Skip to main content

दी ब्लॉग ऑफ युजिनिया वॉटसन: २

आधीची प्रकरणे:

प्रकरण १

***

प्रकरण २: ४ सप्टेंबर

दी ब्लॉग ऑफ युजिनिया व्ही. वॉटसन, दी सॉसेज किंग ऑफ शिकागो

४ सप्टेंबर

शप्पथ मी हे रोजच्या रोज लिहायचं ठरवलं होतं. पण मधले तीन दिवस कुठे गेले कुणास ठाऊक, बघता बघता एकदम चौथाच दिवस उगवला.१

हज अनुदान

अलिकडे सर्वोच्च न्यायालयाने हज अनुदाने टप्प्याटप्प्याने कमी करत दहा वर्षांत ती संपूर्ण थांबवावीत असा आदेश सरकारला दिला आहे.ह्यानिमीत्ताने लोकसत्तेत प्रा. महेबूब सय्यद ह्यांनी लेख लिहीला आहे. लेख बराच कंठाळी आहे (विमाने बनवणार्‍या बोईंगसारख्या कंपन्या, अमेरिका इत्यादी अनावश्यक उल्लेख त्यात जागोजागी आहेत).ते जाऊ दे. पण त्याचा मतितार्थ असा की 'हज अनुदान' हे १९९० च्या अगोदर अस्तित्वात नव्हतेच.

इंग्लिश मॅडम!

केंद्र शासनाच्या सेवेत सरकारी कर्मचा-याच्या तब्येतीला सोसेल इतपत कार्यरत असलेल्या पुरुषोत्तम भोईरची बदली झाली. नवीन ठिकाण होतं बेळगाव जिल्ह्यामधल्या हुक्केरी तालुक्यातलं एक गाव. नकाशा तपासल्यावर गावाचं निश्चित ठिकाण समजलं. समक्ष जाऊन राहण्याची वगरे व्यवस्था प्रथम करावी म्हणून तो एकटाच बदलीच्या गावी जाण्यासाठी निघाला.
‘‘मुलांच्या शाळेचंही बघा. शक्यतो गावातच. शहरात एकटी कशी राहतील?’’ पुरुषोत्तमच्या बायकोनं आठवण करून दिली.
गावात जागा सहज मिळून गेली. रात्री जेवण झाल्यानंतर घरमालकाशी गप्पा सुरू झाल्या.
‘‘गाव लहानच दिसतंय. गावातली मुलं शालेय शिक्षणासाठी बेळगावला जातात की कोल्हापूरला?’’

वाढदिवस झाडाचा

वाढदिवस हत्तीचा
केक बनवला केळीचा
सोंडेने मेणबत्त्या फुंकू
हत्ती लागला केक कापू
जंगलातले
प्राणी पक्षी
गीत लागले गाऊ
हॅप्पी बर्थ डे टू यू

वाढदिवस मिठ्ठूचा
केक बनवला पेरूचा
शिट्टीने मेणबत्त्या फुंकू
मिठ्ठू लागला केक कापू
जंगलातले
प्राणी पक्षी
गीत लागले गाऊ
हॅप्पी बर्थ डे टू यू

वाढदिवस झाडाचा
केक बनवला बर्फाचा
मेणबत्त्या लागल्या पेटू
केक लागला सारा वितळू
जंगलातले
प्राणी पक्षी
गीत लागले गाऊ
हॅप्पी बर्थ डे टू यू

- ग्लोरी

‘नर्मदेऽऽ हर हर..’

नुकताच झालेला साक्षात्कार--

सतत त्रस्त वाटू लागले, चिडचिड होऊ लागली, सारे काही ‘निरर्थक’ वाटायला लागले, की नक्की काय करायचे? जगन्नाथ कुंटेंचे ‘नर्मदेऽऽ हर हर..’ वाचायला सुरुवात करायची. कोणत्याही पानापासून!

त्रिपुरामयः भाग १

“म्हणजे तुम्ही ब्राह्मण का?” आकस्मिकपणे त्या तरुणाने मला प्रश्न विचारला. माझ वजन पुरेसं नसत तर हा प्रश्न ऐकून मी उडालेच असते.

मोठ्यातल्या छोट्यांसाठी : झाडं असतात विद्यार्थी

झाडं असतात विद्यार्थी ऋतू त्यांचे गुरू असतात
झाडांचीही परिक्षा असते झाडंसुद्धा पेपर देतात
ऊन पाऊस वादळवारा अवघड अवघड विषय असतात
झाडांनाही ताण येतो झाडंसुद्धा कंटाळतात
अशावेळी झाडं मग पाखरांचं गाणं ऐकतात
जगत राहणं यालाच झाडं खरं मेरीट म्हणत असतात
वादळ कितीही मोठं असो झाडं जागा सोडत नाही
उन्मळून पडतात पण आत्महत्या करत नाहीत .....

- ग्लोरी

स्वागतासाठी तुझ्या, मरणा पुन्हा आलोच आहे...

कालचा मी तोच होतो आजही मी तोच आहे
अन् तुझ्या लेखी कधीचा वेगळा झालोच आहे

वाहतो आहे कधीचा एकटा ओझे सुखांचे
संपते ना दु:ख येथे, जीवना ही खोच आहे

गालिचे ताज्या फुलांचे भोवताली पसरलेले
मोह ना त्यांचा मला काट्यातुनी गेलोच आहे

वाळवंटे जीवनाची पार करता संपलो मी
स्वागतासाठी तुझ्या, मरणा पुन्हा आलोच आहे

यार थकल्या वादळाची झुंज आहे ही स्वतःशी
थांबण्याची सोय नाही हीच मोठी बोच आहे

मी न उरलो आज माझा, ना कधी झालो कुणाचा
संपले अस्तित्व माझे शून्य मी झालोच आहे

विशाल...

महाराष्ट्राची लोकधारा

काही दिवसांपूर्वी धाकट्या बहिणीच्या पिल्लांना घेवून गणेश कला क्रिडा मंचावर भरलेल्या बालजत्रेला जायचा योग आला. लहान मुलांना भुलावून घेतील, मोहवतील अशा अनेक गोष्ट होती. आमच्या सौ., बहिण, तिची पिल्लं मस्त रमली तिथे. पण माझ्या मनात भरलं एक छोटंसं शिल्पकलेचं प्रदर्शन. बहुदा शाडु किंवा प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या काही मोजक्याच सुबक मुर्ती. पण केवळ शिल्पकला एवढीच त्या प्रदर्शनाची ओळख नव्हती. त्याचं वैशिष्ठ्य होतं त्यातल्या महाराष्ट्राच्या लोकधारेतील काही महत्त्वाच्या आणि आजकाल अस्तंगत होत चाललेल्या घटकांचं, परंपरांचं चित्रण !