आज काय घडले... पौष शु. १४ श्रीमंतांच्या राज्याचा आळा गेला!"
आज काय घडले...
पौष शु. १४
श्रीमंतांच्या राज्याचा आळा गेला!"
शके १७१९ च्या पौष शु. १४ रोजी: मराठेशाहीच्या अखेरच्या काळांतील थोर मुत्सद्दी नाना फडणीस यांना बाजीरावाच्या मदतीने दौलतराव शिंदे यांनी
कैद केले व त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली.
या वेळी मराठी राज्याचे सर्वच ग्रह फिरले होते. महादजी शिंदे व हरिपंत फडके हे नानांचे डावे-उजवे हात कालाच्या ओघाबरोबर निघून गेले होते. सवाई माधवरावाच्या आत्महत्येमुळे मराठेशाहीवर मृत्युयोगच ओढवला होता. पेशवाईचे धनी रावबाजी अगदीच कमकुवत होते. शिंदे यांच्या मदतीने त्यांनी नानाविरुद्ध कारस्थाने करण्यास सुरुवात केली. बाळोबा पागनीस, परशुरामभाऊ पटवर्धन हेहि नानांच्या विरुद्ध झाले. तेव्हां नाना महाडास गेले आणि पैसा व बुद्धि या जोरावर त्यांनी तेथे मोठे कारस्थान उभे केले. शिंदे यांनाहि आपल्याकडे फितवून घेतले. आणि बाजीरावास पेशवा नेमून नानांनी राज्याकारभार पुन्हा हाती घेतला. शिंद्यांनी कपट-कारस्थान केले. भोजनासाठी म्हणून नाना काही साथीदार बरोबर घेऊन शिंदे यांच्या भेटीस गेले. त्या वेळी मुकीर या इटालियन सरदाराने दौलतराव शिंदे यांच्या सांगण्यावरून नानांस कैद केलें. "नानांच्या लोकांनी बराच दंगा केला. पण त्यांस शिंद्यांच्या फौजेने उधळून लाविले. या बनावाने पुण्यात मोठा हाहाःकार उडाला. लोकांची तोंडे काळी ठिक्कर पडली. पेशवाईचा लय होऊन आजपासून बेबंदशाहीसच सुरुवात झाली असे सर्वांना वाटले.” दुसऱ्या दिवशी म्हणजे पौष शु. १४ रोजी नाना व त्यांचे साथीदार यांच्या घराची जप्ती झाली! ही सर्व चिन्हें पेशवाई समाप्त होण्याची होती. “ नानांस कैदेत घालण्याचा विधि समाप्तीस गेला. याउपरीं श्रीमंतांच्या राज्याचा आळा गेला. आतां जो जबरदस्त त्याचे पागोटें वांचेल." अशी स्थिति निर्माण झाली. नानांना अहमदनगरच्या किल्ल्यांत कैदेत राहावे लागले. पुढे बाजीरावाने आपण निरपराध असल्याचे नानांस सांगितले. “शिंद्याने तुम्हांस कैदेत टाकले. मी नव्हे. मी तुम्हांस बापाप्रमाणे मानतो.” इत्यादि मिठास भाषण बाजीरावाने केले. पुढे नानांची सुटका झाली.
-१ जानेवारी १७९८
प्रतिक्रिया
धाग्याचं शीर्षक आहे का ट्वीट!
धाग्याचं शीर्षक आहे का ट्वीट!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नाही म्हणजे...
...लेख उपयुक्त असू शकेलही, परंतु प्रेझेंटेशनमध्ये पुष्कळ म्हणजे पुष्कळच सुधारणा पाहिजेत.
(बाकी, अर्धा लेख शीर्षकात लिहिण्याचा प्रकार मलाही चमत्कारिक वाटला.)
शीर्षकाचा
अंश लेखात येऊ न देण्याची खबरदारी घेण्याचे विस्मरण झाले का?
ऐसी अक्षरनामा
निम्मा लेख शीर्षकात म्हणजे फायनली ऐसी अक्षरेचा अक्षरनामा झालाच!