विज्ञान

ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट: अर्थात आपल्या परसातील पक्ष्यांची मोजणी

येत्या १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या दरम्यान जगभरात 'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट' होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही थोर करायचं नाहिये तर या चार दिवसांत तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला जे जे पक्षी दिसले त्या त्या पक्षांची नोंद करून ती तुम्ही www.ebird.org वर करायची आहे.

पाणी, जड पाणी आणि मंतरलेले पाणी - पूर्वार्ध

टेलिव्हिजनवर चाललेला एक 'माहितीपूर्ण' किंवा 'ज्ञानवर्धक' कार्यक्रम पहात असतांना त्यातल्या तज्ज्ञ व्यक्तीने सांगितले की "पाणी तापवल्यामुळे पाण्यावर अग्नीचे संस्कार होऊन अग्नीचे काही गुणधर्म पाण्यात उतरतात आणि ते पाणी प्याल्याने ते गुण आपल्या शरीराला मिळतात, त्यापासून पचन सुधारते वगैरे." निदान हे विधान तरी माझ्या पचनी पडले नाही. यावरचे माझे विचार मी 'अग्नी आणि संस्कार' या लेखात व्यक्त केले होते आणि हा लेख या संस्थळावर टाकला होता. त्यावर सुजाण वाचकांच्या खूप प्रतिक्रिया आल्या, पण त्यातले एक दोन अपवाद सोडता इतर कुणीही 'अग्नी' किंवा 'संस्कार' याबद्दल फारसे लिहिले नव्हते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

"ब्रेकिंग न्यूज" - कृष्णविवरं नाहीतच - स्टीफन हॉकिंग

कोणी अंतराळवीर जर कृष्णविवरात पडला तर? कृष्णविवर म्हणजे काही बोअरवेलचा खड्डा नव्हे की ज्यात कोणी प्रिन्स पडला तर संपूर्ण देशातली माध्यमं त्याबद्दल बातम्या दाखवू शकतील. हे एक बरं. आणि दुसरी चांगली गोष्ट अशी की या प्रश्नाचा विचार करून काही शास्त्रज्ञांचं पोटही भरतं.

---

धाग्याचा प्रकार निवडा: : 

उष्णता

गेले चारेक दिवस उत्तर अमेरिकेत आलेली थंडीची लाट हा विषय स्थानिक माध्यमांमधे हॉट आहे. त्यातच अग्नि आणि संस्कार धाग्यातही हा विषय चर्चेला आलेला आहेच. उष्णता म्हणजे काय, थंड-गरम, तापमान या संकल्पना समजून घेण्यासाठी हा धागा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

वैमानिकांना विमानाची दिशा बदलावी लागते का?

विमान जर एका रेषेत उडत असले तर ते स्पर्शिकेच्या दिशेने पृथ्वीबाहेर जाईल
जाणार नाही, तितकी ताकद विमानाच्या इंजिनात नसते. काळजी नसावी.
वैमानिकांना विमानाची दिशा बदलावी लागते का? (म्हणजे दिल्ली ते शिकागो विमानाला १८० अंशातून वळवावे लागते का? कि ते आपोआप गुरुत्वाकर्षणाने वळते? दिल्ली शिकागो सरळ हवाई (?) मार्ग पृथ्वीच्या पोटातून जातो.)
नेमकं गवि सांगतील. पण विमान वळवण्याची सोय असते.

(या धाग्यातली चर्चा वेगळी काढली आहे.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 

आपल्या शरीरातील छुपी घड्याळे

मागच्या महिन्यात माझ्या जुन्या शाळासोबत्यांबरोबर एक संध्याकाळ गप्पा गोष्टींमध्ये घालवण्याचा योग आला. आता हे सर्व शाळा सोबती वयाची सत्तरी ओलांडलेले असल्याने, या स्वरूपाच्या गप्पागोष्टींमध्ये आताशा होते तसेच त्या दिवशी झाले व गप्पांचा रोख आमच्या तब्येती व वयोमानानुसार येणार्‍या व्याधी यांकडे वळला. त्या वेळेस माझ्या सहजपणे हे लक्षात आले की तेथे जमलेल्या आम्हा 8/10 मित्रांपैकी बहुतेक जण आता चष्मा वापरत होते. काही जणांच्या डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली होती. निदान चौघांना तरी मधुमेह होता व त्यासाठी नियमित औषधपाणी करावे लागत होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

लाजाळू देवकण आणि त्यांचा तितकाच लाजाळू शोधक

मला वाचकांना अनेक खर्व किंवा निखर्व वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका क्षणापर्यंत मागे न्यायचे आहे. हाच तो क्षण होता की ज्या क्षणी या विश्वाची निर्मिती, वैश्विक महास्फोट किंवा बिग बॅन्गमुळे झाली होती. या क्षणानंतर लगेचच हे प्रसरण पावणारे विश्व, प्रकाशाच्या वेगाने इतस्ततः फेकल्या जाणार्‍या आणि संपूर्णपणे वस्तूमान विरहित असलेल्या तेजकणांनी भरून गेले होते. परंतु याच्या पाठोपाठ किंवा एका निखर्वांश सेकंदानंतर, अशी एक अगम्य घटना घडली की ज्यामुळे संपूर्णपणे वस्तूमान विरहित असलेल्या या तेजकणांपैकी काही तेजकणांना अचानक वस्तूमान प्राप्त झाले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

विकीपंडीत किंवा गूगलपंडीत ?

सध्याच्या इंटरनेटप्रणित युगात, इंटरनेट हे माहितीचे मायाजाल न राहता माहितीचा अफाट स्रोत झाले आहे. त्याचा वापर करून कोणीही कुठल्याही विषयाची माहिती मिळवून, त्या माहितीचा यथायोग्य वापर करून, त्या माहितीचा मानवजातीसाठी योग्य उपयोग करू शकतो. जसे विज्ञान हे शाप किंवा वरदान होऊ शकते त्याचप्रमाणे इंटरनेटवरच्या अफाट माहितीचा हा सागर त्याचा वापर कसा करू त्याप्रमाणे उपयोगी किंवा दुरुपयोगी ठरू शकतो. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अबलंबून आहे. कोणाला अर्धा भरलेला ग्लास 'अर्धा रिकामा' असा दिसू शकतो किंवा 'अर्धा भरलेला' दिसू शकतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

आकाशगंगेच्या मध्यभागी असणारा मॅग्नेटार

मुख्य बातमीआधी काही संज्ञांचं स्पष्टीकरणः

धाग्याचा प्रकार निवडा: : 

पाने

Subscribe to RSS - विज्ञान