Skip to main content

सारे काही कठीण आहे

मी आपले पिकले पान
बाळा मला सांगशील का?
Smartphone नक्की आहे काय?
Internet ही भानगड काय?
App ही बला भारी
सगळयांना का वेड लावी?

चार मित्र जमले की
खर्च सगळा झाला की
हिशेब सारा ही करते;
मला मात्र लहानपणी
शिकलेले अंकगणित,
पाढे सारे काही आठवते.

तहान लागो न लागो
पाणी प्या सुचवते;
वजन आपले सांगा
प्रमाण सुद्धा ही सांगते;
मला मात्र न सांगताच
पाणी प्यावे वाटते.

थोड्यांची हुशारी,
बाकीच्यांचे लोटांगण.
हळुहळु कळते आहे...
Smartphone साठी
Internet हा श्वास आहे;
नवी पीढी गुलाम आहे.

आत्मतल्लिन बनताना
आत्मनिरिक्षण करा रे!
शरीर हे Smartphone
अक्कल ही App रे
मनाला करा Internet

फुसके बार – १० फेब्रुवारी २०१६ - सियाचेनचा चमत्कार, भुजबळ व त्यांचे गुरू आणि झैदींचे पुस्तक

फुसके बार – १० फेब्रुवारी २०१६ - सियाचेनचा चमत्कार, भुजबळ व त्यांचे गुरू आणि झैदींचे पुस्तक

१) अनेकदा गाण्याच्या शब्दांपेक्षा चालीकडेच अधिक लक्ष जाते. ‘रंगीला रे’ या गाण्याबाबतीतही माझे तसेच झाले. विशेषत: ‘दिया तो झुमे है, रोये है बाती’ या ओळीच्याबाबतीत. एरवी निस्वार्थपणे जळण्याबद्दलच बोलले जाते.
‘आग मै पिऊं रे जैसे हो पानी’ अशा अनेक ओळी या गाण्यात आहेत. शब्दांची कंजुषी नाही किंवा निर्मात्याने पैसे कमी दिल्यामुळे म्हणा किंवा इतर कारणामुळे तेच कडवे पुन्हापुन्हा म्हणण्याचाही प्रकार नाही. अशी गाणी क्वचित पहायला मिळतात.
नीरज यांचे शब्द.

व्हॅलेन्टाईन्स डे - एक पारंपरिक निबंधस्पर्धा

'व्हॅलेन्टाईन्स डे' या पवित्र दिवसाच्या निमित्ताला टेकून गेल्या वर्षी जी स्पर्धा आयोजित केली गेली होती त्याने झालेल्या करमणूकीच्या आठवणींनी मन हेलावून गेल्याने, ऐसीवर ही समृद्ध परंपरा चालू रहावी म्हणून याही वर्षी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचं स्वरूप मागच्या वर्षीप्रमाणेच व्यापक आहे. शीर्षकात निबंधस्पर्धा असा उल्लेख आहे, पण स्पर्धेसाठी गद्य, पद्य, फोटो, चित्रं, व्हिडीओ अशा कोणत्याही प्रकारची एंट्री चालेल. या वर्षीचा विषय गेल्या ‌वर्षापेक्षा थोडा निराळा आहे, नीट वाचणे : व्हॅलेन्टाईन्स डे - काल आणि आज.

फुसके बार – ०९ फेब्रुवारी २०१६ - कोठे अंधार कोठे प्रकाश

फुसके बार – ०९ फेब्रुवारी २०१६ - कोठे अंधार कोठे प्रकाश
.

१) माझे फेबुमित्र व उत्तम छायाचित्रकार चित्तरंजन भट यांना हेल्मेटसक्ती अशी दिसली.
“हेल्मेटसक्ती म्हणजे 'जगायचीही सक्ती आहे', नाही काय?”
फार सुंदर. हेल्मेट वापरण्यासाठीचे बोधवाक्य यावर आधारायला हवे.

खेकडा

कुजबुजणारे कोणी असतात
कोणी शहाणे तर कोणी वेडे असतात
दुनियेच्या या उकिरड्यावर
वळवळणारे कोणी किडे असतात

अरे जा शब्दांनीच मारतो तुला
नंगे फकीरसुध्दा *जडे असतात
काळाच्या डोहात बुडून मार तू एक खंबा
कोणी हौशी तर कोणी बेवडे असतात

विश्वाचा परित्याग केलास तू
पण फुटलेला एक बुडबुडा तू
ऐकतो आहेस ना महाराजा
या आदिम रचनेचा खेकडा तू

नैसर्गिक शेती - भाग ३

नैसर्गिक शेती हा शब्दप्रयोग अलिकडे बराच ऐकण्यात-वाचण्यात येतो. ही नेमकी काय भानगड आहे, आणि त्यातल्या तज्ञ म्हणवणाऱ्या लोकांनीही त्यात कसे वैचारिक गोंधळ घालून ठेवले आहेत, त्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा या टिपणांमधून प्रयत्न करते आहे. या मालिकेतील माहिती ही बव्हंशी माझे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी गेल्या साठेक वर्षांत केलेल्या कामावर आधारित आहे. कार्यबाहुल्यामुळे जेव्हा वेळ होईल तेव्हा छोट्या छोट्या टिपणांमधून विषय पुढे पुढे नेत राहीन.
.....

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

जर्जरी वार्धक्य माझे

'मल्मली', वरुन सुचलेले विडंबन

जर्जरी वार्धक्य माझे तू पहाटे गोंजरावे
जीर्ण काया, क्षीण माया, तू जरासे थोपटावे
लागुनी थंडी कहारी, खोकल्याची उबळ यावी
हे प्रिये तू मज जरासे मधुविलेपन चाटवावे
श्वास माझा लागलेला म्रुत्युची चाहूल भिववे
आर्जवी स्पर्शात तूही मज जरासे सावरावे
दे मला आधार मांडी, जीव माझा कोंडताहे
मी तुला जागे करावे परि स्वत: निसटून जावे.

फुसके बार – ०८ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – ०८ फेब्रुवारी २०१६
.

१) हेल्मेटसक्ती १

प्रसिद्ध पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट. त्यांचे मित्र प्रदीप निफाडकर यांनी नुकतीच त्यांची मुलगी अपघातात गमावली. याचा संदर्भ या पोस्टमध्ये आहे. त्यांच्या आवाहनाचा मेसेज काही महिन्यांपासून व्हॉट्सअपवर फिरत आहे. आपल्या पाहण्यातही आला असेल. बर्दापूरकरांची पोस्ट खाली. त्यात त्यांनी त्यांचा स्वत:चा अनुभवही सांगितला आहे.

“पुणेकरांना कळकळीचं आवाहन..दोन्ही कर जोडून विनंती !

हेल्मेट वापरणं का महत्वाचं आहे हे नीट समजून घ्या, विनाकारण राजकारण्यांच्या नादी लागू नका हे कळकळीचं आवाहन आहे, विनंती आहे .

निसर्गरम्य कोकणात बेरोजगारी का?

Taxonomy upgrade extras

निसर्गरम्य कोकणात बेरोजगारी का?

निसर्गाने कोकणात आपले अनेक रंग ऊधळले आहेत. एवढ्या हिरव्यागार प्रदेशात पाण्याची कमतरता नक्कीच नसणार. शेतीची नक्की काय अवस्था आहे माहित नाही. बहुदा खडकाळ जमीनीवर शेती करता येत नसावी.

कोकणस्थांची रोजगार मिळवण्याची साधने कोणती?
किनारपट्टी लाभल्याने मासेमारी हा मुख्य व्यवसाय असावा. मात्र बोटींवर काही परराज्यातील तरुण आढळले.
आंबे फणस सुपारी यांचाही पारंपरिक व्यवसाय होत असावा.
कोकणातील बरेच तरुण नोकरीधंद्यानिम्मित्त पुण्या-मुंबईसारख्या शहरात स्थायिक झाले आहेत. कोकण हा म्हाताऱ्यांचा प्रदेश झाला आहे काय?