चित्रपट

"पॅरीस कॅन वेट" हल्काफुल्का पण देखणा चित्रपट

बऱ्याच दिवसांनी एखादा निवांत आणि सुंदर चित्रपट पहायला मिळाला आणि लिखाणासाठी हात सरसावला.
"पॅरीस कॅन वेट" हि खरं तर दूरदेशी घडणाऱ्या परिकथेसारखी कथा.
भारतात राहणाऱ्या आणि चित्रपटात दाखवलेल्या जीवनशैलीपेक्षा खूप वेगळं, साधंसुधं जीवन जगणाऱ्या माझ्यासारख्याला हि कथा हा चित्रपट आवडावा यामागचं कारण काय असावं बरं?

या प्रश्नाचं उत्तर शोधणं हा खरा हेतू या चित्रपटाचं परीक्षण करण्यामागं आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

The purge

मन शुद्ध करण्यासाठी कायद्याचा कोणताही वचक किंवा कोणतीही मदत उपलब्ध नसताना एक रात्र म्हणजे तब्बल बारा तास येथेच्छ धुमाकुळ म्हणजे The Purge. ज्या व्यक्तीं/समुहाबद्दल राग/चीड आहे, त्यांचे सर्रास मुडदे पाडणे म्हणजे The Purge.
जवळपास एकाच घरामध्ये घडणारे हे कथानक एका कुटूंबावर चित्रीत केलेले आहे. या कुटूंबातील कर्ता पुरुष Purge मधल्या सांभाव्य हल्ल्यांपासून बचावासाठी उपयुक्त अशा संरक्षण यंत्रणा विकत असतो.

समीक्षेचा विषय निवडा: 

Guilty By Suspicion

आपल्यापैकी बरेच जण इतिहासात रमतो, तसा मी देखील रमतो. एखाद्या देशाचा, क्षेत्राचा इतिहास आपल्याला ढोबळ मानाने माहिती असतो. बऱ्याचदा पुस्तके, चित्रपट, पर्यटन यातून या इतिहासाचे अनेक कंगोरे, पदर आपल्यासमोर उलगडले जातात. कधी जाणूनबुजून हे असे वेगवेगळे पैलू समजून घेण्याचा केलेला प्रयत्न असेल किंवा सहजच आपसूक ते समोर आलेले असेल, ही खरं तर अलीबाबाची गुहाच असते. परवा असेच झाले. Guilty By Suspicion नावाचा, १९९१ मधील, तसा जुना, चित्रपट पहिला. प्रमुख व्यक्तिरेखेच्या भूमिकेत प्रसिद्ध नट Robert Di Niro हा होता, हो, तोच तो The Godfather II फेम.

समीक्षेचा विषय निवडा: 

डंकर्क- युद्धभूमीवर !

सिनेमा म्हणजे फक्त गोष्ट नाही . सिनेमाला तांत्रिक अंगेही असतात . आपल्याकडे प्रेक्षकांना सिनेमाची गोष्ट हीच महत्वाची वाटते. त्यात काही चुकीचे नाही . कारण सिनेमा बघायला जाताना माणूस एक नवीन गोष्ट काय आहे हेच बघायला जातो . पण या तांत्रिक गोष्टींचा आस्वाद घेता आला तर अनेक गोष्टी हाती लागू शकतात. ख्रिस्तोफर नोलनचा 'डंकर्क ' हे त्याचं उत्तम उदाहरण .

समीक्षेचा विषय निवडा: 

प्राय‌म‌र: त‌र‌ल, तांत्रिक थ‌रार

आजूबाजूचे चित्र‌प‌ट पाह‌त अस‌ताना, ख‌र‌ंच बुद्धिम‌त्तेला चाल‌ना देतील असे चित्र‌प‌ट पाह‌ण्याची उर्मी दाटून येणं स्वाभाविक आहे. हॉर‌र, मिस्ट‌री ह्यांनी तो कंडू श‌म‌त नाही. मेंदू अजून माग‌त अस‌तो. इंट‌र‌स्टेलार, आय‌डेंटिटी, डॉनी डार्को सार‌खे चित्र‌प‌ट ज‌रा क‌र‌म‌णूक क‌र‌तात प‌ण त्यांचा, त्याच त्या अंधाऱ्या बोळात‌ल्या क‌हाण्या, आणि संथ चाल‌लेल्या गोष्टींचाही कालांत‌राने कंटाळा येतो. हिंदीत‌ल्या जॉनी ग‌द्दार, आ देखें ज‌रा व‌गैरेंचा इथे उल्लेख‌ही न केलेला ब‌रा.

समीक्षेचा विषय निवडा: 

शोधिता लावण्य थोरवें

समीक्षेचा विषय निवडा: 

झाडे लावणारी बाई

नुकताच जागतिक पर्यावरण सप्ताह साजरा झाला. नेमिची येतो पावसाळा या उक्ती प्रमाणे पावसाळ्याच्या तोंडावर येणाऱ्या पर्यावरणजागृती साठी केला जाणारा हा खटाटोप, जागर परत एकदा संपन्न झाला. झाडे, वृक्ष, जंगले यांचे महत्व आपल्या संस्कृतीत आधीपासूनच आहे, जसे की देवराया, ज्या मुळे वृक्षांचे जतन, संवर्धन होते. तो जीवनाचा एक भागच आहे. पण गेल्या काही वर्षांत औद्योगिकरणामुळे बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगलांचा ऱ्हास झाला आहे आणि त्याचे परिणाम आपण पाहतोच आहोत. पश्चिम घाट बचावो सारखी आंदोलने देखील झाली आहेत. पुण्यात नुकत्याच मेट्रो वाहतुकीचा प्रकल्प सुरु झाला, आणि त्यामुळे झालेली वृक्ष तोड ताजी आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

पहिला ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल- एक अभिप्राय

प्रेरणा- चिंतातुर जंतू यांचे आवाहन: http://www.aisiakshare.com/node/5574#comment-147687

नुकतंच नागपुरात भरवण्यात आलेल्या पहिल्या ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलला (27 ते 29 जानेवारी) उपस्थित राहण्याचा योग आला. या नेटक्या आणि सफल आयोजनाबद्दल आधी आयोजकांचे अभिनंदन. विशेष म्हणजे यात ऐसीकर चिंतातुर जंतू अथ पासून इतिपर्यंत धावपळ करत सामील होते. त्यांना 'याची देहि याची डोळा' बघण्याचा व भेटण्याचा योग आला. वेळेअभावी मैफिल बसवता आली नाही . असो. महोत्सवावरचा हा थोडक्यातला अभिप्राय.

समीक्षेचा विषय निवडा: 

दोन अधिक दोन - एक अस्वस्थ वर्तमान

"दोन अधिक दोन किती"? हा प्रश्न एखादी गोष्ट किती सोपी असावी त्याची न्यूनतम पातळी दाखवण्यासाठी वापरला जातो. जसा इंग्रजीत "इटस नॉट रॉकेट सायन्स" हा वाक्प्रचार वापरून 'रॉकेट सायन्स' ही समजण्याची कठिणतम पातळी असल्याचे दाखवतात तसे.
हा आठेक मिनिटांचा लघुचित्रपट (https://www.youtube.com/watch?v=EHAuGA7gqFU&feature=youtu.be) तुम्हांला विचार करायला लावतो. आणि विचार करायला लावतो. आणि विचार करायला लावतो.
चित्रपट आजचा नाही. २०११ सालचा आहे. पर्शियन भाषेत केलेला आहे, पण सबटायटल्स आहेत (ती नसती तरी फार बिघडले नसते).

समीक्षेचा विषय निवडा: 

म्हारी छोरिया छोरोंसे कम है के ? ('दंगल' समीक्षा)

(मी जिथे मोठे स्पॉइलर्स आहेत तिथे तसे लिहिलेले आहे .बायोपिक असल्यामुळे त्यात रहस्य काही नाही . पण तरी चित्रपटातले काही तपशील उघड होऊ शकतात. ज्यांना पूर्ण कोरी पाटी हवी आहे त्यांनी चित्रपट बघितल्यावरच वाचावे.)

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - चित्रपट