Skip to main content

टूथपिक

निकिताला एमबीए कॉलेजला ऍडमिशन मिळाली म्हणून तिने पार्टी अरेंज केली होती. निकिताची पार्टी म्हणजे मह्या घरचं कार्य असल्यासारखा एक्साईटेड झाला होता.

"पर्सनल बाऊण्ड्री" अर्थात वैयक्तिक सीमारेषा

 

नुकताच नेटफ्लिक्सवर मंचकदृष्यांनी खचाखच भरलेला एक स्पॅनिश चित्रपट बघितला. एका पोरसवदा अल्लड तरूण-तरूणीच्या प्रेमाभोवती गुंफलेली ती कथा होती. या चित्रपटात कामक्रीडेचे जे चित्रण आहे, ते नेहेमीपेक्षा वेगळे आहे असे लक्षात आले. कामक्रीडेत आलापी संपल्यानंतर बंदीश चालू करताना नायक नायिकेची "परवानगी" मागताना दाखवला आहे. "consent" ही कल्पना जनमानसात रुजावी म्हणून लेखक/दिग्दर्शकाने हे केले असावे. पण मला याचे कौतूक वाटले कारण चित्रपटात "consent" स्पष्टपणे प्रथमच बघायला मिळाला.

अपग्रेड-त्रुटी-संकलन-धागा (भाग २)

अपग्रेडमुळे गोष्टी बऱ्याच निराळ्या दिसत आहेत. यातील त्रुटी इथे प्रतिसाद देऊन लक्षात आणून द्या.

नबा, हा तुमचा उद्योग ...

नबा, हा तुमचा उद्योग (तुम्ही प्रतिसाद दिलेला धागा ताजा प्रतिसाद देउन वर आणायचा) करताय तरी कसा????? तुम्ही तुमच्या प्रतिसादांची लिस्ट साठवून ठेवली होती? एकेक धागा वाचून करताय?? काही स्क्रिप्ट लिहिली आहात का???

यातल्या कुठल्याही पर्यायासाठी खूप वेळ हवा हाताशी आणि त्याच्या दसपट धीर !! हे दोन्ही तुम्हाला उपलब्ध असलं तर ते अदितीला मदत करण्यात - आणि एकंदरीत सगळी साईटच सुधारण्यात - का नाही घालवताहा? !! आणि हे करायची काही सोपीशी युक्ती असली तर कृपया ती सांगा - त्यासाठी मी हा अख्खा धागा काढलाय बघा :-). 

गाथा सागरतळाच्या सफरीची

समुद्राच्या अंतरंगात, सागरतळाशी असलेलं समुद्री जीवांचं व प्रवाळांचं विश्व आणि त्यातलं नाट्य हे किती मती गुंग करणारं आहे! त्या नितांतसुंदर आणि अद्भुत विश्वाची, नुसती पुस्तकी ओळख न होता, त्या विश्वाची अद्भुत सफरही घडली. तिची ही गाथा...

ललित लेखनाचा प्रकार

31 डिसेंबर

Happy New Year"काय मग ह्या वेळी ३१st चा काय प्लॅन ?" मला वाटत हा डिसेंबर मधला सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न असावा. आणि त्याची शेकडो उत्तरे असली तरी "काही नाही जेवून दहा वाजतात गुडूप होऊ " हे उत्तर ०. ०००१ % सुद्धा नसेल हे नक्की. खर ना ?
सध्या सगळ्यांचे ३१ डिसेंबर च्या पार्टीचे प्लॅन्स चालू असतील. सरत्या वर्षाची उजळणी करत नवीन वर्षाच्या स्वागताला सगळी दुनिया सज्ज असते. श्रीमंतांच्या क्रूझ पार्ट्या किंवा सामान्यांच्या सोसायटीच्या गच्चीवर वर केलेल्या पार्ट्या सगळ्यांचा भाव तोच!

ललित लेखनाचा प्रकार

दुआ

या तर, सरसावू कर आपणही,
आम्हां, ज्यांना अनुष्ठाने स्मरतही नाही..

आम्हीं जे प्रेमाच्या ध्यासाशिवाय
कोणती मुर्ती कोणता ईश्वर ध्यानी ठेवत नाही..

या तर, ढळू देऊया हा जीवंततेचा झरा,
रोजरोजच्या धबडग्यात उद्याची शीतल चांदणं माळूया...

ते जे अहर्निशी पिळवणूकीत हताश पडलेत,
त्यांच्या पापण्या फडफडू देत अंधार आणि उजेडाच्याही पलीकडे..

ज्यांच्या दृष्टीसमोरून सकाळची किरणेही सरत नाही,
त्यांच्या रात्रींत कुठलासा दिवा उजळू दे..

ज्यांच्या पावलांमध्ये कुणावरचा विश्वास दिसून येत नाही,
त्यांच्या नजरेत कुणीतरी दृढता भरू दे..

एकारा

विसरायला काय होते तुला.. जीवनाचा ओघ.
वाळू निसटावी आणि फैलावी तशी सैल पडलेली तुझी धावपळ.

रूजलेली मुळें किती खोल आहे, या जीवनाची, तुला कुठे ठावूक आहे..

ऊन पडावे तसे तुला आठवणींचा पान्हा फुटतो आणि रात्र उजाडावी तशी जरा जीर्ण आकारशून्य निराशा वेढून घेते.

लाल रंगावर निळाई तरळते तसं तुझं शरीर. बालकवींचा औदुंबर जसा.
स्नायूंच्या चेतनाचे दरवाजे आतून बंद केलेले, की आतच ढकललेले.

बागेतल्या मकरंदावर दरोडा घालणारे भुंगे तुझ्या आयुष्यात आलेत,
बाग बनवून गेले आयुष्याला तुझ्या..

दुसरा नाही, म्हणून तू राहतो, निजतो, गुंडाळून घेतो एकारातच..
वाह!