Skip to main content

फोटोग्राफी कशी करावी

मिपावर फोटोग्राफीच्या थियरीबद्दल स्वॅप्स यांनी खूप छान मालिका लिहिली आहे, ती नक्की वाचा. आपण DSLR कॅमेरा उत्साहाने घेऊन येतो, खूप छानछान फोटो काढावेसे वाटतात. थोडीफार थियरी पण माहीत असते, पण बर्‍याचदा होते काय की आपण ऑटो मोडमध्येच अडकून पडतो. अशा लोकांसाठी थोडी तोंडओळख म्हणून हा लेख लिहित आहे. मी काही फार दिग्गज फोटोग्राफर नाही, पण प्रत्यक्ष उदाहरण देऊन फोटोग्राफी शिकवणारे लेख मराठीत तरी मी पाहिले नाहीत, म्हणून घाबरत घाबरत हा एक प्रयत्न करत आहे, कृपया गोड मानून घ्यावा.

नवशिका/नवशिकी फोटोग्राफर साधारणतः असा फोटो काढतात.

स्पर्धा का इतर?

ही बातमी समजली का? - १२७

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____

मोबाइल फोनमुळे कर्करोग ?

Taxonomy upgrade extras

मोबाईल फोनच्या वापराने कर्करोग होतो का नाही ? भयंकर पेचात टाकणारा हा प्रश्न ! आजकाल प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा कारण जगातील बहुसंख्य लोक आता ‘मोबाईलधारी’ झालेले आहेत. मग काय आहे या त्रस्त करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ? जरा थांबा. न्यायालयात उलट तपासणी घेणारा वकील जेव्हा गुळूमुळू किंवा मोघम उत्तर देणाऱ्या साक्षीदाराला ‘हो’ का ‘नाही’ असे खडसावून विचारतो तसे मला किंवा शास्त्रज्ञांना विचारू नका ! कारण, आजच्या घडीला तरी या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ या दोन पर्यायांच्या मध्ये कुठेतरी आहे.

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७१

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

---

हे पुण्य काय भानगड आहे ब्वॉ. ऐसीचा मालक यमराज तर नही ना? नाहीतर उगीच मेल्यावर कळायचे कि वर गेल्यावर पाप-पुण्याचा घडा बघतात तो हाच होता म्हणून.

वरात

जणू एखादा शिकारी दबा धरून असावा तसे शंकर्या आणि राजा रात्रीच्या गुडूप अंधारात उभे होते. “आईघाले किती वेळ लावत्यात बघ…दोन तास झालं उभारलोय पाय दुखाल्यात माझं” चौदा वर्षाचा राजा वैतागून बोलला.चौदा चा असल्यान त्याला उगीचच मोठा झाल्याचा फील यायचा त्या मूळं प्रत्येक वाक्यात शिवी असलीच पाहिजे याची तो काळजी घ्यायचा.छोट्या शंकर्या च्या ते सवयीच झाल होत.

“आरं चल कि मग म्होरच्या गल्लीत.. इथं का वाट बगतूयास वरातीची”असं म्हणून शंकर्या चौगुल्या च्या गल्लीकडं जाऊ लागला… आपल्या हून चार वर्षानं लहान असलेल्या बारक्याश्या शंकर्याला राजानं माग खेचलं

ललित लेखनाचा प्रकार

अमेरिका अमेरिका !

कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झाले कम्प्युटरच्या पदव्या घेतल्या
आता आम्ही लायक झालो एकच एक घोष करण्या – अमेरिका अमेरिका

पालक आमचे कृतार्थ होता लागलेत आता वाट बघायला
कधी एकदाचे पोचतोय आम्ही सिलिकॉनच्या व्हॅलीला – अमेरिका अमेरिका

पासपोर्ट आमचा हातात आणि व्हिसा मिळवायचा निश्चय आमचा
एम्बसीमध्ये जाताजाता चालणार आहे जप आमचा – अमेरिका अमेरिका

आम्ही ज्यांना ‘आमचे’ म्हणतो सगळे ‘तिकडेच’ करताहेत नोकऱ्या
आम्ही तिकडे पोचताक्षणीच करतील तेही जल्लोष केवढा – अमेरिका अमेरिका

विदेश्भूमीच्या गालीचाला लागला एकदा की पाय आमचा
किती पटीने वाढणार की हो बाजारातील भाव आमचा – अमेरिका अमेरिका

धूसर

जो तुफ़ानी दर्या से बगावत कर जाये वो इश्क
भरे दरबारमे जो दुनिया से लड जाये वो इश्क
जो मेहेबूब को देखे तो खुदा को भूल जाये वो इश्क

ललित लेखनाचा प्रकार

बीटल्स बद्दल थोडेफार

१९५७ -५८ सुमारास लिव्हरपूल सारख्या कला प्रांतात फारश्या प्रसिद्ध नसलेल्या शहरात ४ टीनएजर पोरं ( १४-१७ वयोगटातील ) एकत्र आली आणि त्यांनी एक बँड काढला. बरीच नावे बदलत अखेर त्यांनी बीटल्स हे नाव घेतले . पहिली ४-५ वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी घासूगिरी करत करत ( ज्यात हॅम्बर्ग मधल्या रावडी बार्स मध्ये मद्यधुंद सेलर्ससमोर मध्ये दररोज रात्री ८- ८ तास गाणे वाजवणे वगैरे सुध्दा आले) ते एक घट्ट परफॉर्मिंग बँड बनले .या घासूपणाचा फायदा त्यांना नंतर,(तेव्हा पर्यंत फारश्या प्रचलित नसलेल्या ) स्टेडियमभर फॅन्स समोर बिनधास्त आरामात परफॉर्म करण्यात झाला.

समीक्षेचा विषय निवडा