रेट्रो स्ट्रीट : अर्थात जुन्या गाण्यांच्या गप्पा

तर असं झालं , मालक अदिती यांनी खोडी काढली बेस गिटारसंबंधी. ते काय असतंय वगैरे. आणि मग बराच कुटाणा झाल्यावर त्या म्हणाल्या कि मला ( नेहमीप्रमाणे ) हे सगळं माहितेय वगैरे. पण असो . तर खरडफळ्यावर गप्पा वाढत गेल्या. गविशेठ , शुचि मामी , भटोबा , नील लोमस , चौदावा धूमकेतू आणि मालक अदिती , कधीकधी चक्क थत्ते वगैरे . चालकमालक जंतू कावणार असं गृहीत धरून खरडफळ्यावरून चर्चा धाग्यावर आणायचं ठरवलं ( पण जंतू कावलेच नाहीत , )गवि शेठनी नाव सुचवलं म्हणून देऊन टाकलं रेट्रो स्ट्रीट.
आता म्हणाल कि " नवीन काय ऐकताय " पेक्षा इथे वेगळं काये ? खरतर काही नाहीये पण आमच्या गप्पांचा झेंडा लागणार कसा , म्हणून काढून टाकला धागा आणि बिल फाडलं जंतूंवर .
तर वेगळं काये तर इथे गप्पांमधून हा धागा पुढे जाणं अपेक्षित आहे . मारत चला ..
नेहमीप्रमाणे ( या विषयात किंचित रस नसूनही केवळ जनहितार्थ ) श्री श्री आचरट बाबा एडिट करायला आले. आता विषय हाच म्हणल्यावर या गप्पा चालू होण्यापूर्वी अरबी तारुण्य आदूबाळ ( मे पीस बी अपॉन हिम )यांनी द कव्वाली बद्दल चालू गेलेल्या गजालीही यात घेतल्या आहेत .
आत्ता नुसतं एडीटून टाकतोय , गाणी नन्तर वेळ झाल्यावर एम्बेड करण्यात येतील .

गवि
सोमवार, 11/02/2019 - 10:36
नायिका गाते आहे आणि ती एक तर शब्द विसरते किंवा भावनाविवश झाल्याने, तिला पुढे गाववत नाही.
मेरे दिल गायेजा झूबी झूबी..
हे सुद्धा, चक्क यातलं आहे. (.. की जिमी जिमी, आजा आजा? चुभूदेघे)..

गवि
सोमवार, 11/02/2019 - 10:49
आगोदर वाटायचं की जिमी जिमी हे गाणं एखाद्या मूळ रशियन गाण्यावरून उचललं असेल आणि म्हणून त्यांना ते अपील होत असेल. (सवयीने)

पण खरंच हे हिंदी मूळ गाणं आणि ते असलेला मिथुनचा सिनेमा हे तिथे एका पिढीत घराघरात पोचले होते आणि टॉप फेमस होते असं ऐकलं / वाचलं. मिथुन हा अनेक रशियन तरुणींचा "क्रश" होता असंही.

गवि
सोमवार, 11/02/2019 - 10:45
बादवे, जिमी जिमी आजा आजा हे गाणं गोव्यात येणाऱ्या रशियन टुरिस्ट लोकांत इतकं लोकप्रिय आहे की ते खास त्यांच्यासाठी जवळपास सर्व लाईव्ह शोजमध्ये वगैरे खास पेशकश म्हणून किंवा त्यांच्या डिमांडवरुन गायलं वाजवलं जातं.
दोन तीन वेळा हे पाहून आंजावर शोध घेतला असता जुने भारत रशिया सिनेमा, संगीत विषयाकडे ऋणानुबंध दाखवणारे वृत्तपत्रीय लेख सापडले.

अबापट

सोमवार, 11/02/2019 - 13:19
हे घ्या जिमी जिमी आजा आजा चं मूळ गाणं
https://www.youtube.com/watch?v=T-cB0AFHZjw

गवि
सोमवार, 11/02/2019 - 13:25
बघतो लिंक. रोचक असेल.
जिमी जिमी ही क्रिएशन इन इटसेल्फ ओरिजिनल आहे असं म्हणणं / माहिती नसून जे काही जिमी जिमी हिंदी गाणं सिनेमात आहे, तेच तिथे रशियात मुळातून फेमस आहे असा मुद्दा.

गवि

सोमवार, 11/02/2019 - 13:30
लै भारी.
यांचंच "हँडस अप" हे तर फार फार आवडतं लहानपणापासून.
You're ok ऐकलं नव्हतं.

गवि

सोमवार, 11/02/2019 - 13:32
अंडर प्रेशर >> आईस आईस बेबी >> थंडा थंडा पानी
ही चेन आठवली.
अबापट
सोमवार, 11/02/2019 - 13:42
अंडर प्रेशर मधील बेस गिटारवरची रिफ पुढे या दोन्ही गाण्याची चाल बनली . सालं आपल्याकडं बेस गिटारचा चांगला वापर नाय करत कुणी .

गवि

सोमवार, 11/02/2019 - 13:56
सालं आपल्याकडं बेस गिटारचा चांगला वापर नाय करत कुणी
अगदी अगदी..त्यातल्यात्यात लेस्ली लुईसला आवडते ती मधेच मारायला.

घाटावरचे भट
सोमवार, 11/02/2019 - 14:13

>>अवांतर: त्या नायिका/न-नायिका गाण्यांवरून, अजून एका (मायक्रो)थीमवरची दोन गाणी आठवली.

म्हणजे, नायिका गाते आहे आणि ती एक तर शब्द विसरते किंवा भावनाविवश झाल्याने, तिला पुढे गाववत नाही. अशा प्रसंगी, तिच्या आयुष्यातले बाप-भाऊ-सखा- तिच्या साहाय्यार्थ पुढे धावतात आणि 'भरी मेहफिल में', एकही बीट न चुकवता गाण्याचं सॅलड ड्रेसिंग पूर्ण करतात!
उदा. १) पतझड सावन बसंत बहार. अबला नारी: नीलम, संरक्षक: शशी कपूर
उदा. २) दुश्मन ना करे दोस्त नो वो. अबला नारी: स्मिता पाटील(!). संरक्षक: राजेश खन्ना
अजूनही असतील. कुणाला आठवत असल्यास येथे अवश्य नोंदवावीत.
'ये इश्क इश्क है' - सिनेमा आठवत नाही, पण वयस्कर बुवा आणि वयस्कर बाईंमधला कव्वालीचा मुकाबला चालू आहे. वबुंनी त्यांचा गाण्यातून प्रेमाविरुद्ध काही बिनतोड युक्तिवाद केल्या कारणाने वबांना अश्रुपात होतो. तस्मात वबांना प्रेमाची तारीफ करणारं गाणं पुढे म्हणवेनासं झाल्यावर पुढचं गाणं मख्ख चेहेऱ्याचा भारतभूषण येऊन पूर्ण करतो, आणि मुकाबला की काय तो जिंकतो.
सालं आपल्याकडं बेस गिटारचा चांगला वापर नाय करत कुणी .
असहमत. मला बेस गिटारचा उत्तम वापर कोणता याचे बेंचमार्क्स माहित नसले तरी रेहमान बेगि मस्त वापरतो असं वाटतं. मसक्कली नावाच्या गाण्यात बेगि काढून टाकली तर काहीच उरणार नाही. किंबहुना दिल्ली-६ चित्रपटातील सगळ्याच गाण्यांत बेगि सुंदर वापरलेली आहे.

नितिन थत्ते

सोमवार, 11/02/2019 - 22:21
>>'ये इश्क इश्क है' - सिनेमा आठवत नाही,
बरसात की रात
३_१४ विक्षिप्त अदिती
सोमवार, 11/02/2019 - 22:36
आता मुद्दाम बेस गिटार काय ते समजण्याची शक्यता वाढेल म्हणून 'मसक्कली' ऐकलं; आतापर्यंत फक्त मोहित चौहानच्या आवाजासाठी ऐकलं होतं.
अत्यंत रटाळ आणि कल्पनाशक्तीला काहीही वाव नसणारं काम सध्या करत आहे, मग एकीकडे नेटफ्लिक्सवर 'दिल्ली -६' लावून दिला. तेवढाच कमी कंटाळा.
आदूबाळ
मंगळवार, 12/02/2019 - 05:49
'बरसात की एक रात'मधली ती कव्वाली हिंदी सिनेमांतली 'द कव्वाली' आहे. 'जो दवा के नाम पे जहर दे, उसी चारागर* की तलाश है' किंवा 'जब मैं पीता हूं तो कहते है कि मरता ही नहीं, जब मैं मरता हूं तो कहते है कि जीना होगा' वगैरे थोर लिरीक्ष आहेत त्यात.
*म्हणजे डॉक्टर असावा असं संदर्भावरून वाटतं. पण एका मित्राला 'लौंग गवाच्छा'मधला लौंग हे लांबीचं माप वाटत असे. त्यामुळे...
अबापट
मंगळवार, 12/02/2019 - 06:22
तो बरसात की रात ओ आबा, बरसात की एक रात अमिताबच्चम चा ..
नील लोमस
मंगळवार, 12/02/2019 - 07:51
ये इश्क इश्क है
उर्दू, पंजाबी, देहाती अश्या विविध भाषा . प्रमुख गायकांपेक्षा नाच्या-मावशीटाईप सहगायकांनीच म्हंटलेली, ओठांवर बोट फिरवत मख्ख भारतभूषणसाठी अस्वस्थ होणारी चंचल सौंदर्यवती मधुबाला असली किलर गोष्ट सुचवल्याबद्दल आभार
लौंग गवाच्छा
हा हा हा. आबा लोल.
अबापट
मंगळवार, 12/02/2019 - 08:47
१. बरसात की रात मधे संगीत थोर आहे..म्हणजे सुप्रसिद्ध ही द कव्वाली, गरजत बरसत सावन आयो रे, जिंदगीभरनही भुलेगी ये बरसात की रात वगैरे लोकप्रिय गाणी सोडून ,उर्वरित गाणीही थोर आहेत. उदा. निगाहे नाज ही कव्वाली ऐका , यातील फारशा प्रसिद्ध नसलेल्या गायकांची गायकी थोर.
द कव्वाली पेक्षा ही भारी वाटते.अनेक गेय कप्लेट्स सुधा या पिच्चरात मजा आणतात
आणि हे सगळं जमवलंय भा र ल मं यांचा फक्त मर्यादित वापर करूनच.(अदिती प्लिस नोट)
रोशन रॉक्स.
२. @ नील : तू काय म्हणत आहेस ते कळलं, पण कव्वाली मधे नाच्या/मावशी वगैरे असतात का याबद्दल साशंक आहे.( त्यांच्या पोशाखावरून वाटू शकते म्हणजे सुरमा, तोंडात पान, विशिष्ट टोपी वगैरे.)
अजूनही कव्वालांचे पोशाख खास असतात. त्यांची अकंपनीमेंटपण काहीही असू शकते . बुलबुल तरंग तबल्याऐवजी बोन्गो पण डाव्या हाताने डग्गाच . पण गायकी थोर असू शकते..
असो
ऐका निगाहे नाज पण ..
आय लौ कव्वाली पन

अबापट

मंगळवार, 12/02/2019 - 09:02
१.किंवा जी चाहता है चुम लु वगैरे...
व्हीडो बघावेत अजून करमणूक होते
२.भटोबा, तुमचा रेहमान चा मुद्दा मान्य. पण अपवादच नाही का ?

नितिन थत्ते
मंगळवार, 12/02/2019 - 17:22

>>बेस गिटार काय ते समजण्याची शक्यता वाढेल

"दिल है छोटासा"-रोजा मध्ये पण बेस गिटार छान वाजते.

१४टॅन
मंगळवार, 12/02/2019 - 18:51
स्वस्तिक बँडचं जोगी ऐकलंत का? बेस आणि इलेक्ट्रिक गिटार उत्तम.
राजकुमार रावचा 'ट्रॅप्ड' पाहिला. ऑस्कर ओवाळून टाकण्याइतकी उत्तम ॲक्टींग.

अबापट

मंगळवार, 12/02/2019 - 21:27
भटोबा , तुमचा आक्षेप मान्य. आत्ताच उर्वशी उर्वशी टेक इट इझी उर्वशी लागलं होतं. भरपूर आहे बेस गिटार..

अबापट
मंगळवार, 12/02/2019 - 21:23
अदिती, उद्या अंडर प्रेशर चा व्हीडो टाकतो. त्यातील बेस गिटार दिसेल व ऐकू येईल . फोनवरून जमत नाहीये . मग बहुधा बरेच संदर्भ लागतील.
बेस गिटार हे मूलतः परकशन म्हणून रॉक न रोल आणि रॉक मधे वापरले जाते. पूर्वी जे काम डबल बेस नावाचे धूड करे त्याची अर्ली फिफ्टीज मधे स्टेज संगीत जास्त सुटसुटीत झालं, तेव्हा जास्त सुटसुटीत अशा बेस गिटार ने घेतली असावे..जागच्या जागी उभे असणारे गायक वादक जाऊन जास्त नाचते गाते हालते चालते नाचरे गायक वादकांना हे फार सोयीचे झाले असावे( अंड आधी का कोंबडी आधी ते बघायला पाहिजे)हाच काळ स्टेज वर दंगा रॉक अँड रोलचा ( तरी एल्विसच्या सुरुवातीच्या काळात डबल बेसचे अवजड धूड दिसते स्टेजवर)
(अवांतर रोचक: तसा त्यापूर्वी आणि नन्तरही पियानो परकशन म्हणूनही वापरला जातो . मज्जा येते तिथंबी)

३_१४ विक्षिप्त अदिती
मंगळवार, 12/02/2019 - 21:57
बापट, बेस गिटार ऐकवाच.

अबापट
बुधवार, 13/02/2019 - 11:02
अदिती , सुलभ बेस गिटार .
उपरनिर्दिष्ट व्हिडिओ पहा. यात दोन गिटारवाले आहेत. एक लांब केसवाला आहे. तो AstroPhysics मधे Ph.D. आहे . त्याच्याकडे दुर्लक्ष करा . दुसरा सभ्यसा दिसतोय , कमी केस वाला. पांढरा टी शर्टवाला, इंजिनेर आहे तो , त्याच्या हातात चार तारा असलेली गिटार दिसतीय त्याकडे बघा आणि ऐका
किंवा व्हिडिओ चालू झाल्याझाल्या जे वाजताना दिसतंय आणि ऐकू येतंय ती बेस गिटार .

३_१४ विक्षिप्त अदिती
बुधवार, 13/02/2019 - 21:26
तो AstroPhysics मधे Ph.D. आहे . त्याच्याकडे दुर्लक्ष करा .
ही आता प्रतिक्षिप्त क्रिया असते.
बापट, तुम्हाला पटणार नाही, पण बेस गिटार म्हणजे काय ते मला माहीत आहे. मी Astrophysics मधे Ph.D. करत होते तेव्हा माझ्या घरमित्रांपैकी एक अकूस्टिक गिटार वाजवाजचा, एक बेस गिटार आणि एक ड्रम. ते तिघं गाण्याबजावण्याला बसले की माझे कान किटायचे. पण बेस गिटारच्या तारा अकूस्टिकपेक्षा निराळ्या असतात, दिसतात वगैरे गोष्टीही मला माहित्येत.
तुम्ही ऐकवणार ते गाणं क्वीनचं असणार, याबद्दल मला खात्री होतीच.

..शुचि
बुधवार, 13/02/2019 - 21:53
मी Astrophysics मधे Ph.D. करत होते तेव्हा माझ्या घरमित्रांपैकी एक अकूस्टिक गिटार वाजवाजचा,
इंग्लंडमध्ये का गं. विचारायचं कारण की सहसा भारतिय लोक गिटार-ड्रम वगैरे घरात वाजवताना ऐकीवात/पहाण्यात नाहीत.

मिहिर
गुरुवार, 14/02/2019 - 01:11
अण्णा, रहमानच्या 'दिल से रे' गाण्यातही बेस गिटार स्पष्ट ऐकू येते. ती पिंक फ्लॉइडवाल्याने वाजवली आहे म्हणे.

३_१४ विक्षिप्त अदिती
बुधवार, 13/02/2019 - 23:23
हो, हो. पोलिश मित्र अकूस्टिक गिटार वाजवायचा, दोन ब्रिटिश मित्र बेस आणि ड्रम्स.

घाटावरचे भट
गुरुवार, 14/02/2019 - 14:00

>>अण्णा, रहमानच्या 'दिल से रे' गाण्यातही बेस गिटार स्पष्ट ऐकू येते.

'दिल से रे' गाण्याचा तालाचा/पर्कशनचा भाग बराचसा बेगिवरच आहे. पण मसक्कलीमधली बेस गिटार खास आहे. त्यात बेसचा वापर फक्त गाणं भरण्यासाठी किंवा तालासाठी नाही, तर बेसलाईन गाण्याचा अविभाज्य भाग आहे. त्यात दोन वाद्य मोठ्या खूबीने वापरली आहेत - एक म्हणजे बेगि आणि दुसरा म्हणजे स्ट्रिंग सेक्शन (जो फक्त मुखड्याचा किंवा अंतऱ्याचा ओळीच्या सुरुवातीला वाजतो). त्यांनी मस्त परिणाम साधला जातो.

गुरुवार, 14/02/2019 - 14:46

>>अण्णा, रहमानच्या 'दिल से रे' गाण्यातही बेस गिटार स्पष्ट ऐकू येते. ती पिंक फ्लॉइडवाल्याने वाजवली आहे म्हणे.

विकि म्हणतं "Guy Pratt, Pink Floyd bass guitarist for post Roger Waters albums Delicate Sound of Thunder, The Division Bell and Pulse played bass on this song." विकि असंही म्हणतं की हा बाबा सेशन बेस प्लेयर आहे आणि त्यानी लै पब्लिकसोबत बेस वजवलाय. म्हणजे काय ते माहित नाही.

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 15:33
भटोबा, म्हणजे काय खरंच माहीत नाही ?
घाटावरचे भट
गुरुवार, 14/02/2019 - 16:40

>>भटोबा, म्हणजे काय खरंच माहीत नाही ?

नाय बॉ. सेशन बेस प्लेयर आणि इतर बेस प्लेयर्समध्ये काय फरक असतो?

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 17:02
सेशन म्युझिशिअन्स विकी मारा म्हणजे लक्षात येईल . बरेच वादक वेळोवेळी आपल्या सर्व्हिसेस थोरामोठ्या ग्रुप्सना देतात ( खरं तर उलट, बरेच ग्रुप्स अशा वादकांच्या सेवा घेतात ) ही मंडळी सामान्यपणे तरबेज , ज्ञानी कुशल असतात.( तशी नसतील तर विचारत नाही त्यांना ) त्यांची नावे बँडच्या लेबल वर नसतात ( वादन त्यांचे असेल तरी).पण बरेच कलाकार /ब्यांड यांच्याबद्दल कृतज्ञ असतात.( कारण बँड कच्चा असताना या मंडळींनी कुठेतरी हाताला धरून , वाजवून , मार्गदर्शन केलेलं असतं)
स्वीट होम अलाबामा गाणं ऐकलं असेल . लिनर्ड स्किनर्डनी एक आख्ख कडवं swampers या सेशन म्युझिशिअन्सच्या ग्रुपला व्हायलंय , कृतज्ञतापूर्वक .. हे वाचा म्हणजे लक्षात येईल .. आपल्याकडेही अशी मंडळी असणारच .. पण मला माहित नाही . One verse of the song includes the line, "Now Muscle Shoals has got the Swampers/And they've been known to pick a song or two." This refers to the town of Muscle Shoals, Alabama, a popular location for recording popular music because of the "sound" crafted by local recording studios and back-up musicians. "The Swampers" referred to in the lyrics are the Muscle Shoals Rhythm Section. These musicians, who crafted the "Muscle Shoals Sound", were inducted into the Alabama Music Hall of Fame in 1995[10] for a "Lifework Award for Non-Performing Achievement" and into the Musician's Hall Of Fame in 2008 (the performers inducted into the latter were the four founding Swampers—Barry Beckett, Roger Hawkins, David Hood, Jimmy Johnson—plus Pete Carr, Clayton Ivey, Randy McCormack, Will McFarlane, and Spooner Oldham).[11][12] The nickname "The Swampers" was given to the Muscle Shoals Rhythm Section by producer Denny Cordell during a recording session by singer/songwriter Leon Russell, in reference to their 'swampy' sound.
Part of the reference comes from the 1971–1972 demo reels that Lynyrd Skynyrd had recorded in Muscle Shoals with Johnson as a producer/recording engineer. Johnson helped refine many of the songs first heard publicly on the Pronounced album, and it was Van Zant's "tip of the hat" to Johnson for helping out the band in the early years and essentially giving the band its first break.
Lynyrd Skynyrd remains connected to Muscle Shoals, having since recorded a number of works in the city and making it a regular stop on their concert tours.

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 17:31
बरेच वादक वेळोवेळी आपल्या सर्व्हिसेस थोरामोठ्या ग्रुप्सना देतात (
प्रासंगिक करार ??
(अगदीच अवांतर, पण शाळेच्या एस्टीवाल्या ट्रिपा आठवल्या)

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 17:38
गविशेठ, प्रासंगिक करार हे टेक्निकली बरोबर पण महत्व खूप जास्त. ब्यांड वाले लोकं मान देतात या लोकांना. भारी वादक असतात हे.

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 17:48
तसेच अनेक बँड्समधून उत्तम लोक निघून सोलो करियर सुरू करतात.. किंवा दोन सोलो / बँड एकत्र येऊन featuring असं म्हणून काही एकेकटी गाणी करतात.
पैकी दुसऱ्या प्रकारात काही भारी गाणी बनून जातात.
बँडमधून बाहेर पडून एकटा सुरु अशा केसेसमध्ये जास्त वेळा प्रभाव कमी झाल्याचं वाटलं. (फेमस बँड सोडलेल्याचं) सोलो करियर जास्त चांगलं असं क्वचित वाटलं.
बँड म्हणून एक जादा एनर्जी असते.

घाटावरचे भट
गुरुवार, 14/02/2019 - 17:49
धन्यवाद अन्ना!

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 17:59
एक उत्तम उदाहरण म्हणजे बिली प्रेस्टन ... हा जरी बीटल्सच्या फॅब फोर पैकी नसला तरी त्याला अनऑफिशिअली फिफ्थ बीटल म्हणून संबोधण्यात येई .

गविगुरुवार, 14/02/2019 - 19:52
Band with band or solo with solo
-UB40 आणि Pato Banton : बेबी कम बॅक.
- Bryan Adams featuring Melanie C: When you're gone
बँडखेरीज सोलो:
Ali Campbell : Let your yeah be yeah (Cover)
जॉर्ज मायकेलची अनेक WHAM नंतरची।। फादर फिगर, प्रेइंग फॉर टाईम
आठवतील तसे ऍडवतो.
तुम्हीही ऍड करा.

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 20:00
च्यायला गवि, तुम्हीपण एटीजवाले काय ?

आणि माझं एव्हरी ब्रेथ यु टेक...

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 20:13
हो आमचं सगळं जुनं जुनं
पुढे, स्टिंगचं "पोलीस"मधून बाहेर पडल्यानंतरचं "Fields of gold" हे माझं अतीव आवडतं गाणं आहे.

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 20:24
आणि माझं एव्हरी ब्रेथ यु टेक...

..शुचि
गुरुवार, 14/02/2019 - 20:28
एव्हरी ब्रेथ यु टेक
ते गाणं मागावर असल्याचं म्हणजे स्टॉकिंग बद्दल आहे.

..शुचि
गुरुवार, 14/02/2019 - 20:33

च्यायला गवि, तुम्हीपण एटीजवाले काय ?

माझा नवराही ८०ज वाला आहे. पण मी उंडगं जनावर कसं वाट्टेल त्या शेतात जाउन चरतं, मनास येइल ते खातं, तशी हॅपहझार्ड गाणी ऐकत गेलेय. त्यामुळे आम्ही फक्त गोग्गोड वाले. मग ते ७०ज/८०ज/९०ज आपल्याला कळत नाही.

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 20:43
मामी,
भारी आहात तुम्ही !!! मी पण वाट्टेल त्या शेतात चरलोय.फक्त तुम्ही उसाच्या शेतीत गेलात आणि मी दगडधोंड्यांच्या... सेवनटीज एटीज वगैरे लेबल्स हो फक्त, ओळ्खण्याकरता

..शुचि
गुरुवार, 14/02/2019 - 20:44
भारी आहात तुम्ही !!!
हाहाहा नाही ती माझी उपमा नाही वरिजनली सन्जोपरावांनी ती वापरलेली आहे.

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 20:48
आणि माझं एव्हरी ब्रेथ यु टेक...
ते तर आहेच हो. ओ अण्णा, गाजलेल्या मूळ बँड्सची गाणी उत्तम असणं हा भाग गृहीत आहेच, पण इथे त्यातून कोणी वेगळं होऊन सोलो केलेल्या गाण्यांत क्वचित काही उत्तमही बनतात त्याची उदाहरणं म्हणत होतो.
न ऐकलेल्यांसाठी..

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 20:56
बर बर , मग तर काय भरपूर आहेत.
माय स्वीट लॉर्ड जॉर्ज हॅरीसन,
इमॅजीन आणि इन्स्टंट कर्मा जॉन लेनन,
I got my mind set on you .. George Harrison
Bad Boy Ringo Starr
जेनेसीस सोडल्यानन्तरची फिल कोलिन्सची Another day in paradise, one more night, सुसूसुडिओ वगैरे

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 20:57
व्हिडीओ बघतानाही काहीतरी हुरहूर लागते, नॉस्टॅल्जिक. त्याच्या सावलीच्या भागात भूतकाळ लख्ख उजळलेला. ठिकाण तेच, सध्याचं भकास.
व्हिडीओलाही दाद..

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 21:11

तुम्ही ऐकवणार ते गाणं क्वीनचं असणार, याबद्दल मला खात्री होतीच.

पण पण पण..मुळात कोणी काढला या गाण्याचा विषय हे, नम्रपणे नमूद करुन इत्यादि इत्यादि इत्यादि.
करिता माहितीस्तव..

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 14/02/2019 - 21:41

पण पण पण..मुळात कोणी काढला या गाण्याचा विषय हे, नम्रपणे नमूद करुन इत्यादि इत्यादि इत्यादि.

मी विषय काढला हे मान्यच, पण बापटांचं 'क्वीन' बँडवर प्रेम आहे. त्याचं मला कौतुक आहे, असं १४ फेब्रुवारीला नमूद करणं माझं कर्तव्य आहे.


नील लोमस

शुक्रवार, 15/02/2019 - 07:41

स्टिंग फील्ड ऑफ गोल्ड

गवि, या गाण्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे गाणं खूप नॉस्टॅल्जिक करणारं आहे. आणि व्हिडीओ बद्दल तर काय बोलायलाच नको.

घाटावरचे भट
शुक्रवार, 15/02/2019 - 09:34
स्टिंगची एव्हरी ब्रेथ यू टेक, फील्ड्स ऑफ गोल्ड आणि डेझर्ट रोझ माझी आवडती गाणी. स्टिंगचा आवाज फार छान आहे.

गवि
शुक्रवार, 15/02/2019 - 10:14
इफ आय एव्हर लूज माय फेथ इन यू, हे गाणंही एक अगदी mtv च्या भारतातल्या पहिल्या पहिल्या दिवसांची याद म्हणून आवडतं.
तेव्हा mtv फारच वेगळा होता.

..शुचि
शुक्रवार, 15/02/2019 - 10:48

..शुचि
शुक्रवार, 15/02/2019 - 11:22
विस्कॉन्सिन/मिनेसोटा चे कंट्री लाइफ अगदी जवळुन पाहील्याने, कंट्री म्युझिक प्रचंड आवडते.

अबापट
शुक्रवार, 15/02/2019 - 13:15
भटोबा ,
डेझर्ट रोज थोरच . सहमत .
मामी ,
' विस्कॉन्सिन/मिनेसोटा चे कंट्री लाइफ'
मिड वेष्टर्ण कन्ट्री लाईफ स्टाईल व्यक्त करणारी इतर गाणी लिहा की .
कन्ट्री रोड आहेच म्हणजे , म्हणजे इथे अगदी कपिलदेवनं एका ट्रॅक्टरच्या ऍड मधे त्याची वाट लावल्याने फेमस झाले आहे वगैरे .
बाकी लिहा की .

..शुचि
शुक्रवार, 15/02/2019 - 13:29
म्हणजे इथे अगदी कपिलदेवनं एका ट्रॅक्टरच्या ऍड मधे त्याची वाट लावल्याने फेमस झाले आहे वगैरे .
हाहाहा हो का?

अबापट
शुक्रवार, 15/02/2019 - 15:52
मी काय म्हणतो , की कार्यकारी संपादक रा रा जंतु पूर्ण उचकण्याच्या आधी ही सर्व गाणी तिकडे एखादा, आवडती गाणी वगैरे असा धागा काढून ट्रान्सफर करूयात का ?
क्या बोलते गवि शेठ, भटोबा , मामी ?
( ट्रान्सफर कशी करतात ? )

गवि
शुक्रवार, 15/02/2019 - 16:43
ट्रान्सफर करूयात का ?
क्या बोलते गवि शेठ, भटोबा , मामी ?
तुमची सूचना मान्य करण्यास एखाद्याची हरकत नसावी असे म्हणणे वावगे ठरू नये असे म्हटल्यास गैर आहेच असं वाटत नाही हे खरं, अशा आशयाचं व्यक्तिगत मत व्यक्त करावं की नाही हा मुख्य प्रश्न असू शकतो..

पुंबा
शुक्रवार, 15/02/2019 - 17:53
उत्तरदायित्वास नकार देणे गैर नसावे असे वाटण्याची शक्यता तुम्ही ध्यानात घेण्यास हरकत नसावी असे वाटू शकते असे असावे.


चिंतातुर जंतू

शुक्रवार, 15/02/2019 - 19:20
माझा असा दाट संशय आहे की लोकांना खफवर गंभीर आणि माहितीपूर्ण लिहिण्यास अटकाव करण्यासाठी आणि कंटाळा आणून त्यांना इथून हुसकवण्यासाठी ह्या रा रा जंतुंनी हत्तींचे डु आयडी धारण केले असावेत.

१४टॅन
शुक्रवार, 15/02/2019 - 19:30
भटोबा ,
डेझर्ट रोज थोरच . सहमत .
शतश:.
शेप ऑफ माय हार्टही माझं आवडतं. शिवाय अनुष्का शंकर, कर्ष काळेसोबतचं त्याचं 'सी ड्रीमर'ही. चिरतरूण, सदाबहार आवाज.

अबापट
शुक्रवार, 15/02/2019 - 19:54
रा रा जंतूंनी डू आयडींची (त्यांना न जमणारी )अफवा सोडण्यापेक्षा हे सगळं तिकडे धाग्यावर ढकलायचं हे सांगावं किंवा बेटर स्टील स्वतःच ते करून टाकावं
मंडळ आभारी असेल.

नील लोमस
शुक्रवार, 15/02/2019 - 21:28
माझा असा दाट संशय आहे की लोकांना खफवर गंभीर आणि माहितीपूर्ण लिहिण्यास अटकाव करण्यासाठी आणि कंटाळा आणून त्यांना इथून हुसकवण्यासाठी ह्या रा रा जंतुंनी हत्तींचे डु आयडी धारण केले असावेत.
प्रायव्हसीचा फील हे कारण तर नसेल खरडफळ्यावर गंभीर आणि माहितीपूर्ण लिहिण्या मध्ये? ऐसीचे लेख लॉगिन न करताही वाचता येतात त्यामुळे ऐसीवर लॉगिन करणे आवश्यक करावे.

३_१४ विक्षिप्त अदिती
शुक्रवार, 15/02/2019 - 23:33
कोणती गाणी आवडतात, याबद्दलही खाजगीपणा!! किती घाबरून राहाल! जो डर गया, समझो मर गया.

अबापट
गुरुवार, 21/02/2019 - 13:08
गवि शेठ, आपल्या खरड फळ्यावरच्या रँडम संगीत गप्पांचा धागा करूयात का ? पुढं चालू ठेवणार का तुम्ही ?
हो म्हणालात तर समर्पक नाव सुचवा धाग्याचं

नंदन
गुरुवार, 21/02/2019 - 13:58
हो म्हणालात तर समर्पक नाव सुचवा धाग्याचं
ही नावं सोडून काहीही चालेल*
- सूर तेच छेडिता
- स्वर आले दुरुनि
- गाये चला जा
- सूर राहू दे
- गाता रहे मेरा दिल
- सूरसंगम
- जुळल्या सुरेल तारा
- सूर निरागस हो
- हे सुरांनो
(प्रत्येक नाव, त्यापुढे ... + उसासा कल्पूनच वाचावे!)
* म्हणजे गवि ही असली नावं सुचवणार नाहीत, याबद्दल खात्री आहे. पण तेवढ्यातच चान्स पे डान्स!

गवि
गुरुवार, 21/02/2019 - 14:52
नाव: रेट्रो स्ट्रीट..

१४टॅन
बुधवार, 27/02/2019 - 06:34
अबापट, Bloodywood ऐका. भारीए.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे सगळं इंग्लिश (एटले नॉन हिंदी) गाण्यांविषयी आहे. आपला काय समंध नाय !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एटले नॉन हिंदी

बोले तो, मराठीसुद्धा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी चालतायत....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय लतादीदी गायल्यात*, वा!

*कोण रे तो 'लती चिरकली' म्हणतोय? बाहेर घालीव रे त्याला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

...लता लता होती, तोवरच चांगली गायची. तिच्या लतादीदी झाल्यापासून चिरकायला लागल्या.

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मे पीस बी अपोन हिम
लिहिलं ना हो ? मग पिसा की ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते - 'च्यायला गवि, तुम्हीपण एटीजवाले काय ?' माझ्या तोंडी कशाला घातलय? ती कमेंट अ.बांची आहे. मी ते फक्त अवतरणात लिहीले आहे.
मी च्यायला शब्द वापरत नाही. फक्त एक-दोनदा 'हाण्ण तेजायला' ही पराची ओळ वापरलेली आहे.
.
मुझे बदनाम मत करो ना!!! Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व क्वोटेड मजकूर प्लेन टेक्स्ट झाला आहे, त्यामुळे सर्वांच्या तोंडी आधीची इतरांची वाक्ये आली आहेत असं दिसतं.

बाकी या धाग्यावर खाली आणखीन जरा जुन्या काळाकडे जाऊन आठवण व्हावी म्हणून काही गाणी उल्लेखतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणखीन जरा जुन्या काळाकडे जाऊन आठवण व्हावी म्हणून काही गाणी उल्लेखतो.

इर्शाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इर्शाद!

खालिदा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद्या संपादन करतो गविशेठ, तो पर्यंत गाडी चालू ठेवा..चांगला स्पीड पकडलाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@शुचि, एडिटींग मी केलय,तेव्हा प्रतिसाद वर खाली झाला असेल. ( खफवरचे नवीन प्रतिसाद वर इकडे उलट करताना गल्लत झाली असेल. )शिवाय अवतरण चिन्हे उडाली असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो प्रॉब्लेम च्रट्जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय प्रसन्न धून असलेले गाणे आहे हे (जरी गाण्यातील प्रसंग वियोगाचा असला तरी) . आज हॅरी बेलाफाँते चा जन्मदिन दिसतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते तर एक प्रकरण आहे.

उपरोक्त तिन्ही आवडती.

पण स्टिल आय एम सॅड ऐकलंय का? आय होप यू हॅव नॉट मिस्ड इट. नक्कीच ऐकलं असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही ऐकलेले गवि. नक्की ऐकेन Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोनीएमचं आहे हे पटणारच नाही.

शिवाय ब्राऊन गर्ल इन द रिंग हे लहानपणी लै आवडायचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण्हे गाणं स्त्रीने गायलय ना? मग? बॉनी एम चे कसे? हां ग्रुप आहे तो बरोबर ROFL
मी त्या बॉबी फॅरेललाच इतकी वर्षं बॉनी एम समजतेय ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

True! खरच समुद्राची गाज आहे या गाण्यात.
अजुन एक समुद्राच्या गाजेचं गाणं
https://www.youtube.com/watch?v=6rbZr7YoqK0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याचीच "अगली किड जो"ची व्हर्शन नव्वदीत फेमस झाली. ती एका प्रकारे जास्त अस्वस्थ करणारी आहे, मेलडी तुलनेत कमी असल्याने जास्त अंकम्फर्टेबल होते आणि व्हिडीओमुळेही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त गाणं आहे हे. मी हॉस्टेलवर ऐकलं १९९५ मध्ये. इतकं आवडलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTfFaRE1q4-mUv20tFf_OgWGdv_5ex5UZUPSS7CtZX-xjSnTzPYGQ
.
पहील्यांदा हीचा फोटो पाहीला. अतिशय आवडली. मग गाणी ऐकली अतिशय आवडली. नवऱ्याला सांगीतली तर तो म्हणाला - अरेच्च्या तुलाही जुनी गाणी आवडतात का? ही तर माझ्या काळची आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे काय ? मस्तच आवाज आहे !!! ( अनुक्रमे शर्लि बेसी आणि इला फिटजेराल्ड खालोखाल आपली फेवरीट आहे , दमदार आवाजाच्या बाबतीत)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शर्लि बेसी आणि इला फिटजेराल्ड - यांची गाणी ऐकेन. ऐकलेली नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मामी , हे घ्या शर्ली बेसीचं सुप्रसिद्ध लव्ह स्टोरी . तुम्ही हे ऐकलं नव्हतं याचं मला अपार आश्चर्य वाटून राह्यलंय .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मामी , हे घ्या शर्ली बेसीचं सुप्रसिद्ध लव्ह स्टोरी . तुम्ही हे ऐकलं नव्हतं याचं मला अपार आश्चर्य वाटून राह्यलंय .

क्या बात है!!! मस्त मस्त मस्त!!

How long does it last?
Can love be measured by the hours in a day?
I have no answers now but this much I can say
I'm going to need him 'til the stars all burn away
And he'll be there

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आय बेग युअर पार्डन, आय नेव्हर प्रॉमिस्ड यु अ रोझ गार्डन्
https://www.youtube.com/watch?v=2-eclUz-RYI
.
आतिशय गोड गाणं. मी हॉस्टेलवर असताना, नवऱ्याने सांगीतलेले की त्याला हे गाणे आवडते. तेव्हा ऐकायला मिळाले नाही पण नंतर जेव्हा ऐकले अतिशय आवडले.
.
https://www.youtube.com/watch?v=3KFvoDDs0XM - रॉय ऑर्बिसन चे 'प्रेटी वुमन'. अजुनही जुने दिवस आठवतात. हेही नवऱ्याचे आवडते गाणे. त्यामूळे प्रथम त्याला आवडते म्हणुन पारायणे केलेली. त्याच्याकडून होकार यायच्या आधी, ही पारायणे झालेली. ती अनिश्चितता अजुनहीया गाण्याबरोबर जोडलेली आहे. गाणं एकदम वेगळच वाटतं. पोटात गलबलवुन टाकतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त आवडती गाणी काढलीत वर.

हेही ऐकू: The Carpenters - There's a kind of hush

https://youtu.be/8CX83EQA8dc

तशीच

-Time after time

-Dust in the wind

-Love of common people

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चौदावा धूमकेतू

मी कट्टी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

१४ वे सॉरी एखादा धागा हिंदीचा काढू. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मामी, चौदावे हे खरे निळे* धातु **संगीतवाले आहेत , ते कसलं अन्नू मलिक चा धागा काढणार ?
त्यांना हेवी मेटल हवे असणार,
किंवा धूमकेतू म्हटल्यामुळे ते कट्टी असणार...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आह्ह्ह!! आत्ता कळळं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=CMj7UcjPZ0U&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof... - पुट अ लिटल लव्ह इन युअर हार्ट्
.
https://www.youtube.com/watch?v=qeMFqkcPYcg&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof... - स्वीट ड्रीम्स आर मेड ऑफ धिस

Some of them want to use you
Some of them want to get used by you
Some of them want to abuse you
Some of them want to be abused

https://www.youtube.com/watch?v=_rleFAS_B04 - अ बॉय नेम्ड सु ................................ दर लाँग ड्राइव्हला हे गाणे ऐकून कान किटले आहेत. पण मजेशीर आहे.

And he said, "Son, this world is rough
And if a man's gonna make it, he's gotta be tough
And I know I wouldn't be there to help ya along
So I give ya that name and I said goodbye
I knew you'd have to get tough or die
And it's the name that helped to make you strong"

वाह! काय आयडीया आहे.

https://www.youtube.com/watch?v=K6RUg-NkjY4 - द डेव्हिल वेन्ट् टु जॉर्जिआ ................................................. अफलातुन आहे हे गाणं.
https://www.youtube.com/watch?v=oGpFcHTxjZs - टीना टर्नर/ व्हॉट लव्ह हॅस गॉट टू डू विथ ................................ हे एक आवडते गाणे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टिना टर्नर बोले तो गोल्डन आय

काय खणखणीत आहे आवाज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह! खरच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि टीना टर्नर म्हणजे ' व्हाट्स लव्ह गॉट टू डू विथ इट ' पण ... खणखणीत आहे पण खर्जातील पण आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अँड्रिआ बोसेली, या आंधळ्या ऑपेरा गायकाचे 'पॉवर ऑफ लव्ह' -
https://www.youtube.com/watch?v=Esq0U_lvgsA
__________________
https://www.youtube.com/watch?v=lcOxhH8N3Bo - टोटल एक्लिप्स ऑफ द हार्ट ............................... यासम हेच!!! फार फार आवडतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गवि व अबा, तुम्हाला ८०ज मधलं एकच्च फक्त एकच्च गाणं निवडायला सांगीतलं तर तुम्ही कोणतं निवडाल?
मी - https://www.youtube.com/watch?v=lcOxhH8N3Bo - टोटल एक्लिप्स ऑफ द हार्ट निवडेन!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार फार आवडतं गाणं आहे ते. तेही एक नंबरला घ्यायला हरकत नाही.

बाकी एटीज असंच नाही पण एकूण ऐंशी नव्वद आसपास..

फ्रायडे आय एम इन लव्ह (क्युअर)

टेक माय ब्रीथ अवे

आय कान्ट हेल्प (यूबी 40 कव्हर)

पापा वॉज अ रोलिंग स्टोन (जॉर्ज मायकेल कव्हर)

ब्लेझ ऑफ ग्लोरी (बॉन जोव्ही)

इन दीज आर्म्स (बॉन जोव्ही)

किंगस्टन टाऊन (मूळ आणि युबी40 कव्हर दोन्ही)
..

हे राम

नाही एकच ठरवणं शक्य.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा Smile ही गाणी ऐकेन.
https://www.youtube.com/watch?v=PGNiXGX2nLU&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof... - यु स्पिन मी राउंड मस्त आहे. ह पिट बर्न्स पुरुष आहे की स्त्री कळत नाही. ग्लॅमरस आहे मात्र.
_____________
आय कँन्ट हेल्प .................... अतिशय आवडतं. यु बी ४० चे व एल्व्हिस चे देखील..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे असं एक वगैरे नस्तय हो , चारदोन डझन सांगायला लागतात .

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चारदोन डझन सांगायला लागतात .

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि आय ऑफ द टायगर.

फास्ट कार

को कोमो

रिव्हर ऑफ ड्रीम्स (बिली जोएल)

मॅन ऑन द मून (आर ई एम)

निकिता, कँडल इन द विंड, डॅनियल आणि सॅक्रीफाईस (ए.जॉ.)

एल्टन जॉनचं आणखी खूप काही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोकोमो मस्त आहे की.
रिव्हर ऑफ ड्रीम्स - मला देखील फार आवडतं.
निकिता - आवडलं.
सॅक्रिफाइस - आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hallelujah (Leonard Cohen song)
सगळी व्हर्शन्स ऐकली आहेत. एकदम 'कोहेन' गाणं आहे. मूड्वर फार परीणाम करतं आणि दीर्घकाळ करतं. उदास वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा ! मस्त आहेत या गप्पा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

सालं आपल्याकडं बेस गिटारचा चांगला वापर नाय करत कुणी
.....घाटावरचे भट ह्यांनी रहमानने वापरलेल्या बेस गिटारची उदाहरणे दिली आहेतच. 'हम्मा हम्मा', 'ओ हमदम सुनियो रे', 'कभी कभी अदिती', 'चिकबुक रैले' हीदेखील चटकन आठवणारी.

मोहिनी डे ही 'बेस गिटार प्रॉडिजी' म्हणून चांगलीच नावारूपाला आलेली विशीतली तरुणी रहमानच्या चमूत बरेचदा वाजवते. उदा. 'नान येन' गाण्याची सुरुवातच बेसच्या एका सुराने होते नि गाण्यात ते कॉर्ड्च्या स्वरूपात आले आहे. चित्रफितीत मोहिनी बेस गिटार वाजवताना प्रत्यक्ष दिसते आहे.
..
इलैयाराजानेही बरंच वापरलंय. 'आपल्याकडं'च्यांत दाक्षिणात्यही पकडायचे झाले, तर वानगीदाखल मणिरत्नमच्या 'मौनरागम्'मधलं माझं अतिशय आवडतं 'चिन्नं चिन्नं' गाणं आहे. किंवा मणिच्या 'अंजली' चित्रपटातली अनेक गाणी आहेत - 'वेगम् वेगम', 'समथिंग समथिंग', 'छत पे हैं छत पे हैं, एक लव्हजोडी लव्हजोडी'.
मणिच्याच 'अग्निनत्चतीरम्'मधलं 'राजा राजाथि राजा' गाणं नि त्या चित्रपटावर बेतलेल्या 'वंश'मधलं 'राजा राज करें, हम हैं राजा' हे आनंद-मिलिंदनी इलैयाच्या मूळ चालीला वेगळा ढंग दिलेलं गाणं घ्या.
..
शंकर-एहसान-लॉयच्या 'दिल चाहता हैं'ची सुरुवातच बेस गिटारने होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण3
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थातच, रहमान हा अपवाद आहेच आणि शंकर एहसान लॉय हे पण ...यांची सांगीतिक जाण आणि जडणघडण सध्याच्या आणि काही माजी संगीतकरांपेक्षा वेगळी असावी , म्हणून असेल का ? माहीत नाही. अधिकृत संगीतकार बनण्यापूर्वी
लॉय मेंडोंका आणि एहसान नुरानी हे अनेक रॉक/लाईव्ह/स्टुडिओ कॉन्सर्टसचा भाग असत. अनेक मोठ्या कलाकारांचे बॅकअप म्युझिशियन्स असत. एकाहून जास्त वाद्य सहजतेने वाजवू शकतात( पुण्यातही हे सहभागी असलेले प्रोग्रॅम बघितल्याचे आठवते ) उमेदवारीच्या काळात यांनी थोरामोठ्यांच्या मागे राहून भरपूर घासलीये हे जाणवतं. अशा कलाकारांची सांगीतिक दृष्टी ही जास्त मोकळी आणि प्रगल्भ होत असावी काय असं उगाचच वाटतं. हेच सर्व लेसली लुईस च्या बाबतीतही ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमुकराव , माहितीबद्दल धन्यवाद . दाक्षिणात्य संगीत याविषयी माहिती शून्य असल्याने आपण सांगितलेले कधी सापडलेच नसते .
तुमचा याही विषयातील व्यासंग दांडगा दिसत आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Orinoco Flow (Sail Away) - Enya (with lyrics) - YouTube
https://www.youtube.com/watch?v=2zkjQVh5KmQ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाश्चात्य संगीताबद्दल शून्य माहिती आणि दोन शून्य आवड असल्याने पास. तरीही सर्व चेर्चा वाचली. बेस गिटार कशाला म्हणतात ?
'डिस्को स्टेशन डिस्को, ह्या गाण्यांत ते वापरलं आहे का ? किंवा आरडीच्या गाण्यांमधे तर गिटारचा ठणठणाट असायचा, त्यांत ऐकू येतं का हे बसकं गिटार ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

काय काय सांगू ? दिसण्यास सर्वसामान्य इलेक्ट्रिक गिटार सारखीच असते फक्त , चारच तारा असतात ( ६ , ८ किंवा बारा तारांऐवजी )
ज्या तारा असतात त्या हे इलेक्ट्रिक /अकुस्टिक गिटार च्या तारांच्यापेक्षा एका सप्तकाहून अधिक खालच्या सप्तकात लावलेल्या असतात . ( च्यायला , हे मराठीत लिहिताना लै कॉन्स्टीपेटेड होतंय . असो.)
डिस्को स्टेशनमध्ये आहे का नाही याची कल्पना नाही . रीना रॉयचा भीषण चेहरा समोर आल्याने ते गाणे पूर्ण बघणे माझ्याच्याने होणार नाही.
तिरसिंगराव , पूर्वीच्या काही हिंदी गाण्यांमध्ये एक डबल बेसचे धूड असे , ते आठवतंय का ? त्याचेच काम सुटसुटीत प्रकारे बेस गिटार करते .
ऐकू कशी येते ? कानाला कशी जाणवते असे हवे असेल तर वरती रा रा अमुकराव यांनी उल्लेख केलेले गाणे ' दिल चाहता है ' हे ऐका . या गाण्याच्या सुरुवातीला बेस गिटारच आहे .
किंवा खरडफळ्यावर टाकला होता , आणि आज इथेही थोड्या वेळाने एम्बेड करेन तो 'अंडर प्रेशर' या क्वीन बँड च्या गाण्याचा व्हिडीओ बघा . त्याची सुरुवात बेस गिटारने होते . व्हिडिओमध्ये दिसेलसुद्धा ती . ( या गाण्यातील बेस गिटारच्या सांगीतिक रचनेवर आधारित विलायतेत प्रसिद्ध आईस आईस बेबी आणि भारतात पंडित बाबा सैगल यांचे १९९० च्या आसपासचे सु किंवा कुप्रसिद्ध " ठंडा ठंडा पानी " इत्यादी गाणी रचली गेली असे म्हटले जाते . असो . )
बाकी माहिती या गप्पांमधे कुठेतरी लिहिली आहेच .

आर डी च्या गाण्यात बऱ्याच गोष्टींचा ठणठणाट असे . तुम्हाला त्यातील कुठला अपेक्षित आहे हे न कळल्यामुळे नक्की सांगता येत नाही .
अवांतर : ठणठणाट ही संज्ञा सापेक्ष आहे याबद्दल आपण सहमत असाल अशी खात्री आहेच . तरी लोभ असावा .

आणि हे सगळं वाचल्यावर सु श्री अदितीदेवी यांच्यासारखे ' मला हे सगळं माहीतच होतं ' असं कृपया ( तसं असलं तरीही ) सांगू नका . माणुसकीवरची श्रद्धा उडते हो !!! WinkWink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पूर्वीच्या काही हिंदी गाण्यांमध्ये एक डबल बेसचे धूड असे , ते आठवतंय का

हो आठवतंय! ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा, डाव्या कोपऱ्यांत हे धूड उभे करुन, कोणी दांडगट ते खाजवत बसलेला दिसायचा खरा!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

असं कृपया ( तसं असलं तरीही ) सांगू नका . माणुसकी वरची श्रद्धा उडते हो !!! WinkWink

फुटले!!!!
तुस्सी छा गये अबा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे घ्या बापट तुमच्यासाठी ('नोसफेरातू' ह्या माझ्या आवडत्या चित्रपटातले तुकडे टाकण्याबद्दल क्वीनचे विशेष आभार)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद , परंतु दृश्य स्वरूपात बेस गिटार दिसावी म्हणून याच गाण्याचा हा व्हिडिओ टाकत आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जानम समझा करो (सिनेमातलं नव्हे, हे आल्बममधलं आशा भोसले, मिलिंद सोमण फेम आहे, ते) यातही बेस गिटार प्राधान्याने आहे असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे कोणाला 'विकेड गेम्स' नावाचं गाणं आवडतं का? ख्रिस आयझॅक (हे नाव शिवीसारखं वाटतं) का कोणीसा गायक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी क्रिस आयझॅकचा मोठा पंखा आहे.

खजिना आहे.

Wicked game तर अद्भुत आहेच.

हीदेखील त्याच तोडीची अवश्य ऐका:

- Graduation day

- 5:15

- Except the new girl

- San Francisco days (मास्टरपीस)

याचे सर्व व्हिडीओजसहित ऐका Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घाटावरचे भट, पहील्यांदा ऐकले.
काय छान आहे.

What a wicked game you played to make me feel this way
What a wicked thing to do to let me dream of you
What a wicked thing to say you never felt this way
What a wicked thing to do to make me dream of you

आवाज छान आहे.

The world was on fire and no one could save me but you
It's strange what desire will make foolish people do

क्या बात है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता ग्रॅज्युएशन डे, सॅनफ्रान्सिस्को डेज, 5:15, Except the new girl ही ऐका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्की आता ऐकणारेच.
_______________
दोन्ही सुंदर आहेत. ग्रॅज्युएशन डे - वाह!!
Chris Isaak माहीत नव्हता. - प्रचंड प्रॉमिसिंग आवज/स्टाइल् आहे. brooding, romantic
Except the new girl - अरे काय गोड आवाज आणि स्टाइल आहे. हृदय लोण्यासारखं वितळतय. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

९४-९५ सालच्या पुढेमागे क्रिस आयझॅक कानात वॉकमनद्वारे सतत गात असायचा. कॅसेट बाजू संपली की उलट करून परत चालू.

बॉन जोव्हीही. पण दोघांचा प्रकार फार वेगळा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जॅझमधलं flip fantasia (US3 version)

https://youtu.be/JwBjhBL9G6U

- Tom's Diner

https://youtu.be/FLP6QluMlrg

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

whoa !! गवि शेठ , जॅझ चा पेटारा उघडायचा म्हणता ? उघडा उघडा .. मी पण दोन चार आचमनं टाकीन म्हणतो .
( आमची पेटी जरा जुनी आहे पण )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता जरा म्हणजे खुपच्च मागे नेतो , १९३५ वगैरे , ऐका हे जॅझ अँड ब्लूजचे दिग्गज लुई आर्मस्ट्राँग यांचं हे . आणि लगे हाथ ' परिणिता ' मधलं कुठलं गाणं यावरून ढापलंय तेही सांगा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परिणिता ' मधलं कुठलं गाणं यावरून ढापलंय तेही सांगा .

छे.. तुम्ही पाश्चात्यधार्जिणे अर्थात स्वदेशद्वेष्टे दिसता. कैसी पहेली है हे गाणं लुईवरुन केवळ स्फूर्ती घेऊन बनवलं आहे. चोरी, ढापणे असे हीन शब्द का बरं वापरता?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाने