Skip to main content

भ्रामक मायाजाल

Taxonomy upgrade extras

नुकत्याच दोन बातम्या आल्या

साध्वी प्रज्ञा यांच्या वरचे आरोप NIA मागे घेणार http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-12-28/india/45651589_1_...

2009 मडगाव स्फोट खटल्यातून सनातन साधकांची निर्दोष मुक्तता http://www.deccanherald.com/content/377725/court-acquits-sanatan-sanstha...

कोरेगाव भीमा लढाई

आजच्या तारखेच्या दिनविशेषात इंग्रजांचे सैन्य आणि बाजीरावाचे सैन्य ह्यांच्यामधील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी १८१८ ह्या दिवशी झालेल्या लढाईचा उल्लेख आहे. ह्या लढाईमध्ये सगळीकडून घेरल्या गेलेल्या इंग्रज सैन्याच्या तुकडीने - जिच्यामधील बहुसंख्य सैनिक हिंदुस्तानीच होते - बाजीरावाच्या मोठया सैन्याला यशस्वी तोंड दिले. इंग्रजांना ह्या विजयाचे विशेष कौतुक होते आणि तत्कालीन पुस्तकांमधून तिची अनेक वर्णने वाचावयास मिळतात. ह्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्याच्या कोरगाव पर्क भागास ते नाव मिळाले आहे.

१८२३ साली लढाईच्या स्थानी इंग्रजांनी एक स्मृतिस्तंभ उभारला. अजूनहि पुण्याहून अहमदनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर तो उजव्या हाताकडे पाहता येतो. त्याची मी पूर्वी काढलेली दोन छायाचित्रे येथे माहितीसाठी दर्शवीत आहे.

विमानांची मॉडेल्स बनवण्याचा छंद

नुकत्याच लिहिलेल्या माझ्या एका ब्लॉगपोस्ट मध्ये मी ड्रोन स्वयंचलित विमानांचा वापर करून घरात आवश्यक असलेल्या वाणीसामानासरख्या वस्तू घरपोच पोचवणे शक्य होईल का? याचा अभ्यास अमेरिकेमधील काही वाणिज्य संस्था कशा करत आहेत याबद्दल लिहिले होते. जगातील सर्व प्रमुख राष्ट्रे ही छोटेखानी ड्रोन विमाने सध्या आपल्या व शत्रू राष्ट्रांच्या प्रदेशाची टेहळणी करण्यासाठी नियमित स्वरूपात वापरत आहेतच. काही राष्ट्रांनी या छोटेखानी ड्रोनच्या सुधारित आवृत्त्या काढल्या आहेत.

गणितज्ञांच्या अद्भुत कथा - 4 : कल्पित संख्यांचे अभूतपूर्व जग!

क्रि.श. पू. 3000 सालीसुद्धा बॅबिलोनियन्सना क्लिष्ट व गुंतागुंतीच्या गणितातील पदावलींचा परिचय होता व त्यांची उत्तरं शोधून काढण्याची पद्धतीही त्यांना माहित होत्या. त्यानंतरच्या अनेक नागरी संस्कृतींनी गणिताच्या ज्ञानात भर घातली. व त्या अनुषंगाने गणिताचा विकास होत गेला. परंतु क्रि. श. 6व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत गणिताच्या ज्ञानात कुठलीही भर पडली नाही वा प्रगती झाली नाही. गणिताला मृतावस्था आली होती. काऱण गणितात अनेक अनुत्तरित प्रश्न होते व काही पदावलींना उत्तरच सापडत नव्हते. गणितज्ञांसमोर एखादी अदृष्य भिंत उभी आहे की काय अशी परिस्थिती होती.

पुणे कट्टा: शनिवार १८ जानेवारी

एक कट्टा तो बनता है! अशी मेघनाने आरोळी दिली आणि मग चर्चांच्या आवर्तनांतून पुढिल प्लॅन ठरला आहे:

रुपरेषा:

  • दुपारी १२:३० वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील 'साउथ इंडीज' या हॉटेलमध्ये भेटणे. (विकांताच्या दरानुसार माणशी खर्च रु.५५०+tax)
  • आरामात दोनेक तास चरून मग दुपारी युनिव्हर्सिटी किंवा इतर सर्वानुमते योग्य ठिकाणी गप्पाष्टक जमवणे
  • ज्या पुण्याबाहेरच्या मंडळींना त्याच दिवशी परतायचे आहे त्यांनी आपापल्या सोयीच्या वेळी निघणे

धाग्याचा प्रकार निवडा:

२०१४ चा आशावादी आढावा !!

येत्या वर्षात -

रस्त्यावरच्या खड्ड्यांत
भ्रष्टाचार पाय घसरून पडावा

सच्चाईच्या डांबराने
त्याला तेथेच कायमचा गाडावा

भारताचा उज्ज्वल इतिहास
पुन्हा पुन्हा घडावा

भारताचा दुश्मन
धाय मोकलून रडावा

मनाच्या अंगणात आशादायी स्वप्नांचा
सुमंगल सडा पडावा

नववर्षाच्या शुभेच्छा !!

कॉकटेल लाउंज : बुलफ्रॉग (Bullfrog)

२०१३ च्या सरत्या संध्याकाळी २०१४ ह्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे बुलफ्रॉग (Bullfrog)

पार्श्वभूमी:

३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी एक पोटंट आणि तितकेच दिलखेचक व आकर्षक असलेले हे बुलफ्रॉग नावावरून 'बैलाचा आव आणलेली बेडकी' असे वाटणे सहाजिक आहे; पण दिसते तसे नसते ह्या उक्तीला सार्थ करणारे हे कॉकटेल आहे, साहित्यावरून ते किती जहाल असावे ह्याची कल्पना येईल.

ह्या वर्षाची आजची शेवटची रात्र एकदम मादक होऊन येणारे इंग्रजी नववर्ष आपणा सर्वांना समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही इश्वरचरणी प्रार्थना.

ऑफीसातील समस्या

Taxonomy upgrade extras

खरं तर ही समस्या मांडताना लाजच वाटते आहे.
ऑफीसमध्ये दर महीन्याला वाढदिवस साजरे होतात. डिसेंबर मध्ये माझा होता. जवळ जवळ अख्खा डिसेंबर मी मेलची वाट पहात होते की आज नाही उद्या साजरा होइल.
शेवटचा आठवडा (गेला) मी रजेवर गेले. अन त्या महीन्याचे वाढदिवस साजरे केले गेले.

पायाखाली

ज्या काळात कोमट्यांच्या घरांत ब्राह्मण भाडेकरूच चालायचे, लिंगायतांच्या घरांत जंगम भाडेकरूच चालायचे, त्या काळात बाबूराव खंदारेंचा वाडा प्रचंड कॉस्मोपॉलिटन म्हणायला हवा. एक बाजूला कौलारू शेडमधे लिंगायत बाबूराव आणि त्यांच्या सप्तकन्या यांचे कुटुंब. दुसर्‍या बाजूला काँक्रीटच्या छताखाली चार वेगवेगळी कुटुंबे. एका छोटेखानी खोलीत आमचे ब्राह्मण कुटुंब, आमच्या मागे थोड्या लांब खोलीत वारकाचे बालाजीमामा, त्यांच्याशेजारी यलमाच्या जिंदगानीचे दोन खोल्यांचे कुटुंब. भाडे वाढले तसे त्यांनी एकच खोली ठेवली आणि त्यांच्यापुढे थोडे भिडस्त मराठे कुटुंब राहायला आले.