Skip to main content

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४

Taxonomy upgrade extras

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४ च्या अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला या प्रश्नांवर काय वाटते आणि तुमचे अंदाज काय असतील हे जाणून घ्यायला आवडेल. सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्‍यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट :)

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?

सध्या काय वाचताय? - भाग १३

डीसी कॉमिक्सने मार्च 1982 – मे 1989 दरम्यान प्रकाशित केलेलं ​अॅलन मूर व डेव्हिड लॉईड द्वारा निर्मित 'व्ही फॉंर व्हेन्डेटा'​ हे ग्राफिक नॉव्हेल नुकतंच वाचून पूर्ण केलं.
ऐंशीच्या दशकात एकत्र बसून, व्यक्तिशः राज्यशास्र वा समाजशास्त्राची कुठलीही भक्कम स्कॉलररी पार्श्वभूमी नसताना नव्वदच्या दशकाचं भयावहरित्या वास्तवनिर्देशी, अंगावर शहारे आणणारं काल्पनिक जग लेखक-चित्रकार द्वयीने उभं केलं आहे.

क्षितीज चांदणी......

फिरुनी उगवली पुन्हा लाजरी
चांदणी ती क्षितीजावरी …
डोळे तिचे भिरभिर अवघे
शोधी साजणा दूर नभी ….

सैरभैर निळ्या नयनी तिच्या
तो येण्याचे भास खेळती ….
क्षणात हसरी क्षणात बावरी
तिच्या चेहर्याचे रंग बदलती ….

हळूच लपलेला ढगा आडूनी
चांद हासला खट्याळ परी ….
लपंडाव प्रीतीचा अबोल
आभास गोड अंतरंगी ….

चंद्राच्या चांदण्यात मग
अवघी रात्र न्हाऊन निघाली ….
थरथरनाऱ्या ओठांपरी
चांदणीही शहारून गेली ….

प्रेमात आकंठ बुडुनी रात्र मग
अवघा रंग निळा झाला ….
चंदेरी झालर स्वप्नांची लेऊन
गंध श्वासात मिसळूनी गेला ….

सध्या काय वाचताय? - भाग १२

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========

आठवणी : गुळमट तिखट कडू

आताच लोकसत्ता वाचत होतो. खूप मज्जा येते ते तसले भारी शब्द वाचायला.
व्यामिश्र, जनरेटा, उद्बोधक....
एकदम जुन्या गोष्टी आठवायला लागल्या.
शाळेत असताना असे शब्द वाचले , की मी कुठेही ते शब्द ठोकून देत असे.

उदा:-
"मी आज व्यामिश्र खेळलो."
"मला आज खूपच उद्बोधक वाटतय."
किंवा "भाजीची चव उद्बोधक आहे."
आज "शाळेत जनरेटा पोचला."
.
.
"शी "ला विष्ठा म्हणतात समजेपर्यंत दुसरी तिसरीत कानावर पडलेला " शिष्टाचार " हा शब्द "विष्ठाचार ", "व्यभिचार " असा कसाही वापरायचो.
पेप्रात "विष्ठावंत नाराज " असं छापून यायचं असं मला वाटे.

स्वातंत्र्याचा अर्थ

शनिवारची थोडी रिकामी संध्याकाळ. वेळ घालवण्यासाठी टीव्हीशिवाय दुसरं काही साधन नाही (नेट बंद आणि पुस्तकं वाचायचा कंटाळा येतो हल्ली). अश्या वेळी असले भंगार कार्यक्रम लागतात की रिमोट घेऊन या चॅनेल वरून त्या चॅनेलवर उड्या मारणं हाच कार्यक्रम चालु रहातो. अश्या उड्या मारताना DD-Bharati ला थांबले. कोकणातील हिरवीजर्द झाडी, त्यातून वाट काढत , वाचत परिक्षेला निघालेली तीन मुले . फारशी माहीत नसली तरी नीट लक्ष दिल्यावर कळणारी कोंकणी भाषा. जरा रोचक ( हा शब्द मी ’ऐसी ’ मुळे वापरायला लागले) वाटलं म्हणून थांबले. आणि पुढचे दोन तास एक सुंदर अनुभव देउन गेले.

छत्रीखालचं बालपण

मी "ऐसी" चा सभासद झाल्यापासून उत्तम लेख आणि उत्तम कविता वाचायला मिळू लागल्या आहेत. पण फक्त आस्वाद घेणे यावर समाधान मानण्याची प्रकृती नसल्याने मी कधी काळी जुळवलेली कविता इथे पोस्त करण्याचे धाडस करत आहे. सांभाळून घ्यावे.

छत्रीखालचं बालपण
===============
मुसळधार पावसात
खिडकीसमोर बसून
आठवणींचे कण गोळा करताना
हमखास सापडणारा एक कण….
म्हणजे आपलं ‘छत्रीखालचं’ बालपण….

पावसाळ्यात रोज सकाळी
शाळेत जायची इच्छा नसतानाही
आजोबांची जड काळी छत्री घेऊन
चिखलातून वाट काढ़त जात
छोट्या रंगीबेरंगी छत्र्यांमध्ये मिसळणारं….
आपलं ‘बुजलेलं’ बालपण….

खूप पाऊस पडल्याने
शाळेला सुट्टी मिळाली,

आज बाप्पा जाणार

आज बाप्पा जाणार. १० दिवस कसे निघुन गेले कळलेही नाही. सकाळी लवकर आटपुन जवळचा मंडळांचे बाप्पा पाहण्यासाठी मी निघालो. ३-४ वर्षापासुन मी नेमका शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाचा दर्शनाला जात असे. शेवटचा दिवशी गर्दी नसे दर्शनाला त्यामुळे बाप्पाला मनसोक्त डोळे भरुन पाहता येई. त्याच्या डोळ्यातळे भाव, मुर्तीकारा ची मेहनत ध्यानात येई. प्रत्येक मंडळातल्या बाप्पाला निरोप देताना वाटे की आपले मित्रच आपल्याला सोडुन जात आहेत. काही बसलेले, काही उभे असलेले, काही उंच तर काही जाडू. दुपार होईपर्यंत वेगवेगळ्या मंडळांचे बाप्पा पाहील्यावर मी घरी निघलो. प्रत्येक मंडळात बाप्पाचा निरोपाची तयारी सुरु केली होती.

ही बातमी समजली का? - ३९

व्यवस्थापकः अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.

------