Skip to main content

फुसके बार – ०५ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – ०५ फेब्रुवारी २०१६
.

१) राजस्थान पर्यटनाच्या जाहिराती

राजस्थान पर्यटनाच्या काही जाहिराती फार छान आहेत. एक चिनी पर्यटक मुलगी राजस्थानातील एका किल्ल्याला भेट देते. ती सभोवताली पाहते तर तिला काय दिसते? किल्ल्याची तटबंदी जी थेट चीनच्या भिंतीसारखी लांबच लांब आहे.

मागे मध्य प्रदेश सरकारच्या जाहिराती अशाच कल्पक असत.

२) किस्त्रीमच्या मागच्या दिवाळी अंकात गिरीश दाबके यांचा ‘पाश्चिमात्यांच्या तात्विक तलवारी’ हा लेख काही अपरिचित गोष्टी सांगतो.

फुलबाज्या (फुबा) - फेब्रुवारी २०१६

या आमच्या फुलबाज्या (प्रेरणा: सांगायलाच पाहिजे का?)
तुमच्या आयुष्यातील तणाव कमी करण्यासाठीचा आमचा प्रयत्न. रोज ३-४ विनोद इथे टाकले जातील. गोड मानून घ्या.

१) गणपुले बाई आपल्या कुत्रीला घेऊन फळांच्या दुकानात शिरल्या. त्यांची कुत्री तिथली फळं चाटू लागली. ते पाहून दुकानदार चिडला.

दुकानदार : अहो बाई, तुमच्या कुत्रीला आवरा. ती आमच्या दुकानातली फळं चाटतेय.

गणपुले बाई : ल्युसी...खबरदार ती फळं चाटलीस तर...किती धूळ आहे त्याच्यावर. ती पोटात गेली तर तब्येत बिघडेल ना तुझी.

२) एकदा एका सॉफ्टवेअर इंजिनीयरने पाहिले की एक बैल गाडी ओढतो आहे व शेतकरी त्या गाडीत शांतपणे झोपला आहे.

स्त्री - काल आणि आज

पूर्वी चार भिंतींमध्ये
जखडलेली स्त्री होती.
रांधा वाढा उष्टे काढा
आयुष्य ती जगत होती.

कावळा तिला शिवत होता
चार दिवसाची हक्काची
सुट्टी तिला मिळत होती.

स्त्री आज स्वतंत्र आहे
घरा बाहेर पडली आहे.
ऑफिसात जात आहे
धंधा हि पाहत आहे.

मुलांना शिकवत आहे
स्वैपाक हि करीत आहे.
थकलेल्या शरीराने
अहोरात्र खटत आहे.

कावळा आज शिवत नाही
हक्काची चार दिवसाची
सुट्टी हि मिळत नाही.

फुसके बार – ०४ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – ०४ फेब्रुवारी २०१६
.

१) ऐतिहासिक either-or व neither–nor

पूर्वी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामार्फत गणित – इंग्रजीच्या शालाबाह्य परीक्षा घेतल्या जात. कदाचित आजही चालू असतील.

ही बातमी समजली का? - १०२

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____

http://www.nytimes.com/2016/01/25/fashion/free-the-nipple-video.html
.

वीणा माहेरी जाते

वीणा - प्र ए प्र. ऐक ना. इकडे बघ ना जरा.

प्र चं लक्ष नाही. आतापर्यंत संसारात बायकोचा आवाज कानाआड करून तंद्री लावण्यात तो तरबेज झाला आहे.>
.
वीणा - प्र SSSSSS अरे मी तुझ्याशी बोलतेय.
.
प्र दचकुन> - बोल ना ऐकतोय मी. जरा असाच विचार करत होतो. पण विशेष काही नाही तू बोलत रहा.
.
वीणा - उम्म्म आम्हाला माहिते स्वारीच्या मनात काय विचार चाललाय तो. कल्पनेतही माझा विरह सहन होत नाही ना राजा? मग माहेरी जाणं स्थगितच करू का गडे?
.

फुसके बार – ०३ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – ०३ फेब्रुवारी २०१६
.

१) छगन भुजबळांच्या बाबतीत शरदरावांना पडलेले प्रश्न भलतेच गंमतशीर आहेत.
एकाच प्रकरणी तीन-तीनदा छापे कसे? त्यांना यामध्ये भुजबळ कुटुंबाला जाणूनबुजून टार्गेट केल्याचेही वाटत आहे. मागे याच पवारसाहेबांनी भुजबळांबरोबर आपल्यालाही अटक करा असे जाहिरपणे सांगितले होते. सरकारने पवारसाहेबांची ही इच्छा खरोखर पूर्ण करायला हवी होती.

भुजबळांनी त्यांच्या व्हॉट्सअपचा डीपी बदलल्याचीही बातमी झाली. पाठीत अनेक खंजीर खुपसले याचे एक रेखाचित्र होते. ते खंजीर कसले, धार नसलेले किचन नाईफ दिसतात.

सात्सिव्ही — जॉर्जियन (थंड!) चिकन

आपल्याकडच्या मुघलाई किंवा काश्मिरी वगैरे पदार्थांतला सुक्या मेव्याचा सढळ वापर आपल्या परिचयाचा असतो. तशीच अक्रोडात केलेली ही चिकनची पाककृती. हे भरपूर चरबीयुक्त कम्फर्ट फूड आहे. त्यामुळे तुम्ही कॅलरी कॉन्शस वगैरे असाल तर अजिबात करू नका. शिवाय, चिकन गरमच हवं वगैरे आग्रहही सोडून देण्याची तयारी ठेवा. पदार्थ करून तो चोवीस तास फ्रीझमध्ये ठेवायचा असल्यामुळे पाहुणे येणार असतील तेव्हा आधी करून ठेवता येतो हा एक फायदा. भरपूर वेळ घालवण्याची आणि अंगमेहनत करण्याची तयारी मात्र ठेवा. मित्रमैत्रिणी जमवून गप्पाटप्पा मारत पदार्थ केलात तर मेहनतीची विभागणी होईल आणि वेळही चांगला जाईल.