देवाचे खाते
Taxonomy upgrade extras
जन्माला आलेले मूल नुसतेच डोळे मिचकावत असते. त्याच्या पांच ज्ञानेंद्रियामधून मिळणाऱ्या संदेशांचे कितपत आकलन त्याला होते ते कळायला मार्ग नाही. हळू हळू त्याची नजर स्थिर होते. चेहरा व आवाज ओळखून ते प्रतिसाद देऊ लागते. शब्दाशब्दाने भाषा शिकते. बोलायला लागल्यावर अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडते. त्याच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे पालकांच्याकडे नसतात किंवा कांही कारणाने त्यांना ती द्यायची नसतात. यातूनच "देवाचे खाते" उघडले जाते. जे जे आपल्याला माहीत नाही किंवा सांगता येणे शक्य नाही ते सगळे त्याच्या खात्यात मांडले जाते. त्या क्षणी तरी हा सर्वात सोपा मार्ग वाटतो.
- Read more about देवाचे खाते
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6606 views
कसाब आणि चाळीस कोटी रुपये...
Taxonomy upgrade extras
कसाबवर चाळीस कोटी रुपये खर्च आला असं आपण सर्रास ऐकत असतो. त्याला जेवायला बिर्याणी दिली त्यावरही जनता खार खाऊन असते. आणि 'अशा नराधमाला बिर्याणी खायला घालून पोसलं तर चाळीस कोटी रुपये खर्च येणारच' असा काहीतरी विचार होतो. आता रोज बिर्याणी खायला घालूनही वर्षाला दहा कोटी रुपये खर्च येणार नाही हे उघड आहे. मग प्रश्न असा येतो की हा चाळीस कोटीचा आकडा नक्की कुठून आला?
- Read more about कसाब आणि चाळीस कोटी रुपये...
- 11 comments
- Log in or register to post comments
- 6667 views
देवाला रिटायर का करा?
Taxonomy upgrade extras
देवला रिटायर करा असा घोषा अनेक लोक लावत असतात.देव ही संकल्पना फोल आहे असे नक्की कोणत्या कारणामुळे अनेकांना वाटत असावे?अनेकदा असे वाटते की अशा मंडळींची तक्रार देवाविरूध्द नाही तर देवाच्या नावाने चालू असलेल्या पूजा-अर्चा आणि कर्मकांडे (त्यातही ओ माय गॉड चित्रपटात दाखविल्याप्रमाणे हजारो लीटर दूधाची नासाडी याप्रकारच्या गोष्टी) या गोष्टी फोल आहेत असे मत बनले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे फारसे काही आहे असे वाटत नाही.
- Read more about देवाला रिटायर का करा?
- 91 comments
- Log in or register to post comments
- 53418 views
.
.
- Read more about .
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4769 views
कसाब आणि इतर दहशतवादी
Taxonomy upgrade extras
कसाबच्या फाशीनंतर लोकसत्तेतला अग्रलेखः
http://www.loksatta.com/sampadkiya-news/hang-till-death-cheating-12785/
इथे फाशीची शिक्षा असावी का नसावी याचा विचार करत नाही. अग्रलेखाची सुरूवात, कसाबला शिक्षा झाली हे योग्यच, हे मान्य आहे. पण त्यापुढचे मुद्दे फारच हुकलेले वाटले.
१. कसाब आणि बाकी तीन गुन्हे एकाच तीव्रतेचे मानावेत का?
- Read more about कसाब आणि इतर दहशतवादी
- 32 comments
- Log in or register to post comments
- 14574 views
कॉकटेल लाउंज : गोवन समर
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “गोवन समर”
पार्श्वभूमी:
- Read more about कॉकटेल लाउंज : गोवन समर
- 3 comments
- Log in or register to post comments
- 5359 views
कांदा संस्थानात उत्स्फूर्त मेणबत्ती मार्च
दि. २१ नोव्हें, कांदा तलाव, कांदा संस्थान
कुख्यात अतिरेकी अजमल आमीर कसाब याला दिलेल्या फाशीच्या निमित्ताने कांदा तलावाच्या चौपाटीवर विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिशय कमी नोटीसवर कांदा संस्थानातल्या सर्व सज्ञान स्त्री-पुरूषांनी उपस्थिती लावण्याची ही पहिलीच वेळ असावी. शिवाय अठरा वर्षाखालचे काही टीनेजर्सही चौपाटीवर जमलेले दिसले. कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय जमलेल्या या गर्दीला लवकरच मेणबत्ती मार्चचं स्वरूप आलं.
- Read more about कांदा संस्थानात उत्स्फूर्त मेणबत्ती मार्च
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5739 views
शेवट नसलेली कथा
एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली गोष्ट. अनेक शतके कैलासाच्या बाहेर पाउल न टाकल्यामुळे पार्वतीमातेचा जीव अगदी उबून गेला होता. तीच ती हिमाच्छादित पर्वतशिखरे, तेच ते धूसर करडे आकाश, त्याच त्या गणादिकांच्या लीला, तीच ती कार्तिकेय अन गणेशाची कौतुके अन तीच ती पतीराज शिवशंभूंची धीरगंभीर तपोमुद्रा ! कुठलंही च्यानल लावलं तरी एकच सिरीयल लागावी तसं काहीसं जगन्मातेला वाटत होतं. आदिमायेला आता जरा पृथ्वीतलावर जाऊन मनुष्यामात्रांची नखरेल रेलचेल पहावीशी वाटू लागली. त्यांच्या सुखदु:खांची दखल घ्यायची उर्मी तिच्या कोमल मनात दाटून आली.
- Read more about शेवट नसलेली कथा
- 6 comments
- Log in or register to post comments
- 9047 views
दिवाळी अंक आणि टेलिव्हिजन सिरियल्स
Taxonomy upgrade extras
'दिवाळी अंक हे मराठी उच्च मध्यमवर्गीयांच्या टेलिव्हिजन सिरियल्स आहेत' अशा आशयाचं मत नुकतंच फेसबुकावर वाचण्यात आलं. तथाकथित सुसंस्कृत-गोग्गोड-खवा अभिरुचीला जोरदार धक्का, या प्रकारच्या अभिरुचीच्या केवळ संख्याबळावर चालवलेल्या मक्तेदारीला विरोध आणि काही प्रमाणात तथ्यांश - हे सगळं जमेस धरूनसुद्धा हे विधान काहीसं मानभंगकारक वाटलं.
- Read more about दिवाळी अंक आणि टेलिव्हिजन सिरियल्स
- 11 comments
- Log in or register to post comments
- 6240 views
संसद २०१२: हिवाळी अधिवेशन
संसदेचे २०१२चे हिवाळी अधिवेशन दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. त्या सत्रासंबंधीच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी, एकूणच संबंधीत राजकारणावर चर्चा करण्यासाठी, मांडलेल्या बिलांवर ऐसीच्या सदस्यांची मते समजून घेऊन त्यावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.
यात शक्य तितके दररोज काल काय झाले आणि आज संसदेपुढे कोणता कार्यक्रम प्रस्तावित आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहेच. शिवाय यावेळी या धाग्यावर या सत्राच्याशी निगडीत राजकारणावरही चर्चा व्हावी असे वाटते.
जेव्हा एखादे महत्त्वाचे विधेयक सादर होईल तेव्हा त्यावर आपापली मते जरूर द्यावीत अशी विनंतीही करतो
- Read more about संसद २०१२: हिवाळी अधिवेशन
- 43 comments
- Log in or register to post comments
- 51855 views