एक कोडे: मोरी आणि स्वयंपाकघर
कायमच स्थलांतर
भाड्याचे घर
अनेक बोल्यांची
एक भाषा
वरील ओळी वाचून न वाचल्यासारखे करणे
याचा भाषेशी संबंध असावा का
बरोबर आहे!
मोरीची योग्य जागा स्वयंपाकघरातच आहे.
('मोरी' हा कोठलासा खाण्यालायक मासा असतो ना म्हणे? इंग्रजीत काय म्हणतात बरे त्याला?१ मग त्याची जागा स्वयंपाकघरातच नको काय?)
..........
१ तसा मासे अधूनमधून खात जरी असलो, तरी 'एक मराठीभाषक माणूस' (आणि 'एक भूतपूर्व मराठी माणूस') या आयडेंटिट्यांखाली मत्स्यपरिचय फारसा कधीच झालेला नसल्याकारणाने मत्स्यविशेषांची मराठी नावे फारशी माहीत नाहीत, आणि जी ऐकून माहीत आहेत, त्यांच्या ज्ञात मत्स्यविशेषांशी जोड्या जुळविता येतातच, असे नाही. कारण - पु.लं.ची क्षमा मागून - अमेरिकन झालो म्हणून काय झाले, शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार?
पुल्देस्पांडे म्हणालात त्यावरनं
पुल्देस्पांडे म्हणालात त्यावरनं मोरीचा अजून एक उल्लेख आठवला - खानावळीवरच्या लेखातला;
काकू: या अशाने नरकात जाल एक दिवस.
परांजपे: नरकाला मी आता भीत नाही काकू, परवा तुमच्या मोरीत पाय घसरून पडलो तेव्हा नरकाची आयडीया आल्येय मला !!
परत वाचला पाहिजे. मौज आहे त्यात....
परांजपे: काकू, भाजीत लसूण आहे की लसणात भाजी?
काकू: अहो हार्टला लसूण चांगली
परांजपे: कबूल आहे. पण मला एकच हार्ट आहे काकू, चार-पाच असती तर ठीक होतं !!

उत्तर
यो मोटरवाडा
पँटमे रख्खे नन्ही मूंगफली.