Skip to main content

अलिकडं काय घेतलं आणि काय विकलं?

मार्क हॉवर्ड चे हे पत्र वाचले. निराशाजनक आहे.
त्याच प्रमाणे, भारतीय बाजाराचे हे विश्लेषण पाहिले आणि वाचले. यातला Analogize Interest + Inflation Rate with Market Movement (BSE100) हा भाग पाहिला. महागाई + व्याजदर १४% च्या खाली गेले की साधारणत: बाजार उत्तम परतावा देतो. सध्या हा ट्रेंड उतरता आहे. त्यामुळे भारतीय बाजार येत्या वर्षी तेजीत असायला हरकर नसावी.

मराठी भाषेची विस्कळ - जयदीप आणि मिहिरचं संशोधन

ऐसी सदस्य आणि संशोधक जयदीप चिपलकट्टी आणि मिहिर यांनी मराठी भाषेची विस्कळ (entropy) या विषयावर लिहिलेला हा पेपर. त्यात लिहिलेल्या गोष्टी सोप्या करून लिहिण्याची जाहीर विनंती करण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

हा पेपर - On the letter frequencies and entropy of written Marathi

(सध्या धागा माझ्या नावावर असला तरीही जयदीप/मिहिरला त्याचं पितृत्व देण्यासाठी मी उत्सुक आहे.)

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

माझी एक गोची होते

वृत्तबद्ध लिहिताना
माझी एक गोची होते
यमक बिमक जुळवताना
अलगद काही निसटून जाते

माझी कविता "जुळत" नाही
हवी तशी "वळत" नाही
(जुळली/वळली चुकून तर..)
कमावलेली कृत्रिमता
हट्टीपणे हटत नाही

कवितेचे झटपट वर्ग
कुठे कोणी घेतं का?
अभिजात वगैरे लिहिण्यासाठी
प्रतिभा विकत मिळते का?

(एक कोडं सुटत नाही ...)
शब्द इतके रुक्ष तरी
भावना इतक्या तरल क़शा?
काळजात रुतलेली कविता आठवून
डोळ्यांच्या कडा ओलावतात कशा?

महावितरण वीजबिलाचा झोल

जून महिन्यात महावितरणच्या सगळ्याच ग्राहकांची वीजबिलं नेहमीपेक्षा अधिक आल्याची तक्रार होती. जे ग्राहक तक्रार करायला गेले त्यांना उन्हाळ्यात पंख्यामुळे बिल जास्त येते असं कारण सांगितले. मी बिल नीट बघितले तर आमचे बिल १ महिन्याचे नसून १.३ महिन्याचे होते. म्हणजे ९ दिवस उशीरा मिटर रिडींग घेतले होते, त्यामुळे अधिक युनिट पडल्याने बिलही जास्त आले होते . बाबा तक्रार करायला महावितरणच्या कार्यालयात गेले, तेथील अधिकार्‍याने उशीरा रिडींग घेतल्याचे मान्य केले. पुढील महीन्यात ८-९ दिवस आधी रिडींग घेतले जाईल ,त्यामुळे पुढचे बिल कमी येईल.

शब्दप्रपात

या शब्दप्रपाता असला बहर यावा
निर्झर तो उंचावरूनी धबाबा कोसळावा ॥धृ॥
शब्दांचे मौक्तिक चोहिकडे विखरावे..
लेखणीमधुनी भावतरंगांचे भरते यावे ॥१॥

या शब्दलतिकांची ऐसी गुंफण व्हावी
विताना सप्तरंगांची देखणी माला मिरवावी
या शब्दप्रपाता असला बहर यावा
निर्झर तो उंचावरूनी धबाबा कोसळावा ॥२॥

ह्या काव्यसुमनांची ऐसी उधळण व्हावी
तृण पातांवरी जलबिंदूंची शिंपण व्हावी
या शब्दप्रपाता असला बहर यावा
निर्झर तो उंचावरूनी धबाबा कोसळावा ॥३॥

आत्माराम, राधाबाई आणि रखमाबाई सगुण.

गूगलच्या मदतीने मी दुसरेच काही शोधत असता Radhabai Atmaram Sagun/Sagoon, Book publisher अशा एका नावावर माझी दृष्टि पडली. ह्यापूर्वी १८६०च्या दशकात स्थापन झालेल्या निर्णयसागर ह्या प्रकाशनव्यवसायाचे मूळ संस्थापक जावजी दादाजी आणि तदनंतर त्यांचे चिरंजीव तुकाराम आणि पांडुरंग ह्यांनी हा व्यवसाय सांभाळला होता. पांडुरंग जावजी ह्यांचा १९४० साली मृत्यु झाल्यानंतर जिजाबाई, सत्यभामाबाई आणि लक्ष्मीबाई ह्या चौधरी कुटुंबातील तीन विधवांनी आपल्या परीने काही वर्षे त्या व्यवसायाची ढासळती इमारत सावरून धरली होती.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

माझ्या कवितेची शाई

माझ्या कवितेची शाई
आहे अजब मिश्रण
भस्म अधुऱ्या स्वप्नांचे
त्यात अश्रुंचे शिंपण

कधी माझ्या कवितेचा
शब्द निनादे आभाळी
कधी धरती विंधतो
कधी ग‌र्ज‌तो पाताळी

कवितेची ओळ माझ्या
कधी बोब‌डे बोल‌ते
कधी बोलता बोलता
गहनाशी झोंबी घेते

क‌वितेच्या रोम‌रोमी
फुंकीन मी प्राण जेव्हा
तेव्हा तुम्हा रसिकांचा
पाठीवरी हात हवा

प्रवासी वाहतूक नियम कोणासाठी?

शाळेत असताना मित्राच्या सायकलवर डबलसीट बसून शहरातील रस्त्यावर फिरायला मजा वाटायची. असंच एकदा फिरत असताना एका सिग्नलला पोलिसाने आम्हाला अडवलं. सायकलच्या दोन्ही चाकांचे वॉल्व खोलून चाकातील हवा काढून टाकली व वॉल्वची रबरी नळी काढून मित्राच्या हातात दिले. आम्ही दोघे गांगरून पोलिसाकडे बघतच राहीलो. कितवीला आहात तुम्ही? पोलिसाने विचारले. सातवीला, मित्राने सांगितले. मग डबलसीट सायकल चालवू नये हे तुम्हाला शाळेत शिकविले नाही? शाळेत तुम्हाला वाहतुकीचे नियम शिकवले असतील ना? पोलिसाने विचारलं. नाही शिकवलं असं म्हणायची आमची हिम्मत झाली नाही.