प्रतिसादांची श्रेणी

सहसंपादक आवडलेल्या आणि न आवडलेल्या प्रतिसादांना त्याप्रमाणे श्रेणी देऊ शकतात. प्रत्येक प्रतिसादाला 'श्रेणी' देता येईल. याला काही अपवाद आहेतः
१. स्वतः काढलेल्या धाग्यावर श्रेणी देता येत नाही.
२. एखाद्या धाग्यावर प्रतिसाद दिल्यास आपण श्रेणी देऊ शकत नाही आणि दिलेली श्रेणी हटवली जाते. (श्रेणी देण्याची सुविधा नीट सुरू झाल्यामुळे हे पुन्हा सुरू केलं आहे. काही दिवसांनी आलेल्या फीडबॅकप्रमाणे याचा पुनर्विचार करता येईल)
३. या श्रेणींच्या नावांवरूनच कोणत्या श्रेणी द्याव्यात हे स्पष्ट व्हावं. सध्या या श्रेणी आणि त्यांचे गुणांकन अशा पद्धतीने उपलब्ध आहेत:

 • सर्वसाधारण +१
 • अवांतर -१
 • भडकाऊ -१
 • खोडसाळ -१
 • निरर्थक -१
 • मार्मिक +१
 • रोचक +१
 • माहितीपूर्ण +१
 • विनोदी +१
 • कैच्याकै -१
 • उपेक्षित +१

या मॉड्यूलबद्दल थोडक्यातः
०. समूहाच्या शहाणपणावर हे मॉड्यूल आधारित आहे.
१. श्रेणी देण्याचा अधिकार नसला तरी किती श्रेणी आणि त्यावरचे प्रतिसाद वाचायचे हे सर्व सदस्यांना ठरवता येईल.
प्रत्येक धाग्याखाली लगेचच (मौजमजेचे धागे वगळता) आपल्याला किती श्रेणीच्या वरचे प्रतिसाद वाचायचे आहेत हे ठरवता येतं. उदा: काही सदस्य ५+ अशी त्या धाग्यापुरती श्रेणी ठरवू शकतात. ज्या प्रतिसादांना पाचापेक्षा कमी श्रेणी असे प्रतिसाद मिटलेले दिसतात. अशा एकेका प्रतिसादावर क्लिक करून ते प्रतिसाद उघडून बघता येतात; नाहीतर निव्वळ प्रतिसादाचा विषय आणि त्याची श्रेणी दिसते. कोणत्याही धाग्यावर वाचनासाठी डीफॉल्ट श्रेणी +१ असते; जी आपल्याला प्रत्येक धाग्यावर बदलता येते. श्रेणीची रेंज (मराठी?) -१ ते ५ अशी आहे; -१ निवडल्यास सर्व प्रतिसाद दिसतात.
उदा: "+3: 14 comments" याचा अर्थ त्या धाग्यावर तीन आणि त्यापेक्षा जास्त श्रेणी असणारे १४ प्रतिसाद आहेत.
एका धाग्यावर ही श्रेणी ठरवली की इतर धाग्यांवर तोच थ्रेशोल्ड ठरतो, जो आपण नंतर त्याच किंवा इतर धाग्यांवर बदलू शकतो.
२. श्रेणीप्रमाणे प्रतिसादाचं गुणांकन बदलतं.
३. मिळालेल्या श्रेणीप्रमाणे +१ अथवा -१ असं प्रतिसादाचं गुणांकन बदलतं. धाग्याच्या तळाशी आणि सर्व प्रतिसादांच्यावर, जिथे आपण थ्रेशोल्ड ठरवतो तिथे जे गुणांकन दिसतं ते मिळालेल्या श्रेणींची बेरीज असते.
४. प्रतिसादांसमोर त्याचं गुणांकन, उदा: Score:5 माहितीपूर्ण, याचा अर्थ मिळालेल्या श्रेणींची बेरीज ५ आहे आणि श्रेणी देणार्‍यांपैकी शेवटच्या सदस्याने 'माहितीपूर्ण' अशी श्रेणी दिलेली आहे.
५. श्रेणी देण्यासाठी प्रत्येक सहसंपादकाचं 'पुण्य' साठावं लागतं. पुण्य वाढवण्यासाठी लेख आणि प्रतिसाद असं लिखाण करावं लागतं,
६. श्रेणी दिल्यामुळे पुण्य 'खर्च' होतं. सर्व पुण्य खर्च झाल्यास श्रेणी देता येणार नाही.
७. सदस्याच्या खात्यावर त्याचा कर्म मूल्यांकन दिसतं.
८. अधिकाधिक सदस्यांना त्यांचे पुण्य पाहून सहसंपादक बनवण्यात येईल.
९. एकदा एका प्रतिसादाला दिलेली श्रेणी बदलता येत नाही.

प्रतिक्रिया

सेल्फ एक्स्प्लनेटरी= स्वयंस्पष्ट.

ही श्रेणीची भानगड प्रत्येक धाग्याखाली देण्याऐवजी सदस्याच्या खात्यातच देता येईल का?

-Nile

सेल्फ एक्स्प्लनेटरी= स्वयंस्पष्ट.

धन्यवाद.

ही श्रेणीची भानगड प्रत्येक धाग्याखाली देण्याऐवजी सदस्याच्या खात्यातच देता येईल का?

त्यात तत्वतः अडचण अशी आहे की प्रत्येक धाग्यासाठी एकच कट-ऑफ वापरावा लागेल, वापरायचा असेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येक धाग्यावर ही सोय असणं मला महत्त्वाचं वाटतं. बहुतांश सदस्यांचं म्हणणं पडलं की त्यांना हा कट-ऑफ वरच हवा आहे, तर ते सहज करता येईल.

समजा एखाद्या धाग्यावर कोणीही श्रेणी दिली नाही, पण बहुतांश/सर्व प्रतिसादच चांगले असतील तर अशा प्रतिसादांची श्रेणी +१ एवढीच असेल.

या धाग्याच्या प्रतिसादांवर मी आणि निळ्याला श्रेणीदान करता येणार नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओके! गॉटचा!

-Nile

मराठी आंतर्जालिय विश्वात हा एक नवा पायंडा आपण पाडताहात त्याबद्दल आपले हार्दीक अभिनंदन!! एक अतिशय चांगली योजना आहे, याने आवांतर प्रतिसाद, त्यावरचा दंगा यांना नक्कीच लगाम बसेल.
अभिनंदन. Smile

किंचित फरक आहे प्राजु. अवांतर आणि दंगा करायला ना नाही. फक्त ज्यांना अवांतर वाचायचं नाही त्यांना ते गाळता येईल अशी आशा आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा प्रकार नवीन आहे. कितपत उपयुक्त ठरतो ते काळच ठरवेल.

-१ पेक्षा खालच्या श्रेणी असाव्यात असे वाटते.

नुसत्या श्रेणीने प्रतिसादाची प्रत कळणार नाही.

-१ ही श्रेणी दोन प्रकारे दिली जाऊ शकेल. १. प्रतिसाद फालतू/अवांतर आहे (उदा. हॅ हॅ हॅ, चालू द्या वगैरे). २. प्रतिसाद हीन आहे (जातिवाच/डिस्क्रिमिनेटरी वगैरे). दोनात फरक करण्याची काही सोय देता येईल का?

आणखी सूचना.

जेव्हा प्र. का. टा. आ. असा प्रतिसाद असेल तेव्हा तो आपोआप डिलीट होण्याची सोय होईल का? किंवा प्रतिसादकाला तो (किंवा कोणताही स्वतःचा) प्रतिसाद काढून टाकायची सोय देता येईल का?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

-१ पेक्षा खालचा दर्जा (हीन आणि डिस्क्रिमिनेटरी किंवा अनावश्यकरित्या व्यक्तिगत) असल्यास असे प्रतिसाद अप्रकाशित व्हावेत. अर्थातच, मॉडरेटर्सना असे प्रतिसाद दिसत असल्याने ते पुनर्प्रकाशित करता येणे त्यांना शक्य असावे.

नितीन थत्ते म्हणतात तसं काळ ठरवीलच. पण प्रतिसाद गाळलेले आहेत, झाकलेले आहेत, हे समजल्यानंतर ते उघडून पहायची तीव्र इच्छा होणे हा मनुष्यस्वभाव आहे. त्यामुळे याचा कितपत उपयोग होतोय हे बघायला आवडेल.

कुठली श्रेणी कुणी दिलीय ते समजायची सोय आहे का?

उपयुक्तता काही काळानंतर समजेल याच्याशी सहमत आहे.

नितिन थत्ते:
भडकाऊ या प्रकाराचा जातिवाचक हा एक उपप्रकार समजता येईल. अनेकदा प्रतिसाद वाचून त्याला खोडसाळ म्हणणेही पुरेसे असेल.

जेव्हा प्र. का. टा. आ. असा प्रतिसाद असेल तेव्हा तो आपोआप डिलीट होण्याची सोय होईल का? किंवा प्रतिसादकाला तो (किंवा कोणताही स्वतःचा) प्रतिसाद काढून टाकायची सोय देता येईल का?

सध्यातरी हे थोडं ट्रिकी आहे. कोडमधे काही बदल करावे लागतील आणि त्याला बर्‍यापैकी वेळ लागू शकतो.

आळश्यांचा राजा:

प्रतिसाद गाळलेले आहेत, झाकलेले आहेत, हे समजल्यानंतर ते उघडून पहायची तीव्र इच्छा होणे हा मनुष्यस्वभाव आहे.

ज्यांना अवांतर प्रतिसाद, +१ प्रकारचे प्रतिसाद, इ वाचायचे नाहीत अशा लोकांची यातून सोय होईल हा सर्वात मुख्य उद्देश आहे. एखाद्या धाग्यावर मोजके प्रतिसाद असतील तर ते एकाच श्रेणीतले असण्याची शक्यता जास्त असते. पण जिथे प्रतिसादांचं शतक गाठलेलं असतं तिथे या चाळणीचा उपयोग होईल असा माझा तर्क आहे.

कुठली श्रेणी कुणी दिलीय ते समजायची सोय आहे का?

नाही, हा फक्त सांख्यिकी विदा आहे. सुपरयुजरलाही कोणी कोणती श्रेणी दिली आहे हे समजत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

श्रेणीची सुविधा चांगली, पण...
श्रेणीची बेरीज-वजाबाकी होते हे चांगलं नाही. एखाद्या प्रतिसादाला मी चांगलं म्हटलं आणि नंतर एखाद्यानं न-चांगलं म्हटलं तर श्रेणी शून्यावर जाते. त्याला अर्थ नाही. तो विशिष्ट प्रतिसाद 'क्ष' वाचकांना चांगला वाटला, 'य' वाचकांना न-चांगला वाटला, 'ज्ञ' वाचकाना सरासरी वाटला असे समजले पाहिजे. एव्हरेज आऊट केल्यानं काय साध्य होणार? एक साध्य होत असेल की त्याचा रेटिंगशी काही संबंध असेल. पण अंतिम फलनिष्पत्ती चुकीची. कारण चार आयडीनी चांगलं म्हणणं आणि चार आयडींनी न-चांगलं म्हणणं याचा अर्थ वेगळा असतो. तो एव्हरेजआऊट केल्यानं गवसत नाही. चार आयडींनी चांगलं आणि तीन आयडींनी न-चांगलं म्हटल्यानं प्रतिसाद चांगला ठरणार का? हे म्हणजे, शंभरापैकी पन्नास जणांचे मतदान आणि त्यापैकी २६ मतं मिळाल्यानं विजयी झालेला उमेदवार चांगलाच असं म्हटल्यासारखं होतं. तीच व्यवस्था आपण स्वीकारतो आहोत. मला ती पटत नाही.

>>एखाद्या प्रतिसादाला मी चांगलं म्हटलं आणि नंतर एखाद्यानं न-चांगलं म्हटलं तर श्रेणी शून्यावर जाते. त्याला अर्थ नाही. तो विशिष्ट प्रतिसाद 'क्ष' वाचकांना चांगला वाटला, 'य' वाचकांना न-चांगला वाटला, 'ज्ञ' वाचकाना सरासरी वाटला असे समजले पाहिजे. एव्हरेज आऊट केल्यानं काय साध्य होणार? <<

यामागची धारणा अशी असावी की समूहाचं शहाणपण (किंवा मूर्खपण) यातून प्रतिबिंबित व्हावं. जर प्रतिसाद देणार्‍याला अधिकाधिक चांगल्या श्रेणी मिळाल्या तर सरासरी गुण धन असतील, पण प्रतिसाद चांगला की वाईट याविषयी सदस्यांची परस्परविरुद्ध मतं असतील तर समूहाच्या शहाणपणाच्या कलानुसार प्रतिसाद न्यूट्रल राहील. पुरेसे सदस्य जेव्हा श्रेणी देऊ शकतील तेव्हा हळूहळू या समूहाची गुणवत्ता प्रतिबिंबित होईल अशी आशा करूया.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

समूहाची लायकी प्रतिबिंबित व्हावी हे कशासाठी? म्हणजे, समूहाची जाण वगैरे दाखवून काय साध्य होते?

बिपिन कार्यकर्ते

कार्यकर्त्यांचा प्रतिसाद कुणा एकाला खोडसाळ वाटला, मला तसा मुळीच वाटला नाही. त्यामुळे मोडक म्हणतात तसे इव्हन आउट मॉडेल योग्य वाटत नाही. एका सदस्याला हा प्रतिसाद खोड्साळ वाटला, तिघांना मार्मिक वाटला अशा प्रकारचे श्रेणीकरण करता येते का हे पहायला हवे.

तूच माझा खरा मित्र!

बिपिन कार्यकर्ते

हा प्रतिसाद अवांतर तर आहेच, पण तू च्या पुढे च लावल्यामुळे खोडसाळ्ही झालेला आहे. एकाच प्रतिसादाला एकच सदस्य अशा दोन दोन श्रेणी देऊ शकतो का?

>>समूहाची लायकी प्रतिबिंबित व्हावी हे कशासाठी? म्हणजे, समूहाची जाण वगैरे दाखवून काय साध्य होते?<<

ते एक प्रकारचं लोकशाहीकरण आहे असं म्हणता येईल. विनोदाचं वावडं असणार्‍या हुकुमशहांपेक्षा थोडा बदल असं मानून थोडे दिवस चालवून पाहा Wink

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्या व्यवस्थेमागच्या धारणेला माझी काहीही हरकत नाही. या संस्थळापुरते बोलायचे तर हे समूह शहाणपण म्हणजे अंतिमतः मूर्खपणा आहे हे सिद्ध होऊ नये. त्याचे कारण -
(थोडा राजकीय कल गृहीत धरून इथं लिहितोय).
पाच भगव्यांनी एखाद्या प्रतिसादाला चांगलं म्हणणं - मूल्य - ५.
चार डाव्यांनी त्याच प्रतिसादाला न-चांगलं म्हणणं - मूल्य - ४.
संस्थळावर सक्रिय डाव्यांची संख्या कमीच असते, हे या संवादात स्वीकारलं तर, तो प्रतिसाद चांगला ठरेल. आणि प्रतिसाद उलटा असेल तर याउलट निकाल असेल.
व्यक्तीशः मला एखाद्या प्रतिसादावरचा असा बहुसंख्येवर आधारलेला कौल नको. मला हे कळलं पाहिजे की, किती जण कसा कौल देताहेत. मी हे समजून घेईन की, पाच जणांना हा प्रतिसाद चांगला वाटला, पण चार जण न-चांगला म्हणणारेही आहेत.
ज्या हेतूने ही सुविधा करतो आहे, ती पूर्ण तडीपर्यंत न्यावी, हे उत्तम. हे मान्य की लगेचच हे शक्य होणार नाही. तसे कळावे, इतकेच.

तूर्तास तरी ही श्रेणी देण्याची क्षमता मोजक्या लोकांनाच देण्याचा विचार आहे. समूहाचा शहाणपणापेक्षाही निवडक (पण पुरेशा संख्येच्या) शहाण्यांनी घेतलेला हा निर्णय असेल. मर्यादित संख्येचे संपादक प्रत्येक प्रतिसाद वाचणार (आपापली कामं सांभाळून) त्यांवर चर्चाही करणार आणि ते काढण्याचा, न काढण्याचा निर्णयही घेणार हे एक टोक झालं. सर्वच जनता मतदान करून चांगलंवाईट ठरवणार हे दुसरं टोक. पहिल्यात मनुष्यबळ कमी पडण्याचा धोका आहे. दुसऱ्यात तुम्ही म्हणता तसं बहुमताने कावळा कोण आणि हंस कोण हे ठरण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा ज्यांना अनुभव आहे, जाण आहे अशा चाळीस-पन्नास लोकांनी आक्षेपार्ह व कौतुकास्पद लिखाण नोंदवून ठेवलं तर ते अधिक परिणामकारक ठरेल. सगळ्यांनीच संपूर्ण संपादकीय जबाबदारी उचलायची गरज पडणार नाही, संपादकांनाही निर्णय घेणं सोपं पडेल आणि एकंदरीत व्यवस्थापनाला निव्वळ कचरा काढत बसणं हेच काम करत रहावं लागणार नाही अशी आशा आहे.

दुसरी समूहाची चांगली गोष्ट म्हणजे दहा जणांनी एखाद्या प्रतिसादाला खोडसाळ म्हटलं तर ते तिथे इतर वाचकांनाही दिसत रहातं. जर श्रेणी देणारे प्रामाणिक असतील तर इतर वाचकांनाही 'घ्या, या अमुकतमुकने पुन्हा काहीतरी खोडसाळपणा केलेला दिसतो' असं लक्षात येतं. ही समूहासमोरची आपली प्रतिमा सांभाळण्यासाठी सदस्य प्रयत्नशील रहातील असा अंदाज आहे.

सध्या तरी ही व्यवस्था कशी चालते हे पहाणं महत्त्वाचं ठरेल. त्यात गरज पडली तर सुधारणा करूच. पण प्रथम सोपी सिस्टिम चालवून बघू.

कल्पना समजली आहे. यातूनच लेखांचीही वर्गवारी करण्याची व्यवस्था विकसित करता येऊ शकेल.

आ.रा.
सध्या एक क्लिक करून लेखांची वर्गवारी करण्याची सुविधा नाही, पण भविष्यात अशी सुविधा देण्याचा विचार आहे. शिवाय काही सुजाण वाचकांकडून असे निवडक लिखाण 'आर्काईव्ह' करण्याचाही विचार आहे. दर महिन्याचे असे आर्काईव्ह्ज एकत्र ठेवण्यात येतील ज्यात चांगले लेख आणि/किंवा प्रतिसादांमधेही उत्तम चर्चा असणारे धागे असतील.

संकेतस्थळावरचं चांगलं साहित्य एकत्र ठेवता यावं आणि जुन्या-नव्या सर्व सदस्यांना शोधण्यास सोपं जावं असा त्यात विचार आहे. (होय, तुमच्याकडूनच ही कल्पना फार पूर्वी आली होती.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>व्यक्तीशः मला एखाद्या प्रतिसादावरचा असा बहुसंख्येवर आधारलेला कौल नको. <<

एक गोष्ट सांगायची राहून गेली. यात निव्वळ बहुसंख्येवर आधारित कौल नसावा अशी अंतिम अपेक्षा आहे. ज्यांच्या प्रतिसादांना सातत्यानं चांगल्या श्रेणी मिळतील (निवडक संपादकांकडून) अशा प्रतिसादकांनासुद्धा श्रेणी देण्याची सोय मिळावी अशी इच्छा यामागे आहे. म्हणजे जे जबाबदारीनं वागतील त्यांना अधिक जबाबदारी अन जे खोडसाळपणा करतील त्यांना खोडसाळपणा करण्याची मुभा असंही म्हटलं जाऊ शकतं.
(थोडक्यात काय, तर मोडक असेच प्रतिसाद देत राहतील तर त्यांना श्रेणीसशक्त केलं जाईल. खोडसाळपणा करायचं स्वातंत्र्य मात्र त्यांना नेहमीच असेल.)

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझे मुद्दे मांडून झाले आहेत.
तंत्रज्ञानाची मर्यादा म्हणूनही काही गोष्टींचा स्वीकार करावा लागेल. उदाहरणार्थ, श्रेणींमध्ये मला अपेक्षीत असलेले काही गुणविशेष नाहीत. ते समाविष्ट करता येणं सध्या शक्य नाही, असं दिसतंय.
बहुमताविषयी घासकडवी/चिंतातूर जंतू यांनी लिहिलेलं स्वीकारावं लागेल. तो व्यवहार्य उपाय आहे. पण सुधारणांचा प्रयत्न चालू राहिला पाहिजे. मुंग्यांचे बहुमत होऊन हत्ती मारला जाऊ नये, तद्वतच एखाद-दुसऱ्या हत्तींकडून कुणाला चिरडून टाकलं जाऊ नये.

(थोडक्यात काय, तर मोडक असेच प्रतिसाद देत राहतील तर त्यांना श्रेणीसशक्त केलं जाईल. खोडसाळपणा करायचं स्वातंत्र्य मात्र त्यांना नेहमीच असेल.)

आता थांबतो. ही प्रणाली वापरून पाहतो.

कालपासून अनेक प्रकारचे प्रतिसाद टाकून (अवांतर, खोडसाळ, सर्वसाधारण) मी इतर त्याला कशा श्रेणी देतात हे पाहिले. मोडकांना येणार्‍या बराचशा शंका मलाही येत आहेत. श्रेणींचा पर्याय सध्यापुरता ठीक वाटतो परंतु निगेटीव्ह प्रतिसाद देताना आपण उगीचच हार्श होतो आहोत का? प्रत्येक अवांतर प्रतिसादावर आपलं मत वाया घालवण्यासारखं आहे का? वगैरेवर सामूहिक विचार करणे महत्त्वाचे वाटते.

तूर्तास

तंत्रज्ञानाची मर्यादा म्हणूनही काही गोष्टींचा स्वीकार करावा लागेल. उदाहरणार्थ, श्रेणींमध्ये मला अपेक्षीत असलेले काही गुणविशेष नाहीत. ते समाविष्ट करता येणं सध्या शक्य नाही, असं दिसतंय.

हे मान्य करावे लागेल.

आताच आल्याने ही प्रणाली कशी चालते ते समजलेले नाही. शिवाय प्रत्येक धाग्यावर आपापला थ्रेशोल्ड सेट करणे थोडे आडनिडे वाटले.
१. प्रत्येक सदस्याला प्रत्येक क्याट्यागिरीतला थ्रेशोल्ड सेट करता यावा. म्हणजे समजा 'क्ष'ला खोडसाळ प्रतिसाद आवडतात पण कैच्याकै आवडत नाहीत आणि 'य'ला माहितीपूर्ण आणि विनोदी प्रतिसाद आवडतात पण भडकाऊ प्रतिसाद आवडत नाहीत तर 'क्ष' आणि 'य' यांना आपापल्या आवडत्या प्रतिसादांच्या श्रेणींच्या रेंज (आवाका!) 'माझे खाते' मध्ये अस्थायी स्वरूपात साठवता याव्यात. म्हणजे प्रत्येक धाग्यावर तेच ते काम करत बसावे लागणार नाही.
२. -१ ते +५ असा आवाका का ठरवला? -५ ते +५ का नाही? एखाद्याला थोडेसे (उदा. -२) पर्यंत प्रतिसाद चालतील तर त्याने सगळेच प्रतिसाद का वाचावेत?
३. प्रतिसादांच्या श्रेणींच्या बेरजेवर एखाद्या सदस्याचे सदस्यत्त्व रद्द होऊ शकते का? तसा काही संबंध आहे का? ते स्पष्ट झाले नाही.
बाकी वापरून पहिल्यावर...

'उपेक्षित' ह्या श्रेणीचा अर्थ पुढीलपैकी नक्की कोणता?
१) हा प्रतिसाद बिच्चारा उपेक्षित आहे. त्याला आपला म्हणा.
२) हा प्रतिसाद उपेक्षणीय आहे.
कृपया खुलासा करावा.

प्रियाली:

निगेटीव्ह प्रतिसाद देताना आपण उगीचच हार्श होतो आहोत का? प्रत्येक अवांतर प्रतिसादावर आपलं मत वाया घालवण्यासारखं आहे का?

अवांतर प्रतिसादांना मत दिलं नाही तर त्या प्रतिसादांचं गुणांकन १ एवढंच राहिल. याउलट चांगल्या प्रतिसादांना चांगल्या श्रेणी देत रहायचं म्हणजे त्यांच्या श्रेणी वाढत रहातील. दुर्लक्ष करण्याजोग्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष केल्यास ते खालीच रहातील, कारण चांगल्या प्रतिसादांचं गुणांकन वर जाईल.
आपलं 'कर्म' खर्च करून प्रत्येक वाईट प्रतिसादाला वाईट गुणांकन देण्याची गरज नाही; चांगलं गुणांकन देऊन काम होईल.

विसुनाना:

आताच आल्याने ही प्रणाली कशी चालते ते समजलेले नाही.

तुम्ही आल्याचं आत्ताच पाहिल्यामुळे, थोड्या उशीराने तुम्हाला श्रेणी देण्याची सोय देता आली. Smile

शिवाय प्रत्येक धाग्यावर आपापला थ्रेशोल्ड सेट करणे थोडे आडनिडे वाटले.
१. प्रत्येक सदस्याला प्रत्येक क्याट्यागिरीतला थ्रेशोल्ड सेट करता यावा. म्हणजे समजा 'क्ष'ला खोडसाळ प्रतिसाद आवडतात पण कैच्याकै आवडत नाहीत आणि 'य'ला माहितीपूर्ण आणि विनोदी प्रतिसाद आवडतात पण भडकाऊ प्रतिसाद आवडत नाहीत तर 'क्ष' आणि 'य' यांना आपापल्या आवडत्या प्रतिसादांच्या श्रेणींच्या रेंज (आवाका!) 'माझे खाते' मध्ये अस्थायी स्वरूपात साठवता याव्यात. म्हणजे प्रत्येक धाग्यावर तेच ते काम करत बसावे लागणार नाही.

प्रत्येक धाग्यावर थ्रेशोल्ड सेट करावा लागत नाही हे थोडं उशीराने लक्षात आलं आहे. एका धाग्यावर सेट केलं 'बदल साठवले' की ते सगळीकडे दिसत आहेत. क्वचित काही धाग्यांवर श्रेणी दिलेल्या नसतील तर थ्रेशोल्ड बदलावा लागेल.

प्रत्येक कॅटॅगरीसाठी हा थ्रेशोल्ड सेट करता यावा ही अपेक्षा गैरवाजवी नाही, पण त्यासाठी कोड बदलावा लागेल आणि सध्या तेवढे स्किल्स नाहीत. त्यामुळे शिकून बदल व्हायला थोडा वेळ लागेल. दुर्दैवाने किती वेळ लागेल ते मी आत्ता सांगू शकत नाही.

२. -१ ते +५ असा आवाका का ठरवला? -५ ते +५ का नाही? एखाद्याला थोडेसे (उदा. -२) पर्यंत प्रतिसाद चालतील तर त्याने सगळेच प्रतिसाद का वाचावेत?

प्रतिसादाला जर अनेकांनी चांगल्या श्रेणी दिल्या तर गुणांकन >५ होऊ शकतं. गुणांकन हे श्रेणींची बेरीज आहे. बाय डीफॉल्ट -१ ते ५ ही रेंज दिसते.

३. प्रतिसादांच्या श्रेणींच्या बेरजेवर एखाद्या सदस्याचे सदस्यत्त्व रद्द होऊ शकते का? तसा काही संबंध आहे का? ते स्पष्ट झाले नाही.

सध्या अशी (गैर)सोय नाही. सदस्यत्त्व रद्द होणे/करणे ही टोकाची कृती आहे आणि संवादाशिवाय असं काही करू नये असं माझं मत आहे.

शहराजादः

उपेक्षित' ह्या श्रेणीचा अर्थ पुढीलपैकी नक्की कोणता? १) हा प्रतिसाद बिच्चारा उपेक्षित आहे. त्याला आपला म्हणा.

होय. अंडररेटेड या शब्दाचं रूपांतर.

एखाद्या प्रतिसादातली मतं पटलेली नसली तरीही प्रतिसाद 'रोचक' अथवा 'मार्मिक' असू शकतो. उदा: या धाग्यावरची श्रावण यांची मतं मला बरीचशी पटलेली नाहीत, पण विचार करण्यायोग्य वाटतात असं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला वाटतं ११ श्रेणी या जरा जास्तच आहेत. त्यामुळे श्रामो म्हणतात ते योग्य वाटतं. जी श्रेणी सगळ्यात शेवटी मिळाली आहे ती मला दिसत असल्यास (ही सुविधासुद्धा चालत नाहिये असं वाटतंय.) आधीच्या श्रेणींचा उपयोग काय?
एकतर सर्व श्रेणींत किती गुणांकन आहे हे दिसायला हवे किंवा अगदी सुटसुटीत + आणि - अशी श्रेणी हवी. तसेच प्रत्येक धाग्यावर आणि प्रतिक्रियेवर जर सर्वच श्रेणींचे गुणांकन दिसणार असेल तर त्यांची संख्याही कमी करायला हवी.

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

गोंधळच फार... Wink

आता प्रतिसाद दिल्यानंतर आलेल्या प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा आलेली दिसते. हे उत्तम झाले.

श्रेणीबद्दल माझे मत असे आहे. तूर्तास वादविवाद होतील असेल प्रतिसाद झाकले गेल्याने वायफळ अवांतर आणी त्यामुळे उद्भवणर्‍या वेळखाऊ प्रक्रियेला थोडा लगाम मिळेल. हे लोकशाहीने (हा शब्द वापरला की उलट 'क्वेश्चनिंग' कमी होते म्हणतात Wink ) चालले असल्याने संस्थळ व्यवस्थापकांकडून कोणावर पार्शलिटी होते आहे अशा भावनांना कोणाच्या मनात बळकटी यायची नाही. कोण कोणाला काय श्रेणी देतो आहे हे न कळाल्यानेही कंपूबाजीला प्रोत्साहन मिळणार नाही.

सुरुवातीला श्रेणीदेण्याच्या नाविन्यतेमुळेही थोडे फार गोंधळ होतील, तरी सर्वांनी सबुरीने घ्यावे. (आम्ही आपले उगाच सल्ले देतो.)

-Nile

श्रेणी प्रकार /. वर पाहीला आहे.

संस्थळ खासगी मालकीचे आहे ह्या नावाखाली कोण एका अदृष्याची दडपशाही चालणार नाही तर? (कदाचित १०-१५ दृश्य लोकांची चालेल! ;))

भडकाउ मध्ये श्लेष आहे काय?

मला फारसे समजले नाही, पण श्रेणीचे प्रकार चांगले आहेत, नेमके आहेत.
त्यातुनही, वरील मुद्दा
>>>>२. एखाद्या धाग्यावर प्रतिसाद दिल्यास आपण श्रेणी देऊ शकत नाही आणि दिलेली श्रेणी हटवली जाते. (श्रेणी देण्याची सुविधा नीट सुरू झाल्यामुळे हे पुन्हा सुरू केलं आहे. काही दिवसांनी आलेल्या फीडबॅकप्रमाणे याचा पुनर्विचार करता येईल) <<<<
यात दिलेला प्रतिसादाबरोबर श्रेणी देण्याच्या अधिकाराची घातलेली सान्गड अप्रस्तुत वाटते. कारणे अनेक, पैकी;
१) मी (वा कोणीही) जो प्रत्यक्ष प्रतिसाद भीडभीकेपोटी देईन वा म्यानर्स म्हणून देईन, अशी गरज नाही की माझ्या मनात तोच प्रतिसाद द्यावा असे असेल.
२) वर म्हणल्याप्रमाणे प्रतिसाद कसाही दिला, तरी माझे खर्रेखुर्रे मत गोपनीयता पाळून मला श्रेणीद्वारेच देता येईल, हो की नाही? तर हे गोपनीयतेचे तत्व स्वतंत्ररित्या पाळायला नको का?
३) समजा एखाद्याला मला चान्गली श्रेणी द्यायची आहेच शिवाय मूळ मजकुरात भर म्हणून वा सडेतोड उत्तर म्हणून वा जशासतसे म्हणून माझ्याकडून वैचारिक "झब्बू" ही द्यायचे आहेत तर ते का अशक्य व्हावे?

अर्थात तान्त्रिक दृष्ट्या जे शक्य असेल ते आपण करालच, पण वरील प्रमाणे सान्गड ठेवू नये अशा मताचा मी आहे. नैतर याचा अर्थ असा व्हायचा की जो विधानसभा/लोकसभेला "मतदान" करतो त्याला नन्तर पाच वर्षात विरोधी (वा बाजुने) बोलायचा अधिकार (तसाही नस्तोच म्हणा Blum 3 )नाही, वा ज्याला विरोधात (वा बाजुने) बोलायचे आहे त्याने मतदानच करू नये! असेच काहीसे वाटते ना?
असो.

लेट्स सी.

हे कर्म फ्रीली ट्रेडेबल असणार का?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"उपेक्षित" या श्रेणीचा अर्थ देता येईल काय?
म्हणजे "खरे तर महत्त्व द्यायला पाहिजे असा प्रतिसाद, मात्र येथे उपेक्षा झालेली दिसते, हे बरे नव्हे..." आणि "+१" असा अभिप्राय आहे काय?

(फक्त शेवटली दिलेली श्रेणी दिसते, हे मला तितकेसे उपयोगी वाटत नाही. म्हणजे १० जणांनी चांगली श्रेणी दिली त्यानंतर एकाने "भडकाऊ" श्रेणी दिली, तर "+९ भडकाऊ" असे दिसेल. यामुळे प्रतिसादाबद्दल तितकेसे कळत नाही.)

नुकताच एके ठिकाणी प्रतिसाद दिला. त्याला कोणीतरी 'खोडसाळ' अशी श्रेणी दिली. त्या प्रतिसादात काय खोडसाळ आहे असे शोधतांना एक शब्द चुकून वगळलेला दिसल्याने तो टंकून प्रतिसाद पुन्हा प्रकाशित केला. ((मला खोडसाळ काही आढळले नाही. इतरांना तसे आढळणे शक्य आहे.) श्रेणी मिळाल्यानंतर प्रतिसाद संपादन करता येणे या प्रकाराची गंमत वाटली.

श्रेणी बदलून त्याला वरची श्रेणी दिली. उदा. मार्मिक किंवा सर्वसाधारण तरीही प्रतिसाद पहिलीच श्रेणी दाखवतो. लोकांना खोडसाळच दिसते. तसे न होता शेवटची श्रेणी दिसायला हवी.

मी प्रतिसाद दिल्यावर श्रेणी बदलेली दिसली! बहुतेक माणसं आणी भुतांना वेगळा नियम असावा! Wink

-Nile

>>एखाद्या धाग्यावर प्रतिसाद दिल्यास आपण श्रेणी देऊ शकत नाही आणि दिलेली श्रेणी हटवली जाते.
हे फारस पटल नाही. एखाद्या धाग्यावर दुस-या एका लेखकाची एखादी प्रतिक्रिया आवडल्यास त्या प्रतिक्रियेला रोचक/महितीपूर्ण अशी श्रेणी का देता येवू नये? कित्येक वेळा नवीन मुद्दा उपस्थित झाल्यावर तिकडे प्रतिक्रिया देणे प्रत्येक वेळी शक्य नसते मग नवीन मुद्द्याला एकदा प्रतिक्रिया दिली म्हणून श्रेणी का देता येवू नये?

हा मुद्दा मान्य आहे.

बाकी बरेच प्रश्न आहेत. सध्या सगळेच शिकाऊ उमेदवार असल्यामुळे सगळ्या प्रश्नांना आत्ता उत्तरं आहेतच असं नाही, पण निरीक्षणातून विज्ञान्/डॉक्यूमेंटेशन सुरू आहे. काही गोष्टी बदलायला आवडतील, उदा स्वाक्षरीच्या खाली श्रेणी असावी. पण कोडींगमधलं अज्ञान आड येत आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण प्रतिसाद दिल्यावरही श्रेणी देता येते. मी आत्ताच तुमच्या प्रतिसादास 'भडकाऊ' अशी श्रेणी दिली. श्रेणी उगीचच दिली आहे हघे.

कालच मी प्रतिसाद दिल्याप्रमाणे, मला आता मी प्रतिसाद दिल्यानंतरही प्रतिसादांना श्रेणी देता येते आहे.

मी निरर्थक श्रेणी दिली. Wink

-Nile

मी प्रतिसाद दिल्यावर श्रेणी बदलेली दिसली! बहुतेक माणसं आणी भुतांना वेगळा नियम असावा! Wink

भडकाऊचे निरर्थक झालेले नाही, हे नमूद करतो.

ते मी पण नमूद केलं. भुतांनी सेटींग्ज मध्ये खेळ केले असतील. Wink

बहुतेक श्रेण्यांमध्ये पण श्रेणी असावी. म्हणजे अ ला ब कापते पण ब ला अ कापत नाही वगैरे?

-Nile

प्रतिसादांसारखी लेखांना पण श्रेणी द्यायची सोय करता येईल का?

कंपूशाही मुळे श्रेणी बदलू शकते. बदललेली सहज समजूही शकते.
उदा. मला क्रिकेटमधले काहीही समजत नाही. मी त्या विषयीच्या धाग्यावर फक्त श्रेणी देत फिरू लागलो तर माझ्या 'जजमेंट'ची अर्हता काय??
हे प्रकरण जरा विचित्र वाटते इतकेच.
अन सर्वात मोठ्ठा आक्षेपः मला अजुनही कुणालाच श्रेणी देण्याची सुविधा मिळालेली नाहीये Sad

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तुम्हाला जर हा प्रकार फारसा समजत नै तर श्रेणी सुविधा कशाला हवीये?

सध्या ७१ सहसंपादक (श्रेणी देणारे) आहेत. या मॉड्यूलच्या उपयुक्ततेचा अभ्यास त्यातून सुरू आहे. हे मॉड्यूल उपयुक्त ठरल्यास अधिकाधिक लोक सहसंपादक असावेत हा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे आणि असेल.
शक्यतोवर लवकर हे सहसंपादक ऑटोमेटेड अल्गोरिदमने निवडावेत आणि कोणालाही हाताने निवडावे लागू नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

१. नावांची यादी इथे आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओहोहो हेच का ते घासकडवी म्हणत असलेले संस्थळावर नियमितपणे सकारात्मक व संस्थळाच्या अंतिम ध्येयाशी सुसंगत योगदान देणारे.
मजेदार आहे सिलेक्षन. आता निवांत पोपट, बाळकोबा असले आयडी आम्च्या प्रतिसादांना श्रेणी लावणार. आनंद आहे.

तुम्हाला का इंगळया डसताहेत कै कळेना बॉ!! करा रे यांना कोणीतरी मॉडरेटर का काय ते!!

'निवांत पोपट' ह्यांच नाव घ्यायचं काय कारण ब्वॉ.. आणि नावावरून कसा ठरवता तुम्ही कसलाही अधिकार, तुम्ही वाचलंय का यांचं काही.

मला काय हे श्रेणी वगैरे द्यायचा "अधिकार" नको बोवा!
[स्वगतः देतय कोण लिम्ब्या तुला? तू तर आख्ख्या नेटवरुन ओवाळून टाकलेला! तुला कशाला हवित ही सोन्गढोन्ग? तूच एक सोन्ग हेस]
लई जबाबदारीचे काम ते, हिथ आमाला पाच वर्षातुन एकदा लोकसभाविधानसभान्च्या विलेक्शनीला वोट देणे, अर्थात उमेदवारान्ना श्रेणी देणे जमत नै, पाच पाच मिन्टात येणार्‍या प्रतिसादान्ना दरवेळेस श्रेण्या देत बसणे कुठून जमणार? Blum 3
का कोण जाणे, लपुन लपुन श्रेणी देणे म्हणजे मला कुणाच्या पाठीमागे लपुन बसुन त्याला खडा मारल्यागत वाट्टय, त्यापेक्षा प्रतिसादावर सणसणीत प्रतिसाद देणे सोप्पे अन नेमके! काय असेल नसेल ते अरे ला कारे म्हणाव तोन्डावर, कस? Biggrin
(इथे स्मायली द्या बोवा, किमान दात विचकणारी, जीभली दाखविणारी अन डोळा मारणारी तरी हवीच हवी)

स्लॅश्डॉट जोमाने फॉलो करतय Wink

मराठीतील पहीलावहीला प्रतिसाद ष्रेणी अल्गोरिदम योग्य रितीने अंमलात आणल्याबद्दल धन्यवाद. कर्मा ची संकल्पना राबविल्या बद्दल अभिनंदन.

प्रतिसादांच्या श्रेणीबरोबरच धाग्यांना तारे देण्याची नवीन सुविधा काही धाग्यांवर दिसत आहेत. श्रेणी देण्याचा अधिकार असलेला भाग्यवंत नसलो तरी एक सूचना कराविशी वाटते. एखादा लाल तारा किंवा शून्य किंवा असे काहीतरी असावे म्हणजे एकही तारा नाही, कोणीही जराही वेळ या लेखनाला वाचण्यात घालवू नये असा त्रागा व्यक्त करण्याची काहीतरी सोय करता आल्यास करावे.

कोणीही जराही वेळ या लेखनाला वाचण्यात घालवू नये असा त्रागा व्यक्त करण्याची काहीतरी सोय करता आल्यास करावे.

सध्या एक काम करता येईल; अशा लेखांना अजिबात कोणीही काहीही तारे देऊ नयेत. असं केलं की सॉर्टींग अल्गोरिदनमधून हे धागे पार वगळलेच जातील. असे सॉर्ट केलेले उत्तमोत्तम धागे वाचायची सोय एका क्लिकमधे होईल यावर काम करते आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरेच ठिकाणी श्रेणी देणं रोचक दिसतंय. पण प्रत्येक वेळी दिलेली श्रेणी योग्यच असेल का ?
श्रेणी देणा-याच्या आवडीनिवडीनुसार व्यक्तीसापेक्ष गुणांकन होऊ शकेल ना ? एखाद्या संभाषणात केवळ एकाच व्यक्तीला गुणांकन आणि दुस-याला अजिबातच नाही असं होण्याची शक्यता असू शकते का ?

पुण्य खर्च होत असल्याने स्वतःसाठी श्रेणीची अपेक्षा नाही. निरर्थक, खोडसाळ अशा नकारार्थी द्यायच्या असतील तर हरकत नाही. Smile

....

व्यवस्थापकः व्यवस्थापकीय सोयीसाठी प्रतिक्रिया इथे हलवली आहे.