पूर्णान्न

काही वर्षांपूर्वी एका स्वघोषित आयुर्वेदाचार्यांनी काही मनोरंजक विधाने केली होती. जीवनसंगीत अर्थात आयुर्वेदातून गाणे किंवा गाण्यातून आयुर्वेद अशा स्वरुपाच्या एका कार्यक्रमात आचार्य म्हणाले, ’काव्याचा आशय, शब्दोच्चारांबरोबर शक्तीचे स्पंदन आणि भाव एकत्र येते तेंव्हा जीवनसंगीत आकाराला येते’. (म्हणजे काय कुणास ठाऊक!) आचार्य पुढे म्हणाले की ‘मोहुनिया तुजसंगे’ हे गजाननराव वाटव्यांचे गाणे आणि ‘ऐरणीच्या देवा तुला’ हे गाणे यामुळे पित्ताचे संतुलन होते, ‘मेरा रंग दे बसंती ‘ या गाण्याने हृदयातली शक्ती जागृत होते, ‘हवा मे उडता जाये’ या गाण्याने शरीराच्या नाड्या व सांधे मोकळे करण्याचा अनुभव येतो’. बरे, एवढ्यावर तरी त्यांनी थांबावे की नाही? नाव सोडा! त्यांचे सुरूच होते, ‘शरीरातील अग्नी संतुलित करण्यासाठी ‘दशरथा, घे हे पायसदान’ हे गाणे उपयुक्त आहे तर रक्तदाब, मधुमेही रुग्णांना ‘नैनों में बदरा छाये’ हे गाणे. स्मृतीवर्धन आणि मेंदूचे विकार यासाठी ‘जो तुम तोडो पिया’ हे ‘सिलसिला’ चित्रपटातील मीराबाईचे भजन लागू पडेल तर हृदयविकारावर ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ वर बेतलेले ‘किसीके मुस्कराहटोंपे हो निसार’ हे गाणे. (वैष्णव जन तो तेणे कहिये’ वर ‘किसीके मुस्कराहटोंपे हो निसार’ हे बेतलेले आहे का, असल्यास कसे हे त्याने त्याने आपल्या मनात आपापल्या जबाबदारीवर ही दोन्ही गाणी म्हणून ठरवावे!) शिवाय, ‘ओ सजना बरखा बहार आयी’ या गाण्यात अतिउत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा परमेश्वराच्या मीलनाची आहे. मलविसर्जन आणि आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे!
सलील चौधरी, लता मंगेशकर आणि शैलेन्द्र यांच्या आत्म्यांवर काय परिस्थिती ओढवली असेल याचा विचारही करवत नाही.
तर याच परंपरेतील आणखी एक स्वघोषित आहारतज्ज्ञ आयुर्वेदविदुषींनी आज पुन्हा काही मनोरंजक विधाने केली आहेत. मुळात दूध हा या विदुषींचा जिव्हाळ्याचा विषय. कुणीही दूध पीत नाही किंवा कुणालाही दूध पचत नाही असे त्यांना कळाले की त्यांचे पित्त खवळते. काही काळापूर्वी एका व्यक्तीने आपल्याला दूध प्याल्यावर त्रास होतो असे त्यांना लिहिले होते तेंव्हा सदर विदुषींनी ‘त्रास झाला तरी चालेल, पण दूध प्याच.’ (दूध पीत नाही म्हणजे काय? आं?) असे त्यांना बजावले होते. मातेच्या स्तनांत दूध निर्माण होणे या प्रक्रियेमागे त्या त्या प्रजातीच्या बालकाचे पोषण व्हावे हा हेतू आहे. बालकाचे बाल्य संपले की त्याने दूध पिणे अपेक्षित नाही. शिवाय एका प्रजातीच्या मादीच्या शरीरात तयार झालेले दूध दुसर्‍याच प्रजातीने पिणे हे तर अनैसर्गिकच आहे हे यांना कोण सांगेल? आणि सांगितले तरी ते त्यांना कळेल आणि पटेल का? कारण आयुर्वेदाचा दाखला देऊन दूध हे सर्व वयोगटांना चांगले असा त्या दावा करतात. देशी गाईचे दूध सर्वोत्तम असा दावा त्या करतात, पण ते कोणत्या आधारावर हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. दुधावर पाश्चरायझेशन, होमोजिनायझेशन, अल्ट्रा हीटिंग वगैरे प्रक्रिया केलेल्या नसाव्यात असे त्या म्हणतात, मग दुधातील अपायकारक जीवाणू नष्ट कसे होणार याबाबत त्या काहीही बोलत नाहीत. त्यातल्या त्यात पाश्चरायझेशन केलेले दूध शरीराला पचवणे सोपे जाते, पण त्याहून अधिक प्रक्रिया केलेल्या नसाव्यात असे त्या म्हणतात. या दोन्ही प्रक्रिया दुधातील जीवाणू नष्ट करण्यासाठी वापरल्या जातात आणि दूध पचण्याशी त्यांचा काही संबंध नाही हे सदर आयुर्वेदविदुषींना मान्य नसावे. पण तरीही दूध गरम न करता कधीही पिऊ नये असेही त्या म्हणतात. व्यवस्थित गरम केलेले दूध पचायला सोपे जाते असा यांचा दावा आहे. दूध तापवणे आणि त्याचे पचन यांचा त्यांनी संबंध लावला आहे, तो कोणत्या आधारावर हे त्यांनाच ठाऊक. होमोजिनायझेशन या प्रक्रियेत तर दुधातील स्निग्ध पदार्थांचे कण दुधात एकसमान मिसळले जावेत म्हणून दुधावर दाब टाकला जातो. इथे तर उष्णता पण नाही, पण या प्रक्रियेलाही यांचा विरोध आहे. का?
या विदुषी म्हणतात की दुधात वेगवेगळी व्हिटॅमिन्स, मिनारल्स टाकून फोर्टिफाईड दूध या नावाखाली विकले जाणारे दूध शरीरासाठी चांगले नसते. असे का, हे मात्र त्या सांगत नाहीत. Lactose intolerance असल्यामुळे बरीच वर्षे दूध बंद केलेल्या व्यक्तींनी या आयुर्वेदविदुषींच्या आश्रमातील भारतीय वंशाच्या गाईचे दूध घेतल्यास त्यांना कोणताही त्रास होत नाही असा अनुभव आहे, हा त्रास (Lactose intolerance) सध्या उपलब्द्ध असलेल्या अनैसर्गिक (?) दुधाशी निगडीत असावा अशी अत्यंत भोंगळ विधाने त्यांनी केली आहेत. शास्त्रीय कसोटीवर एखादे विधान खरे किंवा खोटे आहे असा दावा करण्याआधी शास्त्राला मान्य असलेल्या काही विशिष्ट चाचण्या ठराविक पद्धतीने पार पाडाव्या लागतात. त्या पुन्हा पुन्हा करूनही तसेच निष्कर्ष प्राप्त होत असतील, तरच ते विधान खरे किंवा खोटे ठरते. केवळ ‘आम्हाला असा अनुभव आहे, अमुक असे असावे’ असल्या विधानांना विज्ञानाच्या जगात काहीच अर्थ नाही. अर्थात या विज्ञानावरच कुणाचा विश्वास नसेल तर तो भाग निराळा. तरीही Lactose Intolerance असलेल्या लोकांमध्ये लॅक्टोज पचवण्याची क्षमता नसते आणि त्यामुळे ती लॅक्टोज नावाची शर्करा त्या व्यक्तीच्या पोटातील जीवाणू वापरतात आणि आम्ल आणि कर्बद्विप्राणिल वायू तयार करतात. त्या व्यक्तीला दूध घेतल्याने त्रास होतो तो यामुळे, हे सांगून ठेवलेले बरे. दूध, मग ते भारतीय वंशाच्या गाईंचे असो किंवा इतर कोणत्या, जोवर त्यात ही शर्करा आहे तोवर त्रासदायक ठरणारच. असे बिचारे विज्ञान सांगते, एवढेच. सोया मिल्क, आल्मंड मिल्क, राईस मिल्क यांमध्ये ही शर्करा नसते पण... बरोबर ओळखलेत! असले प्रकार टाळलेलेच बरे असे या विदुषी म्हणतात. का? त्रास झाला तरी हेच दूध घ्यावे हा अट्टाहास का?
चीज या पदार्थाबाबतही या विदुषींचे चांगले मत नाही. चीज तयार करत असताना वापरण्यात येणारे बॅक्टेरियांचे कल्चर वनस्पतीजन्य आहे की प्राणिज आहे हे पाहावे लागते असे त्या म्हणतात. (हे कोण पाहाणार?) प्राणिज कल्चर वापरुन केलेले चीज पचायला जड असते असे त्या म्हणतात. मुळात कल्चर ही संज्ञा जिवंत जीवाणूंच्या संदर्भात वापरली जाते. चीज तयार करण्यासाठी जे वापरतात त्याला विकरे (enzymes) म्हणतात. ही विकरे दुधात काही जैवरासायनिक प्रक्रिया घडवून आणतात आणि मग पुढे त्याचे चीज तयार होते. जोवर ही विकरे तीच आहेत, तोवर त्या प्रक्रिया त्याच असतात आणि त्यातून निर्माण होणारे पदार्थही तेच असतात. फार पूर्वी ही विकरे गाईच्या वासरांच्या जठरांच्या आवरणांतून काढत असत. १९८४ नंतर भारतात अशा विकरांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्राणिज कल्चर ही संज्ञा भारताच्या संदर्भात अर्थहीन आहे. आता वापरण्यात येणारी बहुतेक विकरे जीवाणूंपासून तयार केलेली असतात. आता जीवाणू म्हणजे वनस्पतीही नव्हे आणि प्राणीही नव्हे असे नृसिंहाचे अवतार आहेत. त्यामुळे त्यांपासून तयार केलेले चीज पचायला जड की हलके? आणि हे कसे ठरवणार? नैसर्गिक चीज प्रकृतीला चांगले पण प्रोसेस्ड चीज प्रकृतीला वाईट असा या विदुषी दावा करतात. याला आधार काय हे सांगण्याची त्यांना गरज वाटत नाही. डोशावर चीज घातले की डोशातील डाळ-तांदळातून मिळणार्‍या पोषणावर त्याचा परिणाम होतो, खायचे झाल्यास चीज सकाळच्या जेवणात खावे, रात्रीच्या जेवणात नको असे भारंभार सल्ले त्या देतात. ते तसे का हा प्रश्न त्यांना पडलेला दिसत नाही आणि तो वाचकांनाही पडू नये अशी त्यांची अपेक्षा दिसते.
हे एकूण समाजाचे प्रातिनिधिक चित्र आहे. प्रश्न विचारू नका, शक्यतो स्वत:ला प्रश्न पडणार नाहीत हे बघा, जे सांगितले आहे, तेच खरे असे मानून चाला. सुखी लोक तसेच करत असतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुमच्या जीवश्चकंठश्च मित्राचे देहावसान झाल्यापासून तुमच्यातला पंच हरवत चाललेला आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- अहिरावण

काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...

उत्तम लेख.
कालच्या सकाळ मध्ये डॉ मालविका तांबे यांनी लिहिलेल्या लेखातुन पसरवलेल्या बहुतांश गैरसमजांच्याबद्दल साधी सरळ शास्त्रीय माहिती देऊन खंडन केलेत त्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतर प्राणी,त्यांची शारीरिक शक्ती आणि आहार पाहिल्यावर पूर्णान्न किंवा योग्य अन्न याबाबत कोणताच सिद्धांत मांडता येणार नाही. तसेच कोणत्याही शास्त्रीय संशोधनाचीही गरज नाही हे पटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगात जे रोज घडते त्याच्या कडे दुर्लक्ष करून फक्त बकवास हेतू नी लिहलेले हा लेख आहे.
दूध हे पिलासाठी च बनते सर्व जगाला माहित आहे .
नवीन काही तरी माहीत झाल्या सारखे व्यक्त होवू नका.
दूध आणि त्याचे उप पदार्थ जगभर.
उपलब्ध आहेत.
काही तरी बकवास हेतू ठेवून बकवास लिहणे सोडा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

दूध आणि त्याचे उप पदार्थ जगभर उपलब्ध आहेत

तरीही वासरासाठी असलेले दूध हे मानवासाठी नाही वगैरे तारे कसे तोडतात देव जाणे. जास्तीच्या दूध देणाऱ्या जाती मानवांनी कृत्रिमरित्या निवडलेल्या आहेत, एका परीने हे मानव आणि गायी म्हशी उंट घोडे शेळ्या या सगळ्यांचे सहजीवन आणि सहउत्क्रांती आहे आणि हे पूर्णत: नैसर्गिक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

हे मूळ तांबे यांच्या लेखाबद्दल आहे की सन्जोप राव यांच्या लेखाबद्दल ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तांबे तर fraud आहेच. परंतु या लेखातील कोणताहि मुद्दा पटलेला नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

तांबे तर fraud
कशामुळे हो वाटले?
.....
जर्मन आणि संस्कृत दोन भाषांमुळे ते जर्मनीत चर्चेत असत. बरेच फालोअरस होते. इकडे लोणावळा (मळवलीत mtdc च्या केंद्राच्या बाजूला आयुर्वेदिक उपचार केंद्र चाले. तसेच श्रीवर्धन येथे जागा घेऊन ठेवली होती. ग्रंथांमध्ये जसे सांगितले आहे तसे उपचार,विधि करायचे. ते उपचार लागू होतात किंवा कसे हे वेगळं. थोडक्यात ते "सर्वीस" देत होते.

गर्भसंस्कार विविध,कुंकुंमतिलक का काही विधि, दक्षिणेतील मंदिरांमध्ये करून घेणारे भाविक आहेत. (ते विधिच फ्रॉड आहेत का हे आपण कसं ठरवणार.?)

तांबेच्या शेवटच्या काळात त्यांना एका पुण्याच्या मॉडर्न हॉस्पिटलमध्ये ठेवले हेसुद्धा बऱ्याच लोकांना आवडले नाही. पण त्यांचे नातेवाईक दूर असतील आणि सेवाशुसृषा यासाठीही त्यांनी तो सल्ला दिला असेल.
असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका पुण्याच्या मॉडर्न हॉस्पिटलमध्ये

असे किती पुणे आहेत आणि त्यापैकी नक्की कोणत्या पुण्यामधे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- अहिरावण

काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...

हुं.
पुण्यातील एका मॉडर्न हॉस्पिटलमध्ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यात किती पिनकोड आहेत, ते तपासावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो ते नववाममार्गीउधारमतस्वतुच्छ्तावादीपरभलामणडिंगोरावादी महान व्यक्तिमत्व आहे..
त्यांची अशी अवहेलना करु नका. बाप्पा कान कापेल हो...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- अहिरावण

काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...

हे मूळ तांबे यांच्या लेखाबद्दल आहे की सन्जोप राव यांच्या लेखाबद्दल ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाणी चांगली निवडली आहेत. विकार बरे होवो अथवा न होवो, ऐकायला बरी वाटतात.

ओमकार, नामजप, मंत्रपठण केल्यास कॅन्सर, मधुमेह, ऱ्हुदयरोग इत्यादी सारखे जटील रोग बरे होतात असे ऐकले आहे. (खरे, खोटे धन्वंतरी जाणे)

आरोग्य आणि आहार विषयक सल्ले देणारे (काही सन्माननीय अपवाद वगळता) खरच काहीच्या काही सल्ले देतात. बऱ्याचवेळा असे वाटते की इंग्रजी लेखाचे मराठी भाषांतर केलेले असते. त्यात इंग्रजी निजधामी गेलेली असते आणि मराठी भाषेचा करूण अंत झालेला असतो.

ह्या होलसेल मधे सल्ले पाडणाऱ्यांचे काहीतरी करायला हवे... खरेच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

गवत आणि झाडपाला हे हरणांचं पूर्णान्न आहे,(कधीमधी खारी मातीही चाटतात) याबद्दल कोणताही वाघ साक्ष देईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या लेखात विज्ञान काय आहे कोणी सांगेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0