विज्ञान

टू डी वर्ल्डच्या अद्भुत दुनियेत!

आपल्यातील अगाध परंतु मर्यादित बुद्धीमत्तेच्या कुवतीनुसार आपण लांबी, रुंदी व उंची या त्रिमिती (व काळ ही चौथी मिती) विश्वात राहणारे प्राणी आहोत याची आपल्याला कल्पना आहे. परंतु विज्ञान कथालेखक मात्र अनेक वेळा बहुमिती विश्वात आपल्याला नेतात व तेथील चक्रावून सोडणाऱ्या गोष्टीतून आपले मनोरंजन करत असतात. त्यांच्या मते त्या बहुमिती विश्वातील माणसं आपल्यापेक्षा जास्त बुद्धीमान असतात. मेंदूला थोडे जास्त ताण दिल्यास विज्ञान कथालेखक वर्णन करत असलेल्या बहुमिती विश्वाची आपण कल्पना करू शकतो व त्यात राहणाऱ्या सूपरइंटेलिजेंट प्राण्यांच्या जीवनाचा वेध घेऊ शकतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

विज्ञान (व तंत्रज्ञान) शिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन

श्रद्धेच्या प्रांतातील विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी उत्साही बुद्धीप्रामाण्यवादी चिकित्सक अनेक वैज्ञानिक पुरावे सादर करत असतात; प्रत्यक्ष प्रयोगांचे दाखले देत असतात; समीकरण मांडतात; सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचे दाखले देतात; ग्राफ्स काढून मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करतात. या त्यांच्या पुराव्यातून, दाखले - संदर्भातून भ्रामक विज्ञानाच्या आधारे चढवलेले श्रद्धेचे इमले कोसळू लागतील, असा एक (भाबडा) आशावाद या चिकित्सक कार्यकर्त्यांच्या मनात दडलेला असतो. परंतु सश्रद्धांच्या समोर हे सर्व पालथ्या घागरीवर पाणी ओतल्यासारखे होत असते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सन्मानाने मरण्याचा हक्क

जीवन व मृत्यु

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

लेफ्टी की रायटी?

काही माणसं डावखुरे का असतात? हा एक अती पुरातन काळापासून विचारत आलेला प्रश्न आहे. प्लॅटो, चार्ल्स डार्विन, कार्ल सॅगन, डेब्बी मिलमन, स्टीफन जे गूल्ड, नोअम चॉम्स्की, अल्बर्ट आइन्स्टाइन (आइन्स्टाइनला डावखुर्‍यांच्या कळपात ओढण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

विपश्यना: माझा प्रत्यक्ष अनुभव: अद्ययावत

मी मिसळपाववर एका प्रश्नाचे उत्तर दिले आहे. माझ्या मते ज्यांना विपश्यनेची काहीच माहीती नाही त्यांना ती या लेखातुन होउ शकेल. तो उतारा जसाच्या तसा ईथे देत आहे. मी प्रथमच ईकडे लेख टाकतोय. जर नियमात बसत नसेल तर काय योग्य असेल ती कारवाई करावी.

लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनातून इरेज करणं अशक्य आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कंपोस्टबद्दल

बागकामाच्या धाग्यात कंपोस्टबद्दल हा एक प्रतिसाद दिला, पण त्याबद्दल चर्चा शोधायला सोपं पडावं म्हणून हा नवा धागाच सुरू करत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

गुरुत्वीय लहरी - अलिकडे काय संशोधन सुरू आहे?

मार्च महिन्यापासून खगोलशास्त्राच्या क्षेत्रात बरीच खळबळ सुरू आहे, आणि याचं कारण काही स्कॅम नाही. उलट आत्तापर्यंत जो प्रचलित सिद्धांत होता त्यात दोन मोठ्या आणि इतर बऱ्याच बारीक उणीवा आहेत. त्यातली एक उणीव काही प्रमाणात भरून काढणारं हे संशोधन आहे. या संशोधनाचं महत्त्व असं की कोणत्याही मानवनिर्मित उपकरणातून, अगदी 'सर्न'मध्येही, अतिप्रचंड ऊर्जा-तापमान तयार करता येत नाही, त्यामुळे त्या परिस्थितीत भौतिकशास्त्राचे नियम तपासता येत नाहीत, अशा अतिप्रचंड प्रक्रियेचं निरीक्षण केल्याचा दावा शास्त्रज्ञांच्या एका गटाने केला आहे. सकृतदर्शनी हा दावा मान्य करण्यासारखा आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अ‍ॅकलेशिया कार्डिया - एक जिवंत अनुभव--१

लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अ‍ॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

श्रद्धा - धार्मिकांचा प्लॅसिबो

श्रद्धेचा रिमोट वापरून प्रत्यक्षात एक बारिकसा खडासुद्धा आपोआप एक सेंटीमीटर मागे-पुढे सरकवता येत नाही हे माहित असूनसुद्धा श्रद्धा असल्यास डोंगर चालत चालत चढू शकतो अशी बढाई मारणारे भरपूर जण आहेत. श्रद्धेमुळे नाट्यपूर्ण घटना घडत असतात असे छातीठोकपणे सांगणारे अनेक लोक आपल्याला नेहमी भेटत असतात. गंगेचे पाणी पिल्यानंतर अनेक दुर्धर रोग बरे झाले आहेत असे सांगणारे लोक आपल्याला नक्कीच भेटले असतील. पार्वतीमाँने पोटावर हात फिरवल्यानंतर बाईची पाळी चुकली व पोट दिसण्याइतपत पुढे आले होते असे (शपथेवर!) सांगितलेल्या शेकडो बायका महाराष्ट्र - गुजरात येथे सापडतील. शेवटी पोटात मूल नव्हतेच, हा भाग वेगळा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

दूरचित्रवाणीवरील नवी क्रांती

अलीकडे संध्याकाळचा टीव्ही मालिकांचा माझा रोजचा रतीब एकदा टाकून झाला आणि नंतर थोडा वेळ आपल्या पार्टीचे पारडे वर जावे म्हणून एकमेकाशी खोटी खोटी भांडणे करणारे राजकीय पार्ट्यांचे प्रवक्ते आणि स्वत:ची हुशारी दाखवणारे टीव्ही अ‍ॅन्कर यांच्यामधली तथाकथित भांडणे आणि वाद-विवाद बघून झाले की मी दूरचित्रवाणी वाहिन्या बघणे बंद करतो व इंटरनेट टीव्ही या नावाने ओळखले जाणारे एक नवीन उपकरण चालू करतो. खरे सांगायचे झाले तर या नवीन उपकरणाने माझ्यावर एवढी छाप टाकली आहे की या उपकरणाला मी आता दूरचित्रवाणी मधील एक नवीन क्रांती असेच मानायला सुरूवात केली आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

पाने

Subscribe to RSS - विज्ञान