जंगलगोष्ट - १

जंगलगोष्ट - १

जंगलाचा सार्वभौम राजा सिंह सत्तेत आल्यापासून आपल्या जंगलाचे ब्रँडिंग करण्यात पूर्णपणे व्यस्त होता. जंगल समृद्ध होण्यासाठी, महासत्ता होण्यासाठी जाणीवपूर्वक आणि दूरदृष्टी ठेऊन प्रयत्न करीत होता.
जंगलातल्या थोर आणि वयोवृद्ध जाणकारांना याचे दूरगामी परिणाम होतील याची खात्री होती मात्र याची हमी तळागाळातल्या चराचर जीवसृष्टीपर्यंत पोचवली जात नव्हती. तशी यंत्रणा आजपर्यंत विकसित झाली नव्हती. केवळ आकड्यांचा खेळ करून, टक्कवारीचं गणितं घालून सत्ता काबीज करण्यात जंगलाचा नावलौकिक होता. ठराविक वर्गाचीच जंगलात जरब बसली होती. शेजारच्याच जंगलातून घुसखोरी करून डुकरांचा हैदोस, निष्पाप लोकांवरील हल्ले या जंगलाने बरीच वर्षे सहन केले होते. यंदा सत्तेत असलेल्या सिंहाच्या मंत्रीमंडळाने शेजारील जंगलातील डुकरांच्या भ्याड हल्ल्लांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी गुपचुप हलचाली चालवल्या होत्या. सूड हा जेवढा थंड डोक्याने घेतला जातो तेवढाच मोठा वचपा काढला जातो. सिंह प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसादावर भर देणारा, नीती अवलंबणारा होता. एकूणच सत्तेत आल्यामुळे सिंहाचे राजकिय आत्मभान, आंतरराष्ट्रीय नातेसंबंधीची तत्सम नीती प्रगल्भ झाली होती. विरोधात असताना बोलणे आणि सत्तेवर आल्यावर कृती करणे याबद्दलचे तारतम्य भलतेच चाणाक्ष व जागृत झाले होते. मानवतावादी दृष्टिकोन ठेऊन माजलेल्या डुकरांच्या जंगलाला जी सूट दिली गेली होती तीच आता अंगलट आली होती. जंगलातल्या प्राणीमात्रांचा एकूणच रोष वाढला होता. अबकी बार.. अंतिम बार.. आर या पार... अशा अतिउन्मेषात घोषणा देणाऱ्यांचे जत्थे वाढत होते. परंतु सिंहाच्या थिंक टँकची नीती वेगळीच होती. वर्मावर घाव घातला तरच वाराचे शल्य बराच काळ आठवणीत राहतो असं वीररसयुक्त धुरंधरांचे विश्लेषण होते. सुरूवात या जंगलातून त्या जंगलात वाहाणाऱ्या नद्यांचे करार आणि त्याची पडताळणी केली गेली. कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन न करता तोंड दाबून बुक्क्यांचा मार कसा देता येईल यावर डावपेच आखले गेले. जगभरात जिथे व्यासपीठ मिळेल तिथे डुकरांच्या जंगलाची नाचक्की करण्यात येत होती. जंगलातले बहुतेक सर्वच एका अदिम अशा शांततेत वावरत होते. सगळे प्राणीमात्र एकात्मकेच्या शक्तीनीशी सिंहाच्या मागे ठामपणे उभे होते काही भटकी बिनभोबाटपणे भुंकणारी कुत्री सोडून. काय करणार? त्यांच्या अशा भुंकण्यामुळेच चरितार्थ चालतो. सकल प्राणीमात्र यांकडे दुर्लक्ष करून एकजुटिने सिंहाला खंबीरपणे पाठींबा देण्यात व्यस्त आहे.
(क्रमशः)
-------------------------
© भूषण वर्धेकर
-------------------------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कोणत्या वाचक वयोगटासाठी आहे जंगल_गोष्ट?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दौंड, पुणे, हडपसर, की हैद्राबाद?

आणि तारीख, वेळ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...डुकरांच्या जंगलाची उपमा अकारण प्रक्षोभक वाटली. बाकी असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0