकडे पाठ फिरवुन
प्रश्न सुटत नसतात.
मग अंधारपोकळीचं अवकाश होतं.
शरिरं भरडतात,
मनं उध्वस्त होतात.
रक्त, हिंसा आणि आरोळ्यानी
सारं काही भरलेलं असताना,
अन्यायी राजा नी शुर प्रजा
गोष्टींमधुन तुच्छ हसतात.
दंगलीत मेलेल्या कुणाचं तरी शव
असंच पडुन रहातं मार्गात,
कोल्हेकुत्रांच्या भयासकट.
मृत जखमांच्या जिवंत प्रेतांशिवाय,
- Read more about ते सर्व!
- 6 comments
- Log in or register to post comments
- 6059 views
आजीबाईचा बटवा - पाठदुखी
आजकाल बैठे काम वाढल्याने बहुतेकांना, जास्त करुन स्त्रियांना पाठदुखीला सामोरे जावे लागते. कोणाला दिसत तर नाही पण त्रास तर खुप होतो. त्यावर काही उपाय :
१) बैठे काम असेल तर दर तासाने उठुन ५मि. उभ्याने चक्कर टाकावी. (कुठे? ते आम्हाला विचारु नये.)
२) ताठ बसावे, पोक काढुन बसु नये.
३) भुजंगासन शिकुन रोज सकाळी आंघोळ झाल्यावर कीमान २-३ वेळा ते करणे. फार फार तर ५-७ मि. लागतात.
४) फार तेलकट, तिखट खाउ नये त्यानेसुद्धा वाईट शरीरावर परीणाम होतो अन पाठ हा शरीरााचाच एक भाग असतो.
५) आठवड्यातुन ३ वेळा तरी तासभर चालण्याचा व्यायाम करावा. मित्र मैत्रीणींबरोबर गप्पा मारत रमतगमत चालणे हा व्यायाम नाही.
- Read more about आजीबाईचा बटवा - पाठदुखी
- 36 comments
- Log in or register to post comments
- 36107 views
मी? म्हातारा??
ही पोस्ट आज लिहिलेली नाही.. पण तरी शेअर करावीशी वाटली.
का? तर...मी आयुष्यात वट्टात पहिल्यांदा आंतरजालावर लिहायला लागलो तेव्हा माझ्या हातून घडलेलं पहिलं लिखाण.. बर्याचदा लिखाणाची सुरुवात नॉस्टाल्जियानेच होते.. तसंच हे..
"मी.. ?? म्हातारा ???"
ते आज परत सर्वांसमोर ठेवतो आहे..
........................
मी कधी कधी "धम्म धम्म" अशी जड पावलं वाजवत भूतकाळात शिरतो. मनाविरुद्ध..
जशी जशी आयुष्याची वर्षं जातात तसा तसा आठवणींचा ढीग जमा होत जातो. मग रवंथ किंवा अॅसिडिटीसारख्या त्या वर येतात.
माझ्या लहानपणच्या ब्रँड्सच्या आठवणी त्या काळातल्या मुलींइतक्याच येतात..
- Read more about मी? म्हातारा??
- 26 comments
- Log in or register to post comments
- 18883 views
भारताची प्रगती २: घृतं पीबेत
बिच्चारा चार्वाक!
अत्यंत महत्त्वाचं एक दर्शन मांडूनही लोकांना तो माहीत असतो केवळ 'ऋणं कृत्वा घृतं पीबेत' या ओळींनी. 'कर्ज काढा आणि तूप प्या लेको. पुढच्या जन्माची कशाला काळजी करता, पुनर्जन्म वगैरे काही नाही.' असा साधारण त्या वाक्याचा गोषवारा. वाक्य वाचून त्याची विचारसरणी म्हणजे हलकटपणाचा कळस वाटते. वाटणारच, कारण ते वाक्य त्याने लिहिलेलं नाहीच. त्याच्यावर टीका करणाऱ्याच्या लेखणीतून ते आलं आहे. म्हणजे न्यूटनचं सगळं कार्य बहुतांशी विसरलं जाऊन त्याच्याविषयी 'यडपट माणूस. त्याने स्वतःसाठी एक दार केलं आणि मांजरीसाठी दुसरं लहान दार केलं...' एवढंच लक्षात राहिल्यासारखं.
- Read more about भारताची प्रगती २: घृतं पीबेत
- 48 comments
- Log in or register to post comments
- 38808 views
नियती
गर्दीत लहान मुलासारखं
शरिर हरवुन बसतं कधीतरी
सैरभैर, प्रश्नांकित!
आणि मनाला आपण हरवु देतो
कधीकधी वेगळं जगता यावं
म्हणुनसुद्धा....
पण नियती कधीच
हरवुन बसत नाही स्वतःला
आंधळ्या डोळ्यांनी
नी बांधलेल्या हाताने
धापा टाकत मूकपणे
चालत रहाते.
तिच्यात सापळ्याआड धडधडणारं
असं काहीच नसतं
कुण्याच्याही स्पर्शाने
उभे रहाणारे किंवा सुटणारे
प्रश्न नसतात
भंगणारी आकांक्षा,
फाटलेलं ह्र्दय
शोकाचे सुर
पश्चातापाचे निश्वास
जखमा आणि सारं काही
शवपेटीत बंद.
- Read more about नियती
- 8 comments
- Log in or register to post comments
- 8302 views
हा खेळ संख्यांचा! - तीन
- 3 ही संख्यासुद्धा 1 व 2 प्रमाणे अविभाज्य (prime) संख्या आहे.
- ज्या प्रकारे 2 बिंदू दिल्यास त्याना जोडणारी रेषा काढता येते त्याचप्रमाणे 3 बिंदूवरून त्रिकोणाची रचना करता येते.
- जॉन्सन प्रमेयानुसार (1913) A, B, C हे 3 वर्तुळ P बिंदूपाशी आणि J, O, H या बिंदूपाशी एकमेकांचा छेद घेत असल्यास J, O, H हे बिंदू या तिन्ही वर्तुळाशी एकरूप (congruent) असलेल्या N वर्तुळावर असतात.
- Read more about हा खेळ संख्यांचा! - तीन
- 5 comments
- Log in or register to post comments
- 6513 views
स्वावलंबी गावः महात्मा गांधी
आज महात्मा गांधींच्या हत्येचा ६५वा स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांचे 'आदर्श गाव' या संकल्पनेवरच काही विचार स्वैर अनुवादित रूपात समोर ठेवत आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन व प्रणाम!
=========
- Read more about स्वावलंबी गावः महात्मा गांधी
- 44 comments
- Log in or register to post comments
- 42685 views
फिल्मफेयर अॅवार्ड (?)
Taxonomy upgrade extras
जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि डर्टी पिक्चरला मिळालेले (फिल्मफेयर) अॅवार्ड –
रणबीर कपूर आणि विद्या बालनला अनुक्रमे बेस्ट अॅक्टर (रॉकस्टार) आणि बेस्ट अॅक्ट्रेस (डर्टी पिक्चर) अॅवार्ड मिळाले.
बेस्ट फिल्म - जिंदगी ना मिलेगी दोबारा
बेस्ट डायरेक्टर – झोया अख्तर - जिंदगी ना मिलेगी दोबारा
बेस्ट डायलाॅग – फरहान अख्तर - जिंदगी ना मिलेगी दोबारा
बेस्ट मुझिक – ए आर रेहमान - रॉकस्टार
बेस्ट स्टोरी – आय एम कलाम
लाइफ टाईम अचीव्हमेंट अॅवार्ड – अरुणा इराणी
- Read more about फिल्मफेयर अॅवार्ड (?)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4682 views