एका जगात...

एका जगात अनेक जगं
अनेक माणसं एका माणसात

रावणाच्या दहा तोंडांतलं
एक तोंड रामाचं
एक सीतेचं
एक लक्ष्मण एक बिभीषण
एक हनुमान
कुंभकर्ण एक एक वाली
एक शूर्पणखा
आणि एक मंदोदरीदेखील

एका वास्तवात अनेक वास्तवं
अनेक स्वप्नं एका स्वप्नात

तुझ्यात एक मी आणि
माझ्यात एक तू
हे भल्तंच रोमँटिक
आणि सोडून द्यायचं अस्तं
जे जे रोमँटिक ते ते आजच्या
काळात
हास्यास्पदय म्हणतात ते

एका भगव्यात लाल आणि पिवळा
एका हिरव्यात पिवळा आणि निळा
यांचं काय करायचं?
आणि एका पांढर्‍यातून येतात सगळे
एका काळ्यात लोपतात
त्याचं काय?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

ही कविता निद्रानाशावर उत्तम उपाय. रात्री परत वाचून पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शांत झोप लागली असेल तर सांगा; मीही मग आज रात्री पुन्हा वाचून पाहीन म्हणते.
अख्खा संग्रह वाचला, तर कोमात जाता येईल का? आणि कायमचं झोपायचं तर किती संग्रह वाचावे लागतील, असे दोन उपप्रश्नही मनात आले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

अख्खा संग्रह वाचला, तर कोमात जाता येईल का? आणि कायमचं झोपायचं तर किती संग्रह वाचावे लागतील, असे दोन उपप्रश्नही मनात आले. (स्माईल)

कोमात जायचे असेल, तर आख्खा संग्रह, आणि कायमचे झोपायचे असेल तर असे असतील नसतील तेवढे सगळे संग्रह, वाचण्याऐवजी कोणी टाळक्यात हाणल्यास (संग्रहांचा) उपयोग होण्याची शक्यता अधिक वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भरपूर. गाढ झोप लागली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पक.

माझा अतिचिकित्सकपणा म्हणा -- रावणाच्या "अन्य" तोंडांकरिता नऊ अन्य नावे आहेत याची मी मोजून खात्री केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शैलीमुळे थॉट मारला जाणे ही मोठीच समस्या आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रावणाच्या तोंडांची उपमा आवडली, पण एकंदरीत कविता काहीशी बाळबोध वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता बै तुम्हाला "अपाविमं"वाल्यांनी झोडपून काढण्याचा उपद्व्याप केलाय. तुम्ही काही उत्तर का देत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0