येन्टल , द मिरर हॅज टु फेसेस - २ प्रचंड सुंदर , वेगळ्याच विषयावरचे चित्रपट

आज, बार्बरा स्ट्रेसँडचे, तिनेच दिग्दर्शित केलेले, माझे अतिशय आवडते २ सिनेमे, एका बैठकीत परत पाहीले - कोणत्याही ओटीटी वरती उपलब्ध नाहीत. विकत अ थवा भाड्याने घेउनच पहावे लागतील. इटस वर्थ इट. आय हायली रेकमेन्ड.
------------------------------------- येन्टल--------------------------------
.
https://lh3.googleusercontent.com/pw/AIL4fc-QWmz2GOaNsoEmS_afOC9uhYX6p05vxAmPekaa_7LWUnjaE62A4tC6uBxlLRNm0juDR9CGn28_wvhVXBlazKPrXRDl3wfJs3k03QViRVAjQv8EhYzZIqYpKXjHPoeVIgjL9zO9rBG6StOrTlZz2iFw2w=w183-h275-s-no?authuser=0
.
पहीला आहे येन्टल (YENTL) - ही युरोपमधली त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा, स्त्रियांना फक्त चित्रे असलेली पुस्तके वाचायची परवानगी होती, पुरुष धार्मिक पुस्तके वाचू शकत. एक ज्यु स्त्री आहे - नाव येन्टल. तिला मात्र धार्मिक पुस्तके वाचायची आहेत. तिला आयुष्याकडुन खूप काही हवे आहे. तिच्या खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा , तिच्याकरता पुरेसा नाही. एका मोकळ्या , विशाल नभांगणात झेप घेण्याची तिची कामना आहे. तिच्या भावाने आत्महत्या केलेली आहे , ज्याचे नाव आहे अँसेल.
जेव्हा येन्टल चे वडील, वारतात तेव्हा तिच्या गावात, तिला बांधून ठेवणारे काहीच पाश उरत नाहीत आणि येन्टल आपले केस कापून, स्वत:चे नाव घेते अँसेल आणि जगात नशीब काढायला निघते. वाटेत अनेकानेक चांगले-वाईट अनुभव घेत ती , कथेच्या नायकाबरोबर पोचते एका तेव्हाच्या काळच्या अध्ययन मंदिरात. तिथे ती खूप शिकते, नायकाबरोबर, अन्य पंडितांबरोबर वादविवाद करते, शी प्रुव्ह्स हर मेटल. नायकाला माहीतच नाही की अँसेल म्हणुन वावरणारी ती एक स्त्री आहे. आणि अशी अँसल बनलेली येन्टल, नायकाच्या प्रेमात पडते.
पुढ त्यांची एकतर्फी प्रेमकहाणी सफळ होते का? येन्टल आकाशी झेप घेते का? असा हा सिनेमा असून, अ तिशय गोड आणि अर्थवाही शब्द असलेले. संगीत आहे.
अभिनेत्री बार्बरा स्ट्रेइसँडने, येन्टलची जिद्द, महत्वाकांक्षा, सकारात्मकता, धैर्य तिच्या डोळ्यातून, देहबोलीतून विलक्षण प्रभावी रीत्या प्रकट केलेले आहे. वन ऑफ माय फेवरेट मुव्हीज. खूप आवडतो हा सिनेमा. सकारात्मक आफ्टर टेस्ट रहाते. मस्त मस्त!! जरुर पहा.
.
-------------------- द मिरर हॅज टु फेसेस --------------------------------------
.
https://lh3.googleusercontent.com/pw/AIL4fc8GMEPTVEY3CnMcWbc-lZKgmx3PdWsl2YvWDOY2UbiQ-ZQ-zlGsf9RKrpkHdAYxV6FVg0GoD-La4QDhtPY-TxSYvuwB_E6RUOgutOzNQgbuNkhC83E1wrkMWiSUywlHTOmS5OigpZP2lXuMeLw0YV_vRg=w584-h875-s-no?authuser=0
.
हा एक वेगळाच मस्त सिनेमा आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीचे २ प्राध्यापक आहेत. दोघे अर्थात कमालीचे बुद्धीमान, व्यासंगी, अभ्यासू आणि इन्टलेक्ट्युअल. दोघे मेड फॉर ईच अदर - पण कसे? ती एक गंमतच. आणि या गंमतीवरती आधारीत हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. नायकाला 'सेक्सच्याही पलिकडची रिलेशनशिप हवी आहे. ' त्याला सेक्स मधे विशेष गम्य नाही म्हणण्यापेक्षा देअर मोअर टू अ रिलेशनशिप दॅन मिअर सेक्स असा त्याचा विश्वास आहे तर ही जी नायिका आहे - बार्बरा स्ट्रेइसँड तिला नटणे मुरडणे यात अज्जिबात रस नाही. ती स्वतः प्रचंड आत्मविश्वास असलेली, फनी, बुद्धीमान आणि विद्यार्थ्यांची लाडकी प्राध्यापिका आहे. अन्य बायकांसारखी, खाण्यात फार नखरे न करणारी, खाणे पिणे आणि एकंदर आयुष्य आवडणारी अशी ती आहे. मात्र प्रेमात एका प्रसंगाने ती पोळलेली आहे. त्यामुळे प्रेमावरचा, तिचा विश्वासच उडालेला आहे. या सगळ्या सलाडमध्ये तिच्या आईचे एक पात्र आहे जिचे स्वतःचे तारुण्य संपलेले असले तरी शेवटच्या काही उरलेल्या वर्षांतही तिला तरुण दिसायचे आहे, डेटिंगला जायचे आहे.
नायक जो आहे तो एकदा वर्तमानपत्रामध्ये 'कंपॅनिअनशिप/मैत्री' शोधण्याकरता एक जाहीरात देतो आणि नायिकेस भेटतो. त्यातून पुढे त्यांची निखळ मैत्री कशी बहरत जाते, कसे दोघे बाँड होत जातात, एकमेकांच्या सहवासात त्यांचा एकाकीपणा दूर होतो, बाँडिंग होत जाते व पुढे मग त्यांच्या 'मैत्रीविषयक, शारिरिक इन्टिमसीबद्दल' धारणा बदलतात का? हे सारे खूप रोचक आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet