Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग २२

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा

====

दीपगिरी अमरावती भाग1

दख्खनच्या पठारावर विस्तारलेल्या सह्याद्री किंवा सातमाला या सारख्या पर्वतराजी आणि सौराष्ट्रातील गिरनार पर्वत यांच्या कडेकपारींमध्ये, इ.स. पूर्वकालात खोदल्या गेलेल्या बौद्ध गुंफाना भेटी देण्याचा एक उपक्रम मी वर्ष दोन वर्षांपूर्वी राबवला होता. दख्खनच्या पठारावर त्या काळात राज्य करीत असलेल्या सातवाहन साम्राज्याने या बौद्ध गुंफांमध्ये मागे ठेवलेल्या खाणाखुणा शोधण्याचा एक यत्न करणे हा त्या उपक्रमामागे असलेला माझा हेतू होता व तो बर्‍यापैकी सफल करण्यात मी यशस्वी झालो होतो असे मी आता समाधानाने म्हणू शकतो.

मुद्देवंचितांसाठी खुषखबर! काही हुकमी उपाय

खुषखबर! सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्‍या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्‍या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा "पळून गेले" वगैरे ऐकावे लागते.

फायरफ्लाय - एक सामाजिक सायफाय

अलीकडे चाललेल्या स्त्रीवाद, भांडवलवाद वगैरे चर्चांना अनुसरून त्याविषयांवर रंजक भाष्य करणार्‍या "पहाव्यातच" अशा एका मालिकेबद्दल माहिती देण्याचा हा प्रपंच.

(लिहताना वाचकाला कोणतेही विशेष स्पॉईलर्स दिले जाणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे, पण तरी सुद्धा एखाद्याचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. तस्मात, आपापल्या जबाबदारीवर वाचणे.)

समीक्षेचा विषय निवडा

मिळून तिघीजणी

अनघाने कंटाळून स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात पाहिलं. "साडेअकरा! अजून निदान पंधरा मिनीटं तरी थांबायला लागेल." हे सगळं स्वतःशी पुटपुटण्याचीही सोय नव्हती. तिचा ऑफिसमेट लगेच गप्पा मारायला लागला असता. तिने सवयीनुसार चष्मा काढला. खिशातून ताजा, धुतलेला रूमाल काढला आणि काचा साफ केल्या. तिला कालचाच संवाद आठवला.

"हिला चष्मा पुसायचं फेटीश आहे. चष्मा खराब झाला म्हणून तोंडाने तक्रार केली तरी हिला मनातून आनंदच होत असतो. आता चष्मा पुसायची "अधिकृत" संधी मिळाली म्हणून."
"म्हणूनच बहुतेक ही स्प्रिंकलर्स सुरू असले तरी तिथूनच चालत येते."
"नाही हं. केवढं उकडतंय. चार थेंब अंगावर पडले की बरं वाटतं."

अ वूमन इन बर्लिन

जुनाच चित्रपट आहे, पण मी काल पाहिला. पूर्ण समीक्षा ब्लॉगवर लावलीये, पण इथे चिकटवतेय.

कामधेनु

जुलै महिन्यात हॉस्पिटलच्या बेड वर मनात आलेले विचार....

हक्काची गाय आणली
पुढ्यात चारा टाकला
तिने भरपूर दूध दिले.
सखी, भार्या, माता
कर्तव्य चोख बजावली.

चाऱ्याच्या बदल्यात कर्तव्य
त्यात कसले आले प्रेम
माझा शुद्र पुरुषी विचार.

त्या दिनी हॉस्पिटल मध्ये
दोन्ही हातानी मला
बेड वर बसविले.
डोकावुनी तिच्या डोळ्यांत पाहिलं
तिथे दिसले केवळ
निखळ निरागस प्रेम.

स्वत:ची लाज वाटली
का ओळखू शकलो नाही
प्रेम तिचे?

थरथरत्या हातानी
तिचा हात घट्ट पकडला
कापऱ्या आवाजात म्हणालो
भीती वाटते मला.

खंबीर आवाजात ती म्हणाली

ड्रूपल (द्रुपल) आणि (मिडिया)विकि

चर्चात्मक मराठी संकेतस्थळांमध्ये ड्रूपल (द्रुपल) मजकुर(आशय) व्यवस्थापन प्रणाली निर्विवादपणे अग्रेसर राहिली. या धाग्याच्या निमीत्ताने मराठी तंत्रज्ञ, लेखक आणि वाचकात ड्रूपल (द्रुपल) मजकुर व्यवस्थापन प्रणाली च्या लोकप्रीयतेच्या मागे असलेल्या गमकांची नोंद घेणे. ड्रूपल (द्रुपल) आणि विकिच्या (मिडियाविकि एक सॉफ्टवेअर म्हणून) तौलनीक सामर्थे आणि दुर्बलतांची नोंद घेणे आणि मराठी संस्थळांवरील सहभागावर या आशयव्यवस्थापन प्रणालींच्या ठशाची दखल घेणे असा उद्देश आहे.

कापूसकोंड्याची खरी गोष्ट

फार पूर्वी विदर्भ देशात आटपाट नगर होते, नगरच्या वेशीवर धनाजी नावाचा शेतकरी आपल्या बायको आणि एकुलत्या एक छकुल्या सोबत सुखाने नांदत होता. आपल्या शेतात तो कधी ज्वारी, तर कधी तूर, भुईमूग इत्यादी पिक घेत होता. वरुण राजाच्या लहरीपणाचा फटका विदर्भाला नेहमीच बसतो. धनाजी सारख्या शेतकरीच्या भाग्यात लक्ष्मी नव्हती पण दुर्भिक्ष पडले तरी उपासमार व्हायची नाही. पोटाचा खड्डा अर्धा तरी भरल्या जात असे.