जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा.
(व्यवस्थापन : एकाच सदस्याचे खूप धागे एकाच वेळी ट्रॅकरवर दिसू नयेत म्हणून सगळे धागे एका ठिकाणी आणले आहेत.)
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा.
- 25 comments
- Log in or register to post comments
- 19091 views
दिंडी
अभिजात सुमारांची बहुश्रुत दिंडी
लॅपटॉपी कीबोर्डाचे चटचट अहिर्निश टाळ
निष्क्रिय मत-मतांतरांचे डब्ब दुतोंडी मृदंग
वैचारिक साठमारीचे गुगलपुष्ट निर्दय घोडरिंगण
जितं मया च्या एकेकट्या भेसूर आरत्या
तिथे सुदूर चंद्रभागेकाठी
काळाभोर त्याच्या अट्टल दगडी मौनातल्या शयनी एकादशीत
कल्पांतापर्यंत अकिम्बो
- Read more about दिंडी
- 14 comments
- Log in or register to post comments
- 8635 views
ही बातमी समजली का? - भाग १५१
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.
- Read more about ही बातमी समजली का? - भाग १५१
- 105 comments
- Log in or register to post comments
- 82100 views
आर्य हे दक्षिण भारतीय होते
(आपल्या स्वार्थासाठी नव्याने इतिहास लिहिणाऱ्या आजच्या महान इतिहासकारांपासून प्रेरणा घेऊन लिहिलेला तर्क पूर्ण लेख)
आर्य शब्दाचा संस्कृत अर्थ आहे उत्तम आणि सुसंस्कृत व्यक्ती अर्थात आचार आणि विचाराने चांगला व्यक्ती. आर्य नावाची कुठली जाती होती आणि ती परदेशातून भारतात आली या भाकड कथेवर मी कधीच विश्वास ठेवला नाही. तरीही जे माझे मित्र आर्य आणि संस्कृत बोलणारे ब्राम्हण विदेशातून भारतात आले होते, त्यांच्या साठी हा लेख. आर्य हे दक्षिण भारतीय होते आणि त्यांची भाषा संस्कृत होती हे मी लेखात तार्किक रित्या सिद्ध करणार आहे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about आर्य हे दक्षिण भारतीय होते
- 30 comments
- Log in or register to post comments
- 30423 views
आपलासुद्धा कोणीतरी डुप्लिकेट आहे
Disclaimer : खालील लेख ऐसीवरील 'डू आयडी' विषयी नाही.
मी एकदा एका सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा त्यांची जेवणाची वेळ चालली होती. वाट पहात मी कार्यालयाच्या आवारात फिरत होतो. तेथे इतर काही लोकसुद्धा कार्यालयाच्या जेवणाची वेळ संपण्याची वाट पहात वेळ काढत होते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about आपलासुद्धा कोणीतरी डुप्लिकेट आहे
- 14 comments
- Log in or register to post comments
- 9692 views
अंदाज करा - १ ते १०० ची वर्गमुळं
इसवी सन ११८०. वयाच्या ३२व्या वर्षी तुम्ही तुमच्या राज्यातले राजगणिती आहात. अंकगणितावर तुमचं उत्तम प्रभुत्व आहे. राजा तुम्हाला अनेक गणिती प्रश्न विचारतो, सैन्याच्या वेगवेगळ्या कारभारासाठी लागणाऱ्या आकडेवारीचं विश्लेषण करणं हे तुमचं काम आहे. तसंच शेतसारा गोळा करण्यासाठी लागणारी क्षेत्रफळाची गणितं करणं, साऱ्याची योग्य टक्केवारी ठरवणं, त्यानुसार वेगवेगळ्या प्रांतांतून येणारा सारा पुरेसा आहे की नाही हे तपासणं, प्रत्येक विभागासाठी यावर्षी झालेल्या पाऊसपाण्याच्या आकडेवारीनुसार साऱ्याचं ध्येय ठरवणं, कुठच्या प्रांताला दुष्काळानुसार किती सूट देणं अशी अनेक कामं तुमच्याकडे आहेत.
- Read more about अंदाज करा - १ ते १०० ची वर्गमुळं
- 52 comments
- Log in or register to post comments
- 61177 views
कलाकाराची वाटचाल
गझल मी ऐकवित गेलो
रंग मैफिलीत भरीत गेलो,
दु:खालाही इथे माझ्या
दाद मिळवत मी गेलो.
होती काही गाणी सुखाची
तर बरीचशी होती दु:खाची,
तान मी छेडीत गेलो
रंग मैफिलीत भरीत गेलो.
वाद्यांनी साथ सोडली तरी
एकटा मी गात गेलो,
आयुष्यातल्या स्वप्नांचीही
पानगळ मी पाहत गेलो,
सुन्या मैफिलीतही माझ्या
रंग भरीत मी गेलो.
जीवनातील चढ उतारांनाही
आलाप समजत मी गेलो
भरल्या मैफिलीत नम्रतेने
रंग भरीत मी गेलो.
- Read more about कलाकाराची वाटचाल
- Log in or register to post comments
- 1440 views
ये हलके हलके मागे
बदामी.
वो जब मिले हैं तो उनसे हर बार, की है उल्फ़त नये सिरे से असं म्हणू?
त्या विलक्षण मातीवर नव्याने जीव जडवावा वाटत राहतं इतक्या आत्मीयतेने ती मी मनात जपलीय.
तीवर त्या अर्जेंतिनी महावाक्याला खरे ठरवणारे क्षण वेचले आहेत.
खिडकीच्या काचेवर डोकं टेकवलं आणि उघड्यागच्च डोळ्यांनी गतीवर नजर लावली
की मागे मातीवर बदलत जाणारे रंग बेसावध चित्ताला एकदम चिमटीत धरतात.
त्या रंगा-पोतांचे विभ्रम साठवत प्रवासाचे टप्पे वाढत जातात,
- Read more about ये हलके हलके मागे
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6359 views
म.म.व.ची कैफियत
गज़लेत सूर्य होतो, तो पिऊन अंध:कार
मी कुडकुडून जातो, डेंजर किती हे वारं
ब्रह्मांड भेदुनिया, गर्जेल काव्य त्याचे
टपरीकडे विडीच्या, वळतात पाय माझे
मृत्यूस डिवचणारे, तो अमरगीत रचतो
लाईफ इन्शुरन्सचे, मी सर्व हप्ते भरतो
तारे, फुले नि शब्द, वश त्यास जन्मसिद्ध
मी सापळ्यात - माझे, अस्तित्व ममवबद्ध
- Read more about म.म.व.ची कैफियत
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3610 views
धर्मांतराची कथा आणि व्यथा
परवा वि ग कानिटकरांची एक वेगळीच कादंबरी मला पुण्याच्या अक्षरधारा या पुस्तक-तीर्थामध्ये(हो, पुस्तकचे दुकान म्हणणे कसे तरी वाटते!) मध्ये पुस्तके चाळता चाळता हाती लागली. शीर्षक होते होरपळ, आणि ती एका धर्मांतराची कथा होती. मी ती कादंबरी घेतली आणि वाचली. तुम्ही म्हणाल धर्मांतर हा काय विषय आहे का आज-कालच्या जागतिकीकरणाच्या जगात. पण धर्माच्या संबंधित दहशतवाद आपल्या आसपास आहेच. त्यामुळे हा विषय आजही लागू आहेच. धर्मांतर म्हटले की आपल्याला आठवते ते बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धधर्म स्वीकारणे, आदिवासी, पददलित समाजाचे कधी मन वळवून, तर कधी जबरदस्तीने मिशनर्यांनी केले धर्मांतर.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about धर्मांतराची कथा आणि व्यथा
- 9 comments
- Log in or register to post comments
- 13208 views