काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९

तर आता फायनली बॅजसाठी ऍप्लिकेशन:

इतके वेळा "सारथी" ऑनलाईन सर्व्हिसेसच्या पेज वर गां# घासून मला आत्ता पेजचा फ्लो जवळ-जवळ पाठ झालेला.

तेव्हा ठरवलं की बॅजचं ऑन-लाईन ऍप्लिकेशनसुद्धा आपणच भरायचं.

त्यालातरी कशाला हवा एजंट?

मग सकाळी पुन्हा प्रायमरी हेल्थ सेंटरला गेलो आणि एका रागीट दिसणाऱ्या पण छान चीक-बोन्स असलेल्या डॉक्टरणीकडून फिटनेस सर्टिफिकेट घेतलं.

हो बॅजसाठी हे लागतं.

अजून एक गोष्ट ऑनलाईन फॉर्मवर लिहिलेली ती म्हणजे "फॉर्म S. E. C."

आत्ता एकच कन्फ्युजन की च्यायला हा "फॉर्म S. E. C." म्हणजे काय बुव्वा?

आणि त्यात परत चुकीचं काही भरलं की पुन्हा बोंबला!

form sec

मग गिरगावातल्या ओळखीच्या एजंट अनिल मामांना फोन केला शंका निरसन करण्यासाठी.

तर ते एकदम हायपरच झाले,

"अरे अजिबात काय भरू नको ते चुकलं तर वांधे होतील.उद्या ताडदेव आर टी ओ ला ये माझा दुसरा एजंट भरेल."

म्हणजे गम्मत काये माहितीये का?

खरं तर या ऑनलाईन प्रोसेस मुळे त्या बिचाऱ्या अर्धशिक्षित एजंट लोकांपेक्षा आपण जास्त "एम्पावर्ड" आहोत आणि हे आपल्याला माहीतच नाहीये Smile

म्हणजे आयटीवाल्या मृगाच्या बेंबीत ऑनलाईनची कस्तुरी वगैरे.

एजंटलोकांना ऑनलाईन प्रोसेसची नीटशी ओळख नसल्याने ते स्वतः घाबरतात आणि आपल्याला पण उगाच टरकवतात.

खरं तर वाईटात वाईट होऊन काय होणार तर आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि ६०० रुपये वाया जाणार.

ठीक आहे खली-बली!

उद्या आर टी ओ लाच जाऊन काय ते फाईंड आऊट करूया आणि भरूया रन-टाइमला.

आजचा खर्च: १० रुपये (पुन्हा मेडिकल चेक-अपचा केसपेपर काढण्यासाठी)

क्रमश:

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ठीक. उद्या पुन्हा धा रुपे आणि दोन तास.