दुध (अगोदरच्या भडक शीर्षकासाठी सर्वांची जाहीर माफी मागतो )
आजच सकाळी दैनिक दिव्य मराठी त आलेल्या एका बातमीने लक्ष वेधुन घेतले. ती अशी की महाराष्ट्राचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांनी कुठल्याशा कार्यक्रमात (राजकारण्यांच्या टीपीकल तुलादान इ. सारख्या) स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेतला व दुधाची भरपुर नासाडी या कार्यक्रमात त्यांच्या निष्टावंत कार्यकर्त्यांनी केली. या घटनेवर डॉ. राणी बंग यांची प्रतिक्रीया आली आहे ती अशी की,
- Read more about दुध (अगोदरच्या भडक शीर्षकासाठी सर्वांची जाहीर माफी मागतो )
- 63 comments
- Log in or register to post comments
- 27868 views
बाप माणुस
बाप माझा बाप
बाप मानुस होता.
फाटकी चड्डी
मळकट बनियान
मनाने मात्र तो
साफ माणुस होता.
बाप माझा बाप
बाप मानुस होता.
टकलावर तुरा अन
डोळ्यावर जाड काचा.
आरे मोठठ व्हायच
तर भरपुर वाचा.
अस नेहमी ओरडणारा
तो ताप माणुस होता.
बाप माझा बाप
बाप मानुस होता.
वयात आली जवानी
घेऊन नवि उर्मी.
स्वभावात रगेल पणा
बोलण्यात उद्धट गुर्मी.
दोस्तांच्या गप्पात मग
एकेरी उल्लेख होता.
बाप माझा बाप
बाप मानुस होता.
आज जेंव्हा मी
हळवा बाप होतो.
लेकाला माझ्या
घट्ट जवळ घेतो.
फुटतो सारा बांध कारण
समोर चेहरा त्याचा होता.
बाप माझा बाप
बाप मानुस होता.
तक्रार नाही केली
की कधी नाही चिडला.
- Read more about बाप माणुस
- 4 comments
- Log in or register to post comments
- 5344 views
मैत्रीण : जगण्यातली, मनातली आणि कवितेतली
पुरूषाची मैत्रीण म्हटलं की आपल्याकडे थोडं सावरून बसायची पद्धत आहे. शंभर एक वर्षांपूर्वी 'मैत्रीण' हार्ट अॅटॅक देत असेल. आता फक्त सावरून बसण्यापर्यंत आलो आहोत हे एक चांगलंच. शिवाय आज विशीतली बरीच (सगळी नव्हे) मुलं-मुली मैत्री, आकर्षण, लैंगिकता याबाबतीत पुष्कळच 'सुलझे हुए' आहेत, अधिक थेटपणे या गोष्टींना सामोरं जात आहेत असंही मला वाटतं. किमान आजच्या अभिव्यक्तीतून, चित्रपट-नाटक, फेसबुक अशा माध्यमातून जे चित्र समोर येतंय ते तरी असं आहे. आणि ते आश्वासकही आहे.
- Read more about मैत्रीण : जगण्यातली, मनातली आणि कवितेतली
- 109 comments
- Log in or register to post comments
- 58434 views
लास्ट ट्रेन फ्रॉम गनहिल…एकाकी संघर्षाची अविस्मरणिय कथा

समीक्षेचा विषय निवडा
- Read more about लास्ट ट्रेन फ्रॉम गनहिल…एकाकी संघर्षाची अविस्मरणिय कथा
- 5 comments
- Log in or register to post comments
- 9593 views
घड्याळ

- Read more about घड्याळ
- 7 comments
- Log in or register to post comments
- 11187 views
प्रेम म्हणजे काय ?
तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग
.
लैला मजनूच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकल्या होत्या. मजनूच्या पाठीवर पडणाऱ्या कोड्यांचे व्रण लैलाच्या पाठीवर उमटायचे. कारण शरीराने अलग-अलग असले तरी त्यांचे ह्रदय एक होते. लैला मजनूच प्रेम हे खरं प्रेम होत. आज ही आपण त्यांच्या प्रेमाचे पोवाडे गातो.
मनात एक प्रश्न आला, आजच्या तरुण पीढ़ीच्या प्रेमाच्या कल्पना काय?
- Read more about प्रेम म्हणजे काय ?
- 29 comments
- Log in or register to post comments
- 28487 views
अॅनिमल युथनेशिया : एक मानवतावादी उद्योग
Taxonomy upgrade extras
मी एक शाकाहारी आहे, असण्याच कारण धार्मिक जराही नाही पण मांस खाण्याचा विचार केला तरीही गिल्ट येतो. प्राण्यांची हत्या बघवत नाही. झटाका (वेदनामयच पण) त्यातल्यात्यात थोडा बरा … हलाल वैगेरे प्रकार तर फारच अंगावर येतो, कोंबडी ,बकरे इत्यादींच्या फक्त मानेवर सुरा चालवायचा आणि वेदनामय मरण मरण्यास सोडून द्यायचे.
का?
काहीही तर्क लागत नाही उत्तर पण सापडत नाही.
शाकाहारी पण हत्या करतात वृक्ष-वल्ली मध्ये पण (मेन्दु नसला तरीही) जीव-वेदना असतातच पण त्याच्या वेदना निदान दिसत तरी नाहीत आणि प्राण्यांपेक्षा कमी असतात.
- Read more about अॅनिमल युथनेशिया : एक मानवतावादी उद्योग
- 81 comments
- Log in or register to post comments
- 32504 views
अर्थ एक, अर्थछटा अनेक: शब्दसमूह नोंदींसाठी धागा
Taxonomy upgrade extras
जवळ-जवळचे अर्थ असणारे अनेक शब्द आपण वापरत असतो. अर्थछटांमधला नेमका फरक नक्की करायला जावं, तर मात्र लोकांना विचारण्याखेरीज दुसरी मदत हाताशी नसते. माझ्या माहितीप्रमाणे असे जवळजवळचे अर्थ असणारे शब्द एकत्र देणारा आणि त्यांच्या अर्थछटांमधला फरक नोंदणारा कोश मराठीत नाही. (कुणाला ठाऊक असल्यास जरूर सांगा. मी आभारी असेन.) तो कोश निघायचा तेव्हा निघो, तोवर मला अशा अर्थछटांमधला फरक नक्की करण्याचं काम करणं आवडेल, कुणी करत असेल तर वाचायलाही आवडेल. तेवढ्याकरता हा धागा आहे.
इथे लिहिताना पाळायची पथ्यं:
१. शक्यतोवर शब्दाची जात (आणि जातीबरहुकूम लिंग, सामान्यरूप, अनेकवचन, अनियमित रूपं इत्यादी) नोंदावी.
- Read more about अर्थ एक, अर्थछटा अनेक: शब्दसमूह नोंदींसाठी धागा
- 51 comments
- Log in or register to post comments
- 36255 views
कॉकटेल लाउंज : क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)
‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)
पार्श्वभूमी:
Crabby ह्या शब्दाचा Crabbie असा अपभ्रंश करून, मात्र त्याचा अर्थ तोच घेऊन, हे कॉकटेल बनले आहे. खरेतर मी घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतून Mixology मधला काहीतरी प्रयोग करायला गेलो आणि त्या प्रयोगाचे कॉकटेल ऑलरेडी अस्तित्वात होते हे आंजावर शोध घेता कळले, तेच हे क्रॅबी कॉकटेल.
मालिबू रम हा ह्या कॉकटेलचा आत्मा आहे. मालिबू रमचे अंग म्हणजे 'एक मखमली' टेक्स्चर आणि चवही तितकीच भन्नाट! तिचे अननसाच्या रसाबरोबर जुळणारे सूत हे कॉकटेला एक वेगळीच 'उंची' देऊन जाते.
- Read more about कॉकटेल लाउंज : क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4068 views
शब्द
शब्द सुंदर केवढा
पारिजातकाचा सडा
शब्द पाउस हा वेडा
शब्द जमिनीचा ओढा
शब्द संतांच्या दारी
शब्द मंदिरात हरी
शब्द कबिराचे करी
शब्द झाले एकतारी
शब्द पाखरांच्या दिठी
तुका-ज्ञानियाच्या भेटी
शब्द भिमेच्याही काठी
शब्द सिंधूच्या ललाटी
शब्द बासरीची धून
शब्द श्रावणाचे ऊन
शब्द पायात रुतून
शब्द बंबाळ अजून
© राहुल अहिरे
- Read more about शब्द
- 6 comments
- Log in or register to post comments
- 7368 views