काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९

२० जुलैनंतर तर मी हवेतच होतो.
मला वाटलं बॅज मिळाला म्हणजे आपण शेवटची अवघड हिलरी स्टेप पार केली.
आत्ता काय एव्हरेस्ट सर झालाच.
अभी टॅक्सी मिळणा किस झाड की पत्ती.
आत्ता मस्त शनिवार रविवार रुबाबात युनिफॉर्म घालून टॅक्सी चालवायची उजवा हात खिडकीबाहेर लटकावत ठेवून.
...
...
...
पण मग कळलं खरी लढाई तर आत्ता होती.

बॅज मिळवणं ही वेळकाढू असली तरी निश्चित प्रोसेस होती.
पण अजिबात ओळख नसताना कोणाची तरी टॅक्सी चालवायला मिळायची काहीच गॅरंटी नव्हती.

आज मला कळलं टॅक्सी लाईन मध्येही आपल्या बॉलीवूडसारखं निपोटिझम आहे.
कोणाचा तरी रेफरन्स लागतोचच Smile

एका अर्थी ते साहजिकच आहे म्हणा आपली रोजी रोटी असलेली गाडी त्यांनी अनोळखी माणसाकडे का द्यावी?
प्रत्येक जण अनुभव आणि रेफरन्स मागायचा.
आणि ते तर टॅक्सी चालवूनच मिळणार
म्हणजे झाली ना ही कोंबडी - अंडं सिच्युएशन च्यायची!

मग चालू झाली माझी आणि केतकीची धडपड टॅक्सी मागायची...

नात्यात किंवा मित्रांत कोणाची टॅक्सी वगैरे नव्हती...
मुंबईत बऱ्यापैकी ओळखी आणि वट बाळगून असलेले काही एक्स मित्र होते...
पण काही अपरिहार्य तात्विक भांडणामुळे त्यांच्याशी संवाद तुटल्यात जमा...
मग आम्ही सर्वात ऑब्व्हियस मार्ग पत्करला:

टॅक्सीत बसलं की ड्रायव्हरलाच चाचपून पाह्यचं...
आमचा टिपीकल संवाद असा व्हायचा,
पात्र पोझीशन:
ड्रायव्हर साहेब स्टिअरींगवर
मी त्यांच्या बाजूला
आणि केतकी पाठच्या सीटवर

(अवांतर सिडक्शन टीप:
मुलीला टॅक्सीतून डेटवर घेऊन चालला असाल तर लुब्र्यासारखं पाठी तिला चिकटून बसण्याऐवजी...
तिला एकटीला पाठी बसवा
(तिच्यासाठी दरवाजा उघडायला विसरू नका. क्लिशेड आहे पण शिव्हर्लस आहे आणि वर्क्स ऑल द टाईम Wink )
आणि तुम्ही पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसा.
त्यानी बऱ्याच गोष्टी सटली दाखवता येतात.
एकतर तुम्ही क्लासबिसला फाट्यावर मारता...
दुसरं म्हणजे तुम्हाला ती आवडते पण तरीही एक अलूफपणा आहे,
तुम्ही फालतू "C.P" लाळघोटेपणा करण्यातले नाहीयत वगैरे...
बाहेरचा कंस आणि टीप समाप्त)

हां तर बॅक टू टॅक्सीनामा.
टॅक्सी चालू झाल्यावर साधारण तीन मिनटांनी

मी:
दादा टॅक्सी किधर का है आपका?
(हे म्हणजे बर्फ फोडण्यासाठी)

ड्रायव्हर साहेब:
वडाळा
(बरं एक निरीक्षण असं की ९० टक्के टॅक्स्या वडाळ्याच्या असतात.)

मी:
अच्छा...
(मग जुळवाजुळव करून घसा खाकरून)
मेरे को भी टॅक्सी चलाने का है. मेरा बॅज वगैरे सब रेडी है. है क्या किसका टॅक्सी?
नही तो आप दे दो सॅटर्डे संडे!
(हे सगळं एका दमात)

आत्ता हे ऐकून ड्रायव्हर सायबांना एक हलकासा शॉक बसतो...
डोळ्यांतला अविश्वास स्विफ्टली हसण्यामध्ये कन्व्हर्ट होतो.
हे माझी उटपटांग विनवणी ऐकून त्यांच्या चेहेऱ्यावर जे हसू उमटतं ना...
तिकडेच पैसे वसूल आहेत खरं तर.

ड्रा.सा:
(चेहेरा हसरा ठेवत +अविश्वास शिताफीने न दिसू देत + आवाजात पुरेसा कॅज्युअलपणा आणत)
आप टॅक्सी चलाओगे?

मी:
हां! मेरा बॅज बीज सब रेडी हय. लायसेन्स दिखाऊ क्या?
युनिफॉर्मभी रेडी है!
(इकडे वरच्या टिपेत दिलेला सेक्सी अलूफपणा धाब्यावर बसवून मी साक्षात डेस्परेट झालोय हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात आलं असेलच.
चालायचंच... )

(पाठच्या सीटवरून)
केतकी:
आप उनको एक बार चान्स तो दे दो.
प्लीज प्लीज भाईसाब!

ड्रा.सा:
लेकिन क्यूँ भाई?
अच्छे पढे लिखे दिखते हो.

आता त्यांच्या क्यूँ? ह्या प्रश्नाला मी प्रत्येक वेळी वेगवेगळं उत्तर देतो.
हे म्हणजे थोडंसं डार्क नाईटमधल्या जोकरसारखं आहे.
तो कसा प्रत्येक वेळी नवीनच बॅकस्टोरी बनवून सांगतो तसं काहीसं!

मी:
मै रायटर हूँ आपकी लाईफ जानना चाहता हूँ

किंवा
मेरे कुछ बडे काम के लिये मैने मन्नत मांगी थी.

किंवा
मुंबईकी सडकोंपे घुमना चाहता हूँ.

(ही सगळीच उत्तरं खरी होती आपापल्या परीने खरं तर.)

ह्यावर ड्रायव्हर सायबांचे जवाब साधारण असे:

ड्रा.सा:
मत आओ इस धंदेमें.
हम तो मजबूरीसे चलाते है!

किंवा
अब पहिले जैसा मझा नही रहा इस धंदेमे.

किंवा
आप एक दिनभी नही टीक पाओगे इसमें.

किंवा
ओला-उबर चलाओ फिर...

इत्यादी इत्यादी.

पण एकंदरीतच टॅक्सी मिळवणं वाटतं तितकं सोप्पं नव्हतं...
मुख्य अडचण आधी सांगीतल्याप्रमाणे रेफरन्सची.

त्यामुळेच कोणाही रँडम टॅक्सीला विचारण्यापेक्षा एरियातल्या टॅक्सी ड्रायव्हरना विचारल्यास मिळण्याची शक्यता वाढेल असं आम्हाला कळालं.

पण एरियातल्या टॅक्सीवाल्यांनी सुद्धा नन्नाचा पाढा वाचला मोस्टली.

त्यात माझीही एक मेख होतीच.

आठवडाभर पुण्यात काम करत असल्याने मी फक्त वीकेंड्सना टॅक्सी चालवायची असं ठरवलेलं.

पण अशी दोनच दिवस टॅक्सी मिळणं अजूनच अडचणीचं!

मग असं कळलं की बरेचसे यु. पी. तले ड्रायव्हर्स एप्रिल ते जुलै पावसाळ्यात शेतीसाठी गावाला जातात तेव्हा त्या काळात टॅक्सी मिळू शकेल.

सो आलं का परत वाट बघणं चुपचाप.

त्यातही एवढा टाईमपास झाल्याने माझं ट्रान्सपोर्ट लायसन्स मार्च २०२० मध्ये एक्सपायर होतंय म्हणजे अजून लोचा.

बॅज तर मिळाला पण टॅक्सी कशी मिळवायची हे मात्र मला (नी बायकोलाही) सुधरेना !

क्रमश:

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान चालू आहे. येऊ द्यात पुढचं.

वाचतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम मालिका आहे.
आणि आता टॅक्सीनं जरा स्पीडही घेतलाय असं वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0