काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९

बराच काळ आमचा हनिमून पेंडिंग होता.

बायको दाखवत नसली तरी तिची सूक्ष्म नाराजी जाणवत होतीच.

फायनली एक दहा दिवसांची पुणे-कोल्हापूर-मालवण-गोवा-आंबोली-पुणे अशी धमाल रोड ट्रिप केली.

मजा आली.

कॉलनीतले माझे बरेचसे खास मित्र मालवणी असल्यामुळे बायकोला रस्त्यातली वैभववाडी, तळेरे, शिरगांव, आचरा, हडी, कुडाळ, शिरोडा, रेडी, डिचोली अशी गावं दाखवून आणि अवली मित्रांचे एकेक किस्से सांगून पीळपीळ पिळलं.

मस्त फ्रेश होऊन आलो.

...

...

...

तर:

आत्ता टेक्निकली बॅज नंबर तर मिळालेला पण तो टिपिकल चकचकीत पितळी बिल्ला मिळवायचं फायनल काम बाकी होतं.

त्यासाठी पुन्हा एक अर्ज करावा लागतो.

तो बिल्ला मिळाला की टॅक्सी चालवायला रेडी!

आज सकाळी सगळी तयारी करून आर. टी. ओ. ला जाणार तर लायसन्सच मिळेना.

आईनी कुठेतरी ठेवलेलं की काय कोण जाणे.

मी माझी नाराजी लपवायच्या प्रयत्नात आणि आई बिचारी अधिकाधिक अपराधी आणि ॲनक्शस होत शोधायला लागलेली.

मिळता मिळेनाच.

सगळं ओम-फस्स!

प्रत्येकाच्या आयुष्यात हे एकदातरी होतंच.

पासपोर्ट/ लायसन्स/ पाकीट/ दागिना...

हाता-हाताशी असताना गायब होतो.

"अरे मिळेल पाच मिनिटांत"... आपण कॉन्फिडन्टली फायली, कपाटं, बेडच्या खालचे ड्रॉवर्स तपासतो.

मग जरा अजून अन-कन्व्हेन्शनल जागा: माळा, बायकोची पर्स, पोराचं दप्तर धांडोळून होतं.

मग आपण शेरलॉकला स्मरून आईच्या गावात आउट ऑफ द बॉक्स विचार करायला लागतो.

टीव्हीच्या पाठची पोकळी, कारचा डॅशबोर्ड चेक करतो. हळूच्कन फ्रीजसुद्धा उघडून बघतो.

पण झाटा काय मिळायला नाय.

मग हळूहळू आपली आशा मावळायला लागते.

मीसुद्धा नर्व्हस होऊन पुण्याला आलो.

रोज आईला फोन करायचो.

तिनंही बिचारीनी गिल्टी होत सगळं घर पालथं घातलं पण नो लक्क!

आणि मग अशा वेळी आपल्याला सकाळी सकाळी हरवलेली वस्तू अवचित मिळाल्याचं छान स्वप्नं पडतं.

आणि जाग आल्यावर शिटी-शिटी वाटत रहातं.

मलाही एक दिवशी तसंच स्वप्नं पडलं आणि उठून मी सरळ मनावर दगड वगैरे ठेवून डुप्लिकेट लायसन्सच्या अर्जाची तयारी करायला लागलो.

क्रमश:

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अर्रर्र.‌..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचतानाही वाईट वाटतंय. रच्याकने, उपसंहार वाचल्यावर, उपोद्घातपासून सुरुवात केलीय..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नितीन पालकर

जरूर वाचा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0