Skip to main content

ट्रक धिना धिन!!

.

आपल्याला सगळ्यांना हे माहीतच असेल कि आपल्याकडे ट्रक चालक स्वताच्या ट्रकमागे काहीना काही लिहित असतात. मी या अशा लिखाणाचे खूप निरीक्षण करायचो. मला ते खूप आवडायचे. एकदा गोव्याला मित्रांबरोबर जाताना रस्त्यात एक ट्रक दिसला. त्यामागे ट्रकमधल्या साहित्यिकाने बरेच काही लिहिले होते. वरती तो फोटो लावला आहे. मला स्वताला हा ट्रक चालक नेहमीच एक भावनिक, विचारवंत आणि एक कवी मनाचा वाटत आला आहे. स्वताच्या भावना तो आपल्या ट्रक मागच्या ब्लॉगद्वारे दुसऱ्यांना सांगत असतो.

रसग्रहणः रंजीश

गझल हा माझा वीक पॉइंट. मला विकून येइल कधी कधी इतका वीक.
अन रंजीश माझी एक आवडती गझल.
मेहदी हसन साहेबांनी गायीलेली.
मला क्लासिकल समजत नाही. रागदरी म्हणजे राग येतो तो दरीत नेऊन फेक इतपत ज्ञान.
पण,
उर्दू/फारसी थोडं येतं. तर, अर्थ समजावून 'गाणं' ऐकू यात

इथे ऐका:

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ ।

हेलिकॉप्टर

ध्याकाळी साडेपाचचा सुमार असेल. चहा घेता घेता संगणकावर काहीतरी उद्योग चालु होता. म्हणजे कॉफी बनवायचे वीजेवर चालणारे यंत्र कसे वापरावे याचा शोध तू नळीवर घेत होतो. संगणकावर चित्रपट सुरू होऊन स्वागत आणि स्वगत संपवुन तो बुवा यंत्राविषयी काही सांगणार एव्हढ्यात हेलिकॉप्टरचा घरघराट, मागोमाग पक्ष्यांचा कलकलाट. नेमके जे ऐकायला हवे ते निसटले. असा प्रकार तिनेक वेळा घडला. आता हेलिकॉप्टर म्हणजे काही नवलाई नाही हे खरे पण आवाजावरून ते बरेच जवळ वाटले. खिडकीतुन डोकावायचा प्रयत्न केला पण आकाशात काहीच नव्हते. कदाचित ते इमारतीच्य बरोबर वरून गेले असावे.

संसारी माणसाची पाककृती: संडे स्टार्टर्स

अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर!!

यापुर्वी आम्ही बॅचलर पाककृती लिहिली होती. या पाककृतीच्या नावात बॅचलर लिहिता येणार नाही अशी तंबी आम्हाला स्वयंपाक घरात जायच्या आधीच मिळाली. तसेही आम्हाला आज नव्याने कळलेला नियम म्हणजे " नीट आवरलेले स्वयंपाकघर ही नवर्‍याने स्वयपांक केल्याची खूण आहे"! तुम्हाला काय वाटले?? नवर्‍याने स्वयंपाक घर आवरले? अहो त्याने स्वयंपाक केल्यावर पुर्ण स्वयंपाकघरच ओट्यावर असते तर मग आपोआप आवरल्या जाणार नाही का??? ;) ;)

बृहन्महाराष्ट्र मंडळाची प्रतीक/घोषवाक्य स्पर्धा

प्रेषक: राधा गुर्जर, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बीएमएम) २०१३ मधील अधिवेशनाच्या मार्केटिंग कमिटीसाठी.

अथातो प्राकृत जिज्ञासा। - १

आज पर्यंत आपण अनेक समूहांवर, ब्लॉग्जमध्ये, 'संस्कृत' भाषेसंबंधी लिखाण वाचले आहे. अनेक ठिकाणी "संकृत भाषा किती महत्त्वाची आहे?", "संस्कृत भाषेची आज खरोखरच गरज आहे का?", "संस्कृत भाषा का शिकावी?" असे प्रश्न उपस्थित करून जोराजोराने वाद घातले गेले आहेत. या वादांना पुढे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे वळणही लागलेले दिसून आलेले आहे. अशा वेळी सोयिस्कररीत्या संस्कृत ब्राह्मणांची भाषा आहे आणि आमची ती प्राकृत भाषा असा मुद्दा काढल्याचेही अनेक ठिकाणी दिसून आलेले आहे.

ऋतुचक्र - संधीकाळ

आमच्या अपार्टमेंट कॉंप्लेक्सच्या मागच्या बाजूला काही सुंदर घरं आहेत. त्यातल्या मला आवडलेल्या एका घराचे काढलेले हे दोन फोटो. पहिला फोटो सुमारे दोन महिन्यांपूर्वी काढला होता. समर आणि फॉलच्या संधीकाळातला. पानगळती अजून सुरू झाली नव्हती. असाच एका सकाळी बाहेर फिरायला गेलो. धुक्याने आसमंत वेढलं गेलं होतं. सकाळची गुलाबी थंडी उतरली नव्हती. अशा वेळी ही रेखीव, प्रशस्त घरं त्यांच्या आसपासच्या मॅनिक्यूअर्ड हिरवळीत फारच देखणी दिसत होती. फोटो काढल्यानंतर धुक्यामुळे तो थोडा रंगांच्या बाबतीत एकसुरी वाटत होता. त्यामुळे प्रोसेसिंग करताना सॅच्युरेशन वाढवलं. पिकासामध्ये वॉर्मिफाय नावाचं फंक्शन आहे.

अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे -

(चाल:- जीवनात ही घडी अशीच राहू दे)

अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे
पेट्रोलच्या टाकीवरी गंज वाढु दे ||धृ||

रंगविले गॅरेजात कितिक देखणे
आवडले गाडीला खूप खर्चणे
स्वप्नातही बंद ना कधीच वाटु दे |१|

हळुच तिला पुसण्याचा छंद आगळा
गाडीचा त्याविण का व्यर्थ हा लळा
वर्षातुन छंद बंद कधि न होऊ दे |२|

...पाहु दे असेच तिला आता गंजता
राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता
महागाईत पायपीट सार्थ होऊ दे |३|

पाऊसगाणी

सूर्य बुडे पायथ्याशी
रंग ओंजळ भरुन
गाव जाता अंधारुनी
येतो सावल्या घेऊन

एका अंगणी पावसाची
होती धून घनधुंद
कुण्या बाहुलीचा होता
वेड्या सुखाचा प्रपंच

त्याने पापांच्या पायाने
तिचे उष्टावले फूल
उंबर्‍यात अनाथ झाले
भोळ्या तुळशीचे मूळ

धुक्यात हरवले घर
पात्रात अडकली नाव
लाज सावराया आला
उभा आंधळाच गाव

उभा काठावर जीव
येई डोहातुनी हाक
एका ईवल्या डोळ्यांची
हले पापणीही मूक

रडुनिया निजे पाखरु
भ्रमित उत्तरांची मिठी
ती शरिर घेऊनी येता
निघे फकिर भरल्या पोटी

माझे डॉक्टर होणे : ६ (क्रमशः)

ही सगळीच लेखमाला लिहिण्याला सुरूवात झाली, त्याचं एक कारण म्हणजे इथे पाटील सरांनी सिनेमाबद्दल लिहिलेलं वाचून खूपच नॉस्टाल्जिक झालो होतो. तसं पाहिलं, तर बीजेला अ‍ॅडमिशन घेण्याआधी अख्ख्या आयुष्यात ४-६ सिनेमे पाहिले असतील. बीजे सोडल्यानंतरही थिएटरात जाऊन आजपर्यंत फारतर वर्षातून एखादा. पण कॉलेज अन सिनेमा याचं काहीतरी गुळपीठ होतं, अन सुरुवातीचे काही दिवस तर आम्ही सगळी गँगच्या गँग दररोज अलंकारला 'सौतन'चा शेवटचा शो पहायला जात असू. तो एकच सिनेमा मी १२-१५ वेळा तरी पाहिला असेल. अधूनमधून अपोलो, एम्पायर इ. पायी जाण्याइतपत दूरच्या सिनेमांना रात्री जात असू, पण बहुतेकदा सौतन.