रद्दीवाला -
.
रद्दीवाला "या कविराज"- म्हणून माझे स्वागत करतो
त्याच्या पैशानेच मला तो कटिंग चहा पाजत असतो -
मला भेटल्यावरती तो आनंदी अन् खुषीत दिसतो
माझ्या कवितेच्या रद्दीवर त्याचा धंदा चालू असतो !
एके काळी 'रद्दीवाला' म्हणून ज्याला हिणवत होतो
सलाम करुनी मी आता त्याचे जंगी स्वागत करतो -
"आभारासह परती"चा कविता-कचरा माझा घेतो
रद्दीवाला धंदा करुनी , धंद्यामधुनी 'सोने' घेतो !
कवितांच्या रद्दीने माझ्या, रद्दीवाला झाला 'राव'
'अध्यक्ष'पदी खुर्चीवरती देणगीसाठी त्याचे नाव -
व्यासपिठावर बसून हल्ली तो कविसंमेलन गाजवतो
समोर सतरंजीवर बसुनी आम्ही टाळ्या वाजवतो !
.
प्रतिक्रिया
हाहाहा मस्त!
हाहाहा मस्त!
कल्पना चमकदार आहे. पण शब्द
कल्पना चमकदार आहे. पण शब्द लयीत बसविताना गडबड झाली आहे असे वाटते. तरीही मजा आली वाचून. धन्यवाद.
कवितेतली कल्पना आवडली.
कवितेतली कल्पना आवडली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खिक् गमतीदार
खिक् गमतीदार
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तुमच्या रद्दीवाल्याला..
प्रिन्टाऊट्स विकत घ्यायची सवय लागली आहे, की तो स्वतःच प्रिन्टाऊट्स काढून घेत असतो?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-