साहित्यिक ख़ज़ीना
कवितांचा शोध घेता घेता, खरे पाहता एका सुर्हुदाच्या ओळखीतून पुढील खजीना सापडला.
http://www.belvalkarhousing.com/
या साइट वरती "ऐसी अक्षरे" नावाच्या नियतकालिकाचे काही अंक सापडले. शांता शेळके , बोरकर , जी ए, अरुणा ढेरे अशा अनेकानेक नामवंत साहित्यिकांच्या कथा, कविता, ललीत असा ख़ज़ीनाच हाती लागला आहे. एक एक डाऊन लोड करत वाचत आहे.
लहानपणी चिवड़ा लाडूचे बोकाणे भरत भरत वाचलेले साहित्य परत वाचावयास मिळते आहे. पुनर्वाचनाचा अत्यंत उच्च आनंद अनुभविण्यास मिळत आहे. आपणा सर्वाना तो लाभावा म्हणून , सर्वांबरोबर शेअर करावासा वाटला म्हणून हा धागाप्रपंच.
मला जेवढे माहीत पडले, त्यावरून -
- Read more about साहित्यिक ख़ज़ीना
- 15 comments
- Log in or register to post comments
- 14829 views
भारत २०११ जनगणना - विदा कुठे आहे?
Taxonomy upgrade extras
भारतात २०११ साली जनगणना झाली पण यातील धार्मिक विदा प्रसिद्ध केला गेला नाही. हा विदा कुठे मिळेल हे कुणी सांगू शकेल का?
दुवा http://censusindia.gov.in/Census_And_You/religion.aspx येथे फक्त २००१ चा विदाच मिळतो.
२०११ चा इतर विदा मिळतो पण धार्मिक विदा मिळाला नाही.
विदा पाहण्यासाठी इतर कोणता दुवा आहे का?
- Read more about भारत २०११ जनगणना - विदा कुठे आहे?
- 9 comments
- Log in or register to post comments
- 5020 views
'मूनलाइट सोनाटा'
Taxonomy upgrade extras

- Read more about 'मूनलाइट सोनाटा'
- 4 comments
- Log in or register to post comments
- 11065 views
.
अग्नि आणि संस्कार
परवा रिमोटशी चाळा करतांना एका चॅनेलवर आयुर्वेदावर चर्चा होत असलेली दिसली. त्यात एक विदुषी सांगत होती, "आजकाल घरोघरी वॉटर फिल्टर बसवायचे एक फॅड निघाले आहे. हे अॅक्वागार्डचं पाणी फार शुद्ध असतं असं हे (मूर्ख) लोक समजतात. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहता ते पाणी अशुद्धच असते कारण त्यावर अग्निसंस्कार झालेला नसतो. पिण्याचे पाणी तापवून प्यावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. अग्नीमधली ऊर्जा, पावित्र्य आणि इतर गुणधर्म त्या क्रियेमध्ये पाण्याला मिळतात, ते संस्कार घेऊन ते पाणी पोटात गेल्यानंतर त्याच्यामुळे जठराग्नीला चालना मिळून अन्नाचे चांगले पचन होते.
- Read more about अग्नि आणि संस्कार
- 31 comments
- Log in or register to post comments
- 20099 views
महाभारतातील “चलाख” महापुरुष आणि तत्व कि अस्तित्वाची लढाई
महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे. हर्ष, खेद, सुख, दु:ख, वेदना, लोभ, सूड, कौर्य अशा अनेकानेक भावनांचा विविधरंगी पट या कथेत गुंफला आहे. हा इतिहास पराक्रमी पुरुषांचा असला तरी त्यामागे कुशल राजकारणाचा देखिल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या राजकारणाचे धागेदोरे महाभारतात फार दुरवर जाणारे आहेत. या राजकारणाचा विचार करताना तीन महापुरुषांनी केलेल्या घडवुन आणलेल्या घटनांचा परामर्ष या लेखात घेतलेला आहे. याला हुशारी, बुद्धीमत्ता असं नाव देता आलं असतं. मात्र मुद्दामच “चलाखी” हा शब्द वापरलेला आहे.
- Read more about महाभारतातील “चलाख” महापुरुष आणि तत्व कि अस्तित्वाची लढाई
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2883 views
घासकडवी - नगरीनिरंजन पैज
Taxonomy upgrade extras
(ही बातमी वाचलीत का धाग्यावर पीक ऑइल विषयीची चर्चा फारच गमतीदार व्हायला लागली म्हणून हा स्वतंत्र धागा बनवला आहे. ऐसी अक्षरे या माध्यमातून सदस्यांनी एकमेकांशी पैसे लावून पैजा लावणे योग्य नाही. पण ही पैज एक चर्चा म्हणून महत्त्वाची वाटते.)
मुद्दा असा आहे की 'पीक ऑइल' मध्ये तेल संपणार, ऊर्जा संपणार आणि त्यामुळे प्रचंड उत्पात होणार असं अनेक जण अनेक वर्षं ओरडत आहेत.
पीक ऑईल म्हणजे तेल संपणार असे कोणीही म्हणत नाही पण पीक ऑईल थियरिस्ट्सना सरसकट दुर्लक्षित ठेवण्यासाठी अशी मतं वापरली जातात.
- Read more about घासकडवी - नगरीनिरंजन पैज
- 107 comments
- Log in or register to post comments
- 80292 views
शेरलॉक-३
Taxonomy upgrade extras
बीबीसीच्या 'शेरलॉक' या मालिकेच्या तिसर्या सीझनचा पहिला भाग नुकताच प्रसारित झाला. 'ऐसी...' वर या मालिकेचे अनेक चाहते आहेत असे आमच्या लक्षात आले आहे. त्यामुळे एकेकाशी खरडीतून चर्चा करण्यापेक्षा सर्वांशी एकत्रच या सीझनवर चर्चा करता यावी यासाठी हा धागा काढला आहे. कोणाला या सीझनमधले काय आवडले, काय आवडले नाही, पुढच्या भागांबद्दलचे कुणाचे काय आडाखे आहेत हे जाणून घ्यायला आवडेल.
- Read more about शेरलॉक-३
- 47 comments
- Log in or register to post comments
- 40742 views
शेपूट
एकदा करटक आणि दमनक नावाचे दोन कोल्हे एका वृक्षाच्या स्निग्ध छायेत निवांतपणे काव्यशास्त्रविनोद करत बसले होते. करटकाने दमनकाला विचारले, "दमनका, कानावर आलं आहे की पलिकडच्या जंगलातला एक कोल्ह्यांचा कळप आता फुटला आहे आणि आता त्यातले आपले बांधव स्वतंत्रपणे शिकार करून आपला जीवनक्रम व्यतीत करत आहेत. कळपाला सोडायची अशी दूर्बुद्धी त्यांना का बरे झाली असावी?"
दमनक म्हणाला, "समूहात राहण्याचे फायदे तोपर्यंतच असतात जोपर्यंत कळप त्या सदस्याची कसली ना कसली गरज भागवतो. ही गरज भागेनाशी झाली किंवा कळप जर सदस्याच्या अस्मितेला खुडायचे काम करत असेल तर कळप फुटतो."
करटकाने विचारले, "हे कसे?"
- Read more about शेपूट
- 14 comments
- Log in or register to post comments
- 9847 views
ट्रोजन युद्ध भाग २.३-इलियडमधील हेक्टरपर्व आणि पॅट्रोक्लसचा मृत्यू.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about ट्रोजन युद्ध भाग २.३-इलियडमधील हेक्टरपर्व आणि पॅट्रोक्लसचा मृत्यू.
- 11 comments
- Log in or register to post comments
- 9365 views