अमेरिका: उच्च-शिक्षित भारतीयांसाठी; स्वप्नपूर्तीचा देश की वेठबिगारीचा (आधुनिक गुलामगिरीचा) सापळा?

नमस्कार,

सर्वप्रथम एवढे मोठे शीर्षक वाचून देखील तुम्हाला पुढे वाचावेसे वाटले ह्या करता सर्वांचे मन:पुर्वक आभार.
अमेरिकेविषयी मराठी तसेच भारतीय वाङ्मय विश्वातील सर्व लेखन प्रकारात, जसे लेख, ललीत, कादंबऱ्या, लघुकथा, क्रिया-प्रतिक्रिया, उखाळ्या पाखाळ्या, वगैरे वगैरे तसेच अमेरिकेतील चांगल्या - वाईट आणि इतर सर्व गोष्टींचा खिस पाडून झाला आहे. तरी मी ह्या लेखमालेतून असे वेगळे काय सांगणार आहे?

आयुष्यातील काही प्रश्न उघड उघड दिसणारे असतात. हातच्या कंकणाला आरसा कशाला? जसे गरिबी, अत्याचार, सामाजिक जीवनातील विषमता वगैरे वगैरे.
काही प्रश्न माहित असतात पण थोडेसे प्रयत्न करून समजून घ्यावे लागतात उदाहरणार्थ दारूचे व्यसन कसे सोडावे? हे प्रश्न दृष्टीस पडतात परंतु किती दारु पिणे म्हणजे व्यसन हे व्यक्तिगणिक प्रमाण बदलू शकते, मते बदलू शकतात.
पण काही प्रश्न खोलात गेल्याशिवाय समजत नाहीत, मुळात त्यांचे अस्तित्वच जाणवत नाही. उदाहरणार्थ मानसिक समस्या. डोळ्यासमोर तर सगळं आलबेल दिसत असतं, परंतु खोलवर समजून घ्यावं लागतं, तेंव्हा कुठे लक्षात येतं की हि समस्या आहे खरी..? हे असे दडलेले, आड- निबिड जागी रुतून बसलेले प्रश्न समजून घेणे म्हणजे ज्ञानेश्वरांनी हरिपाठात म्हटल्याप्रमाणे पारियाचा रवा घेता परोपरी सारखेच आहे. परंतु एकदा त्या समस्येची नस (नाडी) तुम्हाला अचूक कळली की त्याचे दूरगामी आणि भीषण परिणाम समजून घेणं सोपे जाईल. समस्या निर्माण होण्याचे मूळ कारणही लक्षात घेणे मग फार कठीण नाही आणि त्यावर सांगितलेला उपाय समजणे ही तितकेच सोपे होईल.

ह्या लेखमालेतील भाव आणि मुळ समस्या समजून घेण्यासाठी, किंवा उमजण्यासाठी वाचकांना त्यांची अमेरिकेबद्दलची सामान्यपणे असणारी भूमिका आणि मानसिकता थोडीशी बदलणे किंवा त्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघणे आवश्यक आहे. कदाचित हि लेखमाला वाचताना ती बदलेल किंवा वेगळ्या दृष्टीकोनातून वाचताना समस्येच्या भावाशी एकरूप होता येईल अशी आशा करतो. अन्यथा, फसगत होऊन मुळाशी न पोचता, त्यातून निर्माण झालेल्या परिणामांशीच झोंबत बसण्याची शक्यता अधिक आहे.

तर अश्याच काही दडलेल्या, अनवट जागी लपलेल्या परंतु सूर्य-प्रकाशाइतक्या स्वच्छ सर्वांच्या डोळ्यासमोर लखलखणाऱ्या अमेरिकेतील एका "फर्स्ट वर्ल्ड" खुपऱ्या समस्येबद्दल तुमच्याशी संवाद साधणार आहे.

हि लेखमाला, हा भारत विरुद्ध अमेरिका सामना नाही, ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी. असलाच तर हा अमेरिका विरुद्ध अमेरिका असा अगदी कलगी तुर्याचा सामना नसून एक तुलनात्मक विरोधाभास असू शकतो.

अमेरिकेमध्ये स्थलांतराच्या प्रक्रियेमध्ये ग्रीन कार्ड हा महत्वाचा टप्पा आहे, ग्रीन कार्ड शिवाय व्हिसा-वरच्या वास्तव्यात अनेक निर्बंध आहेत. ग्रीन कार्ड मिळाले तरी त्या व्यक्तीचे नागरिकत्व भारतीयच राहते ह्याची भारतातील वाचकांनी नोंद घ्यावी. ग्रीन कार्ड मिळाल्यावर ती व्यक्ती व्हिसाच्या निर्बंधातून मुक्त होते. लेखमालेत ह्या विषयावर सखोल निरीक्षणे आणि चर्चा होईलच. आज भारतीयांना ग्रीन कार्ड मिळण्याचा कालावधी १५० वर्षे आहे, जो भारतेतर; म्हणजेच जर्मनी, जपान अगदी जगातल्या कुठल्याही देशातून स्थलांतरित झालेल्या व्यक्तीसाठी काही महिने ते एखाद - दोन वर्ष इतका कमी आहे. हे असे का? ह्याचे काय परिणाम आहेत वगैरे वगैरे प्रश्नावर ह्या लेखमालेतून उहापोह करणार आहे. आज दिनांक २८ जुलै २०२० मध्ये किमान १० लाख उच्च-शिक्षित भारतीय; त्यात सायंटिस्ट, डॉक्टर, इंजिनिअर, कॉम्पुटरवाले सगळे, सगळे ह्या सापळ्यात अडकलेले आहेत. गेली पंधरा वर्ष ह्यातून सुटण्यासाठी शासकीय पातळीवर त्यांची एक चळवळ, धडपड सुरु आहे. आणि बदलत्या परिस्थितीनुसार आता तर ह्या आंदोलनाला अमेरिकेतील त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

समस्येच्या स्वरूपाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने निरनिराळ्या विषयांना; जसे अमेरिकेचा इतिहास, राजकारण, समाज-कारण वगैरे स्पर्श होणे स्वाभाविक आहे, परंतु मूळ विषयापासून दूर न जाता इतर विषय गरजेपुरतेच संदर्भासाठी संक्षिप्त रूपात घेतले आहेत.

ह्या लेखमालेचे उद्दिष्ट काय असेल? तर पुढच्यास ठेच, मागचा शहाणा.. ! कुणी अमेरिकेची स्वप्न बघावी की न बघावी, इथे येण्यासाठी धडपड करावी की न करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू अमेरिकेत आल्यावर पुढे कुठल्या परिस्थितीमधून आपल्याला जायला लागू शकते ह्या शक्या-शक्यतांची जाणीव करवून देणे. त्यामुळे अमेरिकेची स्वप्ने बघताना आपल्यालाही त्याच रांगेत उभे राहायचे आहे, ह्याची माहिती व्हावी ह्याच जात्यातून आपल्यालाही दळून निघायचे आहे ह्याची जाणीव पुढील पिढीला व्हावी ह्या उद्देशाने करवून आणलेला हा लेखन प्रपंच..

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वा. लेखांची वाट बघत आहे. मला कंपनीने अमेरिकेला पाच वेळा पाठवले होते. त्यावेळी बरेच जण करायचे तसा एच-१ चा काहीतरी जुगाड करून अमेरिकन कंपनीत नोकरी मिळणे कठीण नव्हते. पण अमेरिकेच्या मर्यादा मला लगेचच समजल्या. जोपर्यंत त्या देशाचे नागरिक (किमान ग्रीनकार्ड) नाही तोपर्यंत बऱ्याच गोष्टी करायला मर्यादा येतात. मी इथे सरळ नोकरी सोडून पूर्णवेळ शेअरमार्केट ट्रेडिंग करतो कारण मला ट्रेडिंग खूप आवडते. तसे सगळे सोडून आपली आवड जोपासणे अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना करणे शक्य नाही. सतत दुसऱ्याची नोकरी करत बसायची आणि आपले आयुष्य कधी जगायचेच नाही. सतत दुसऱ्याच्या तालावर नाचायचे. पैसे म्हणाल तर तिथल्या लाईफस्टाईल आणि खर्चांचा विचार करता खूप जास्त मिळतात असेही नाही. डॉलर रूपयात बदलले की ते खूप वाटतात पण डॉलरमध्येच ठेवले तर तितके नसतात. कधीही नोकरी जाईल का ही टांगती तलवार पण असते. भारतात ती तितक्या प्रमाणावर नसते. माझ्यासारख्या लहानपणापासून विस्तारीत परिवाराबरोबर- भरपूर चुलत/मामे/मावस/आते भावंडे, मामा, काका, आत्या, मावश्यांचे येणेजाणे अशी सवय असलेल्याला असे कुठेतरी एकट्याने जाऊन राहणे आवडलेच नाही. म्हणून मी अमेरिकेत स्थायिक व्हायचा विचारही केला नाही.

मी खरडफळ्यावर खूप धुडगूस घालत असतो. मेन बोर्डातल्या चर्चांमध्ये सामील होणे हा माझा पिंड नाही. तरीही जिव्हाळ्याचा विषय असल्याने शक्य होईल तेव्हा या लेखांवर काहीतरी प्रतिक्रिया देणार. पण मी इतर ऐसी सदस्यांप्रमाणे फार मोठा इंटलेक्च्युअल नसल्याने फार दर्जाची प्रतिक्रिया माझ्याकडून येणे त्यामानाने कठीण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा प्रश्न गेल्या २० वर्षात आणि प्रामुख्याने १० वर्षात तीव्रतेने वाढलाय, त्याआधी आलेल्यांना ह्या समस्येची झळ पोचली नाही.

ह्या लेखमालेचा उद्देश पुढील पिढ्यांना; जे अमेरिकेची स्वप्ने बघत आहेत त्यांना जाणीव करवून देणे. आता जे ह्या समस्येतून जात आहेत, त्यांना जागे करणे.. आणि भारतीय - अमेरिकन लोकांना ह्या प्रकल्पात सामावून घेण्यासाठी आवाहन करणे ज्या-योगे अमेरिकेत येण्याची स्वप्ने बघणाऱ्या पुढील पिढ्यांचा मार्ग सुकर करता येण्यास मदत होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्या-योगे अमेरिकेत येण्याची स्वप्ने बघणाऱ्या पुढील पिढ्यांचा मार्ग सुकर करता येण्यास मदत होईल.

कशाबद्दल?

अमेरिकेची आजची स्थिती आणि पुढील लक्षणे पाहता, यापुढे अमेरिकेत येऊ पाहणाऱ्या भारतीयांच्या पुढच्या पिढ्यांना, 'जगातल्या वाटेल त्या खड्ड्यात जा किंवा भारतातच राहा, परंतु (स्वत:च्या भल्याची इच्छा असेल तर) आजमितीस अमेरिकेत - या (ट्रंपचे आवडते शब्द वापरायचे, तर) शिटहोल कंट्रीत - येऊन कडमडू नका' असा सल्ला, एक अमेरिकन या नात्याने, आत्यंतिक कळवळ्याने देऊ इच्छितो.

- (अमेरिकन) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तर अश्याच काही दडलेल्या, अनवट जागी लपलेल्या परंतु सूर्य-प्रकाशाइतक्या स्वच्छ सर्वांच्या डोळ्यासमोर लखलखणाऱ्या अमेरिकेतील एका "फर्स्ट वर्ल्ड" खुपऱ्या समस्येबद्दल तुमच्याशी संवाद साधणार आहे.

मुळात आजमितीस(सुद्धा) यूएसए हे राष्ट्र "फर्स्ट वर्ल्ड" या कॅटेगरीत गणण्यायोग्य आहे, हे गृहीतक तपासण्यायोग्य आहे.

The concept of First World originated during the Cold War and comprising countries that were aligned with NATO and the United States, and opposed the Soviet Union and/or communism during the Cold War. Since the collapse of the Soviet Union in 1991, the definition has instead largely shifted to any country with little political risk and a well functioning democracy, rule of law, capitalist economy, economic stability, and high standard of living.

(विकीवरून.)

रसातळाला चाललेली अर्थव्यवस्था, वाढता वर्णद्वेष - वर्णवर्चस्वाचे वाढते नि नागडे समर्थन, वाढते पोलिसी अत्याचार, बंदुकींचे वाढते प्राबल्य, वाढत्या अंधश्रद्धा, नि या सर्वाबद्दल (उजव्या) राजकारण्यांची अनास्था, सहभाग, किंवा पाठिंबा - एकंदरीत उजव्यांचे नंदनवन आहे.

असो चालायचेच.

(आणि, आजमितीस यूएसए नक्की कोणाच्या डोळ्यांसमोर लखलखत आहे, म्हणे?)

- (अमेरिकन) 'न'वी बाजू.

==========

ओबामा अध्यक्ष झाले तेव्हा आता फायनली या देशाने या समस्येवर मात केली, असे वाटले होते. बोले तो, आता या देशात गौरवर्णीयेतर - आणि त्यातसुद्धा कृष्णवर्णीय! - मनुष्य निवडून येऊ शकतो, आणखी काय पाहिजे, वगैरे वगैरे. पण कसचे काय! ओबामा निवडून आल्यावर एकएक वर्णविद्वेषी हरामजादे कोठूनकोठून वुडवर्कातून वाळवीसारखे बाहेर पडू लागले, 'आम्ही अजून शिल्लक आहोत - टुकटुक!' म्हणत. बिचाऱ्याला छळ-छळ-छळले. धड काम करू नाही दिले. त्याच्यावर काय नाही नाही ते आरोप केले. (आता निवडून आलाच आहे तर) त्याला काहीही केल्या तो एका टर्मपेक्षा अधिक काळ अध्यक्ष बनू देणार नाही - थोडक्यात, पुन्हा दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून येऊ देणार नाही - असा जाहीरपणे चंग बांधला. त्याच्या कामात सदैव अडथळे आणले. त्याने नियुक्त करू पाहिलेल्या सुप्रीम कोर्ट जज्जास नाकारले असते, तर ते एक वेळ समजता आले असते, परंतु, 'आता तुझ्या टर्मचे थोडेच दिवस उरलेले आहेत; आता तुला जज्ज नियुक्त करू देण्याऐवजी पुढचा जो अध्यक्ष निवडून येईल, त्याला ती संधी देणे हे लोकशाहीस धरून ठरेल' असे फडतूस कारण देऊन त्या जज्जाचे कन्फर्मेशन हियरिंगच होऊ दिले नाही, नि ती मोकळी झालेली जागा ट्रंप निवडून येईपर्यंत तशीच मोकळी ठेवली, नि काय न काय. हे सगळे का, तर 'ब्लॅक मॅन इन द व्हाइट हाउस'! एक काळा माणूस अध्यक्ष होण्याची हिंमतच कशी करू शकतो? हाणा त्याला! (आणि ही म्हणे मेरिटॉक्रसी!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिचाऱ्याला छळ-छळ-छळले. धड काम करू नाही दिले.

सहमत आहे. लिबियावाल्या युद्धात फक्त १००० भर लोक मारता आले त्या शांतिदुताला. आणि फक्त लाखभर बेघर. फार म्हणजे फार बिचारा. काळ्या लोकांना हे असे काम करू दिले जात नाही बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हीच तर मेरिटोक्रसी असते.

आमचे बापदादे वरच्या पदांवर, सत्तास्थानांवर होते; तर आम्हांलाच ती संधी मिळण्याची सोय आम्ही व्यवस्थेत करून ठेवू; आणि मग 'बघा, आम्हीच व्यवस्थेतून तावून-सुलाखून बाहेर पडलो' म्हणून नाचायला मोकळे - हा मेरिटोक्रसीचा अर्थ आहे. ह्या संदर्भात 'द अटलांटिक' आणि 'द न्यू यॉर्कर'मधले लेख बघितले नसल्यास दुवे -
The False Promise of Meritocracy
Is Meritocracy Making Everyone Miserable?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अजून आपण पहिल्याच प्रकरणावर आहोत, ह्या लेखमालेत बऱ्याच विषयांवर चर्चा होणार आहे. ह्या लेखात मूळ प्रेरणांवर, धारणांवर झोत टाकला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात असून असून माणसाची स्वप्न काय असतात चरित्र चालण्या एवढं पैसा कमविणे.
अमेरिका ताब्यात घेण्यासाठी ,त्यांची अर्थ व्यवस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी कोणी परदेशात ( अमेरिकेत) जात नाही.
अमेरिकेत जाणाऱ्या लोकांची विभागणी करणे गरजेचे आहे
मुकेश अंबानी नी अमेरिकेत त्यांचा उद्योग व्यवसाय वाढवणे आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इथे योग्य तो मोबदला मिळत नाही म्हणून अमेरिकेत जाण्या साठी धडपड करणे.
मुकेश अंबानी सारख्या व्यक्ती नी अमेरिकेत उद्योग व्यवसायात पाय रोवणे ही अभिमानाची गोष्ट आहे.
पण इथे संधी मिळत नाही म्हणून तिथे जाणे हे काही अभिमानाचे नाही.
ग्रीन कार्ड त्या देशाच्या गरजे नुसारच दिली जाणार तिथे आमचा हक्क आहे असा विचार चुकीचं आहे.
अमेरिकेत भेदभाव होतो.
काळे विरूद्ध गोरे.
स्थानिक अमेरिकन विरूद्ध स्थलांतरित.
पण ही गोष्ट साहजिक आहे.
हे विश्व ची माझे घर हे बोलायला सोप असेल तरी घरात किती लोक परकी असावीत ह्याला काही मर्यादा आहेत.
नुकतेच IT क्षेत्र उदयास आले आणि त्या वर आधारित उद्योग अमेरिकेत पाहिले निर्माण झाले तेव्हा त्यांना IT क्षेत्रातील शिक्षित लोकांची गरज होती त्यांनी खूप जास्त पगार देवून जगातील सर्व देशातून लोक लालाच देवून अमेरिकेत आणली.
ज्या देशातून हे नागरिक अमेरिकेत विस्थापित झाले त्या देशा ची अवस्था गंभीर झाली .
बुद्धिवान लोक देश सोडून गेल्या मुळे विकासावर परिणाम झाला.
आता अमेरिकेची गरज संपली आहे.
त्या मुळे तिथे अमेरिकन फर्स्ट असा विचार बळावत आहे.
आणि ते निसर्ग नियम नुसारच आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केल्याने देशाटन !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गहन विषय आहे. चर्चा वाचत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखमाला वाचतो आहे. बरेच सविस्तर लिहिता आहात. पुभालटा.
युरोपात राहणाऱ्या भारतीयांपेक्षा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना नागरिकत्व मिळवण्याची इच्छा अधिक असते असे माझ्या मर्यादित अनुभवावरून वाटते. सध्या कदाचित उलटे असु शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

युरोपात राहणाऱ्या भारतीयांपेक्षा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना नागरिकत्व मिळवण्याची इच्छा अधिक असते असे माझ्या मर्यादित अनुभवावरून वाटते.

युरोपाबद्दल माहितीअभावी बोलू इच्छीत नाही, परंतु, अमेरिकेबद्दलच बोलायचे झाले, तर, अमेरिकेत राहणाऱ्या (आणि कायमस्वरूपी राहू इच्छिणाऱ्या) भारतीयांना प्राथमिकत: येनकेनप्रकारेण ग्रीनकार्ड मिळविण्याची इच्छा असते. अर्थात, एकदा ग्रीनकार्ड मिळाल्यानंतर, कायमस्वरूपी अमेरिकेत राहाण्याकरिता तत्त्वत: ते जरी पुरेसे असले, तरीसुद्धा, त्यानंतर नागरिकत्व मिळविणे हे इतके आत्यंतिक सोपे आहे, , , की का मिळवू नये, असा प्रश्न निर्माण होतो. (शिवाय, नागरिकत्व मिळविल्यास काही अधिकचे आनुषंगिक फायदे प्राप्त होऊ शकतात, हाही भाग आहेच.)

==========

कारण, कोणत्याही प्रकारचा व्हिसा म्हटला, की त्याला कितीही दीर्घ म्हटली, तरी मुदत असते, तथा कोणावर ना कोणावर - मग ते एखाद्या विद्यापीठावर असो, नाहीतर एम्प्लॉयरवर असो - अवलंबित्व राहाते. कोणावरही अवलंबून न राहता कायमस्वरूपी अमेरिकेत राहायचे असल्यास ग्रीनकार्ड आवश्यक.

त्या मानाने, त्याअगोदर ग्रीनकार्ड मिळवणे हेच महाकर्मकठीण.

अर्थात, गेल्या काही वर्षांत नागरिकत्वाच्या अर्जासोबत भरायची फी ही काहीच्याकाहीच अवाच्यासवा वाढवून ठेवलेली आहे, हा भाग आहेच म्हणा. परंतु तरीही, ही प्रक्रिया एकंदरीत फारच सोपी आहे.

फार काही करावे लागत नाही. ग्रीनकार्ड मिळाल्यानंतर किमान पाच वर्षांपर्यंत४अ नागरिकत्वाकरिता अर्ज करता येत नाही. मधल्या काळात अमेरिकेत सलग वास्तव्य४ब करावे लागते, तथा या काळात कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी रेकॉर्ड असून चालत नाही. त्यानंतर मग नागरिकत्वाचा अर्ज, त्याबरोबरचे दस्तावेज, फोटो, तथा फी भरायची. (बहुतांश परिस्थितीत हे स्वत:, वकिलाच्या वगैरे मदतीशिवाय, नि पोष्टाने - किंवा आजकाल ऑनलाइनसुद्धा - करता येते. मात्र, अर्ज करतेवेळी किमान अठरा वर्षे वय असावे लागते४क.) त्यानंतर मग बोलावणे आले, की बोटांचे ठसे देऊन यायचे, नि वाट पाहात बसायची. मग पुन्हा बोलावणे आले, की इंटरव्ह्यूला जायचे. (अर्ज भरल्यापासून ते इंटरव्हूला जायच्या मधल्या काळात कोणत्याही प्रकारचे नवीन गुन्हेगारी रेकॉर्ड असून चालत नाही. तथा, मधल्या काळात काही ट्राफिक चलाने वगैरे झाल्यास, इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी ती निपटावी लागतात, अन्यथा, ती निपटेपर्यंत इंटरव्ह्यू पुढे ढकलला जातो.) इंटरव्ह्यू अत्यंत जुजबी असतो. अर्जात भरलेल्याच माहितीची पुन्हा नि वरवरची उजळणी होते. त्यानंतर (काही तुरळक अपवाद वगळल्यास) तुम्हांस इंग्रजी भाषेचे तथा अमेरिकन इतिहास तथा नागरिकशास्त्राचे पुरेसे ज्ञान आहे, हे दाखविण्याकरिता एक छोटीशी परीक्षा द्यावी लागते. (परीक्षा तशी सोपी असते. इंग्रजी भाषेच्या परीक्षेकरिता एकदोन साधीसोपी इंग्रजी वाक्ये प्रत्येकी लिहायला नि मोठ्याने वाचून दाखवायला सांगतात. इतिहास तथा नागरिकशास्त्राच्या परीक्षेकरिता, आपल्याकडे कसे दहावीच्या परीक्षेकरिता '२१ अपेक्षित प्रश्नसंच' वगैरे असतात, तसेच 'शंभर अपेक्षित प्रश्नां'चे एक पुस्तक खुद्द संबंधित खात्याकडून प्रकाशित होते, त्यातलेच काही प्रश्न विचारतात.) ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मग (बहुतकरून त्याच दिवशी, किंवा क्वचित्प्रसंगी ते शक्य नसल्यास पुन्हा कधीतरी) शपथविधीकरिता४ड बोलावणे येते. शपथविधीपूर्वी ग्रीनकार्ड काढून घेतले जाते, नि शपथविधी झाल्यानंतर नागरिकत्वाचे प्रमाणपत्र मिळते, जे वापरून तुम्ही अमेरिकन पासपोर्टाकरिता वगैरे अर्ज करू शकता.

४अ तुमचा/ची वैवाहिक जोडीदार अमेरिकन नागरिक असल्यास, आणि/किंवा तुम्ही अमेरिकन सैन्यात भरती असल्यास, ग्रीनकार्ड मिळाल्यापासून पाचाच्याऐवजी तीन वर्षांनंतर अर्ज करता येतो.

४ब मध्यंतरी अमेरिकेबाहेर पडायचेच झाल्यास सलग सहा महिने किंवा त्याहून अधिक काळाकरिता बाहेर पडता येत नाही; त्यापूर्वी परत यावे लागते. अन्यथा, नागरिकत्वाच्या अर्जाकरिता वाट पाहण्याचे तीन/पाच वर्षांचे घड्याळ अमेरिकेत परतल्यानंतर पुन्हा शून्यापासून सुरू होते. शिवाय, सलग एका वर्षाहून अधिक काळ पूर्वपरवानगीशिवाय अमेरिकेबाहेर राहिल्यास, बहुतांश परिस्थितींत ग्रीनकार्ड आपोआप रद्दबातल ठरून अमेरिकेत परत येणे अशक्य होते.

४क अठरा वर्षांहून कमी वय असणाऱ्या व्यक्तींकरिता नागरिकत्वाचा अर्ज भरता येण्याची तरतूद नाही. मात्र, अठरा वर्षांखालील ग्रीनकार्डधारक व्यक्ती ही आपल्या पालकांपैकी किमान एकाबरोबर अमेरिकेत वास्तव्यास असल्यास, संबंधित पालकास अमेरिकन नागरिकत्व मिळताक्षणी त्या (अठरा वर्षांखालील) व्यक्तीस आपोआप अमेरिकन नागरिक गणले जाते, तथा एका वेगळ्या प्रक्रियेने तसे प्रमाणपत्र मिळविता येते.

४ड शपथविधीत 'मी यापूर्वी ज्याज्या परकीय राज्यांचा वा राष्ट्रांचा नागरिक, प्रजाजन वा आधिपत्याखाली होतो/होते, त्यात्या राज्यांप्रति/राष्ट्रांप्रति निष्ठेचा त्याग मी आजपासून करीत आहे' अशा प्रकारची पारंपरिक भाषा असते खरी, परंतु, अमेरिकन कायद्याच्या दृष्टीने त्यास काहीही महत्त्व नाही. अमेरिकन कायदा (अमेरिकन नागरिकत्वाबरोबरच) आधीचे नागरिकत्व राखण्याच्या आड (काही आत्यंतिक टोकाच्या अपवादात्मक परिस्थिती वगळल्यास) येत नाही, तथा आधीच्या नागरिकत्वाचा त्याग करण्यास भाग पाडत नाही. (भारतीय कायद्यानुसार मात्र, अमेरिकन - किंवा अन्य कोणतेही - नागरिकत्व प्राप्त झाल्यास भारतीय नागरिकत्वाचा त्याग करावा लागतो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण4
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण मोठ्या सांस्क्रूतीक फरकामुळे लोक्स इथे जास्त काळ टिकत नाहीत. पुन्हा जर्मन भाषा शिकावी लागते आणि चांगली आत्मसात करावी लागते.
ह्या दोन गोष्टी जमवल्या तर मग युरोप पण छान जागा आहे. सध्या इथे येणार्या लोकांची संख्या वाढते आहे. भारतापासुन ८ तासच दुर असल्याने प्रवास हा मुद्दा निकालात निघतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर लेखन. अापले विचार वाचायला अावडतील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0