Skip to main content

गद्य

है सबसे मधुर वो गीत...

"है सबसे मधुर वो गीत जिन्हें, हम दर्द के सुर में गाते हैं
जब हद से गुज़र जाती है खुशी, आँसू भी छलकते आते हैं

ललित लेखनाचा प्रकार

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ५ - प्रेसिजन बिसिजन

हे प्रत्यक्ष सँटा फे ऑपेराच्या इथले नाहीये पण कॉश्च्युम शॉपचीच गोष्ट आहे म्हणून याच सिरीजमध्ये घेतेय.
------ ------------ - - --
मी आणि केविन एकमेकांच्या कटींग आणि पिनिंगवर हसायचो. कटींग म्हणजे कापड बेतणे आणि बेतलेले दोन कापडाचे तुकडे मशीनवर जोडताना आधी टाचण्या लावायच्या असतात ते पिनिंग. केविनला वेळ लागायचा. मी धडाधड करायचे. त्यामुळे मी माझे नाक खूप वर करायचे. मग यायची बाही. बाही गोल जोडताना - म्हणजे आधी बाही बनवून मग ती धडाला जोडणे - हे करताना बाहीची शिवण नेमक्या गोलाव्यात कधी कधी उसवायला लागायची मला. पण केविनला कधीही तसे करायला लागायचे नाही.

ललित लेखनाचा प्रकार

कुटुंबातले श्रीपु

श्री.पु. भागवत माझे मामेसासरे. म्हणजे माझी पत्नी निर्मला ही श्रीपुंच्या पाठची बहीण कमल यांची मुलगी. तसं पाहिलं तर मी एक प्रकारे त्यांच्या कुटुंबीयांपैकीच, पण काहीसा बाहेरच्या वर्तुळातला. पण भागवत कुटुंबीय ‘श्रीपुंचे आवडते जावई’ अशी माझी थट्टा करीत असत.

ललित लेखनाचा प्रकार

(देह-फुलं: ७) लँडींग

त्यानं तिच्या बुझम्समध्ये डोकं घुसळलं.
डोकं दाबत दाबत आणखी आत आत जाऊ दिलं.
तिनं आळसावलेले डोळे उघडत ऊं ऊं SSS करत फारसं एन्करेजमेंट नसलं तरी विरोध नक्कीच नसल्याचा सिग्नल देत त्याला एक पापी घेऊ दिली.
त्यानं तिच्या सुती जुनाट अशक्य कम्फर्टेबल पजामात मागून हात घालत हलकेच दाबलं आणि तो पुटपुटला...
चांद्रयान पण असंच लँड होऊ देत यार!
मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट!!

ललित लेखनाचा प्रकार

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ४ - रिश्ता आया है!

हातशिलाईच्या अड्ड्यात अप्रेंटीस असायचे आणि व्हॉलंटीयर्स. अप्रेंटीस क्वचितच सँटा फे मधले स्थानिक असायचे. तर कॉश्च्युम शॉपच्या व्हॉलंटीयर्स या सँटा फे आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या रिटायर्ड बायका असायच्या. शिकत असलेले, शिक्षण संपून खऱ्या जगात उतरू पाहणारे अप्रेंटीस आणि रिटायर झालेल्या, वेळ घालवायला काम करणाऱ्या व्हॉलंटीयर्स असे फार गमतीशीर मिश्रण असायचे हातशिलाईच्या अड्ड्याचे.
वयातला आणि अनुभवातला फरक असला तरी लगेच अप्रेंटीस लोकांनी व्हॉलंटीयर्सना काकू-मावशी-आजी म्हणत लीन व्हावे, त्यांचे ऐकावे वगैरे बावळटपणा तिथे चालत नसे. त्यामुळे गप्पा तश्या म्हणायच्या तर एका पातळीवर चालत.

ललित लेखनाचा प्रकार

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ३ - जूनची लगीनघाई

जून महिना लग्नघाईचा असतो तिकडे. त्या सीझनसाठी घेतलेले गायकनट ते क्रू मधले सर्व विभागांचे लोक रांचवर असतात. रांच म्हणजे ऑपेरा रांच.

मुख्य गावाकडून उत्तरेला जायला जुना ताओस हायवे किंवा हायवे 285 पकडायचा. जात राहायचं, जात राहायचं मग एका ठिकाणी डावीकडे ऑपेरा ड्राइव्हवर शिरायचं. थोडा चढ आणि काही वळणे झाली की आपण डोंगरमाथ्यावर पोचतो. तिकडे उजव्या बाजूला आकाशात घुसलेली ऑपेरा हाऊसच्या छताची टोके आणि अडोब बांधकाम दिसते. मग गेट दिसते. पार्किंग लॉट दिसतो. हा सगळा ऑपेरा रांच.

तर या रांचवर जून महिना लग्नघाईचा असतो. जून अखेरीला शनिवारी रात्री सीझनचा पहिला ऑपेरा लोकांसाठी ओपन होणार असतो.

ललित लेखनाचा प्रकार

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप २ - मॅगी रेवूड

'वरच्या मजल्यावर कोण कोण जाणार? मला टेबल बदलायला आवडेल किंवा मला नाही आवडणार. काय बघून ठरवतील वरच्या मजल्यावरच्या टेबलाची टीम? '

ललित लेखनाचा प्रकार

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप - १. थिंबल

खूप खूप वर्षांपूर्वी सँटा फे येथे ऑपेरा कंपनीच्या कॉश्च्युम शॉपमध्ये तीन उन्हाळयांच्यात काम केले होते. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात भन्नाट काळ होता.

ललित लेखनाचा प्रकार

राज्यातील विस्थापित

एकदा एका राज्यात राज्याबाहेरील मोठ्या प्रमाणात विस्थापित लोकांचा प्रश्न निर्माण होतो. राज्यातील बहुसंख्य लोक खूप विरोध करतात. अशा लोकांना अजिबात राज्यात रहायला देऊ नका म्हणून आरडाओरडा सुरू होतो. मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजवादी मंडळी राजाने त्यांना आश्रय दिला पाहिजे वगैरे वर समर्थन करू लागतात. तर सीमाभागातील बरेचशे लोक विरोध करतात. कारण त्यांना माहित असतं की अशी मंडळी मुख्यत्वेकरून सीमेलगतच्या भागात बस्तान बसवतात आणि त्यांच्या मुळे मूळ भूमिपुत्रांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

ललित लेखनाचा प्रकार