सामाजिक

कशाला हवे आरक्षण ?

Taxonomy upgrade extras: 

मा।झा जल्म स्वातंत्र्यानंतरच्या 30 सालाबादचा. तेव्हापासून मी इथे या ‘गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा’मध्ये प्रबळ ठोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते म्हणून मराठा जात समूहातील एकसे एक दांडगे नामचीन नेतृत्वधत्तुरे बहाद्दर पाहत लहानाचा जवान आणि जवानचा ओल्ड व्हायच्या मार्गावर आलो. मधल्या काळात एक सुशीलकुमार शिंदे नामक अजातशत्रू वादळ इथल्या राजकीय मराठा इतिहासात माफक वादळ उठवून गेले. शालिनीताई पाटलांनी थेट प्रतिगामित्व पत्करून या शूद्राचा आणि ज्यांनी त्या शूद्रास गादीवर बसविले त्यांचा सामायिक जहरी जातीय निषेध केला, हे आपण उघड पाहिलेच आहे.

पंचतारांकित अध्यात्म

Taxonomy upgrade extras: 

भारतात संत गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज ह्या सारखे महान संत होवून गेले. जनसेवा हीच ईश्वरसेवा असे मानणारे हे महान संत होते.संत गाडगे महाराजांनी आपल्या प्रवचनातून जन जागृती केली. परंतु आता काळानुसार संतांचे प्रकार बदलले आहेत आताचे तथाकथित संत हे पंचतारांकित झाले आहेत.

काकस्पर्श ऊर्फ बाजूला बसलेली बाई

Taxonomy upgrade extras: 

बरेच दिवस हा विषय डोक्यात होता. पण निमित्त अदितीच्या प्रतिसादाचं झालं. त्यामुळे या धाग्याचं पापपुण्य अदितीलाच लखलाभ. Wink
***

मासिक पाळीच्या अनुषंगानं येणारं तथाकथित अपावित्र्य, त्या दिवसांबद्दलचे गैरसमज, 'पण बायकांना ३ दिवस विश्रांती मिळते, उगाच नाही जुन्या लोकांनी नियम केले'छापाचे युक्तिवाद... हे सगळं इतिहासजमा झालं असा माझा गोड समज होता. पण एका मैत्रिणीच्या कुटुंबीयांसोबत थोडं पर्यटन करण्याचा योग आला आणि माझा समज रीतसर उद्ध्वस्त झाला.

जातीभेद: इष्टता व अनिष्टता

Taxonomy upgrade extras: 

व्यवस्थापक: श्री गब्बर सिंग यांच्या मते जातीभेद हा इष्ट आहे असा युक्तीवाद ते करू शकतात(संदर्भ) त्यांची या दृष्टीकोनातून असलेली भुमिका अधिक विस्ताराने मांडली जावी व त्यावर खंडन-मंडनाद्वारे सांगोपांग चर्चा व्हावी या उद्देशाने हा प्रतिसाद मुळ धाग्यापासून वेगळा करत आहोत. श्री गब्बर सिंग यांना विनंती आहे की आपले मत या धाग्यात बदल करून अथवा प्रतिसादांत अधिक विस्ताराने मांडावे.

भेदभाव

Taxonomy upgrade extras: 

आजकाल शहरी भागात बऱ्याच सोसायट्यांमध्ये घर खरेदी करताना किंवा भाड्याने देताना ती व्यक्ती विशिष्ठ जाती धर्माची असेल तरच प्राधान्य दिले जाते. इतरांना त्या सोसायटीत घर घेण्यास व भाड्याने येण्यास अघोषित अशी बंदी असते.

ऐसी अक्षरे करांचं संमेलन

संपादकः सदर एकोळी धागा इथे हलवला आहे.

Taxonomy upgrade extras: 

स्त्रीवाद, फायनॅशियल सेक्युरीटी वैगेरे

Taxonomy upgrade extras: 

धागा असंबद्ध होत नाहिये याची काळजी संपादिकेने नघेता धागा वेगळा काढल्यामुळे आणि "मुलगी बघायाला जाणे-->लग्न होणे --> मग ते मोडणे" हाप्रवास अवांतर कसा याचे उत्तर न मिळाल्यामुळे प्रतिसाद काढुन घेण्यात आलेला आहे. क्षमस्व!

(व्यवस्थापकांची नोंद - मूळ धाग्यातली अवांतर चर्चा इथे हलवली आहे. सिफर यांनी हवंतर चर्चाविषयातच अधिक भर घालावी किंवा प्रतिसादांमधून भर घालावी.)

घर बदलणे

Taxonomy upgrade extras: 

घर बदलणे ही किचकट क्रिया आहे. जिथे घर घ्यायचे आहे तिथे जाऊन अगोदर शंभर चौकश्या कराव्या लागतात. मग घर फायनल करायचे. अगोदरच्या घरमालकाला एक दोन महिन्यांची नोटीस द्यावी लागते. तारीख ठरवावी लागते. दुसर्‍या घरमालकाशी करार करावा लागतो. त्याचे रजिस्ट्रारकडे पंजीकरण करावे लागते. पहिल्या घरातून टीव्ही, ए सी, आर ओ, इ इ उतरावून ठेवावे लागते. पहिल्या घरात पंखे होते, दुसर्‍यात नाहीत, ते घ्या. पडदे घ्या. ट्रान्सपोर्ट ठरवावा लागतो. कुठे गॅस असतो तर कुठे पी एन जी. ते पहावे लागते. मुलाला नविन शाळेत अ‍ॅडमिशन द्यावे लागते. त्याच्या प्रवासाची वेगळी व्यवस्था लागली तर ती पाहावी लागते.

चमत्कारांच्या आडची वास्तवं

Taxonomy upgrade extras: 

सणसमारंभसोहळे कसे नात्यागोत्याच्या मित्रपरिवाराच्या गर्दीघोळक्यांनी ओसंडून वाहताना दिसतात. अगदी तिर्‍हाईतांना हेवा वाटावेत असे. आणि त्यांच्या आत मात्र ठासून भरलेले असतात मानापमान, हेवेदावे, अपेक्षा आणि अपेक्षाभंगाची नाटकं... व्यवहाराचा एक अत्यंत कुरूप आणि सडका चेहरा या उत्सवाच्या मुखवट्यामागे लपलेला...

संकटं आणि अडचणी येतात, तेव्हा हेच सगळे लोक न जाणे कुठे अदृश्य होतात... दिसतच नाही. पूर्ण ग्रहण. आणि मग कधीतरी दिसलेच तर आपल्यावर ओझं पडणार नाही, अशा अवस्थेचे खात्री झाल्यावर उगवलेले दिसतात. सगळं निस्तारल्यावर तर कुणी चमकतातही झकास.

भाषिक, प्रांतिक, जातीय, इ. इ. अस्मिता

Taxonomy upgrade extras: 

अवांतरात मोडेल पण एक किस्सा सांगितल्याशिवाय रहावत नाही.

स्थळः कोथरूडमधल्या एका डॉक्टरांच्या क्लिनिकची वेटिंग रूम. एक हुच्चभ्रू मध्यमवयीन मराठी महिला येते आणि शेजारच्या खुर्चीवर बसते. चेहेर्‍यावर चिंता करते विश्वाची छाप भाव. अचानक माझ्याकडे वळते:

हुममः मला एक सांगा...डॉक्टरांचं नाव करमाळकर आहे का करळकर?
मी: (स्वगत) त्याने काय फरक पडतो, मावशी. औषध गिळा आणि गप पडा की. (प्रकट) काही कल्पना नाही.
हुममः विचारून घ्यायला पाहिजे त्यांना.
मी: (न रहावून) पण त्याने काय फरक पडतो?

पाने

Subscribe to RSS - सामाजिक