काही चित्रपटीय व्याख्या

संशोधनातील पुढचा भाग, खास जनहितार्थ. आधीच्या संशोधनाची लिन्क इथे आहे. गाणी वगैरे ऐकताना लोकांना प्रश्न पडतात की तेरी मैफिल मे म्हणजे नक्की कोठे. तेथे ही माहिती उपयोगी पडेल. गेल्या काही दिवसांत वाचकांनी "प्रेमात पडल्यावर सजदे नक्की कधी करतात?", "तिच्या मैफिलीत जायचे आहे. काय तयारी करून जाऊ?", "जानेजा जास्त भारी की जानेजहॉ?" असे अनेक प्रश्न विचारले. म्हणूनच हा लेखप्रपंच.

तर काही गाण्यांमधून व डॉयलॉग्ज मधून नेहमी ऐकू येणार्‍या शब्दांच्या व्याख्या.

फूटी कौडी:
प्रत्यक्षात जी देणार्‍याकडे नसते. घेणार्‍याला नको असते. तरीही ती मिळणार नाही अशी देणारा धमकी देतो, अशी जगातील एकमेव गोष्ट. लोक एकतर फूटी कौडीही देत नाहीत, नाहीतर सगळी जायदाद देतात. पण जायदाद पैकी फूटी कौडीही न दिल्याने गेली अनेक द्शके पिक्चर्स मधे झालेला झालेला हिंसाचार केवळ एखादी फुटकी का होईना कवडी देऊन थांबवता आला असता का यावर संशोधन व्हावे. म्हणजे जाउ दे त्याच्या/तिच्या बापाने किमान एक फुटी कौडी तरी दिली आहे तेव्हा आपण जायदाद हस्तगत करण्याचे प्रयत्न शांततामय/संवैधानिक मार्गाने करू असे ते चित्रपटातील व्हिलन-मामा वगैरे म्हंटले असते का वगैरे. त्रिशूल मधे संजीवकुमार ने रिसेप्शनिस्ट ला कोणी चिडलेला चेहरा घेउन भेटायला आला तर जरा त्याला आधीच ४-५ फूटी कौडियाँ देउन मगच आत पाठव अशी एक जनरल प्रोसेस सेट करून ठेवली असती, तर तो त्या भारी सीन ला अमिताभची 'आज मै आपसे पाँच लाख का सौदा कर रहा हूँ, और मेरे जेब मे पाँच फूटी कौडियाँ भी नहीं है' वगैरे डॉयलॉगबाजी टोटली नलीफाय करू शकला असता. तेव्हा भावी जायदाद होल्डर लोकांनी हे लक्षात ठेवावे की घरात लॉजिकल कारण नसताना बायकोचा भाऊ, मामा किंवा भाचा उगाच ये-जा करत असेल तर त्यांना अधूनमधून काही फूटी कौडिया देत राहावे.

मौला:
हे लोक प्रेमात पडलेल्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात."ती" ने एकदा हसून बघितल्यावर जर पुढच्या वेळी तिने बघितले नाही तर डायरेक्ट एकदम "मेरे मौला मेरे मौला, देदे कोई जान..." वगैरे विव्हळणारे प्रेमी जीव असतात त्यांच्यासाठी फॅमिली मौला नावाची संस्था आस्तित्वात येणे आवश्यक आहे अशा प्रसंगी कन्सल्ट करायला. प्रत्येक जण "मेरे मौला" म्हणत असल्याने प्रत्येकाचा एक स्वतंत्र मौला असावा. फॅमिली डॉक्टर, टॅक्स कन्सल्टंट, लीगल अॅडव्हायजर असतात तसे. मग लग्नाच्या आदल्या दिवशी याचा मामा तिच्या मामाला भेटून ओळख करून घेतात तशी दोघांकडचे मौला एकमेकांना भेटवत असतील. तसेच सगळे मौला या कामाला लागले तर जागतिक शांतताही होउ शकते हा दुसरा फायदा. मात्र यांनी अनेक शतके धर्माच्या बाबतीत जे केले त्यावरून आता प्रेम ही संस्था धोक्यात आहे हे नक्की

सजदे:
अस्सल मराठी लोक प्रेमात पडले की "ती"ला मिळवण्याकरिता हे करतात. उदा: 'खट्टा मीठा' मधे टिचकुले आडनावाचा मुलगा व गणपुले आडनावाची मुलगी प्रेमात पडतात तेव्हा सजदे करतात, दुवाँ मागतात. मात्र प्रदक्षिणा जशी एखादी घालून चालते तसे याचे नाही. हे एखाद्या किंमत कोसळलेल्या चलनाप्रमाणे एकदम लाखो मधे करावे लागतात.

दुनियावाले:
सरकारच्या 'वजने व मापे' विभागाकरता प्रेम मोजण्याचे काम हे लोक करतात. कसे कोणास ठाउक पण जगात सर्वात जास्त प्रेम कोणी केले हे यांना कळते. एरव्ही हे प्रेमी लोकांना विरोध करणे, त्यांच्यावर जळणे, त्यांची अनावश्यक खाजगी चौकशी करणे ई. कामे करतात. गजलयुक्त गाण्यांमधे 'वो'/'उनको' वगैरे उल्लेख आले आणि ते लीड पेअर पैकी कोणाला चपखल बसले नाहीत, तर नक्कीच यांच्याबद्दल असतात.

बाजा:
राजा लोकांचे अत्यंत नावडते वाद्य.

प्रेमाच्या तीन लेव्हल्सः
या लेव्हलच्या नावात जितके "जा" व "ने/ना" येतील तितक्या जास्त असतात. जा चा उच्चार ज्या सारखा.
उदा: १. जा २. जानेजा ३. जानेजाना
अजून तीन च्या पुढची लेव्हल कोणी गाठलेली नसावी.

पुस्तकः
बापाने 'जी ले अपनी जिंदगी' म्हंटल्यावर ट्रेन ने फिरायला निघाल्यावर गाडी पकडल्या पकडल्या जराही खिडकीबाहेर सुद्धा न पाहता पहिल्यांदा उघडतात ती वस्तू. किंवा कोणाला आपले शहर दाखवायला नेताना सुद्धा बाजूला वाचत बसतात - लहान मुलाला पार्क मधे घसरगुंडी वर सोडून आपण बाकड्यावर वाचत बसावे तसे. जज किंवा प्रोफेसर चे घर असेल तर जितकी पुस्तके असतील तितकी सर्वांना सारखे कव्हर घालून मागच्या शेल्फ मधे बरोब्बर बसली पाहिजेत. पुस्तके कशाचीही असू शकतात. हीरो इंजिनिअरिंग करत असेल तर 'इंजिनिअरिंग' चे पुस्तक असते. तो शेर मारत असेल तर त्याच्या शायरीचे असते. जरा आणखी गहन काहीतरी असेल तर उपन्यास असतो. हीरो चा "कारोबार" असेल तर एकाच शेल्फ वर Principles of Physiology, Thesaurus आणि Advertising Management शेजारी शेजारी असावीत.

पियानो:
कीबोर्ड वरच्या साधारण मधल्या १०-१५ कीज वर बोटे फिरवून कोणत्याही ताला-सुरातील गाणे वाजवता येणारे वाद्य

मैफिल:
मैफिल हे साधेसुधे काम नव्हे. सर्वसाधारण मराठी स्त्रियांचे मंगळागौर, हळदीकुंकू जशा रिच्युअल असतात तशा बडे खानदान की लडकीयोंकी अशी एक रिच्युअल असते. उसकी मैफिल. "तेरी मैफिल मे..." असे स्पष्ट उल्लेख असलेली अनेक गाणी अभ्यासून हेच लक्षात येते.

लोकेशनः एक मोठा हॉल. मागे दोन्ही बाजूने वरती जाणारे जिने असतील तर उत्तम, नाहीतर किमान मधे एक मोठा जिना असावा. हॉल च्या मध्यभागी एक पियानो.

पात्रयोजना अशी हवी:

हीरॉइनः कालानुसार मेकअप, किंवा विसंगतही चालेल. गाणार्‍या व्यक्तीच्या समोर गाणे कळत असल्याची अॅक्टिंग करावी लागते. तसे दिग्गज गीतलेखक कधीकधी फेल-सेफ ओळी लिहीतात, म्हणजे "न जाहिर हो, तुम्हारी कश्मकश का राज नजरोंसे" यात अभिनय करू शकणारी हीरॉइन ते बरोबर दाखवेल, तर न करू शकणार्‍या हीरॉइनला या ओळीला वेगळे काही करावेच लागणार नाही. त्यामुळे एक साधारण रडका चेहरा इतपत तयारी पुरते. दुसरे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे आधी कसमे वगैरे खाउन मग लाथाडलेल्या गरीब हीरोला स्वतःच्या मंगनीच्या मैफिलीत बोलावून त्यालाच गायला सांगणे इतकी "आ बैल" गिरी करता यायला हवी.

गरीब हीरो: हा गरीब असल्याने हीरॉइन त्याला पूर्वी दिलेल्या शपथा वगैरे विसरून दुसर्‍याबरोबर लग्न करणार आहे, असा त्याचा समज असतो. हा रोल करायचा असेल तर तीन गुण अत्यावश्यकः १. गरीब असणे २. पियानो फिल्मी स्टाईलने वाजवता येणे (वरती पियानोची व्याख्या पाहा) व ३. एक रडके गाणे अचानक म्हणता येणे. मैफिलीत अचानक गाण्याची ऑर्डर मिळून सुद्धा एक विरहगीत एकदम तयार असायला हवे. पेपरवाले जसे कोणी आजारी पडले की एक श्रद्धांजलीपर लेख तयार ठेवतात तसे मैफिल चे आमंत्रण आले की विरहगीत खिशात ठेवूनच निघावे. दुसरे म्हणजे "Dude, this occasion is not about you" याची अजिबात फिकीर न करता हिरॉइन चा वाढदिवस असेल किंवा मंगनी किंवा लग्न, तेथे आपली रडकथा सादर करता यायला हवी. ती कधी अगम्य भाषेत, कधी सभ्य पण थेट, तर कधी थेट आणि अपमानास्पद अशा कोणत्याही भाषेत करता यायला हवी.

हीरॉइनचा बापः या मैफिलीचा निर्माता. कारण ही अवस्था त्याच्यामुळेच निर्माण झालेली असते. चिरूट ओढत इकडेइकडे गर्वाने बघत फिरणे हे मुख्य काम

श्रीमंत बकरा: तो श्रीमंत आहे हे दाखवायला सूट घातला की झाले. अधूनमधून हीरॉइन वर हक्क दाखवणार्‍या हालचाली करणे. चालू असलेले गाणे कोणाबद्दल आहे कोणास ठाऊक असे एक्स्प्रेशन्स पाहिजेत. हीरॉइनच्या व याच्या अगदी in your face येउन बेवफाई, मेरे आँसू, गरिबी, चाँदी सोना विरूद्ध प्यार भरा दिल वगैरे गाणारा हा हिचा नक्की कोण आहे. इतक्या चांगल्या प्रसंगात हा हे काय गातोय वगैरे प्रश्न डोक्यात जराही आलेले दिसलेले चालणार नाहीत.

मैफिलीतील हुशार स्त्री: हे गाणे कोणाला उद्देशून आहे हे (फक्त) हिला समजले आहे, हे सतत चेहर्‍यावर दिसले पाहिजे. त्यामुळे गूढ हास्य करत एकदा हीरो कडे व एकदा हीरॉइन कडे आलटून पालटून पाहणे आवश्यक.

बाकी उपस्थित जनता: पूर्वीच्या डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेस सारखे जागा मिळेल तेथे बसलेले किंवा उभे. दोन बोटांत वाईन किंवा इतर दारूचे ग्लास धरलेले, मठ्ठपणा हा मुख्य गुण. म्हणजे गरीब हीरो ने "तेरी बेवफाई का शिकवा करू तो..." हे हॉल च्या मध्यावर रडका चेहरा करून उभ्या असलेल्या हीरॉइनकडे बघत म्हण्टले तरी त्याला "कोण बरे ती इतक्या यशस्वी असलेल्या तुला दुखावणारी?" असे विचारण्याइतके अज्ञान पाहिजे. येथे हा ही लॉजिकल प्रश्न पडू नये की जर ते या हीरॉइन बद्दल असेल तर थेट बोल की. आणि या हीरॉइन बद्दल नसेल, तर तिच्या मैफिलीमधे मधेच तुझी कहाणी कशाला?

तसेच आपल्या मागच्या तीन पिढ्यांमधले टोटल उर्दू नॉलेज हे पुलं म्हणतात तसे "हमारे बगीचे मे पैदा हुआ फुलदणाणा" च्या पुढे गेलेले नसेल तरी "खयाल-ए-दिल-ए-नाशाद आया", किंवा " एक यही मेरा इलाज-ए-गम-ए-तनहाई है" सारखी डबल-ए बॅटरी पॉवर्ड उर्दू वाक्ये आपल्याला समजली आहेत अशा थाटात माना डोलावता आल्या पाहिजेत.

यातली कोणतीही गोष्ट जमणार नसेल तर मैफिलीच्या नादी लागू नका.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

आयाई! 'सजदे' आणि 'मौला' वाचून संपलो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शीशेके महल में देखो तो पत्थरदिलवाले बसते हैं।
जो प्यार को खेल समझते है जो तोड़के दिलको हँसते है।

मस्त लेख..

याऊपर जाऊन हे पार्टीतले पाहुणेलोक्स पुष्कळदा तसल्या बेवफाई छाप रडक्या गाण्यावरही आनंदपूर्वक नाचाच्या स्टेप्स करत असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावरून आठवले. महाल बांधायचा तो शिशाचा कशासाठी? रेडियेशन-प्रूफ बनवण्यासाठी?

आणि लेड पॉयझनिंग झाले म्हणजे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते मुळात शीशीका महल असंही असू शकेल.

आठवा: काऊचं घर शेणाचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ताजमहाल बांधून झाल्यावर शाहजहानने कारागिरांची बोटे कापली होती म्हणतात.

इथे तशी गरज पडली नसेल. इथे कारागिरांनी स्वतःच आपली बोटे कापली असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"खिक्क" अशी श्रेणी दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक गाण्यातल्या 'गरवा' या शब्दाबद्दल माझा बरेच दिवस गैरसमज होता. 'गरवाच्या पुढे लगाना हे क्रियापद आल्यामुळे त्या क्रियापदाचे श्वापद होते आणि याचा काहीतरी भयंकर अश्लील अर्थ होतो (आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय, अशा अर्थाचं काहीतरी) असं आपलं मला वाटायचं. पुढे उर्दू जाणणाऱ्या एका मित्राने माझा हा गैरसमज दूर केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसा 'नेहा'बद्दलही संशय वाटावा अशी प्रस्थिती आहे. (नेहा लगा के हारी.. वगैरे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नेहाचा एक अर्थ 'डोळे' असा आहे.. 'मैं तो तुमसे नैन मिलाके हार गयी सजना' टैप..
(अवांतर : नेहाचा पाऊस , वात्स्ल्य् असाही अर्थ होतो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेहा आणि नेह या वेगवेगळ्या गोष्टी आहेत का?

उदा० 'नीड का निर्माण फिर फिर, नेह का आव्हान फिर फिर'. (मी 'नेह'चा अर्थ 'सृजनशीलता' असा घेत होतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

उर्दुत 'नेह' म्हणजे पाऊस.. 'आसमां से नेह बरसे' असा उल्लेख वाचलाय मी कुठेतरी..
एका शब्द्कोशात* 'नेह' हा मुळ शब्द असा उल्लेख वाचला होता.. नेह म्हणजे संस्कृत मधे 'वात्सल्य'.. मग यापासुन पुढची सगळी नावं तयार झाली म्हणे. नेहा, स्नेहा, स्नेहल आणि काय काय.. काही पंजाबी नावं पण 'नेह' वरुनच आहेत.

*इंडियन नेम्स अँड देअर मिनिंग्स असा शब्द्कोष होता तो. चांगला ४ इंच जाड्जुड.. देवनारगरीत नाव, मग संस्कृत अर्थ आणि मग ईंग्रजीत अर्थ असं त्याचं स्वरूप होतं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. जा २. जानेजा ३. जानेजाना - अजून तीन च्या पुढची लेव्हल कोणी गाठलेली नसावी.
'समीर' नामक व्यक्तीने (गीतकार म्हणवत नाही) जितकं 'जान, जानम, जानेजाँ, जानेजहाँ, जानेमन, सनम' वगैरे भरताड, लिंपण वापरलं तितकं क्वचितच कुणी वापरलं असेल. वानगीदाखल 'आशिक़ी'तलं हे गाणं -
जानेजिगर जानेमन मुझको हैं तेरी क़सम,
तू जो मुझे ना मिली, मर जाउँगा मैं सनम,
जाआनमऽ जाऽनेजाँऽआऽआऽआऽआऽ
जाआनमऽ जानेजहाँऽआऽआऽऽऽ
https://www.youtube.com/watch?v=2MIr6GuycTI

----

एक अत्यंत कळकळीची विनंती: मराठी टंकताना कृपया -
डॉयलॉग्ज मधून, जायदाद पैकी, पिक्चर्स मधे, त्रिशूल मधे संजीवकुमार ने रिसेप्शनिस्ट ला...
ही मराठीची कत्तल थांबवा. हे पुढलं वाचून पाहा बरं कसं वाटतं -
डॉयलॉग्जमधून, जायदादपैकी, पिक्चर्समधे, त्रिशूलमधे संजीवकुमारने रिसेप्शनिस्टला...

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"दिल्लगी" आणि "दिल की लगी" ही प्रॉडक्ट्स वेगवेगळी आहेत असनं ऐकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"कोण बरे ती इतक्या यशस्वी असलेल्या तुला दुखावणारी?"

... इथपर्यंत जेमतेम पोहोचले.

अधूनमधून हीरॉइन वर हक्क दाखवणार्‍या हालचाली करणे

हे थोडंसं बघितलं. का बघितलं! पण असो; या सिनेमावर आख्खं परीक्षण पाहिजे. अनिल धवन, हिटलरी मिशीवाला गबाळ्या आणि नीतू सिंग यांची मिसळ करणाऱ्याचा खिमा फारएण्डाकडून झालाच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फारेंडराव म्हणजे बोलायचं काम नाहीच, पण त्यातही सजदे विशेष आवडले. एक नंबर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मजा आली!

अजून काही शब्द:
१. प्रवासी शब्द : कारवा, फासला
२. फलक (सुफी किंवा अर्जितसिंगी सोलफुल गाण्यात मस्ट)
३. साहिल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

हाहा मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0