Skip to main content

खिक् दर्शन

खिक् दर्शन

आतला नागडा
बधिर ;
बाहेरचा भलताच
अधिर..
निर्लज्ज श्रध्दा खिक्
हसून ;
ढुंगणाखाली दाबते
धीर ..
गोट्या मोट्या
सोट्या ;
अगडबं बगडंब
छोट्या..
विठू हरकला ;
बुक्का थरकला.
रुख्माय
देते गाली !
चवथीचं फडकं पिळावं भाड्या...
मुखडा भुलून निजावं भाड्या.,
वाढीव येल...
वाढीव इस्तार ;
बुळ्याचं लग्न
बुळ्याचा इस्तार .
उलट्या देवाची
पुजावी गांड ;
मांडावी चूल
चेचावं आंड ..
गोष्ट सांगतो सापाची
शेटं उपट माझ्या बापाची !
काय मंतू रे ?
का मंतू रे ?
अगं बाय अगं बाय चिल्बाट चिवडी
कस्पाट सोडून भलांगी निवडी...

ध्यानम् सरणम् गच्छामी (पूर्वार्ध)

ध्यानधारणा ही कुणाच्याही गळी उतरवण्यास सुलभ गोष्ट आहे हे प्रथम मान्य करायला हवे. अनादी काळापासून ध्यानधारणा सर्वांच्या परिचयाची आहे. जगभरातील बहुतेक धर्मांनी ध्यानप्रकाराचा पुरस्कार केला आहे. धार्मिक मान्यतेमुळे हा एक चांगला संस्कार आहे असे वाटत आले आहे. अगदी 1-2 मिनिटापासून ते दिवसातील 16-18 तास वेळेची अपेक्षा करणारे विविध ध्यानप्रकार आहेत. परंतु अलिकडे ध्यानधारणेला बाजारी स्वरूप आल्यामुळे काही तरी भव्य दिव्य यातून निर्माण होते असे सुशिक्षिताना वाटत आहे. परंतु ध्यानधारणेमुळे खरोखरच काही ठाशीव फरक जाणवतो का? हा प्रश्न आता विचारावासा वाटतो.

खजिना (८/८)

~~~मंदार~~~
मला काहीच समजेना. आई, बाबा इथे कुठे आले? मी कांबळेंकडे पाहिले.
ते म्हणाले, "तुला काही गोष्टी समजाव्यात म्हणूनच त्यांना इथे बोलावले आहे."
"म्हणजे?", मला काही कळेना, "हे काय आहे? त्यांचा याच्याशी काय संबंध?"
"आता थेट बोलतो, ते दोघे तुझे आई-वडील नाहीत."
मला कळेचना की हे काय बोलताहेत. त्यांच्या डोळ्यात वेडाची झाक दिसतेय का हे मी बघू लागलो. ते म्हणाले, "नाही मी वेडा नाही आणि तशी झाक माझ्या डोळ्यात शोधूही नकोस. ते खरंच तुझे आई-वडील नाहीत."

सर्पट पंजरीका ..............

सांजवेळी फोनची रिंग वाजली. चमेलीने रिसीवर उचलून हेलो म्हटले. पलीकडून हॅलो ऐवजी "जय जय रघुवीर समर्थ "अशी गर्जना ऐकून ती दचकली. नवऱ्याच्या गावाचे सुप्रसिद्ध सर्पमित्र नागोबा फुसे उद्या सक्काळी ५ वाजता एक लग्नकार्यात हजेरी लावण्यास सदेह येऊन ठेपत असल्याची पूर्वसूचना त्यांनी फुत्कारून दिली. तिचे डोकेच फिरले. आधीच सर्दी खोकल्याने तिच्या डोक्याची वाट लागली होती त्यात सासरचे पाहुणे नेमके अनिवार्य असल्यागत तेंव्हाच का टपकतात तिला कळेनासेच झाले. तिच्या नवऱ्याचा चंदूचा मोबाईल नंबर असून ते तिलाच का सांगतात याचाही उगीच राग येऊ लागला. इतक्यात चंदूचा फोन आला. त्याला ऑफिसमधून यायला उशीर होणार होता.

रेल्वे बजेट आणि सर्वसाधारण (जनरल) बजेट २०१३-१४

Taxonomy upgrade extras

ऐसीवरील बजेट चर्चा: २०१३-१४ | २०१४-१५

सर्वसाधारण बजेट म्हणजे काय?
घटनेतील आर्टिकल ११२ नुसार सरकारला दरवर्षी येत्या वित्तवर्षाच्या प्रस्तावित जमा-खर्चाचा ताळेबंद संसदेपुढे मांडुन त्यावर संसदेची मंजूरी घेणे अनिवार्य असते. या 'फायनान्शियल स्टेटमेन्ट' अर्थात आर्थिक ताळेबंदालाच सर्वसाधारण बजेट असे म्हटले जाते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटाच्या कामकाजाच्या दिवशी हे 'बजेट' वित्तमंत्री सादर करतात.

रेल्वे बजेट म्हणजे काय?

ध्यान.. एक अनुभव.


काही दिवसांपूर्वी ‘ध्यान’ या विषयावर काही चर्चा वाचायला मिळाली. साधारण तीन वर्षापूर्वी मी एक वैद्यकीय सहाय्य म्हणून प्रथमच ध्यानाची प्रॅक्टिस सुरू केली. त्याचे मला अनपेक्षित आणि अत्यंत परिणामकारक रिझल्ट्स मिळाले. या अनुभवातून या विषयाचा काही अभ्यास केला तेव्हा ही माहिती मिळाली.

सोनई हत्याकांड घटना प्रतिक्रिये वरील प्रतिक्रिया.

Taxonomy upgrade extras

सोनई दलित हत्याकांड ही ऎसी अक्षरे वरील पोस्ट एका ग्रुपवर टाकल्यानंतर काही दिवसांनी डिलिट केली. तेव्हा तिथे दिलेली प्रतिक्रिया इथेही लागू होतेय. म्हणुन तशीच देतोय. न ओळखणार्या व्यक्तिँचे संदर्भ लक्षात येणार नाहित तेव्हा ते तसेच टाळून पुढे वाचा ही विनंती.

आँ?! हे काय हो तुकोबा?

Taxonomy upgrade extras

अहो हे काय हो तुकोबा?
मी तर तुम्हाला संत तुकाराम म्हणुन ओळखतो. तुमचे विठ्ठल भक्तीचे ( क्वचित राम- कृष्ण ह्यांचा उल्लेख असलेले) आणि बर्‍याच वेळेस सामाजिक अंधश्रद्धेवर कोरडे ओढणारे , रोखठोक अभंग मी ऐकत आलोय.

पूर्वी हिंदु-मुस्लिम तत्वज्ञानाचा संगम कबीर म्हणा, गुरुनानक ह्यांच्या साहित्यात असल्याचं ऐकलं होतं.
ज्ञानदेवांचे समकालीन संत नामदेव हेसुद्धा महाराष्ट्रापासून थेट पंजाबपर्यंत जाउन आलेत; त्यांच्या कित्येक रचनांचा समावेश शिखांच्या "गुरु ग्रंथ साहिब " मध्ये आहे हेही ऐकलय. पण तुमच्या लिखाणात असं काही असल्याचं ऐकलं नव्हतं बुवा.

टाळ बोले माझ्या मनीं -

टाळ बोले माझ्या मनीं
नाद करी मृदुंग कानीं
चिपळ्यातुनी येई ध्वनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||

हाती झेंडा नाचवुनी
स्मरण होई गजरातुनी
नामाचा जप मुखातुनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||

डोईवरी तुळशीवृंदावनीं
पावलांच्या ठेक्यातुनी
टाळ्यांच्या तालातुनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||

भक्तीच्या या वाटेवरुनी
जाऊ सगळे आनंदुनी
गाऊ सगळे दंग होउनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||

देहभान अपुले हरपूनी
नाचू रंगूया कीर्तनी
म्हणू सगळे वारीतुनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||
.

भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू

Taxonomy upgrade extras

पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते.