शांताराम - ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स
सध्या "ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स" या लेखकाचे "शांताराम" हे आत्मचरीत्रात्मक पुस्तक वाचते आहे, अर्धे झाले आहे. पहीली काही प्रकरणे, भारतातील अनुभवांबद्दल एखादी पाश्चात्य व्यक्ती इतके सकारात्मक लिहू शकते हे वाचून, आश्चर्यमिश्रीत आनंदाचा धक्का बसला. हातातून पुस्तक खाली ठेववेना. विशेषतः पुस्तकातील मराठी संवाद आणि मराठी पात्रांनी भुरळ घातली. लेखकाची नीरीक्षणशक्ती देखील अफाट, खरच अफाट आहे हे जाणवले. पण पुढे पुढे लेखकाची जीवनशैली, चरस, हशीश घेणे आदि सवयी बघता, मुंबईचे अतिरेकी कौतुक, लोकांची स्तुती सर्व अतिरंजित वाटू लागले. खरं तर पुस्तक काही काळ दूरच ठेवले.
- Read more about शांताराम - ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स
- 18 comments
- Log in or register to post comments
- 14086 views
मानवी शरीर आणि भारतीय संस्कृती (भाग १)
Taxonomy upgrade extras
‘झीरो फिगर’चं आकर्षण, ऋजुता दिवेकर आणि त्यावरून दिवे लावणारा चिंजंचा धागा हे या "चित्रलेखाचे" कारण. शेंबड्या पोरांना काय कळतं ते ही या धाग्यातून दिसावं हाही एक उद्देश. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात मानवी शरीर कशा प्रकारे दर्शवलं गेलं आहे त्याचा हा एक धावता प्रातिनिधिक आढावा आहे.
(सध्या या लेखात फक्त चित्रपटांतील शरीरांचा आढावा आहे. त्यामागचं कारण एवढंच आहे की चित्रपटांतील सर्व "नमुने" जालावर सापडायला सोपे जातात. शक्य झालं तर पाश्चात्य चित्रपटांतील नमुने नंतर कधीतरी देण्याचा प्रयत्न करेन.)
‘मातृदेवता’ वगैरे म्हणत ४००० वर्षे मागे जाण्यापेक्षा ४० वर्षे मागे जाऊ. उदाहरणार्थ हे पाहा :
- Read more about मानवी शरीर आणि भारतीय संस्कृती (भाग १)
- 21 comments
- Log in or register to post comments
- 23634 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३ : वाट
येत्या पंधरवड्याच्या स्पर्धेचा विषय आहे: वाट
या विषयाचा अनेक प्रकारे अर्थ लावता येईल - जसे वाट पाहणे, वाट काढणे, वाट लावणे, वाट दाखवणे ... इत्यादी :-) असे आणखी अनेक अर्थ व्यक्त होतील याची खात्री आहे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे प्रकाशित करता येतील.
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३ : वाट
- 39 comments
- Log in or register to post comments
- 45205 views
मानवी शरीर आणि पाश्चिमात्य संस्कृती (भाग १)
‘झीरो फिगर’चं आकर्षण, वजन कमी कसं करावं ते सांगणाऱ्या पुस्तकाचा हातोहात खप, त्यावरून झालेली ही चर्चा हे या लेखमालेमागचं एक कारण. ‘सौंदर्य म्हणजे काहीतरी निखालस (absolute) गोष्ट आहे आणि ती शेंबड्या पोरालाही कळते’ असा आंतरजालावर आणि बाहेर अनेकजण जो दावा करताना दिसतात, ते या लेखामागचं दुसरं कारण. पाश्चिमात्य इतिहासात मानवी शरीर कशा प्रकारे दर्शवलं गेलं आहे त्याचा हा एक धावता आढावा आहे.
- Read more about मानवी शरीर आणि पाश्चिमात्य संस्कृती (भाग १)
- 10 comments
- Log in or register to post comments
- 22796 views
हे सगळे गेले कुठे?
गेल्या काही दिवसात कोणत्या मित्र-मैत्रिणीला प्रत्यक्ष भेटून मनसोक्त गप्पा केल्या आहेत असा प्रश्न विचारल्यास फार कमी लोकांना ठाम उत्तर देता येईल. मात्र त्यात जीमेल वरच्या लिखित गप्पा किंवा स्काइपवरच्या ऑडिओ-व्हिडिओ गप्पांचा पर्याय टाकला तर बहुतेकांना ठाम उत्तर देता येईल. मी स्वतः या दुसर्या गटातली म्हणजे बहुसंख्यांपैकी आहे. जगभरात स्थित असलेल्या मित्रमंडळाच्या सान्निध्यात राहून, त्यांच्याशी विविध प्रकारे गप्पा-टप्पा करत त्यांच्याबरोबर विचार-भावना-ज्ञान वाटून घ्यायची जी सोय आहे त्याबद्दल आधुनिक तंत्रज्ञानाची मी कायम ऋणी राहिन.
- Read more about हे सगळे गेले कुठे?
- 12 comments
- Log in or register to post comments
- 7637 views
सायलेन्स एव जयते - एस्. आनंद (सौजन्य - आऊटलुक)
आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' कार्यक्रमाच्या नुकत्याच झालेल्या एका भागात जातपातीबद्दल मांडणी होती. कार्यक्रमाचं प्रत्यक्ष चित्रीकरण झालं तेव्हा व्यक्त झालेले काही विचार प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचायच्या आत त्यांना पद्धतशीरपणे कशी कात्री लावली गेली याविषयी एस्. आनंद यांनी लिहिलेला एक लेख 'आऊटलुक'मध्ये प्रकाशित झाला आहे. पडद्यावर दिसलेल्या कार्यक्रमात आंबेडकर आणि आरक्षण या दोन गोष्टींना पद्धतशीरपणे बगल देण्यात आली, पण मुद्रित झालेल्या भागात तसं नव्हतं, असं त्यांचं म्हणणं आहे.
- Read more about सायलेन्स एव जयते - एस्. आनंद (सौजन्य - आऊटलुक)
- 10 comments
- Log in or register to post comments
- 9497 views
नाविन्यतेचा धसका!
Taxonomy upgrade extras
नाविन्याची ओढ, सृजनशीलता, उपक्रमशीलता, वेगळी वाट, आउट ऑफ दि बॉक्स थिंकिंग, इत्यादी शब्दांच्या बद्दल वाकडे तिकडे कुणी बोलत असल्यास वा लिहित असल्यास बहुतेकांना राग येतो. या गोष्टींबद्दल निगेटिव्ह काही ऐकून घेण्याइतकी सहनशीलता आपल्यात आता नाही. याबद्दल काही बाही लिहिणार्यांना आपण सर्रासपणे मूर्खात काढतो. हे शब्द आजच्या युगाचे परवलीचे शब्द झालेले आहेत. स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, नारायण मूर्ती, रिचर्ड ब्रॉन्सन, टाटा, अंबानी, किरण मुजुमदार, मायकेल डेल सारख्या उपक्रमशील उद्योजकांनी या शब्दामागील संकल्पनांचा पाठपुरावा केल्यामुळेच Fortune 500 च्या यादीत त्यांची नावं झळकत असतात.
- Read more about नाविन्यतेचा धसका!
- 18 comments
- Log in or register to post comments
- 12755 views
शिंपी समाजाचा इतिहास
शिंपी. जगाची अब्रू झाकणारा समाज. या समाजानं घडवला एक संत. ज्यानं कपड्यांचे तुकडे जोडता जोडता तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेला समाज जोडला. प्रेमाच्या धाग्यांनी घट्ट शिवला. देशभर फिरून त्यानं ज्ञानाचा दिवा लावला. म्हणून संत नामदेव हेच नाव या समाजानं अभिमानानं आणि भक्तिभावानं धारण केलं. कोणत्या सामाजिक पार्श्वभूमीतून नामदेवांनी एवढं मोठं काम केलं, ते समजण्यास मदत होईल असा हा शिंपी समाजाचा इतिहास. सांगताहेत ज्येष्ठ सामाजिक इतिहासकार संजय सोनवणी.
- Read more about शिंपी समाजाचा इतिहास
- Log in or register to post comments
- 20579 views
वाचनानुभव!
Taxonomy upgrade extras
‘मी का वाचते?’ ह्याचा विचार करताना जाणवले ते असे ---
२००४ साली वाचनाला नव्याने सुरूवात झाल्यापासून आजपर्यंत, जवळ-जवळ प्रत्येक पुस्तक वाचताना नकळतपणे मी स्वत:शी भिडत आले. इथे ‘स्वत:’ म्हणजे निव्वळ ‘मी’ नसून त्यानिमित्ताने एकंदरीत आपल्याभोवतीची परिस्थिती-घटना-माणसे-इ. कडे बघण्याची नवी नजर मिळत राहिली, प्रत्येक वाचनातून !!!
- Read more about वाचनानुभव!
- 8 comments
- Log in or register to post comments
- 7201 views
ढोर समाजाचा इतिहास
ढोर हा भारतातील एक अत्यल्पसंख्य समाज आहे. हा समाज प्रामुख्यानं महाराष्ट्र, कर्नाटक आणि अल्पांश स्वरुपात गुजरातेत आढळतो. अन्यत्र कातडी कमावणार्या समाजांना वेगवेगळी नावं आहेत. उत्तरेत मोची, चमार वगैरे. ज्या ज्या भागांवर सातवाहनांनी राज्य केलं तिथं तिथं महाराष्ट्री प्राकृत भाषेचा प्रभाव आहे. त्यामुळं त्या भागातल्या जातींची नावं ही महाराष्ट्री प्राकृतावरून पडलेली आहेत. त्यामुळं तिथली जातीनाम वैशिष्टय़ंही वेगळी आहेत, हे आपण अन्य जातीनामांवरुनही पाहू शकतो. अन्य ठिकाणच्या जातीनामांवर त्या-त्या प्रदेशातल्या भाषांचा प्रभाव असला तरी हा समाज मूळचा तसा एकच.
- Read more about ढोर समाजाचा इतिहास
- 12 comments
- Log in or register to post comments
- 39053 views