Skip to main content

सुहाना सफर और मै हंसी ; ))

धगधगत्या सूर्यचुलीवर हुगळी नदीच्या पाण्यात कलकत्त्याला माणसं उकडायला घातली होती. आम्ही गीतांजलीची वाट पहात हावड्याला वाफा आणि धापा टाकत होतो. शेवटी एकदाचे दीड वाजता गाडीत शिरलो. गाडी सुटेपर्यंत एसी सुरु होईना तरी घराकडे निघाल्याने शीतल उल्हासाचे चांदणे पडले होते. एक सावळा, स्मार्ट, पंचविशीतला मुलगा लगेच माझा मित्र झाला. आम्ही मस्त गप्पा मारू लागलो. इतक्यात काही धटिंग मारवाडी शिरले. ते एकमेकांना टाकून बोलण्याची पराकाष्ठा करू लागले. ते अधूनमधून दुसऱ्या डब्यातल्या नातेवाइकान्ना आपल्या उर्मट सान्निध्याचा निकट लाभ द्यायला जायचे मग आम्हाला शांततेचा आणि सुसंगतीचा लाभ घेता यायचा.

संसद: बजेट सत्र २०१३

याआधी आपण २०१२ चे मान्सून सत्र आणि २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात काय प्रस्तावित होते, काय झाले याचे वार्तांकन इथे वाचले. उद्या, २१ फेब्रुवारी २०१३ पासून बजेट सत्र सुरू होत आहे.

अर्थातच या सत्रात वित्तविषयक घडामोडींना प्राधान्य दिले जाते असा पायंडा आहे. यातील काही ठळक प्रस्तावित विधेयके अशी आहेतः
१. रेल्वे बजेट २०१३-१४
२. सर्वसाधारण बजेट २०१३-१४
३. इन्शुरन्स आणि पेन्शन मध्ये थेट परकीय गुंतवणुकीच्या योजनेत बदल करणारी विधेयके
४. अन्न सुरक्षा बिल

जुने सिनेमे... नव्या काळात

Taxonomy upgrade extras

तसा चर्चाविषय शीर्षकातच उघड होतोय. त्याची प्रेरणा मुक्तसुनित यांनी तिथल्या चर्चेच्या संदर्भात दिलेला हा प्रतिसाद... त्यांची पूर्वपरवानगी न घेताच मी ती प्रेरणा उचलली आहे. या धाग्याला 'अलिकडे काय पाह्यलंत?' चा इंटरसेक्टिंग सेट समजण्यास हरकत नाही.

नकोच शिवबा, जन्म इथे तू पुन्हा कधी घेऊ -

नकोच शिवबा, जन्म कधी तू पुन्हा इथे घेऊ
कर्तव्याची नाही जाणिव, जयघोषातच दंगुन जाऊ

नाही येथे कुणी जिजाऊ- शिकवण्यास बाळा
म्हणती भाऊ तरि ते टपले दाबण्यास रे गळा ,

येथ जाणती बळ एकीचे जरी सर्व लोक
गडबडती स्वबळावर जगण्या कोपऱ्यात नेक -

शिवबा, तुजसाठी जगणारे संपले मर्द मावळे
आता उरले येथे सारे संधीसाधू डोमकावळे ,

पायपोस तो कुणास नाही उरला कुणाचा आता
सत्तेसाठी केवळ सारा आटापिटा पहाणे आता !

जन्मलास जरी आता शिवबा, इथल्या तू भूवरी
सिंहासन तव तुजसाठी नुरले हपापलेले भारी

ऐकू येते डरकाळी शिवबाची नुस्ती सगळीकडे
फलकावर झळकणे ध्येय तुजवाचुन नेत्याचे इकडे

निघाली खाशी हो स्वारी ...

निघाली खाशी हो स्वारी
दुष्काळी त्या दौऱ्यावरी
संगे घेउनिया लवाजमा
फौजफाटाही तो भारी

तिकडे नाही की पाणी
कोरड्याच साऱ्या विहिरी
संगे घेउनिया बिस्लेरी
ट्रकमधे भारी भारी

खाण्याला नाही बाजरी
ना दाणा ना भाकरी
संगे घेउनिया कारभारी
कुशल सैपाकी आचारी

डोईवर छत्री ती धरी
सोबतचा चमचा कुणीतरी
संगे घेउनिया गालीचा
पायघडी ती कुणी अंथरी

निघाली खाशी ती स्वारी
पहा हो विमाने ती वरी
संगे घेउनिया सामग्री
दुष्काळी त्या दौऱ्यावरी !

.

त्रागा धागा... वैताग

हा धागा मी का लिहितोय ?
कटकट करुन फार थकलोय. चिडचिड करायचाही स्टॅमिना संपलाय. अगदि लहान लहान गोष्टींत चिडचिड करायची पूर्वीपासून सवय. एक बस सुटली ऑफिसची नि ५ मिनिटं वाट पहावी लागली, कर चिडचिड. बॉसनं येताना सगळ्यांना शेकहँड केलं गुड मॉर्निंग म्हणत, मला सोडलं, कर चिडचिड. तिचं नाव ठाउक नाही, पण रोज येउन ओळखीची स्माइल देते, आज एकदम अनोळखी चेहरा करुन चाल्ली गेली, कर चिडचिड.

अलिकडे काय पाह्यलंत ? - ३

दुसरा धागा बराच मोठा झाल्यामुळे तिसरा धागा सुरू करत आहे. भाग -२

रुचीच्या सूचनेवरून 'कपलिंग' नावाची ब्रिटीश मालिका बघायला सुरूवात केली आहे. दोन दिवसात सहा भागांचा पहिला सीझन बघून संपला. ही मालिका 'सेक्स कॉमेडी' आहे, पण 'अमेरिकन पाय'सारखी गलिच्छ अजिबात नाही एवढं वगळता लिहीण्यासारखं मला फार काही सुचलं नाही. (या वाक्याबद्दलही रुचीचे आभार.) तीन मित्र, तीन मैत्रिणी एकत्र येऊन धमाल करतात हे वाचून 'फ्रेंड्स'ची आठवण होणं अपरिहार्य आहे. पण 'कपलिंग' त्यापेक्षा फारच वेगळी वाटते आहे.