सामाजिक

द डेथ ऑफ एक्स्पर्टीज

Taxonomy upgrade extras: 

मराठी आंतरजालावरच्या अनेक वादघालकांनी आणि मतप्रदर्शकांनी वाचावा असा एक लेख -
द डेथ ऑफ एक्स्पर्टीज

("ही बातमी वाचली का?" मधून प्रतिसाद हलवला आहे.)

ठाणे (मुंबई) कट्टा; शनिवार १५ फेब्रुवारी

Taxonomy upgrade extras: 

मुंबई कट्ट्यावर गल्बलाच जास्त जाहला.

मुदलात ठाणेकर जास्त आहेत मुंबईकरांपेक्षा. तसंही मुंबैकरांना ठाणं लांब नाही. नि पुणेकर मुंबै गाडी घेण्याऐवजी ठाणे गाडी घेतील. तेव्हा मी माझ्या अगाऊ अधिकारात कट्टा ठाण्याला हलवते आहे.

वेळः शनिवार १५ फेब्रुवारी, संध्याकाळी ५ पासून पुढे .

स्थळः पॉप टेट्स, कोरम मॉल टॉप फ्लोअर, ईस्टर्न एक्सप्रेसवे सर्विस रोड, ठाणे

नक्की येणार्‍या लोकांनी खाली नावं लिहा, ते बरं पडेल. ऋषिकेशच्या धाग्याइतका आदर्श धागा काढणं काही मला जमणार नाही. Tongue तरी हाच धागा गोड मानून घ्यावा.

विकास म्हणजे नक्की काय?

Taxonomy upgrade extras: 

पुणे आणि आसपासचा परिसर , घणसोली ,नवी मुंबई परिसर ,पेण - पनवेल इत्यादी परिसरात भूखंड / जमीन विक्रीतून आलेल्या प्रचंड पैशातून निर्माण झालेला नवश्रीमंत वर्ग आणि पर्यायाने बोकाळलेली गुंठामंत्री संस्कृती (?) इत्यादी पहाता या भागाचा विकास झाला आहे,असे म्हणणे योग्य ठरेल का?

मूलभूत हक्क

Taxonomy upgrade extras: 

माझ्या सुमारे ६ वर्षांच्या अनुभवावरून अशा निष्कर्षा प्रत पोहोचलो आहे , की यच्चयावत मराठी संस्थळां वर हिंदू अध्यात्म / देवता /आराधना /उपासना /साधना याविषयी कोणीही अभ्यासू ने /श्रद्धाळूने काही लेख टाकला रे टाकला कि कथित सुधारणा वाडी / विज्ञान वादी / अंधश्रद्धा इत्यादी मंडळी त्यावर तुटून पडतात
. हे गैर आहे . अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वधर्म-उपासना स्वातंत्र्य हे भारतीय राज्य घटनेने दिलेले आहे ,असे असताना कथित नव -मतवादी किंवा सुधारक अथवा हिंदू धर्मद्वेषी मंडळी मूलभूत हक्कावर घाला घालू पहात आहेत .

विवाह कायदा आणि विधी

Taxonomy upgrade extras: 

मी पूर्वी सप्तपदी विधीच्या आधुनिक काळातील अव्यवहार्यतेबद्दल पुरुषांची बाजु घेऊन लिहीले होते. त्याला बराच काळ लोटला आहे आणि तेव्हा उडालेली धूळ आता खाली बसली आहे. तरीही मी दरम्यानच्या काळात माझी भूमिका परत-परत तपासत होतो. ही भूमिका तपासत असताना काही गोष्टी नव्याने लक्षात आल्या...

अजूनही आपण लोकांनी गप्पच राहायचे आहे का?

Taxonomy upgrade extras: 

ब्राह्मणानविरुद्ध सर्व बाजूंनी रान उठविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यानविषयी मी माझ्या परीने बाजू मांडण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे. आणखीन त्यात मला अपयश आले आहे. या बेबसाईटवर मी याविषयी एक लेख लिहिला होता. आणखीन माझ्या फेसबुक खात्यावरही मी लिहिले आहे. पण हे सारे करीत असताना आपलेच लोक मला मुर्ख ठरवितात. काही लोकांना वाटत आहे की, जे कोणी ब्राह्मणानविरोधात लिहितात अथवा बोलतात त्यांना प्रति उत्तर देण्याची गरज अजिबात दिसून येत नाही. ज्या वेबसाईटी या विषयी लिहितात त्यांच्याबद्दल बोलू नये. पण मी म्हणते की, आपण बोललो नाही, म्हणून या लोकानचे कार्य थांबते का? तर उत्तर नाही असेच येते ना?

माकडचाळे

Taxonomy upgrade extras: 

मानव व माकड ह्यांचा पूर्वज एकच होता असे म्हणतात. म्हणूनच पब्लिक माकडचाळे करायचं सोडत नसेल.
विविध वेळी आपण काहीतरी गमतीजमती करतो, निसर्गदत्त मूर्खपणा दागिन्याप्रमाणे वागवतो.
कधी कधी ऑक्वर्ड, अवघडलेल्या प्रसंगात जातो.
असे तुमचे काही प्रसंग आहेत का ? (कींवा इतरांचे तुम्हला ठाउक आहेत का?)
चला, मानवी मूर्खपणाचा एनसायक्लोपिडिया बनवूया.
प्रसंग एक :-
मेघु तैंच्या हापिसात एक विदेशी सद्गृहस्थ महिलांच्या रेस्ट रूम मध्ये शिरले!
.
.
प्रसंग २:-
मनोबांनी साखर समजून तुरटी घातली सरबतात, लाइट गेलेली असल्यामुळं.
.
.
तुमच्या प्रस्म्गांची सुरु वात अक्रा.
तोवर मीही माझे टंकतोय.

सण म्हटलं की निसर्गाला त्रास द्यायलाच हवा का?

Taxonomy upgrade extras: 

याविषयावर खूप आधीपासून लिहायची इच्छा होती, पण आज मकर संक्रांतीचं निमित्त मिळालं. आपण वर्षभरात एवढे छोटे-मोठे सण साजरे करतो, पण त्यातल्या देशाभरात मोठ्या प्रमाणावर साज-या होणा-या जवळ जवळ प्रत्येक सणामध्ये आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात निसर्गाचं नुकसान करत असतो. लेखनामागचा आशय शीर्षकावरून स्पष्ट होत नसेल तर - 'आक्षेप सण साजरे करण्याला नसून साजरे करण्याच्या पद्धतीला आहे.' असा आहे.

गविकाकाचा सल्ला

Taxonomy upgrade extras: 

पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किम्वा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात.
त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला.
तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल.
एक टेम्प्लेट केस येथे देत आहे.

प्रश्न
काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत.
मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं.

अरुणराव, का जगायचं?

Taxonomy upgrade extras: 

अरुणरावानं इथे का जगायचं हे सांगावं.
त्यासंबंधित प्रश्नांसाठी हे प्लेस होल्डर राहील.
शिवाय साइड्-बाय्-साइड विज्ञान विरुद्ध धर्म अशी नेहमीचीच यशस्वी फायटिंग खेळली तरी चालेल,.
तिथे वैज्ञानिक माहितीच्या धाग्यात, त्या पाण्याच्या धाग्यात, अवांतराचे जलप्रदूषण नको.

अरुणराव, बोला...
का जगायचं?

--मनोबा

पाने

Subscribe to RSS - सामाजिक