सीता सिंग्ज द ब्लुज्

पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन (किंबहुना स्वयंसेवकाचे [माकड]चाळे) सोडल्यास मला या माझ्या पहिल्यावहिल्या फेस्टिव्हलकडून बरेच नवे, चांगले काही मिळाले सुद्धा. 'रेगे' हा मराठी चित्रपट १५ हून अधिक मिनिटे न बघवल्याने आम्ही सगळे उठून बाहेर आलो आणि पुढील चित्रपटाला बराच वेळ होता म्हणून दुसर्‍या एका स्क्रीनवर 'अ‍ॅनिमेशन आणि अ‍ॅनिमेशनपटांचे भविष्य' नावाच्या व्याख्यानाला जाऊन बसलो होतो. व्याख्याते एक वक्ते म्हणून तितपतच असावेत - वाटले - मात्र त्यांनी दाखवलेल्या क्लिप्स/अ‍ॅनिमेशन्स त्यांचे प्रकार सगळेच भन्नाट होते. त्यात सँड ऍनिमेशन, शॅडो ऍनिमेशन वगैरे आता काही टॅलेंट शोजमुळे बर्‍यापैकी माहितीतले प्रकार होते तर स्टॉप अ‍ॅनिमेशन, मिनिमल अ‍ॅनिमेशन असे नवखे प्रकारही होते. या दरम्यान त्यांनी एका अ‍ॅनिमेशनचे उदाहरण म्हणून एक अनोखे गाणे दाखवले.

रामायण हा भारतातील प्रत्येकाचा परिचित विषय. त्यातील सीतेला बंदिवासात ठेवले असता ती रामाच्या आठवणींचे कढ काढून रडते आहे आणि तिथे तिला हनुमान भेटायला येतो, अंगठी देतो आणि लंकेला आग लावून परत जातो या भागावर बेतलेले रॅप अंगाने जाणारे एक गाणे आणि त्यावरचे अफाट मजेशीर अ‍ॅनिमेशन बघितले. सीतेला एक दैवी स्त्री किंवा देवाची पत्नी वगैरे न मानता, चांदोबा स्टाइल पुष्ट दाखवली आहेच, शिवाय मस्तपैकी तालावर नाचणारा मारुती वगैरे धमाल आणतो. आणि या सगळ्यात मूळ गोष्टीला बाधा न आणता, कोणत्याही कॅरेक्टरचा अपमान झाला आहे असे वाटणार नाही याची दक्षता घेण्याची कसरतही छान साधली आहे असे वाटले. अर्थात एका गाण्याने आमचे समाधान झाले नाही मात्र तिथे तो विषय नसल्याने केवळ नोंद घेत व्याख्यान पुढे गेले. माझ्या डोक्यात मात्र गाणे पक्के रुतले होते. घरी येऊन त्या गाण्याचा शोध घेत असताना (त्याचे बोलही आठवत नव्हते) शेवटी ते गाणेच नाही तर ते गाणे ज्या चित्रपटात आहे त्या एका अख्ख्या चित्रपटाचा शोध लागला. त्या चित्रपटाचे नाव आहे 'सीता सिंग्ज द ब्ल्यूज'.

रूढार्थाने हा व्यावसायिक चित्रपट नाही. जालावर हा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. अमेरिकास्थित नीना पॅले (उच्चारी चुभेदेघे) हिने या चित्रपटाची निर्मिती, लेखन, अ‍ॅनिमेशन सगळेच केले आहे. हा चित्रपट त्यांच्या संस्थळावरून अधिकृतरीत्या मोफत बघता येतो, डाऊनलोड करता येतो, इतकेच काय त्याचे प्रदर्शनही करता येते - खेळ ठेवता येतो. चित्रपट प्रकाशनाच्या रूढ कल्पनांहून वेगळा प्रयोग इथे आहेच. (याऐवजी मिळकत ही डोनेशन, संबंधित वस्तूंची विक्री, डीव्हीडीज, स्पॉन्सरशीप्स याद्वारे भरून काढली जात आहे).

तर ते असो. हा चित्रपट आहे रामायणावर. रामायण आणि उत्तररामायण या दोन्ही कथा इंटर्वलच्या आधी व नंतर होतात. चित्रपट हा संवाद प्रधान नसून यास एक 'म्युझिकल' म्हणता यावे इतका छान छान गाण्यांनी भरलेला आहे. दोन गाण्यांच्या, प्रसंगांच्या मध्ये शॅडो अ‍ॅनिमेशनच्या वापरातून रामायण, रामाचे वागणे, सीतेचे वागणे, हनुमान व एकूणच सामाजिक चालीरीतींची चिकित्सा आणि प्रभावी भाष्य केले आहे. सीतेला 'कंटॅमिनेटेड' दाखवणे, सारखं तिला अग्नी नैतर जलपरिक्षा द्यायला लावणे, तिचे प्रेग्नंट असणे, तिच्यासाठी लढल्यावरही रामाने अनासक्त असणे, हनुमानाची भूमिका, रावणाची भूमिका इथे इतक्या रोचकपणे मांडली आहे. यातील प्रत्येक गाणं, अ‍ॅनिमेशन हे तर निव्वळ थोर आहेच, त्याहून अधिक मला शॅडो अ‍ॅनिमेशनद्वारे मूर्ती बोलत असतानाचे संवाद अधिक मार्मिक वाटले. रामायणाकडे पाहण्याचा अगदी फ्रेश आणि मजेशीर दृष्टिकोन आहे.

याशिवाय एक समांतर अशी 'नीना' या अमेरिकन पात्राची गोष्ट घडते. तिचा नवरा भारतात येतो व त्याचा तिच्यातील इंटरेस्ट संपू लागतो. पुढे खोदकाम केल्यावर कळले की ही प्रस्तुत लेखिका-निर्मातीची प्रत्यक्ष कथा आहे. किंबहुना स्वतःच्या पतीने सोडून जाण्यानंतर ती भारतीय सीतेला अधिकच रिलेट करू लागली, त्यावर अधिकच चिंतन करू लागली. आणि त्या वेदनेतूनच ही अ‍ॅनिमेशन फिल्म तयार झाली आहे. मला यात आवडलं ते प्रतिमा आणि प्रतीकांत अडकून न पडणं. शेवटी ही पात्रे ही त्या कवीच्या तत्कालीन परिस्थितीला सुटेबल अशी पात्रे असली तरी त्यांनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या भावनांचे प्रतिनिधित्व केले आहे. आधुनिक काळातील ही चिकित्सा याच माळेतील पुढील पाऊल दमदार टाकते.

मला ही फिल्म अतिशय आवडली. तुम्ही नक्की बघा आणि इथे सांगा वाटली ते!

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3.6
Your rating: None Average: 3.6 (5 votes)

प्रतिक्रिया

जमल्यास ऑनलाइन पाहिन.(wired connection वसूल करणं भाग आहे फुल्ल)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ऐकलं होतं याबद्दल. काही उजव्या लोकांनी या चित्रपटावर आक्षेप घेतले होते काही वर्षापूर्वी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रोचक आहे. नक्की पाहते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्योबाद! मोठंच काम केलंस तू!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद! नक्कीच पाहण्यात येईल.

ह्या पिफ मधे एकहि अ‍ॅनिमेटेड फिल्म पाहिली नाही Sad पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन... Smile

(आणि हो... मराठी चित्रपटांना राम-राम पुढच्या पिफ ला... काय ती वेड्यासारखी गर्दी आणि काही चित्रपटही बकवास... जसं ऋषिकेशला 'रेगे' चा अनुभव आला आणि मला टपाल, म्हादू चा... आणि ह्या गडबडीत चांगले विदेशी किंवा असे अ‍ॅनिमेटेड चित्रपट पहायचे राहून जातात ..असो... झाली आहे ह्यावर आधिच बरीच चर्चा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0