तंत्रज्ञान

दुहेरी प्रमाणीकरण वापरून आपले गुगल खाते सुरक्षित कसे ठेवावे

दुहेरी प्रमाणीकरण वापरून आपले गुगल खाते सुरक्षित कसे ठेवावे
                                                                                    
   टीप: लेख प्रिंट करायचा असेल तर इथे क्लिक करा.
           
धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

फेसबुकवरचे आश्चर्यकारक जाहिरातविश्व : रु. १२० खर्चून प्राप्त झालेले ज्ञान

या लेखाची पीडीएफ लिंक

नमस्कार,

आमचा सध्या चालू असलेला उपक्रम, म्हणजे वेगवेगळ्या खेळांचे नियम सांगणारी वेब सिरीज, हिची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी म्हणून काय करता येईल याचा आम्ही विचार करत होतो. वॉट्सअप वर सर्वाना लिंक पाठवूनही व्यूझ फारसे वाढेनात, म्हणून कोणीतरी सजेस्ट केलं फेसबुकवर लिंक टाकून पहा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

काही ऑनलाईन पथ्ये

बरेच दिवस केंब्रिज ॲनॅलिटिका, फेसबुक आणि माहितीची चोरी ह्यावर प्रचंड चर्वितचर्वण सुरु आहे. सगळे हिरीरीने एकमेकांची अक्कल काढण्याची चढाओढ लावत आहेत. तंत्रजगताच्या प्रत्येक इव्हॉल्युशनरी स्टेजशी अगदी तोंडओळख असलेले; मिलेनिअल्सच्या आधीचे, केविलवाणेच असे- १९८०-२००० ह्या काळात जन्म झालेल्या लोकांचे स्ट्यांड वेगळे आहेत. आम्ही तो फक्त एकच लँडलाईन असलेल्या जगात वावरलेलो आहोत, पेजर, ब्लॅक ॲण्ड व्हाईट ठोकळा फोन, मग कलर फोन, मग मुजिक/क्यामरा/अँड्रॉईड/टच्चस्क्रीन फोन इ. प्रचंड झेपा साधारण २००३-४ नंतर प्रत्येक वर्षी पाहिलेल्या आहेत, हाताळलेल्या आहेत. हीच पिढी सध्या इंटरनेटवर ठाण मांडून आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

शैक्षणिक तंत्रज्ञान 1

आम्ही अमेरिकेतले 'मागासलेले' पालक असल्यामुळे आपल्या मुलाला ६ वर्षाचा होई पर्यंत फोन, टॅबलेट वगैरे पासून दूरच ठेवलं होतं. टीव्ही कधी दाखवला, तर त्यावर वेळेचं बंधन असायचं, आणि मनामध्ये प्रचंड अपराधीपणाची भावना, कारण तिकडे स्वयंपाक करतांना मध्ये लुडबुड नको म्हणून टीव्हीचा "बेबीसिटर" लावला जायचा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

ऑनलाइन डेटाचे मृत्यूपत्र

आजकाल बहुतांश लोक अँड्रॉइड प्रणालीवर चालणारे फोन वापरतात ज्याचा सर्व डेटा Google कडे सुरक्षित साठवला जातो. यामध्ये तुम्ही दिलेल्या भेटी(location), Google drive वर साठवलेले कागदपत्रे, छायाचित्रे, आलेले व पाठवलेले ई-मेल, जतन केलेले पासवर्ड इत्यादींचा अंतरभाव होतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

uBlock Origin - भडक सायटींपासून आणि नको असलेल्या जाहिरातींपासून सुटका

* म्यू ब्लॉक ओरिजिन काय आहे?

या ब्राउझर एक्सटेंशन चा वापर करून तुम्ही तुम्हाला दिसायला आवडत नसलेल्या वेबसायटींना सुधारू शकता. जसे कि फेसबुक मधून साईडबार गायब करणे. फ्रेंड सजेशन गायब करणे वगैरे वगैरे.

तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती सुद्धा तुम्ही वेबपेजेसवरून गायब करू शकता.

जर एखादी वेबसाईट तुम्हाला ब्राउझर मधून ओपन होऊ द्यायची नसेल - तर तिला नेहमीसाठी ब्लॉक पण करू शकता.

(हे एक्सटेंशन क्रोम डेस्कटॉप, फायरफॉक्स वर चालते पणअँड्रॉइड वरच्या क्रोम वर चालत नाही)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

देवनागरी OCR - मदत हवी आहे

या धाग्यावर OCR - Optical Character Recognition बद्दल थोडी चर्चा झालेली आहेच.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

टेस्ला वि. कार डीलर्स: एक डिस्रप्शन व त्याला होत असलेला विरोध

टेस्ला च्या कार विकण्यासंबंधी एक लेख नुकताच वाचला. मी पूर्वी टाटा मोटर्स (तेव्हाची "टेल्को") मधे काही वर्षे काम केलेले असल्याने एकूणच ऑटो इण्डस्ट्री तील बातम्यांबद्दल अजूनही कायम कुतूहल असते. तेव्हा मी टेल्को च्या सॉफ्टवेअर डिव्हिजन मधे सप्लाय चेन एरिया मधे - वाहने बनवायला लागणारा माल सप्लायर्स कडून कंपनीत येण्याबद्दलची प्रक्रिया- काम करत होतो. पुण्यातील प्लॅण्ट्स मधे उत्पादनावर जास्त फोकस होता.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

स‌ंस्थ‌ळाबाब‌त‌ आक‌डेमोड‌ - २

१०० जोर्दार‌ लेख‌क‌.

ऐसीव‌र‌च्या एकूण‌ ७ ह‌जार‌ लेखांपैकी कोण‌ आहेत‌ टॉप‌ लेख‌क‌?
हे घ्या. काही नाव‌ं अनपेक्षित‌ अस‌तील‌ त‌र‌ काही अपेक्षित‌. ब‌घा तुम्हीच‌.
(शुचीमामींचे सग‌ळे आय‌डी ह्यात‌ कुठेकुठे अस‌तील‌, ते एक‌त्र‌ क‌र‌ण‌ं माझ्या अवाक्यात‌ल‌ं काम‌ नाही, सॉरी!)
राकु - ह्यांनी तुफान‌ लेख‌न केल‌ंय‌ तेही इव‌ल्याश्या काळात‌. ते अधिक‌ काळ‌ राहिले अस‌ते त‌र‌ .. लोल‌.
ग‌ब्ब‌र‌ सिंगांच‌ं लेखन‌ ब‌हुतेक‌ "ही बात‌मी स‌म‌ज‌ली का" मुळे असावा असा सौश‌य‌ आहे.
मिलिंद‌भौंच्या क‌विता आणि काही एकोळी धागे अस‌ले त‌री नो स‌र‌प्राईज‌.

माहितीमधल्या टर्म्स: 

मोहीम - २ फलक

नमस्कार मंडळी,
मागच्या भागात आपण पॅम्प्लेटस इन्सर्शन ह्या जाहीरात मोहीमेचा एक भाग पाह्यला. जाहीरातीसाठी वापरला जाणारा आद्य प्रकार म्हणजे नाम फलक. ह्या फलकांचे विविध प्रकार आपण ह्या भागात जाणून घेऊ. विषयाची व्याप्ती बरीच असलेने सुरुवातीपासूनचे फलक ते विद्युत आकाश फलक (हो, अशा फलकांना परवानगी देणार्‍या विभागाचे अधिकृत नाव हेच आहे) असे प्रकार क्रमश: पाहुयात. ह्यासंदर्भात काही सूचना, दुरुस्ती असल्यास स्वागत आहे. माझ्या अल्पज्ञानाने अन अनुभवाने जेवढी माहीती आहे ती मी लिहायचा प्रयत्न करत आहे.
................................

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - तंत्रज्ञान