काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९

आजही सकाळीच पोचलो पण ऑफीसमध्ये सगळीकडे सामसूम.

बो#$र, केतन, लोखंडे कोणीच नव्हते.

साहजिकच आहे काल दीड दोन वाजेपर्यंत सगळ्यांना इलेक्शनची कामं होती.

सो थकून झोपले असणार सगळे बहुतेक.

एजंटला विचारलं "फॉर्म S. E. C." काय आहे तर त्यानं सांगितलं "स्कूल-लिव्हिंग सर्टिफिकेट" पण माझा फारसा विश्वास नाही बसला.

परत एकदा १० नंबर खिडकीतून आत डोकावलो एक गोरासा हँडसम पोरगा दिसला.

बहुतेक तिकडे प्यून असावा तो.

खेटे घालून घालून थोडा ओळखीचा झाला होता.

त्याला विचारलं "फॉर्म S. E. C." विषयी तर त्यानं सांगितलं, "आपलं पंधरा वर्षांचं डोमिसाईल सर्टिफिकेट."

ठरावीक वर्षं मुंबईत राहिलेल्यांनाच बॅज द्यायची पॉलिसी आहे आर. टी. ओ. ची सो हे मला जास्त प्रोबॅबल वाटलं.

ठीक आहे मग सरळ घरी आलॊ आणि शांतपणे ऍप्लिकेशन भरलं.

पंधरा वर्षांचं डोमिसाईल काढलेलं होतंच.

( काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ )

ते अपलोड केलं.

आता फायनल हल्ला ४ मे ला.

क्रमश:

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet