आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)

मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत '"दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता" अशी वाच्यता होती. तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे बनू लागले, त्यांत बहुतेक वसुली आणि तस्करीचा पैसाच लागत असे, अशी वाच्यता होती. नट आणि नट्यांना दाऊदच्या चरणी सर्वस्व अर्पित केल्याशिवाय सिनेसृष्टीत काम मिळत नाही, अश्या आशयाच्या गाॅसिप सिने पत्रिकांमध्ये वाचायला मिळायचे

१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. शेकडोंच्या संख्येत मुंबईत लोक मारल्या गेले. दाऊद फरार झाला. आता वाटले होते, सिनेसृष्टीत दाऊदचा प्रभाव कमी होईल. पण तसे घडले नाही. दाऊदची पकड सिनेसृष्टीवर अधिक मजबूत झाली. देशप्रेम, स्वाभिमान इत्यादी विसरलेले, केवळ पैश्यांसाठी नट आणि नट्या परदेशात असलेल्या दाऊदच्या चरणी नाक घासण्यात आणि दरबारात ठुमके धन्यता मानू लागले.

आता प्रश्न येतो आपली जनता आणि सरकार काय करत होती. दुसरा कुठलाही देश असता, तर अश्या कलाकारांवर सिनेसृष्टीत काम करण्यावर कायम बंदी टाकली असती किंवा आतंकवादीशी संबंध ठेवण्यासाठी त्यांना जेलमध्ये धाडले असते. (आपली सरकारने अश्या कलाकारांवर का कार्रवाई केली नाही, हेच समजत नाही). जनतेने हि अश्या कलाकारांचा बहिष्कार केला पाहिजे होता. पण असे घडले नाही. मुंबईचे वाघ म्हणविणार्या नेत्यांनी अश्या कलाकारांचा बहिष्कार करण्याच्या धमक्या वैगरे दिल्या होत्या असे ऐकिवात आहे. बहुतेक त्यांच्या धमक्यांना दाऊद समर्थित सिनेसृष्टीने 'कुत्र्यांचे भुंकणे' याहून जास्त भाव दिला नसावा. ज्या मुंबईत शेकडों लोक मृत्युमुखी पडले, त्याच मुंबईत अनेक नेता किंवा दरबारात ठुमके लावणारे दाउदच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकले अश्याही वाच्यता आहेत. (उत्तर प्रदेशातील गवर्नर श्री राम नाईक यांनी तर उघडपणे आरोप लावले आहेत).

यानंतर हि मुंबईत अनेक आतंकवादी घटना घडल्या. २००८च्या हल्ल्यात जनतेसोबत अनेक पोलीस अधिकारी हि मारल्या गेले. तरीही कराचीत बसलेल्या दाऊदचे नियंत्रण आपल्या सिनेसृष्टीवर कमी झाले नाही. आता तर पाकिस्तानी कलाकार हि सिनेसृष्टीत दिसू लागले. पण भारतात काम करीत असताना, इथे घडणाऱ्या आतंकवादी घटनांचा विरोध त्यांनी कधीच केला नाही. विषयांतर होईल, पण मला आठवते, अलिबाबा चालीस चोर मधले चोर हि ज्या घरात दरोडा टाकायचा असेल त्या घरातले मीठ खात नसे. इथले मीठ खाऊन हि, इथल्या आतंकवादी घटनांचा जर पाकी कलाकार विरोध करीत नाही, तर त्यांना इथे काम देण्यात काय अर्थ. खरे म्हणाल तर सिनेसृष्टीने जी मुंबईमध्ये आहे निदान त्यांनीतरी पाकी कलाकारांवर १९९३ नंतरच बहिष्कार टाकायला पाहिजे होता. आपल्या दुर्दैवाचे कारण असलेल्या दाऊदच्या कठपुतली कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचणारी मुंबईकर/ देशातील सिनेप्रेमी जनतेला काय म्हणावे.

आज काश्मिरात आपले सैन्याचे जवान शहीद झाले. आपल्या देशाचे मीठ खाणार्या पाकी कलाकारांनी या घटनेची निंदा केली नाही. उलटपक्षी पाकिस्तानांत परतून, आपल्या देशाची निंदाच केली, असे ऐकिवात आहे. अश्या पाकी कलाकारांचा बहिष्कार करण्याएवजी, सिनेमा सृष्टीतील सर्व मोठे कलाकार, पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करीत आहे. कारण स्पष्ट आहे, हे सर्व कलाकार आतंकवादी मालकाच्या इशार्यावर नाचणाऱ्या बाहुल्या आहेत. पाकी कलाकारांसोबत अश्या बाहुल्यांचा हि बहिष्कार आपल्या सिनेसृष्टीने/ आपण केला पाहिजे, हीच आपल्या शहीद सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. शेकडोंच्या संख्येत मुंबईत लोक मारल्या गेले. दाऊद फरार झाला.

दाऊद बहुधा ८६-८७ सालीच पळून गेला होता. बॉम्बस्फोटाआधी काही वर्ष.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सिनेनट-नट्या पैशांसाठी काम करतात. त्यांना त्यांचा प्रोड्युसर पैसे पुरवतो. प्रोड्युसरकडे कुठून पैसे येतात ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे वेलनोन सीक्रेट आहे.

पण या लेखात सगळा दोष नट-नट्यांच्या खांद्यावर ठेवलेला आहे. त्यांचे सिनेमे पैसे देऊन बघणाऱ्या तमाम देशप्रेमी जनतेचं काय? त्या सगळ्यांनी मिळून अशा लोकांचे सिनेमे बघायचे नाहीत असं ठरवलं तर हे प्रश्नच येणार नाहीत. मग नटनट्या दाऊदच्या तालावर नाचण्याऐवजी जनतेच्या तालावर नाचायला लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसरा कुठलाही देश असता, तर अश्या कलाकारांवर सिनेसृष्टीत काम करण्यावर कायम बंदी टाकली असती किंवा आतंकवादीशी संबंध ठेवण्यासाठी त्यांना जेलमध्ये धाडले असते. (आपली सरकारने अश्या कलाकारांवर का कार्रवाई केली नाही, हेच समजत नाही).

मला नाही वाटत की दुसर्‍या, कायद्याने चालणार्‍या देशात, तशाच परिस्थितीत, भारतापेक्षा काही वेगळे केले असते. उदा. अमेरिका किंवा कॅनडामध्ये अशा - म्हणजे नक्की कशा - कलाकारांवर सिनेसृष्टीत काम करण्यावर बंदी घालण्यामागे अनंत अडचणी आल्या असत्या. तसेच आतंकवादींशी संबंध ठेवण्यासाठी -म्हणजे नक्की काय -त्यांना जेलमध्येहि पाठवता आले नसते. आपण विचारपूर्वक जी न्यायव्यवस्था निवडली आहे तिची ही inevitable downside आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बालबुद्धि आम जनतेतून अशा प्रतिक्रिया येतातच पण 'ऐसी'वरहि तेच? You too, Brutus?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालबुद्धि आम जनतेतून अशा प्रतिक्रिया येतातच पण 'ऐसी'वरहि तेच? You too, Brutus?

कोल्हटकरांचा मला जो पॉइन्ट आवडतो तो हा की ऐसीकरता त्यांची एक व्हिजन आहे - बालबुद्धी मते न मांडणारे, उथळपणा न करणारे सदस्य, "गा च्या गां" वगैरे भाषा न वापरणारे सदस्य असे ऐसी आहे/असावे.
या व्हिजनमुळे एक हुरुप येतो व अंतर्मुख (मी तरी) होते - हे वास्तव आहे. अन्य अनेक सदस्य होत असतील असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्य अनेक सदस्य होत असतील असे वाटते.

नाही म्हणजे कोल्हटकर काका आदरणीय आहेतच. आम्हीही त्यांच्याशी वागतांना हातातली विडी विझवून वागतो.
पण त्यांची पाठ वळताच पुन्हा चिलिम शिलगावतो! शेवटी पिवळ्या डांबिसाचीही काही सेल्फ आयडेंटिटी आहे की नाही?
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile Smile
मलाही ऊथळ वागलं नाही तर चुकल्यासारखं होतं :(.... आई शप्पत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आक्रमक' देशातल्या कलाकारांना घेऊन सिनेमे काढण्याबद्दल, लोकांच्या मताबद्दल मला कुतूहल वाटतं. ऐसीवर आणि बाहेरही अनेकांना इस्रायलच्या लष्करी सामर्थ्य, पॅलेस्टाईनींना चिरडण्याबद्दल आकर्षण आहे. त्याच इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधल्या दिग्दर्शिका दोन्ही देशांमधले कलाकार, तंत्रज्ञ मदतीला घेऊन उत्तमोत्तम चित्रपट काढतात. अगदी युद्धखोरीविरोधी चित्रपटही बनतात आणि ते मिरवलेही जातात.

---

हा असा धागा 'सलमानचे सिनेमे बघू नका' असं म्हणाला काढला असता तर अधिक आनंद झाला असता. पण दोन-चार सामान्य लोकांचे, पोलिस शिपायांचे बळी गेले तरी त्यात राष्ट्रभक्तीचा मसाला नसल्यामुळे असं म्हणावंसं कोणाला वाटत नसावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी व्यक्तिश: कुठल्याही देशाच्या कलाकारांचा विरोधात नाही. पण जो देशाचे मीठ खातो, इथल्या सुख-दुखात त्याने सहभागी व्हावे हि अपेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारत पाकिस्तानच्या संबंधांचं ओझं बॉलीवूडने वाहावे अशी एक बालिश अपेक्षा असते . पाकिस्तानने काही कुरापत केली की पहिले लोक बॉलिवूडकडे बोट दाखवतात . अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा लेख http://www.firstpost.com/bollywood/surgical-strikes-done-lets-ban-bollyw...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

विषारी वडापाव साहेब, कलाकारांचा जनतेशी सरळ संबंध जोडला जातो. अप्रत्यक्ष युद्धात - भारताने किती सिमेंट विकत घेतले किंवा किती धान्य आयात केले याचा जनतेवर प्रभाव पडत नाही. पण कलाकारांचा बहिष्कार जनते पर्यंत पोहचतो. अप्रत्यक्ष युद्धात हेच महत्वाचे. (पराजयाचा फील येतो). या शिवाय बिना नाव घेता, आम्ही सर्व आतंकी घटनांचा विरोध करतो एवढे म्हणण्याचे औदार्य एका हि पाकी कलाकाराने केले नाही. उलट पाकिस्तान मध्ये जाऊन आम्ही फक्त पैसे कमवायला तिथे जातो, भारतीय जनतेप्रती आम्हाला कुठलीच सहानभूती नाही,असे त्यांचे आचरण.

कालच पाक अधिकृत काश्मिरी जनतेने आतंकी केम्पांविरूढ प्रदर्शने केली. का? कारण आग त्यांच्या हि घरापर्यंत पोहचली. हीच सर्जिकल स्ट्राईक ची सफलता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्जिकल स्ट्राईक च यश /अपयश हा वेगळा मुद्दा आहे . प्रत्यक्ष फरक पडतो ओ सिमेंट आणि धान्य या गोष्टींचा . आपल्या उद्योगपतीना कुणी प्रश्न विचारतो का ? का बॉलिवूड सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून हाणा त्यांना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

काल पोलिश स्त्री-पुरुषांनी (होय पुरुषांनीही) गर्भपातावर सरसकट बंदी घालणाऱ्या कायद्याविरोधात मोठ्या निदर्शनं केली; त्यामुळे ह्या कायद्याविरोधात संसदेत मत द्यावं असे निर्णय मोठ्या राजकीय पक्षांनी घेतले आहेत. ह्यात रशिया, नास्तिक किंवा अन्य देशांचा हात आहे, असं वाचायला मला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.