Skip to main content

गाथा सागरतळाच्या सफरीची

समुद्राच्या अंतरंगात, सागरतळाशी असलेलं समुद्री जीवांचं व प्रवाळांचं विश्व आणि त्यातलं नाट्य हे किती मती गुंग करणारं आहे! त्या नितांतसुंदर आणि अद्भुत विश्वाची, नुसती पुस्तकी ओळख न होता, त्या विश्वाची अद्भुत सफरही घडली. तिची ही गाथा...

ललित लेखनाचा प्रकार

31 डिसेंबर

Happy New Year"काय मग ह्या वेळी ३१st चा काय प्लॅन ?" मला वाटत हा डिसेंबर मधला सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न असावा. आणि त्याची शेकडो उत्तरे असली तरी "काही नाही जेवून दहा वाजतात गुडूप होऊ " हे उत्तर ०. ०००१ % सुद्धा नसेल हे नक्की. खर ना ?
सध्या सगळ्यांचे ३१ डिसेंबर च्या पार्टीचे प्लॅन्स चालू असतील. सरत्या वर्षाची उजळणी करत नवीन वर्षाच्या स्वागताला सगळी दुनिया सज्ज असते. श्रीमंतांच्या क्रूझ पार्ट्या किंवा सामान्यांच्या सोसायटीच्या गच्चीवर वर केलेल्या पार्ट्या सगळ्यांचा भाव तोच!

ललित लेखनाचा प्रकार

दुआ

या तर, सरसावू कर आपणही,
आम्हां, ज्यांना अनुष्ठाने स्मरतही नाही..

आम्हीं जे प्रेमाच्या ध्यासाशिवाय
कोणती मुर्ती कोणता ईश्वर ध्यानी ठेवत नाही..

या तर, ढळू देऊया हा जीवंततेचा झरा,
रोजरोजच्या धबडग्यात उद्याची शीतल चांदणं माळूया...

ते जे अहर्निशी पिळवणूकीत हताश पडलेत,
त्यांच्या पापण्या फडफडू देत अंधार आणि उजेडाच्याही पलीकडे..

ज्यांच्या दृष्टीसमोरून सकाळची किरणेही सरत नाही,
त्यांच्या रात्रींत कुठलासा दिवा उजळू दे..

ज्यांच्या पावलांमध्ये कुणावरचा विश्वास दिसून येत नाही,
त्यांच्या नजरेत कुणीतरी दृढता भरू दे..

एकारा

विसरायला काय होते तुला.. जीवनाचा ओघ.
वाळू निसटावी आणि फैलावी तशी सैल पडलेली तुझी धावपळ.

रूजलेली मुळें किती खोल आहे, या जीवनाची, तुला कुठे ठावूक आहे..

ऊन पडावे तसे तुला आठवणींचा पान्हा फुटतो आणि रात्र उजाडावी तशी जरा जीर्ण आकारशून्य निराशा वेढून घेते.

लाल रंगावर निळाई तरळते तसं तुझं शरीर. बालकवींचा औदुंबर जसा.
स्नायूंच्या चेतनाचे दरवाजे आतून बंद केलेले, की आतच ढकललेले.

बागेतल्या मकरंदावर दरोडा घालणारे भुंगे तुझ्या आयुष्यात आलेत,
बाग बनवून गेले आयुष्याला तुझ्या..

दुसरा नाही, म्हणून तू राहतो, निजतो, गुंडाळून घेतो एकारातच..
वाह!

मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (12)

आपल्या विश्वाच्या शेवटाची सुरुवात कशी असेल?

मानवी अस्तित्वाच्या अंताबद्दल भाकीत करताना आपल्या विश्वाचा मृत्यूसुद्धा त्यास कारणीभूत ठरू शकेल असे म्हणावे लागते. हे विश्व कशाप्रकारे कोसळून जाईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुळात यांची चाचणी कशी घ्यावी, त्यांची शहानिशा कशी करावी याबद्दलच अनेक शंकाकुशंका आहेत. उत्सुकता शमवण्यापोटीच हा मुद्दा उपस्थित केला जातो असेही वाटण्याची शक्यता आहे. हे विश्व पूर्णपणे गोठून जाईल (deep freeze), की कृष्णविवरात नाहीसे होईल की अस्टेरॉइड्सच्या माऱ्यामुळे तुकडे तुकडे होऊन ब्रह्मांडात सामावून जाईल की….आणखी काही तरी ?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

All we imagine: स्वचा शोध

'लोक काय म्हणतील', 'हे असं वागायचं असतं म्हणून मी असं केलं', ह्या प्रेरणेतून दाखवलेल्या चांगुलपणामुळे आपण खरंच चांगली व्यक्ती ठरतो का? All We Imagine As Lightमध्ये घेतलेला स्वचा शोध.

समीक्षेचा विषय निवडा

लेखनपरिषद

एकदा लेखन संघ सर्वसमावेशक लेखन परिषद आयोजित करण्याचं ठरवतं. लेखन संघाचे खूप वर्षांपासून सगळ्या प्रकारचे लेखन एकाच छताखाली येतील असे वातावरण तयार होण्यासाठी प्रयत्न चालू होते. पण ठराविक लेखनासाठी संघाला ओळखले जायचे. कधीकाळी संघ स्थापनेपासूनच शिक्का बसला होता. अभिजनांचं लेखन म्हणजे संघ. सुखवस्तू वर्गातील लोकांचं लेखन म्हणजे संघ हा शिक्का पुसायचाच असा नवीन संघ वरिष्ठांनी चंग बांधला होता.