ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १२

प्रकरण १२ – होमिओपॅथी आणि बाराक्षार

सुधीर भिडे

विषयाची मांडणी

 • हाहनेमानचे सिद्धांत
 • औषधे कशापासून बनतात?
 • औषधे कशी बनतात?
 • बाराक्षार
 • समालोचन

***

होमिओपॅथी

हाहनेमानचे सिद्धांत

सॅम्युएल हाहनेमानचा जन्म जर्मनीत १७५५ साली झाला. सॅम्युएल हाहनेमान हा जर्मनीतील एक डॉक्टर होता. १७७९ साली हाहनेमानने. एम डी. ही पदवी मिळविली. त्याच्या काळात शास्त्रीय वैद्यक अस्तित्वात आले नव्हते. दुसऱ्या भागात ज्या पाश्चिमात्य मध्ययुगीन वैद्यकाचा आपण विचार केला ते वैद्यक वापरात होते. त्या काळातील सर्व समज हाहनेमानने नाकारले. त्या काळातील वैद्यकीच्या अघोरी प्रथा त्याला अमान्य होत्या.


हाहनीमन

त्याने स्वत:चा एक सिद्धांत मांडला. तो सिद्धांत असा –

एका माणसाकडून दुसऱ्याला आजार चुंबकत्वासारख्या एका फोर्सने दिला जातो.

त्याकाळी सिंचोना झाडाची साल मलेरियासाठी औषध म्हणून वापरली जात असे. हाहनेमानने पाहिले की सिंचोनाचे औषध घेतल्यावर काही रोग्यांना मलेरियासारखी लक्षणे दिसतात. यावरून त्याने – like cures like - similia similibus curantur – असा सिद्धांत मांडला. जो पदार्थ घेतल्यामुळे एखाद्या आजारासारखी लक्षणे दिसू लागतात तो पदार्थ तो आजार बरा करतो. Substance that triggers a disease in a healthy person should be able to cure the same disease in a sick person.

(Homeopathy—where is the science? Natalie Grams, EMBO Rep. 2019 Mar; 20(3): e47761. Published online 2019 Feb 14.)

नंतर त्याने नाना प्रकारचे पदार्थ निरोगी माणसांना देण्यास सुरुवात केली. ज्या पदार्थाने निरोगी माणसात एखाद्या रोगासारखी लक्षणे दिसू लागली तो पदार्थ त्या रोगावरचे औषध असे त्याने ठरविले. हाहनेमानने एकंदर २००० पदार्थांची चाचणी केली. त्यांपैकी ५०० पदार्थ आजमितीस वापरले जातात. हे पदार्थ वनस्पतीजन्य, प्राणीजन्य, आणि खनिजे होती (आणि आहेत).

अशा प्रकारचे चित्रविचित्र पदार्थ निरोगी माणसांना दिल्याने साहजिकच त्यांची प्रकृती बिघडली. हाहनेमानने त्याचा अर्थ असा लावला की डोस कमी करायला हवा. डोस इतका कमी केला की निरोगी रोग्यांचा त्रास गेला. यावरून हाहनेमानने असा निर्णय घेतला की जितका डोस कमी तितका परिणाम जास्त. त्यासाठी पदार्थ पाण्यात टाकून ते पाणी ढवळले जाते. मग त्या पाण्यात त्या पदार्थाचे गुणधर्म उतरले असे मानले जाते. पदार्थ जितका जास्त पाण्यात मिसळला जाईल तेवढी औषध म्हणून परिणामकारकता (पोटन्सी) जास्त असे ठरविण्यात आले. बहुतेक औषधांची परिणामकारकता १०३० (एकावर ३० शून्य) असते. याचा अर्थ एक मिलिलिटर पदार्थ १०३० मिलिलिटर पाण्यात विरघळवायचा. आव्होगाड्रोच्या सिद्धांतानुसार या पाण्यात औषधाचा अंश शाबूत असण्याची शक्यता शून्यवत आहे.

एक उदाहरण द्यायचे तर फ्लू आजारासाठी बदकाच्या यकृताचा वापर केला जातो. यकृताचा छोटा तुकडा १०२०० मिलिलिटर पाण्यात विरघळवायचा. हे पाणी विश्वाच्या आकारमानाएवढे होते.

जेव्हा होमिओपथीच्या समर्थकांना हे लक्षात आले की प्रकरण हाताबाहेर चालले तेव्हा त्यांनी नवीन सिद्धात मांडला – पाण्याला स्मृती असते.

"Spiritual healing power" is transferred from the original substance into the solvent by a dilution process called "potentiation" that is accompanied by ritual shaking blows. Homeopaths often speak of "energy" or "information" that is released during potentiation and passed into the solvent.

(Homeopathy—where is the science? Natalie Grams, EMBO Rep. 2019 Mar; 20(3): e47761.Published online 2019 Feb 14.)

जेव्हा एखादा पदार्थ पाण्यात ढवळला जातो तेव्हा त्या पदार्थाच्या रेणूंची रचना पाण्यात कॉपी केली जाते. मग त्या पाण्यापासून गोळ्या बनविल्या की त्या गोळ्यांत तो गुणधर्म येतो. येथे परत ही गोष्ट विसरली जाते की ज्या पाण्यात ते गुणधर्म उतरले ते पाणी त्या गोळ्यांतून निघून गेले आहे. (अशी शक्यता आहे की समर्थक सांगतील की पाण्यातील गुणधर्म साखरेने कॉपी केले!)

होमिओपथीच्या समर्थकांनी अजून एक पळवाट ठेवली – प्रत्येक व्यक्तीची प्रकृती निराळी असते. दोन-चार महिन्यांनंतरही एखादे औषध काम करत नाही असे दिसून आले तर सांगायचे – औषध आणि रोग्याची प्रकृती यांची सांगड जमत नाही, औषध बदलले पाहिजे. अजून दोन-चार महिने गेले की रोगी स्वत:हून बरा झाला असेल, दगावला तरी असेल किंवा शास्त्रीय वैद्यकाकडे गेला असेल.

औषधे कशापासून बनतात?

खालील माहिती विलियम बोरिके यांनी लिहिलेल्या Homeopathic Materia Medica या ग्रंथातून घेतली आहे. (हा ग्रंथ इंटरनेटवर मिळतो.) ग्रंथात औषधे बाराखडीच्या क्रमानुसार येतात. इथे उदाहरणादाखल काही उद्धृत केली आहेत. औषधे कशासाठी वापरण्यात येतात तेही दिले आहे.

LAPIS ALBUS, Silico-fluoride of Calcium
Affections of glands, goitre, pre-ulcerative stage of carcinoma. Burning, stinging pain in breast, stomach, and uterus. Connective tissue about glands specially affected. Fat anemic babies with Iodine appetite. Ravenous appetite. Uterine carcinoma. Fibroid tumours with intense burning pains through the part with profuse haemorrhage.

ABROTANUM, Southernwood - A very useful remedy in marasmus, especially of lower extremities only, yet with good appetite. Metastasis. Rheumatism following checked diarrhoea. Ill effects of suppressed conditions especially in gouty subjects. Tuberculous peritonitis. Exudative pleurisy and other exudative processes. After operation upon the chest for hydrothorax or emphysema, a pressing sensation remains. Aggravation of haemorrhoids when rheumatism improves. Nosebleed and hydrocele in boys.

ARSENICUM HYDROGENISATUM, Arseniuretted Hydrogen -. Anaemia. Anxiety; despair. Hśmaturia, with general blood disorganisation. Haemorrhages from mucous membranes. Urine suppressed, followed by vomiting. Prepuce and glans covered with pustules and round superficial ulcers. Coldness; prostration. Sudden weakness and nausea. Skin becomes dark brown. (अर्सेनिक अत्यंत विषारी असते.)

KREOSOTUM, Beechwood Kreosote - Pulsations all over the body, and profuse bleeding from small wounds. Very severe, old neuralgic affections; pains rather aggravated by rest. Excoriating, burning, and offensive discharges. Hæmorrhages, ulcerations, cancerous affections. Rapid decomposition of fluids and secretions, and burning pains. Overgrown, poorly developed children. Post-climacteric diseases. Tumefaction, puffiness, gangrene. Ailings of teething children.

QUILLAYA SAPONARIA, Chile Soap-bark - Produces and cures symptoms of acute catarrh, sneezing and sore throat. Most effective in the beginning of coryza, checking its further development. Colds with sore throat; heat and dryness of throat. Cough with difficult expectoration. Squamous skin

GLYCERINUM, Glycerine- marasmus, debility, mental and physical, diabetes, etc. It disturbs nutrition in its primary action, and, secondarily, seems to improve the general state of nutrition.

GUACO, Mikania, Climbing Hemp Weed - Acts on the nervous system and female organs. Antidote to bites of scorpions and serpents (Golondrina). Cholera. Bulbar paralysis. Syphilis. Cancer. Deafness - tongue heavy and difficult to move. Spinal irritation. Spinal symptoms most marked and verified. Beer drinkers threatened with apoplexy. Diarrhœa and dysentery with aching in sacrum and loins.

MANGIFERA INDICA, Mango Tree - for passive hćmorrhages, uterine, renal, gastric, pulmonary and intestinal. Rhinitis, sneezing, pharyngitis, and other acute throat troubles, suffocative sensation as if the throat would close. Relaxation of mucous membrane of alimentary canal. Catarrhal and serous discharges, chronic intestinal irritation. Varicose veins. Drowsiness.

MEDUSA, Jelly-fish- Whole face puffed śdematous-eyes, nose, ears, lips.

ही औषधे बनविण्यास जे पदार्थ वापरण्यात आले त्याचे वर्गीकरण केले तर हे दिसते की हेंप, आंबा, चिलीसोपची साल, बीचचं लाकूड हे वनस्पतीजन्य पदार्थ आहेत.

The Metal Tellurium, Silico-fluoride of Calcium, Arseniuretted Hydrogen हे धातूंपासून बनलेले पदार्थ आहेत तर जेलीफिश हा प्राणी आहे. ग्लिसरीन हे जैविक रसायन (organic compound) आहे.

आता आपण Mangifera indica या औषधाचा विचार करू. हे औषध आंब्याच्या झाडापासून बनले. याचा अर्थ काय? खोड, साल, फूल, फळ कशापासून बनले? रामेश्वरपासून जम्मूपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत भारतात आंब्याच्या शेकडो जाती आहेत. प्रत्येक आंब्याची चव निराळी असते; याचा अर्थ त्यात असणारी रसायनं निराळी असतात. कुठल्या आंब्याचा वापर करायचा? हे औषध कोणत्या आजारांसाठी वापरले जाते? अंतर्गत रक्तस्राव, सर्दी, पडसे, आतड्यांचा दाह, व्हेरिकोज व्हेन्स, हे आजार अगदी वेगवेगळ्या कारणांनी होतात. अंतर्गत रक्तस्राव हा गंभीर आजार आहे.

सर्वच औषधांविषयी एक गोष्ट दिसते ती म्हणजे एक औषध इतक्या निरनिराळ्या आजारांवर दिले जाते आणि ते सर्व आजार अगदी निरनिराळ्या कारणांनी होतात.

औषधे कशी बनतात?

माहिती Methods of preparation of Homeopathic medicines by Michael Quinn, Hahnemann Laboratories या लेखातून घेतली आहे.

१. वनस्पतीजन्य, प्राणिजन्य अथवा रासायनिक पदार्थ आणणे.
२. हे पदार्थ साखरेबरोबर मिसळून बारीक भुकटी करणे.

एक ग्रॅम औषधी पदार्थ ९९ ग्रॅम साखरेबरोबर दळा. जी भुकटी बनेल त्यातील १ ग्रॅम भुकटी घ्या, यात ०.०१ ग्रॅम ‘औषधी’ पदार्थ आला. याला १सी डायल्युशन (सौम्य करणे) म्हणतात.

आता १सी डायल्युशनची १ ग्रॅम भुकटी घ्या त्या ९९ ग्रॅम साखर मिसळा आणि दळा. जी भुकटी बनेल त्यातील एक ग्रॅम भुकटी घ्या. यात ०.०००१ ग्रॅम ‘औषधी‘ पदार्थ आला. यास २सी डायल्युशन म्हणतात.

आता २सी डायल्युशनची १ ग्रॅम भुकटी घ्या, यात ९९ ग्रॅम साखर मिसळा आणि दळा. जी भुकटी बनेल त्यातील एक ग्रॅम भुकटी घ्या. यात ०.०००००१ ग्रॅम ‘औषधी’ पदार्थ आला. यास ३सी डायल्युशन म्हणतात.

यापुढील डायल्युशन पाण्यात होते.आता ३ सी डायल्युशनची १ ग्रॅम भुकटी घ्या, यात ९९ ग्रॅम पाणी मिसळा आणि व्यवस्थित मिसळून घ्या. जे द्रव बनेल त्यातील एक सीसी द्रव घ्या यात ०.०००००००१ ग्रॅम ‘औषधी’ पदार्थ आला. यास ४सी डायल्युशन म्हणतात.

आता ४ सी डायल्युशनचा १ सीसी द्रव घ्या, यात ९९ ग्रॅम पाणी मिसळा आणि जोरदार मिक्स करा. जे द्रव बनेल त्यातील एक सीसी द्रव घ्या यात ०.०००००००००१ ग्रॅम ‘औषधी’ पदार्थ आला. यास ५सी डायल्युशन म्हणतात.

आता ५ सी डायल्युशनचा १ सीसी द्रव घ्या, ९९ ग्रॅम साखर आणि नैसर्गिक डिंक मिसळा. त्याच्या हजार गोळ्या करा. एका गोळीत ०.००००००००००००००१ (१४ शून्य!) ग्रॅम एवढा मूळ ‘औषधा’चा भाग आला. याचा अर्थ मूळ औषधाचा एखादा रेणू एका गोळीत असेल किंवा नसेल.

एक तर मूळ औषध म्हणून जो पदार्थ निवडला याला काही तार्किक आधार नाही आणि एका गोळीत एखादा रेणू असेल याचा काय परिणाम होणार?

बाराक्षार

शूलर नावाच्या जर्मन माणसाने बायोकेमिक या नावाने ही पद्धत चालू केली. औषध देण्याची पद्धत होमेओपथीसारखीच आहे; औषधे मात्र बाराच आहेत. ही बाराही औषधे म्हणजे पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, फ्लोरीन यांचे क्षार. सिलिका हाही पदार्थ या शास्त्रात वापरला जातो. मराठीमध्ये या शास्त्राला ‘बाराक्षार चिकित्सा’ या नावाने ओळखले जाते. शरीरात अतिसूक्ष्म प्रमाणात वरील क्षार असतात आणि ते कमी होण्यानेच शारीरिक व्याधी उद्भवतात. त्याच्या मते सर्व रोगांचे निर्मूलन बाराच क्षारांच्या उपयोगाने करणे शक्य आहे. मग तो रोग जंतूंमुळे उद्भवला असो, की अन्य कारणाने.

सामान्यत: बायोकेमिकलांच्या औषधाच्या दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा रोग्यास दिल्या जातात. त्यांची शक्ती 6* किंवा 12* असावी. जुनाट व्याधींमध्ये (सूक्ष्मता) 30* किंवा 200* शक्तीचे औषध दोन वेळा रोज घेतले जाते. औषध घेतल्यापासून आठ-दहा दिवसांत गुण दिसायला हवा. तसे न झाल्यास औषध बदलणे आवश्यक आहे की काय याचा विचार करावा. ही औषधे एक-दोन औंसाच्या बाटलीतून मिळतात. ही औषधे स्वस्त असून वाईट परिणाम नसणारी आहेत आणि म्हणून वापरण्यास सुरक्षित आहेत.

या पद्धतीमध्ये बारा प्रकारचे क्षार शरीरातली निरनिराळी कामे करतात असे मानले जाते. जेव्हा या क्षारांचे प्रमाण कमीजास्त होते तसे शरीराच्या त्या भागाचे काम विस्कळीत होते. तो क्षार शरीराला पुरवला तर परत शरीर योग्य प्रकारे काम करू लागते. अशी साधारणपणे ही पद्धती काम करते.

बारा प्रकारचे क्षार

 • कल्केरिया सल्फ्युरीका
 • फेरम फॉस्फोटीकम
 • कॅलीमूरएटिकम
 • काली फॉस्फोरिकम
 • काली सल्फ्युरिकम
 • मॅग्नेशिया फॉस्फोरेका
 • नायट्रम म्युरेटिकम
 • नायट्रम फॉस्फोरिकम
 • नायट्रम सल्फ्युरिकम
 • सायलिशिया
 • कल्केरिया फ्लोरिका
 • कल्केरिया फॉस्फोरिका

या औषधी वेगवेगळ्या रोगांवर कामी येतात असा दावा केला जातो. या औषधांना क्रमवारीने वेगवेगळ्या ताकदी आहेत जसे ३ एक्स, ६ एक्स ते २०० एक्स. शारीरिक अवस्था व वेळेनुसार कमी वा जास्त ताकदीची औषधे दिली जातात. ही औषधे प्राण्यांवर व वनस्पतींवरही काम करतात असा दावा केला जातो.

समालोचन

होमिओपॅथीचे मूलभूत सिद्धांत अतिशय हास्यास्पद आहेत. त्याविषयी मोठमोठाल्या संस्थांनी आणि संशोधकांनी लिखाण केले आहे. औषधे बनण्याची क्रिया अशी आहे की शेवटी ज्या तीन मिलीमीटर व्यासाच्या गोळ्या विकल्या जातात त्या गोळ्यांत साखरेशिवाय काहीच उरत नाही. दोनशे वर्षापूर्वी हाहनेमानने जी औषधे सांगितली त्याची कारणमीमांसा न तपासता ती आजही तशीच दिली जातात. बाराक्षार हे वैद्यक होमिओपाथीची बहीण आहे. औषध बनविण्याची प्रक्रिया तीच. मानवाचे सर्व आजार शरीरात काही क्षार कमी पडले यामुळे होतात आणि ते क्षार दिले की प्रश्न सुटला!

क्रमशः

***

भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
भाग ५ - परीक्षा आणि चिकित्सा
भाग ६ - आयुर्वेदाची औषधे – भाग १
भाग ७ - आयुर्वेदाची औषधे – भाग २
भाग ८ - आयुर्वेदाचे शिक्षण आणि नंतर
भाग ९ - आयुर्वेदाची प्रॅक्टीस
भाग १० - युनानी आणि सिद्ध
भाग ११ - निसर्गोपचार

field_vote: 
0
No votes yet