Skip to main content

भुताळी जहाज - ७ - विचक्रॅफ्ट

फ्लोरीडाचा पूर्व किनारा, बर्म्युडा बेटांचा दक्षिण किनारा आणि प्युर्टो रिकोचा उत्तर किनारा यांतील प्रदेश हा पृथ्वीवरील अतिशय गूढ असा प्रदेश आहे. हा प्रदेश त्रिकोणी आकाराचा आहे, लंबवर्तुळाकार आहे अथवा ट्रॅपिझियमच्या आकाराचा असेल, परंतु त्यातील गूढपणा त्यामुळे रतिभरही कमी होत नाही. पार क्रिस्तोफर कोलंबसच्या काळापासून हा प्रदेश वेगळाच आहे असं मानवाच्या ध्यानात आलेलं आहे. या प्रदेशात अनेक जहाजं, विमानं आणि माणसं कोणताही मागमूस न ठेवता अनाकलनीय रितीने गायब झालेली आहेत.

बर्म्युडा ट्रँगल!

भुताळी जहाज - ६ - बेकीमो

पृथ्वीवरील महासागरांचा इतिहास लिहायचा झाला तर सर्वात गूढ आणि चमत्कारीक महासागर म्हणून आर्क्टीक समुद्र सर्वात वरचा क्रमांक पटकावेल. या महासागरात अनेक गोष्टी का आणि कशामुळे होतात याचं कोणतंही स्पष्टीकरण अनेकदा मिळत नाही. कोणत्याही तर्काच्या आणि शास्त्रीय स्पष्टीकरणाच्या कसोटीवर न उतरणार्‍या अनेक चित्रविचित्र घटना इथे घडल्याच्या दोन शतकांपासूनच्या नोंदी सापडतात! अनेक जहाजं आणि माणसं या सागरात कोणताही मागमूस न ठेवता गडप झालेली आहेत. दक्षिण धृवावर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा रोआल्ड अ‍ॅमंडसेन, सुप्रसिध्द संशोधक सर जॉन फ्रँकलीन ही चटकन आठवणारी नावं!

लाचलुचपत प्रतिबंधक खाते आता फेसबुकवर..

आजकाल वर्तमानपत्र वाचताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्याच्या बर्‍याचशा बातम्या दिसतात. या खात्याचे पोलिस महासंचालक ( Director General) श्री. प्रवीण दिक्षित यांनी नेहमीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून लोकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची वाट न पाहता आपल्याच अधिकार्‍यांना सरकारी कार्यालयात पेरून लाचखोर मंडळींची माहिती काढावयास लावली आणि अटकसत्र आरंभले. तरीदेखील लाच मागण्याच्या घटना कमी होत नाहीत किंवा कार्यालयाबाहेर केलेल्या देवाणघेवाणीचीही अँटी करप्शन ब्युरोला माहिती मिळणे थोडे अवघड होते.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

बाबूंचे अच्छे दिन आले

बाबूंचे अच्छे दिन आले

(बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट. असे हे बाबूंचे अच्छे दिन सुरु झाले आहेत)

दोन तास जायला
दोन तास यायला
वर दहा तास काम
बाबूंचे असे
अच्छे दिन आले.


न घेताच सुट्ट्या
कश्या काय संपल्या
मिनिटाच्या उशिराने
पाण्यात त्या बुडाल्या.
बाबूंच्या सुट्ट्यांचे असे
अच्छे दिन आले.

भुताळी जहाज - ५ - कॅरोल ए. डिअरींग

अमेरीकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील समुद्रकिनारा हा काहीसा गूढ आणि धोकादायक आहे. या भागात थंड तापमानाचा दक्षिणेकडे वाहणारा लॅब्रेडॉर सागरप्रवाह आणि उत्तरेकडे वाहणारा गल्फ स्ट्रीमचा उष्ण प्रवाह एकमेकांत मिसळतात. त्यातच समुद्रकिनार्‍यावरुन येणार्‍या जोरदार वार्‍यामुळे परस्परविरोधी कमी-अधिक दाबाचा हवामानाचे पट्टे तयार होण्यास ही परिस्थिती एकदम अनुकूल असते. याचा परिणाम म्हणून वाळूपासून तयार झालेले अनेक पट्टे (सँडबार्स) इथे पाण्याच्या पृष्ठभागाखाली अगदी थोड्या अंतरावर दडलेले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे नौकानयनाच्या दृष्टीने हा भाग अत्यंत जिकीरीचा आहे.

रेल्वे प्रवासातील किस्सा

किस्सा मोबाईल चोराला धोपटल्याचा...!

थाड थाड 7-8 थपडा बसता गालफडावर बोटांचे वळ चोळत, ‘नको नको, प्लीज मला माफ करा! मी नाही चोरी केली!’ म्हणणारा खाली वाकला तशी पाठीत एका मागून एक पुन्हा 10-12 धपाटे लगावले, शर्टाची क़लर पकडून ‘साल्या, बऱ्या बोलाने मोबाईल काढून दे नाही तर आणखी मारतो!’ मी ओरडलो.

रक्षण

डोळे मिटून मी आत डोकावतो
तेव्हा मला एक वाघुळ दिसतं.
तोंड झाकलेल्या विहीरीमध्ये
ते गरागरा फिरत असतं.
बाहेरच्या प्रकाशाला अंधार
नि आतल्या अंधाराला प्रकाश समजतं,
गोंगाट असल्यावर काही नाही
पण शांतता झिरपलीच तर भेलकांडतं....
सकाळी जेव्हा मी उठतो
मऊ बिछान्यातून दुखर्‍या अंगानं,
बाहेर सृष्टी सजत असते
शब्दरहित पण नवनव्या ढंगानं.
गवतावर नि:शब्दपणे दवबिंदु ठिबकतात
आणि मूकपणे कळ्या उमलतात.
तिकडे मी चक्क दुर्लक्ष करतो,
गाड्यांचा पोंगाट ऐकत राहतो....
बसची वाट पाहताना, एका कोपर्‍यात
मला एक मांजर दिसतं.
कोवळ्या उन्हात एक पंजा वर करून
स्वतःचंच पोट चाटत असतं.
बस यायच्या थोडंसं आधी,

अलीकडे काय पाहिलंत? - १४

(जुन्या धाग्यात १००च्या जवळपास प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)
==========

एका मित्राच्या सुचवणीला भूलून "टूरिंग टॉकीज" पाहिला.

या तंबूतल्या सिनेमांची value chain काय असते कोण जाणे, पण प्रत्यक्ष प्रोड्युसर आणि डायरेक्टर तंबूवाल्यांकडे सिनेमाची रिळं घेऊन दस्तुरखुद्द फिरत असावेत असं वाटत नाही. डिस्ट्रीब्यूटर कशासाठी असतो मग?

हुच्चभ्रू डायरेक्टरचा सामाजिक हुच्च स्तर दाखवण्यासाठी की काय तो पडद्यावर आला की इंग्रजी गाणं वाजतं.

पर्सनल फायनान्स - भाग ६ - माहिती मिळवणे

गेल्या आठवड्यात लेख लिहू शकलो नाही, म्हणून क्षमस्व.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

बृहन्महाराष्ट्र आणि महाराष्ट मंडळे यांबद्दल व्यापक माहिती हवी

महाराष्ट्राबाहेरच्या मराठी लोकांचा उल्लेख सहसा बृहनमहाराष्ट्र असा केला जातो. यात जसा भारतातील इतर राज्यातील मराठी लोकांचा समावेश होतो तसा भारता बाहेर स्थायिक मराठी एन आर आय आणि त्यांच्या नंतरच्या पिढ्यांचा समावेश होतो. बृहनमहाराष्ट्रातील बरीच मंडळी लिहिती असतात भारतात असताना मराठी माणूस अ‍ॅक्टीव्ह नसतो तेवढी मराठी माणस परदेशात गेली की सांस्कृतीक दृष्ट्या अ‍ॅक्टीव्ह होतात, बृहनमहाराष्ट्रातील बरीच मंडळी लिहिती असलीतरी महाराष्ट्रमंडळातून होणार्‍या बहुतांश अ‍ॅक्टीव्हीटीजचे पुरेसे वार्तांकन आणि नोंदी होत नाहीत.