Skip to main content

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: पुरोगामीस्य किम् लक्षणं?

आश्रमात स्वामीजी ध्यानमग्न बसलेले होते, अचानक त्यांनी डोळे उघडले, क्षणाचा ही बिलंब न करता मी प्रश्न विचारला, स्वामीजी मनात एक शंका आहे. स्वामी त्रिकाळदर्शी: काय शंका आहे बच्चा? मी: स्वामीजी पुरोगामी कोण असतो, त्याची लक्षणे काय? स्वामी त्रिकाळदर्शींच्या चेहऱ्या एक हास्याची लहर पसरली, ते म्हणाले बच्चा, समोर वडाचे झाड बघ, झाडाच्या डाव्या अंगाला एक वाळकी फांदी दिसते आहे न. मी म्हणालो होय, स्वामीजी. स्वामी त्रिकाळदर्शी: त्या फांदीला पुरोगामी फांदी असे म्हणतात. मी त्या वाळक्या फांदी कडे बघितले,मला काहीच कळले नाही.

बागकामप्रेमी ऐसीकर : ३

Taxonomy upgrade extras

आधीच्या धाग्यात ९०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा. घरगुती बागकामासंबंधित प्रश्न, शंका, विचार, माहिती, फोटो, योजना, कार्यक्रम, अपडेट्स इत्यादी गोष्टी या धाग्यात लिहिता येतील.
धागा क्र १, धागा क्र २

---

ही बातमी समजली का? - ३८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.

=======

वरुण राजाला साकडं

श्रावण सगळा सरला
टिपूस नाही पडला.
बळीराजाच्या अश्रूंनी
धरती जळून गेली.
साकडं घातल इंद्राला
वरुणराजा धावत आला
वादळ फोडून पाऊस बरसला.
गुरं-ढोरं पुरात गेली वाहून
पीक सगलं खलास झालं
बळीराजाच नशीब फुटलं.
वरुण राजा,
तू तर देव आकाशाचा
का वागतो लहरी सारखा?
गत जन्मांच्या कर्मांचा

साईबाबा होते तरी कोण?

Taxonomy upgrade extras

बाबा देव नव्हते, संत नव्हतेच, पण गुरूही नव्हते, असा निकाल
स्वयंघोषित धर्मसंसदेने दिला आहे. (निदान साईबाबा म्हणून कोणीतरी या
भूमीत होऊन गेले, हे त्यांनी नाकारले नाही, ही मोठीच सहिष्णुता
म्हणायची.) खरं सांगायचं तर बाबांनीही आपल्या उभ्या हयातीत मी देव आहे,
संत आहे किंवा गुरू आहे, असं कधीच सांगितलं नाही. जो तसा नसतो त्यालाच
उच्चरवानं तसा दावा करावा लागतो आणि असा दावा करणाऱ्या अनेक स्वयंघोषित
संत, अवतारी आणि गुरूंचा बाजार तेजीत असताना धर्मसंसदेला त्यांच्याबाबत
चकार शब्दही उच्चारावासा वाटत नाही. ही धर्माची हानी आहे, असं वाटत नाही.

गणपती पूजेच्या मागची अवधारणा

आज गणेश चतुर्थी, आज बाप्पा आपल्या घरी येतात. १० दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतो. आपण बाप्पाची पूजा का करतो या मागची अवधारणा काय? हा प्रश्न मनात येतोच.

गणपती किंवा गणाध्यक्ष याचा अर्थ गणांचा अधिपती सोप्या शब्दात म्हणावे तर कुळ, जाती, बिरादरी, राज्याचा किंवा देशाचा प्रमुख म्हणजे गणपती ज्याला जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे. विभिन्न गणांचे प्रमुख मिळून इंद्राची निवड करायचे. असो.

सेंट पीटर्सबर्ग पॅरॅडॉक्स

उदय यांच्या लेखात 'सेंट पीटर्सबर्ग पॅरॅडॉक्स' चा उल्लेख आलेला आहे, पण त्याचा तपशील दिलेला नाही. तेव्हा वाचकांचा कौल मागवण्यासाठी ही उत्तम संधी आहे. ज्यांना ह्या पॅरॅडॉक्सची उकल ठाऊक आहे त्यांनी ती 'फोडू' नये, आणि ज्यांना त्याची माहिती नाही त्यांनी गूगलगिरी करण्याचा मोह टाळावा ही विनंती.

तर समजा तुम्ही सेंट पीटसबर्गमध्ये झार निकोलसच्या दालनात शिरता.

नेपच्युन

नेपच्यून अर्थात वरुण हा ग्रह ज्योतिषशास्त्रात सागरसम्राट म्हणून ओळखला जातो. मीन रास या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. ज्याप्रमाणे जललहरींमध्ये प्रतिबिंब वेडेवाकडे व विचित्र दिसते, तद्वत हा ग्रह कुंडलीत ज्या घरामध्ये पडतो त्या तेथे त्या कारकत्वात, गोंधळ , संभ्रम आदी प्रकार जाणवू शकतात. हिपनोटिस्ट, जादूगार , सायकिक व हीलर्स हे व्यावसायिक या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात. पण त्याच बरोबर दारू अथवा ड्रग्ज च्या आहारी गेलेले लोकही येतात .

ब्रु.म.मं २०१५: अधिवेशन गीत स्पर्धा

BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सादर करीत आहे

अधिवेशन गीत स्पर्धा

हि स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे.

गीताचा विषय “मैत्र पिढ्यांचे” या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडीत असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी.
विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स